निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज हा धागा शोधावा लागला. अरेरे>>>>>>>>>>>तुझ्यामुळे. Proud तुझा इथला वावर कमी झालाय. पूर्वीसारे भरपूर फ़ोटो माहिती देत जा की. Happy
आणि मला आणि साधला तर तू बोलूच देत नाही. Uhoh Sad Wink Lol

शोभे हसु नको. मी कालच आठवण करुन द्यायला हवी होती खर तर त्याला. संध्याकाळी फोन केला तर म्हणे ... जाऊदे आता. होत असं कधी कधी (म्हणजे ते लग्न नुक्तच झालेल असल्यावर Wink )

शोभे हसु नको. >>>>>>>..तू अगदी त्या गाण्याच्या चालीतच म्हणालीस, "मेरा कुछ सामान..........." Lol

आज सही जगह पे पहुचाना भुलना नही.>>>>>और आज मै फिरसे "विसर" गया. Sad उद्याको नक्क्कीच पहुंचाता हु. सॉरी मोनाली. Sad

सुदुपार....

आज सलग दोन दिवस झालेत पाऊस पाठलाग करतोय....

एका वसतीग्रुहातील काही मुलं भाज्यांची लागवड करीत आहेत...
(फोटो मोबाईल वरुन काढलाय त्यामुळे धुसर असेल)
Photo1155.jpg

जिप्स्या, असे करता करता मोनालीला प्रोजेक्ट सबमिट करायची वेळ संपुन जायची तरी पालक काही पोचायचा नाही...

केना नावाचे एक तण सध्या आमच्या बागेत फारच माजले आहे - मात्र याला येणारी अतिशय नाजुक आणि इवलीशी निळी फुले आपले लक्ष नक्कीच वेधून घेतात -
(Common name: Whiskered Commelina • Hindi: काना Kana, Kankawa • Marathi: केना Kena
Botanical name: Commelina benghalensis Family: Commelinaceae (dayflower family) )

जून महिन्यात मी केनाचे तण उपटून टाकले आणि एका बागेच्या एका कोपर्‍यात टाकून दिले. जून महिना पूर्ण कोरडा गेल्याने हे सारे तण पार सुकून गेले. मात्र नुकतीच पावसाची झड सुरु झाल्याने सारे तण हिरवेगार दिसायला लागले - खाली फार चांगल्या जमिनीचा आधार नसतानाही हे कसे काय एवढे तरारले आहे याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते आहे... (फोटो मात्र आंतरजालावरुन साभार .. Happy )

5482655.jpg

हे फुल किती छोटुकले असावे हे दाखवण्यासाठी ( http://www.flowersofindia.net/catalog/slides/Whiskered%20Commelina.jpg ) हा फोटो किती नजाकतीने काढलाय पहा -- Happy

Whiskered Commelina.jpg

केना नावाचे तण>>> हो हे पुष्कळदा पाहिलेत. याचा फोटो पाहिल्याबरोबर पटकन विहिगावचा धबधबा आठवला. तिथेच याचा फोटो काढलेला. लगेच फोल्डर चाळुन बघितलं Happy धन्यवाद शशांक माहितीसाठी. Happy

या फुलांचे नाव काय? हि प्र भटकंतीत दिसले होते. हॉटेल परीसरात लावलेली होती. लीलीचाच प्रकार आहे ना?

प्रोजेक्ट सबमिट करायची वेळ संपुन जायची >>> बघ ना साधना, बहुदा ह्या स्पीडने, प्रोजेक्ट घरी आल्यावर पाने बाहेर डोकावतील मातीतुन. Sad

बहुदा ह्या स्पीडने प्रोजेक्ट घरी आल्यावर पाने बाहेर डोकावतील मातीतुन>>>>सॉरी Sad आता लगेचच बॅग मध्ये भरून ठेवलंय. आज नक्की देतो. फक्त निखिलल मला लिंकवर पिंग करायची आठवण कर ना प्लीज. त्याच्या वर्कस्टेशन माझ्या WS पासुन जरा लांब आहे. Sad

काय सुन्दर कलर आहे या फुलाचा! पण जिप्स्या... लिलीची पान वेगळी असतात ना?
काही झाड आणलीस की नाही हिमालयातुन???

आला एकदाचा! ओळखा पाहू कोण?
घ्या एक क्ल्यु.....सक्काळीच ६ वाजता जे लाइट गेले ते आत्ता ११ वाजता आले! हाय्क्का आता?

निखिलल मला लिंकवर पिंग करायची आठवण कर>>> केली>>>>धन्यवाद Happy ऑफिसला पोहचल्यावर सुपुर्द करतो. Happy

काही झाड आणलीस की नाही हिमालयातुन???>>>>नाही ना.एका जागी मुक्काम नव्हता. ९ दिवस भटकणार होतो म्हणुन नाही आणली.वरची झाडे हि हॉटेल परीसरात लावलेली. बाकी लाहौल-स्पिती मध्ये झाडे तशी विरळच. सगळं शीत वाळवंटच. हिरवळ कमीच. हे बघ हे असं Happy

गुर्जी ते लाल फूल आहे ना ...लिली सारखं... ते समरमधे उसगात खूप ठिकाणी दिसलं. म्हण्जे कंपाउंडला शेकड्यानी.
माझा टेक्निकल प्रॉब आहे ना सध्या नाहीतर इथे फोटो डकवला असता.

.<< बाकी लाहौल-स्पिती मध्ये झाडे तशी विरळच. सगळं शीत वाळवंटच. हिरवळ कमीच. हे बघ हे असं स्मित<<
व्वाह.... काय शान्तता असेल ना अशा ठिकाण!! अप्रतिम!!! ए, जागा बघ रे माझ्यासाठी तिथे... त्या पहाडात नैतर नदीकाठी. Wink
बाकी ग्लॅशिअर वै. दिसल का?

या फुलांचे नाव काय? हि प्र भटकंतीत दिसले होते. हॉटेल परीसरात लावलेली होती. लीलीचाच प्रकार आहे ना? >>>> होय रे जिप्सी - एशिआटिक लिलीचा प्रकार आहे हा - अनेक रंग आहेत यात... Happy

Pages