निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याचं मराठी नाव काहि केल्या आठवत नाहीए >>>>>

मराठी एकच नाव छान आहे - बाकीची नावे ऐकली की नकोच हे फुल पहायला असे होईल..... Happy

आषाढ हबेअमरी , चिचुरकांदा , चिकरकांदा

आषाढ हबेअमरी>>>>>>>>धन्यवाद शशांक. "अमरी", तुम्ही माहिती/फोटो दिल्यापासुन हेच नाव आठवण्याचा प्रयत्न करतोय. Happy

माझ्याकडच्या अडेनियमने चांगलच बाळसं धरलय...

baby adenium.jpg

कंसराज..फोटो मस्त. शशांकदा... श्वेतपरी सुंदरच.

जिप्सी.. मला हवयं बहावाच रोप...

सुदुपार...

लक्षमण फळे खुपच मस्त नाव आहे बुवा! चवीला कशी असतात?
कंसराज, कसले मस्त फोटोज आहेत, मन कस प्रसन्न झालय.
श्वेतपरी/ अमरी नावासारखीच गोड आहे.. पण तीचे पानं त्याहुन भावले...
कामिनी छानच लिहीतेस.. Happy

आपले पणा वाटायला माणसे,घर असेच फक्त पुरत नाही,अनेक लहान लहान गोष्टी तुम्हाला आपलेसे करुन घेतात.+++ हे खुपच आवडले..
अडेनियम खरच गोंडस आहे..

मंजु ताई, वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा!

red passinflower.jpg

(फोटो अंतरजालाहुन सभार..)

तर लोक्स, काल मंजु ताईं कडे एक १८ - २० जणांचे गटग झाले. त्यांच्यामुळे खुप छान ग्रुप मिळाला..
निसर्गाच्या गप्पा, पर्यावरणावरील समस्या,शुद्ध आहार, बीज वाटप, आणि खादाडी... खुप मज्जा आली..
माझ्या बरोबर लेक पण होती... तीला खुप आवडला हा ग्रुप.. कालचा दिवस कारणी लागला..

मायबोलीचे खुप आभार... मंजु ताईंची ओळख इथेच झाली..:)

दडपे पोहे खुप सही झाले होते...

मंजुताईंना वाढदिवसाच्या अनेकानेक आणि हार्दिक शुभेच्छा ....

सायली पातुरकर -
निसर्गाच्या गप्पा, पर्यावरणावरील समस्या,शुद्ध आहार, बीज वाटप >>>> यासंबंधी जरा डिट्लवार लिवा की ... Happy

पुरंदरे शशांक | : फुले सुंदर आहेत. मला आवडली. तुम्ही अजुन हलके घेतलेले दिसत नाही काहीच प्रतिसाद देत नाही आहात.

जिप्सी |: तुझ्या फुलामध्ये चतुरासारखे काय आहे.

माझ्याकडच्या अडेनियमने चांगलच बाळसं धरलय... :- हे मी वाचलेच नाही. मला वाटले लाल चाफा, याच्या कळ्या आहेत. आमच्याकडे सेम अशाच चाफ्याच्या कळ्या यायच्या.

पुरंदरे शशांक | : फुले सुंदर आहेत. मला आवडली. तुम्ही अजुन हलके घेतलेले दिसत नाही काहीच प्रतिसाद देत नाही आहात. >>>> अरेच्चा, असे काही नाही गं. मी कायम लाईट मूडमधेच असतो.... जसा वेळ होईल तसा प्रतिसाद देत असतो इतकेच. मा बो वर बहुतेकांचे फोटो अप्रतिमच असतात -त्यामुळे जमेल तेव्हा प्रोत्साहन देत असतो ... Happy
मागील पानावर तुझे छोटेसे मनोगत वाचले - सुरेखच लिहिलंय - तुला निसर्गाची मुळातूनच आवड दिसते आहे - ती आवड अशीच वाढत राहो ... इथे माबोवरही तुला आवडलेले/भावलेले लिहित रहा .... Happy

प्रत्यक्ष भेटीत कामिनी खुप शांत आणि अबोल वाटलेली. बहुतेक बोलण्यापेक्षा ती निगकरांचे निरिक्षण करत होती. तिला पाहुन एक क्षण मला माझ्या अखंडीत बडबडीची थोडीशी लाजच वाटायला लागली होती.

त्यामानाने इथे कमेंटी टाकताना मात्र तिच्या प्रतिभेला बहर येतो. बोलण्यापेक्षा ती लिखाणातुन जास्त व्यक्त होते असे वाटतेय एकंदर.... Happy

साधना/ ....... ------

एक क्षण मला माझ्या अखंडीत बडबडीची थोडीशी लाजच वाटायला लागली होती >>>>> मुझे लगता है तुम्हारा नाम "बसंती" तो नही !!!!

आता कसं परत घरी आल्यासारखं वाटतंय....

दुबईला एका मित्राबरोबर ( डॉ. विवेक खोसे ) गेलो होतो.. अबु धाबी, शारजाह, अल ऐन, हत्ता वादी, ओमान बॉर्डर... भरपूर भटकलो. अबु धाबीतली अतिशय देखणी मशीद बघितली, नाचरे कारंजे, गरम पाण्याचे झरे, नाचरे मोर, मीना बाजार, अमरातीतील सर्वात उंच पर्वत... आता हे कवतिक हप्त्या हप्त्याने दाखवत राहणार आहेच. भरपूर फोटो काढलेत. कधी एकदा इथे टाकीन असे झालेय. पण ते सगळे फोटो निवडून त्यावर संस्कार करून इथे टाकायला जरा वेळ लागेलच.

मॉरिशियस ते दुबई, एमिरेट्सचे ३८० ( डबल डेकर ) विमान होते आणि आता मुंबई ते दुबई पण तेच होते.

अरे वा, दिनेशदा आलात परत.
कसा झाला प्रवास?

रच्याकने, वाशी गटगहुन घरी गेल्यावर श्लोकला चॉकलेट दिलेले. तसा तो चॉकलेट खात नाही पण ते चॉकलेट अर्धे खाल्ले आणि मला थँक्यु म्हणाला. Happy त्याला तुमचं नाव सांगुन तुम्हाला फोनवर थँक्यु बोलायला सांगितले पण तुम्ही दुबईकडे रवाना झाला होतात. (बहुतेक) आईंनी फोन घेतला आणि त्यांना तो थँक्यु म्हणाला आणि चॉकलेट आवडल्याचे सांगितले. Happy

खुप मस्त झाला प्रवास... खजूराचे झाड झोडपून खजूर काढले, गरम पाण्याच्या झर्‍यात पाय सोडून बसलो..
सतराशे साठ पदार्थ असलेली गोर्धन थाली खाल्ली, सुकवलेले शहतूत खाल्ले, शाकंभरी ची सजावट बघितली, लंगरमधला प्रसाद खाल्ला, अमिरातीतल्या सर्वात उंच पर्वतावर फुललेली फुले बघितली, १४० च्या वेगाने चालणार्‍या गाडीत अजिबात न सांडता वरून पाणी प्यायलो, "तूझ्या भुकेच्या वेळेस तूला जेवू घातले नाही तर माझा रोजा अल्ला मान्य करणार नाही " असे म्हणणारा एक मित्र मिळवला. अमिरातीतल्या वर्ल्ड हेरीटेज साईटला भेट दिली....... हे सगळे दुबई भेटीत..
तिथून परत आल्यावर डॉ. विवेकने जबरदस्ती माझ्या सर्व टेस्ट करायला लावल्या.. त्या केल्या आणि काल इथे अंगोलात पोहोचलो.

शुभ श्रावणी सोमवार!

पुण्याच्या यावर्षीच्या पुष्पप्रदर्शनातील गुलाबपुष्पांनी केलेली महादेवाची ही सुंदर पिंड.

वॄत्तांत खुप मनापासून लिहिलाएस कामिनी.मला पुनःप्रत्ययाचा आनंद आला.
सर्वांनी प्रेमाने आणलेल्या त-हेत-हेच्या पदार्थांवर ताव मारायला जीव सुखावत होता.पथ्या-बिथ्य पार विसरायला झालं. अर्थात प्रेमाने आण्लेल्या असल्याने त्यातलं काहीच बाधणार नाही हे नक्की.
प्रथमच भेटत असूनही कुठलाच परकेपणा वाटला नाही.
गोव्याहून फक्त काजूच आणू शकले.( तशी मी फरशी सुगरण नाही, म्हण्जे जास्त आवडही नाही, असो....)
माझ्या कवितांचा कार्यक्रम कदाचित तुम्हाला बोर करेल. पण मी एखादी माझी कविता ,मी स्वरबद्ध केलेली त्या दिवशी म्हणायला हवी होती. पण पर्तायच्या गडबडीत राहून गेलं.
पुढच्या वेळेस नक्की.
मजा आली.

Pages