निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मजा आली सगळयाना प्रत्यक्षात भेटुन.
खादाडी सॅालिड झाली.+१
जागू अळूवडया बेस्ट. कामिनी पातोळ्या अप्रतिम.>>>>>+१

हं............ मज्जा केलेली दिसते. कामिनी पातोळ्या , आणि जागू अळुवड्या.......... हम सब डीटेलवार रेस्प्या मंगता हय!
तिकडे उसगावतही एक मिनी गटग अटेन्ड केलं पण इथे देशात काय जमत नाय! खरं म्हणजे पुण्याचं अगदी जमत आलं होतं.........................................

अरे व्वा... मस्तच झालंय गटग..
मी परत आल्यावर एकदा आपण सर्व भेटायचं ठरवू
तुम्हा सर्वां च्या वर्चुअल भेटीवर किती वर्षं समाधान मानून घ्यायचं बरं...

कामिनी करेक्ट. आमच्याकडे कामाला येतात त्या ताईनी दिले. त्यांच्याकडे ते मीठ लाऊन असे वाळवतात. मला विशेष नाही आवडले पण इथे अळूची चर्चा झाली होती म्हणून टाकूया म्हटलं.

इथे हिली एरिआ आहे सर्व शहरभर, त्यामुळे वॉकिंग ट्रॅक सुद्धा उंचच ऊंच टेकडीच.. चारी बाजूंनी रेन फॉरेस्ट ने घेरलेले , आंब्या च्या झाडांखाली सरपटत जावून खोबरी आंबे तोडून घ्यावे ( फोटू आहेत प्रूफ म्हणून !! Wink )
सकाळ संध्याकाळ वेगवेगळे पक्षी दिसत असतात. काळे कुळकुळीत चमकदार पण कावळे नाहीत, करडे, तपकिरी, चॉकलेटी पण चिमण्या नाहीत, चुकून हळदीच्या डब्यात पडल्यासारख्या इकडे तिकडे गडद ,फिकट हळदीचे डाग असलेल्या चिमण्यांसारखे दिसणारे चंचल पक्षी, मुठीत मावू शकतीलसे चिमुकले रंगीत हमिंग बर्ड्स , जे नाजूक फुलांच्या दांडीवर बसले तरी त्या दांड्या वाकत नाहीत इतके हलकेफुलके , मजाच मजा चाललेली असते..
औषधालाही माणूस दिसत नाही वॉकिंग ट्रॅक्स वर म्हणून फक्त आमचेच राज्य ..त्यातून कुणी गवत कापणारा मशीन घेऊन आला तर आपल्या एकछत्र राज्यात कोण घुसखोर आलाय असं वाटतं.. Proud

खूप मजा आली सगळयाना प्रत्यक्षात भेटुन.
खादाडी सॅालिड झाली.+१
जागू अळूवडया बेस्ट. कामिनी पातोळ्या अप्रतिम.>>>>>+१००
दिनेशदा ते गोरखचिंचेचे सरबत आणि जिप्स्याची सफरचंद वडी क्या बात हे मजा आली.
आंब्या च्या झाडांखाली सरपटत जावून खोबरी आंबे तोडून घ्यावे ( फोटू आहेत प्रूफ म्हणून !! ) वर्षुताई फोटो येऊद्या पटापट Happy

- (माझा कॅमेरा साधाच असल्याने फोटो क्वालिटीही साधीच आहे ... ) हे खोट आहे शशांकजी बहारदार आहेत प्रचि सुंदर टिपलयत पक्षांना Happy

नलिनी - प्रचि सुंदर आहेत.

सुप्रभात.

खरच अविस्मरणीय गटग झाला त्या दिवशी. सगळ्यांना भेटून फार बर वाटल.
वर्षूताई दिनेशदांनी तुझ्यासाठी दिलेल्या मिरच्या माझ्याकडे आहेत. त्या देण्या-घेण्याच्या निमित्ताने तरी भेटू. Happy

अन्जू मी पण ओळखले. मी खाल्ले आहेत एकदा लहानपणी हे सुकवलेले अळू महाडला.

मज्जा केलीयेत लोखो!
जिप्स्या...खादाडीचे फोटु लवकर टाक आम्हाला जळवायला. Sad

कुठल्या कुठल्या झाडान्ची देवाणघेवाण झाली?????.
अरे लोकहो, पुण्यातल पण निग गटग करा की! Happy

व्वा छान झालेल दिसतय गटग! फोटो आणि सविस्तर माहिती येऊ देत...

वर्षु ताई, फोटो टाका लवकर, इतक छान वर्णन करुन उत्सुक्ता वाढवलीत..

जागु तुला कुरियर मिळालं का? इकडे डीलीव्हर दाखवतय.. तुझा फोन पण लागत
नाहीये...

नमस्कार लोक्स Happy

जिप्स्या...खादाडीचे फोटु लवकर टाक आम्हाला जळवायला>>>>सध्या माझ्या घरचा नेट गंडलाय, सो १-२ दिवसात टाकतो फोटो. कामिनीने लिहिलेल्या वृत्तांताच्या धाग्यावरच सगळे फोटो टाकतो.

फक्त एक कन्फर्म करा, जो ग्रुप फोटो टाकलाय तो माबोवर प्रदर्शित करण्यासाठी सगळ्यांची परवानगी आहे का? अर्थात ज्या क्रमांकाने फोटो आहे त्या क्रमांकाने नावे देणार नाही. सो प्लीज कन्फर्म.

मी मिस केल. त्याच खूप वाईट वाटत होत. ३.३०ला घड्याळाकडे बघून आठवणसुद्धा झाली होती>>>>आरती. थोडावेळे येऊन जायचे ना?

शशांकजी पक्ष्यांचे फोटो खरंच खूप सुंदर आहेत.

जागू, मी नवऱ्याला म्हटलं होतं की जागू लगेच ओळखेल. दिनेशदाही ओळखतील कदाचित आणि ज्यांना अळूचा परिचय आहे त्यांच्या लक्षात येईल.

अरे व्वा ग्रुप फोटो... येउ देत ना लवकर!

अन्जु ते अळुचे काप कोकम सारखे दिसतायत! चवीला पण तसेच लागतात काय?

आरती. थोडावेळे येऊन जायचे ना? <<< जिप्सी, आमच वाशीमध्ये घर आहे पण मी हैद्राबादमध्ये राहते. त्याचच जास्त वाईट वाटत होत. Sad तुम्ही सगळेजण लांबून आला होता पण मला जमण्यासारख नव्हत.
साधनाताई, ट्री केक नाही बनवला का??

अग नाही बनवला, शनवारी घरी खुप काम होते त्यामुळे वेळ मिळाला नाही.

बनवला की टाकेन फोटो त्या बीबीवर.

जिप्सी, आमच वाशीमध्ये घर आहे पण मी हैद्राबादमध्ये राहते.>>>>ओह्ह. मला वाटलं तुम्ही त्यावेळेस वाशीमध्येच होतात. नो वरीज. तुम्ही इथे आल्यावर पुन्हा एकदा गटग करू. Happy

मला वाटलं तुम्ही त्यावेळेस वाशीमध्येच होतात. नो वरीज. तुम्ही इथे आल्यावर पुन्हा एकदा गटग करू<<< धन्यवाद जिप्सी. वाशीमध्ये असते तर दिनेशदा आणि तुम्हा सर्वांना भेटायला नक्की आले असते.
राणीच्या बागेसाठी ट्राय करेन. पुढच्या महिन्यात येणार आहे. पण मला ९ किंवा १० जमेल.

पण मला ९ किंवा १० जमेल.>>>>१० ऑगस्टला रक्षाबंधन आहे. सो ९ तारीख फायनल करायची का?
१५-१६-१७ मी नसणार. Sad

सायली नाही ग, त्या अळूची चव अशी सांगताच येत नाही, थोडी विचित्रच असते ते पूर्ण चघळून संपायला आल्यावर अगदी किंचित आंबट लागली मला पण खरंच अळूची चव मलातरी सांगताच येत नाही.

Pages