निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
(No subject)
हा घ्या फोटो सागरगोट्यांचा.
हा घ्या फोटो सागरगोट्यांचा.
o wow..sagaragote... mast
o wow..sagaragote... mast nostalgic
अय्या! कसले मस्त दिसतायेत
अय्या!

कसले मस्त दिसतायेत
मला पण हवेत
इथे डोंबिवलीत माझ्या आईच्या
इथे डोंबिवलीत माझ्या आईच्या घराजवळ सागरगोटयाचे झाड आहे, त्याचे सागरगोटे पण आईने मला दिले आहेत. मी पार विसरूनच गेले, आत्ता वरती फोटो बघितले तेव्हा स्ट्राईक झालं, अरे आपल्याकडे आईने दिलेले सागरगोटे आहेत.
नले, तूझ्या लेकासोबतच गेलो
नले, तूझ्या लेकासोबतच गेलो होतो ते शोधायला !
मानुषी, आमचा उद्योग म्हणजे मुली खेळताना ते वरचेवर पळवायचे. अर्थात तसे झेलायलाही जमायचे नाही, मग
पेपरची घडी त्याने, तो आडवा फिरवून ते उडवायचे.
पेपरची घडी त्यान, तो आडवा
पेपरची घडी त्यान, तो आडवा फिरवून ते उडवायचे.>>> मुली किती चिडत असतील.
हो ना, चांगले धपाटे मिळायचे.
हो ना, चांगले धपाटे मिळायचे.
मस्त सगळच. सागरगोट्यांनी
मस्त सगळच. सागरगोट्यांनी खरचं नॉस्टेलजिक केलं. पावसाळ्यात जेंव्हा बाहेर खेळता यायचं नाही तेंव्हा जास्त चालायचा हा खेळ आणि खरच त्यात खोडा घालणे हाच मुलांचा खेळ.
कित्तीतरी आठवणी जागृत झाल्या
अजून मिळतात का खेळण्यांच्या दुकानात सहजपणे??
वर्षु अग आयुर्वेदिक दुकानात
वर्षु अग आयुर्वेदिक दुकानात मिळतात. लहान मुलांच्या बाळघुटीत घालतात सागरगोटा उगाळून म्हणून तिथे मिळतात.
अगा ममो.. ते वाले नै कै...
अगा ममो.. ते वाले नै कै... ते>> रंगीत, चट्टेपट्टे असलेले .. त्ते व्वाले
बाल्कनीत आले भात. गुढी
बाल्कनीत आले भात. गुढी पाडव्याच्या तोरणात भाताच्या लोंब्या होत्या. त्या १मेला पेरल्या. उगवल्यावर रोपे थोडी मोठी झाल्यावर दोन इंच पाणी टबात भरले. डास होऊ नये यासाठी नारळाच्या शेंडीने पाणी झाकले .
सागरगोटे.. माझा आवडता खेळ.
सागरगोटे.. माझा आवडता खेळ. दगड उंच फेकुन, एका हाताने खालचे दगड जसा नंबर असेल तसे एकमेकांना न हलवता उचलायचे, आणि त्याच वेळेस वरती फेकलेला दगड दुस-या हाताने झेलायचा. कधीकधी दगड असलेल्या हातानेही झेलावा लागायचा. दुपारचे तासनतास या खेळात घालवलेत.
नविन भाग आला आता... तिथेही हजेरी लावते.
मस्त सगळच. सागरगोट्यांनी खरचं
मस्त सगळच. सागरगोट्यांनी खरचं नॉस्टेलजिक केलं. + १ सागरगोटा बालघूटीत देतात त्याचबरोबर सागरगोटे खेलण्याचे फायदे : मान, खांदे व डोल्यांना उत्तम व्यायाम
मस्त सगळच. सागरगोट्यांनी खरचं
मस्त सगळच. सागरगोट्यांनी खरचं नॉस्टेलजिक केलं. + १ सागरगोटा बालघूटीत देतात त्याचबरोबर सागरगोटे खेलण्याचे फायदे : मान, खांदे व डोल्यांना उत्तम व्यायाम
सागरगोट्या खुप सही...जिप्सी,
सागरगोट्या खुप सही...जिप्सी, नलिनी मस्त फोटु..
<<सागरगोटे.. माझा आवडता खेळ.
<<सागरगोटे.. माझा आवडता खेळ. दगड उंच फेकुन, एका हाताने खालचे दगड जसा नंबर असेल तसे एकमेकांना न हलवता उचलायचे, आणि त्याच वेळेस वरती फेकलेला दगड दुस-या हाताने झेलायचा<<<
<<सांगली भागात सागरगोट्याला गजगे म्हण्तात. फार मजा यायची एक पाय दुमडून एक पसरायचा . आणि सुरू....
एख्खई दुख्खई..... मात्र फरशी गुळ्गुळीत पाहिजे.<<
अगदी अग्दी.. आमच्याकडेही एक्खई, दुक्खई म्हणाय्चे. कधी कधी सागरगोटे घासुन चटका द्यायचो गुपचुप एकमेकीन्ना.
ते एक 'बिट्ट्यान्च' झाड येत. मोठ्या शन्करपाळ्याच्या आकाराच्या पण फुगीर अशा बिट्ट्या येतात. त्यान्चाही तसाच खेळ खेळायचो.
आमचा उद्योग म्हणजे मुली
आमचा उद्योग म्हणजे मुली खेळताना ते वरचेवर पळवायचे.>>>>>>
हो हो....भावांना याच उद्योगासाठी मारलेले फट्के आठवताहेत.
हुश्श्य....आज उघडीप!
सागरगोटे, बिट्ट्या बापरे
सागरगोटे, बिट्ट्या बापरे कित्ती मागे नेले मनाने काळामागे धावत. बाकी त्या विहिर प्रकरणापर्यंत नाही ब्वॉ पोहोचले कधी
पण मज्जा यायची.
कधी कधी सागरगोटे घासुन चटका
कधी कधी सागरगोटे घासुन चटका द्यायचो गुपचुप एकमेकीन्ना. >>>>>>>> अरे वा हेही माहिती आहे ? वा!
आम्हीही असले उद्योग करायचो.
Pages