निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी, ह्यातला जुलै महिन्यातला कोणता? दुसर्‍या फोटोत आंब्याला मोहोर आहे.

जिप्सी, वर केलेल्या वर्णनामुळे त्या नजरेने बघितले आणि अर्थातच त्यामूळे जास्त आवडले ( अपील झाले)

दोन्ही मस्त दिसतायत. दोन्हीचे सौंदर्य वेगवेगळे

लिलिचे फोटो घेतले..तिथलेच शेजारचे हे २
१) ये..ल्लो ग्रीन Wink
https://lh3.googleusercontent.com/-zB7M7nWAbo8/U8Smych4vPI/AAAAAAAAGGk/olGDcWlRPiA/w767-h431-no/IMG_20140715_082116832.jpg
१) म्स्म्स्म्स्म्स्म्स्म्स्म्स.............ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआ..दरवळ!
https://lh4.googleusercontent.com/--WFbDc6P6ts/U8SmiaPlSfI/AAAAAAAAGGc/-XpD8HUVxAs/w321-h572-no/IMG_20140715_082104579.jpg

सायली, किती छान उपक्रम ! डॉ. कमला सोहोनी यांनी भात सडून न घेता, तसाच दळून त्याच्या भाकर्‍या कराव्या
असे सुचवले होते. तसे कुणी केल्याचे मी कधीच वाचले नाही.

आसमंत मधे डॉ इंगळहाळीकरांचे शेतीचे अनुभव मजेशीर आहेत.

शहतूत म्हणजे तुतीच.. पण तशी भारतात कुठे वाळवलेली मिळते असे वाचले नाही कधी. सुकवल्यावर ती लाल
रंगाची नाही रहात पण चवीला मात्र अप्रतिम लागतेय.

अबुधाबीच्या राजपरीवाराचे पुर्वीचे राहते घर आता संग्रहालय म्ह्णून जतन केलेय.. तिथे भरपूर मोगरा फुलला होता. तिथल्या ४५ अंश सेंटीग्रेड तपमानातही तो टिक(व्)ला होता हे नवल. जेवढा उन्हाळा कडक तेवढा मोगर्‍याला
सुगंध.. गल्फ मधे स्थानिक लोकांना सुगंधाचे वेड आहे. मस्कतमधे मोगरा, बकुळ, निशीगंध, प्राजक्त अशी अनेक
सुगंधी फुलांची झाडे आहेत. उद म्हणजे त्या लोकांचा जीव कि प्राण. उन्हाळ्यात अनेक सुगंधी वनौषधींची धुरी
घ्यायची पद्धत आहे तिथे. त्यांच्या पांढर्‍या झग्याला गळ्याजवळ जो गोंडा असतो तो खुपदा अत्तरात बुडवलेला
असतो.

प्रत्यक्ष भेटीत कामिनी खुप शांत आणि अबोल वाटलेली : साधना असे काहीजण म्हणतात खरे, पण मला तसे वाटत नाही. माझ्यामुळे कोणी दुखावले गेलेले मला आवडत नाही. म्हणुन मी शब्द जपुनच वापरते.
आपण कोणाच्या बाबतीत चांगले बोलु शकत नाही, तर त्याच्या बद्दल वाईटही बोलु नये.
आपण कोणाला सुख देऊ शकत नाही तर दु:खही देऊ नये असे मला वाटते.
तु लाईटली घेतेस म्हणुन मी तुझ्याबद्दल लिहते.

"तूझ्या भुकेच्या वेळेस तूला जेवू घातले नाही तर माझा रोजा अल्ला मान्य करणार नाही " असे म्हणणारा एक मित्र मिळवला. : दिनेशदा, पेरावे तसे उगवते. आपण जसे आहोत तसे आपल्याला मिळते. भविष्यात तुम्ही खुप मित्र मैत्रिणी आणि फॅन यांचा रेकॉड ब्रेक कराल. मला लक्षात ठेवा नाहीतर मी सही घेण्यासाठी आली तर म्हणाल कोण तु ?

जिप्सी : श्रावणातील पहील्या पावसात तु कुठे गेला होतास? पेणच्या आसपास तुझा कॅमेरा पाहीला होता.
सांगितले नाहीस तरी चालेल.
( हलके घ्या.)

कामिनी, मित्रमैत्रिंणीच्या बाबतीत मी अतिधनाढ्य आहे.. आणि तेही खरेच आहे, आपण चांगले वागले कि समोरचा चांगला वागतोच. असा माझा अनुभव आहे.

यावेळेस मला मुंबईचा पाऊस मनाजोगता अनुभवता आला नाही. मॉरिशियसमधे मात्र भेटलाच. तिथे सध्या थंडी आहे. ( दक्षिण गोलार्ध.. आपल्या उलट ऋतू )

मॉरिशियस जवळ समुद्रात म्हणजे समुद्राच्या खाली एक धबधबा आहे... वाचायलाही विचित्र वाटतेय ना ? खरं तर तो आभास आहे. पण दिसते खरे तसे. तो विमानातून बघितला मी. त्याचा फोटो नाही काढता आला ( नेटवर आहे )
पण दुसरे दोन धबधबे मात्र बघितले.

गल्फ मधे स्थानिक लोकांना सुगंधाचे वेड आहे. मस्कतमधे मोगरा, बकुळ, निशीगंध, प्राजक्त अशी अनेक
सुगंधी फुलांची झाडे आहेत. उद म्हणजे त्या लोकांचा जीव कि प्राण. उन्हाळ्यात अनेक सुगंधी वनौषधींची धुरी
घ्यायची पद्धत आहे तिथे. त्यांच्या पांढर्‍या झग्याला गळ्याजवळ जो गोंडा असतो तो खुपदा अत्तरात बुडवलेला
असतो.
दिनेशदा : खुप छान. मला येथेही सुगंध आला.

सगळे फोटो आणि माहिती वाचतेय. जिप्सीचा तो पेणचा फोटो मस्त आहे. असं आम्ही इकडच्या एका स्टेट पार्कमध्ये फोर सिझन्सचे फोटो काढुया म्हणून सुरूवात केली आणि नेमका त्याच वर्षी तिकडचा मुक्काम हलला Happy

यंदा हे कंद आम्हाला विसरले असं वाटलं होतं तितक्यात त्यातल्या एक-दोघांनी आम्हाला दर्शन दिलंच Happy

flowers.jpg

सुदुपार.

श्वेतपरी, सब्जा, लिलि , शिवपिंड आणि बाकीचे सगळेच फोटो फार सुंदर आहेत.

दिनेशदा तुमचे वर्णन ऐकून तुमच्या येणारा फोटोसकटचा धागा पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

कामिनी तू छान लिहीतेस. लिहत रहा. आणि तुझ्यासारखी वही मी पण शाळेत असताना बनवलेली. ती पण अशीच पावसाच्या पाण्याने गेली. त्यात मी रिडर्स डायजेस्ट मधून येणारी फुले, फ्लॉवरपॉटचे तसेच इतर मासीकात आलेल्या फुलांचे फोटो चिकटवायचे. त्यात वेगवेगळी फुलेही सुकवत ठेवली होती.

श्रीकांत इंगळहळीकरांच्या शेताच्या अनुभवात त्यांनी लिहीलय की किड लागलेली भाजी खाण्यास योग्य असते कारण रसायन नसल्याने किड त्यावर येऊ शकते. त्यांची बरीचशी विधाने मला पटली.

सायली गटग छानच. त्या पुस्तकांची आणि मासीकाची पण जरा व्यवस्थित ओळख करुन दे. म्हणजे ज्यांना घेता येतील ते घेतील.

जिप्स्या पेणला कुठे गेला होतास? माझे सासरचे गाव आहे पेण.

पहिले प्रतिबिंब मस्तच आहे.

माझ्याकडे पानाचा वेल मस्त फोफावला आहे आता.

आज सगळे गडप कुठे झालेत? साधना रोमात आहे म्हणाली. पलक पूर्वीचे धागे वाचण्यात गुंग आहे.

जिप्स्या पेणला कुठे गेला होतास? >>>पेण-खोपोली रस्त्यावर, पेणपासुन साधारण पाच एक किमी अंतरावरील "सावरसई" गावात. एका मित्राचे फार्म हाऊस आहे तेथे आणि तिथुनच पुढे २ किमी अंतरावर यावर्षीचे वविचे ठिकाण "एस पी फार्म्स" होते. सो तेथेही धावती भेट देऊन आलेलो. Happy

फार्म हाऊसच्या मागे एक मस्त धबधबा होता. श्रावणातील पहिला दिवस तिथेच साजरा केला. Wink फेसबुकवर फोटो टाकलाय बघ "श्रावणधारा". Happy Wink

अच्छा. तस मला तिथल्या पेण वाशी गावाशिवाय जास्त माहीती नाही.

फेबु. पाहते नक्की.

काल अजून एक पावसाळी रंगित पाहुणा दिसला.

'सिंहगड पायथ्याशी असलेल्या वल्कल या माझ्या जागेत आत्तापर्यंत मी शेती करीत होतो. मात्र, आता शेती बंद केली असून, तिथे वृक्षसंवर्धन करणार आहे,' असे सांगून इंगळहळीकर म्हणाले, 'पुणे महापालिकेने एक दुर्मिळ वृक्षांचे उद्यान साकारावे, अशी माझी खूप इच्छा होती. मात्र, मी माझ्या जागेतच झाडे लावण्याचा निर्णय घेतला. पश्चिम घाट पिंजून अनेक वैशिष्ट्यपूर्ण झाडांची निवड करून मी त्यांची रोपे तयार केली आहेत. गेल्या पाच वर्षांपासून घरातील बागेत ही रोपे वाढविण्याचे माझे काम सुरू आहे
— श्रीकांत इंगळहळीकर

‘वल्कल’वर दुर्मिळ वृक्षांचे उद्यान

सायली व्रुत्तांत छान लिहीलास. दिलीप कुलकर्णी ह्यांची पुस्तके राजहंस प्रकाशकांची आहे व वर लिहील्याप्माणे गतिमान संतुलन मासिक आहे. पुण्यात ते कार्यशाला घेत असतात. सगले प्रचि नेहमीप्रमाणे सुंदर! भारती ठाकुरचं नर्मदा परिक्रमेवरच पुस्तक वाचतेय त्यात 'गोरख चिंचे' चा उल्लेख वाचला न निगकर्सची (गटग)आठवण आली त्यात हे खूप आंबट फल असतं, असं लिहीलंय.

aapan punyala Ingalhalikarani lavlelyaa garden madhe gtg karuya kadhitari.

Pages