निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सरिवा, शिवलिंग अप्रतिम. दिनेश
सरिवा, शिवलिंग अप्रतिम.
दिनेश दा सुट्टी संपली का? फोटो बघायला उत्सुक आहे फार.
इवलुसं टोपड घालुन टुकुटुकु बघणारी हि इवलुशी श्वेतपरी >>> किती योग्य आहे उपमा.
गौरम्मा, अडेनियम क्यूट.
@इवलुशी श्वेतपरी >>> किती
@इवलुशी श्वेतपरी >>> किती योग्य आहे उपमा. +++१११
आज सकाळी .. ऑन ड्युटी असतांना
आज सकाळी .. ऑन ड्युटी असतांना यांना हळुच टिपलं!
ओळखा पाहू :
ओळखा पाहू :
नलिनी - तुळशीच्या फुलाचा
नलिनी - तुळशीच्या फुलाचा क्लोज अप आहे ना ???
राम राम,
राम राम, सुप्रभात!

रानहळदः
हा सब्जाचा तुरा:

दोन्ही नॅशनल पार्कात दिसले होते.
खुप सुंदर आहे शिवलिंग !
खुप सुंदर आहे शिवलिंग !
आणखी हा कसला तुरा आहे? >>>>
आणखी हा कसला तुरा आहे? >>>> रानतुळस असावी ...
शशांक अगदी जवळ पोहचलात .
शशांक अगदी जवळ पोहचलात . सब्जा आहे
हा तुळशीचा

सब्जाचं झाड असतं हे माहीत च
सब्जाचं झाड असतं हे माहीत च नव्हत मला.
मला वाटायचं तुळशीच्या मंजिर्या तोच सब्जा.
सब्जाच्या झाडाचा फोटो टाकाना कोणी तरी...
हा बघ रिया.
हा बघ रिया.
सब्जाच्या झाडाला खुप छान
सब्जाच्या झाडाला खुप छान वास असतो मी लावले होते,
सुंदर शिवलिंग...
सुंदर शिवलिंग...
सब्जा = Botanical Name :
सब्जा = Botanical Name : Ocimum basilicum
आणि तुळस - Botanical Name : Ocimum tenuiflorum
मात्र दोघांचे कुळ (फॅमिली) एकच - Lamiaceae
सुदुपार... सरिवा काय सुंदर
सुदुपार...
सरिवा काय सुंदर शिवलींग आहे...
व्वा दिनेश दा आलात परत, खुप प्रवास झाला ना? प्रवास वर्णन,प्र.ची, लेख आणि
अद्भुत माहितीच्या प्रति़क्षेत....आणि हे शाहतुत म्हणजेच तुती काय?
अत्रुप्त आत्मा, पांढरी लीली छानच टिपलीत..
वर्षा रान हळद छानच...
नलिनी/शशांक जी सब्जा आणि कापुर/पंढरपुरी तुळस वेगवेगळे आहेत का? मी आत्ताच मंजीरी
घातल्या आणि दिड इंचीची रोपं पण आलीत...खुप छान सुगंध आहे त्याचा... क्रुष्ण तुळशी सारखेच
आहे पण पान टोकदार आणि काळपट आहेत..
सगले प्रचि अप्रतिम! गप्पा
सगले प्रचि अप्रतिम! गप्पा वाचतेय....
निसर्गाच्या गप्पा,
निसर्गाच्या गप्पा, पर्यावरणावरील समस्या,शुद्ध आहार, बीज वाटप >>>> यासंबंधी जरा डिट्लवार लिवा की ..+++
सुमारे ३ वर्षा पुर्वी, श्री दिलीप कुलकर्णी आणि पोर्णिमा कुलकर्णी (दापोली), यांनी "निसर्ग मंडळ" या ग्रुप ची
स्थापना केली.. ही दोघे वर्षातुन एकदा नागपूरला पण भेट देत असतात...मी नविन सदस्य असल्यामुळे मला
अजुन खुप काही माहिती नाही...
तर त्या दिवशीच्या गटग ला सगळे सदस्य रविवारी भर पावसात, आपली जास्तीचे कामे उरकुन/बाजुला ठेवुन एका वेगळ्याच ओढीने जमतांना दिसले.. यात महिला,पुरूष, काही जोडपी,तरुण,बाल गट आणि एक सदस्य श्री येते काका, तर चक्क ७५ वर्षाचे यांचा समावेश आहे.
तर सगळी मंडळी शिस्तीत भारतीय बैठकीत बसलो होते.. आणि आमच्या पैकी एका महिला सदस्यनीने
श्री दिलीप कुलकर्णी यांच्याच "निसर्गायन" म्हणुन एका पुस्ताकतली काही पाने (धडा) खडया आवाजात
वाचुन दाखवला आणि श्री हेंमत मोहरील यांनी अतिशय सोप्या आणि समर्पक शब्दात फोड करुन समजावुन सांगीतलीत...यात आपण निसर्गाचे कशा प्रकार शोषण करत आलोत,उपभोगत आलोत, निसर्गाला ओरबडत आलोत आणि हे कुठपत आणि कीतपत योग्य आहे ह्या विषयी चर्चा झाली...थोडक्यात म्हणजे त्यांच्या पुस्तकाचे वाचन,चिंतन आणि मनन झाले..
त्यानंतर शुद्ध आहारा संबधी चर्चा झाली.. यात मतीच्या भांडयात स्वयंपाक करावा, तसेच लाल तांदुळ (साला सकट तांदुळ), धुर्या वरची तुरीची डाळ(धुर्या वरची म्हणजे धानाची पेरणी करतांना एक उंचवटा करतात म्हणे आणि त्यावर तुर पेरतात) ही बिना फवारणीची आणि बिना पॉलीशची डाळ कीती पौष्टीक आहेत याचे नुसते महत्वच नाही तर ती विशिष्ठ गावातुन माफक दरात उपलब्ध पण करुन दिली.. नंतर अशा प्रकारचा शुद्ध आहाराचा वर्षभरात सभासदांनी कसा लाभ घेतला याचा एक छोटासा अहवाल पण सादर केला. यात, तीळ, गु़ळ,ज्वारी, बाजरी, चणा/ तुर डाळ, तांदुळ,आंबे, चिक्कु, गाईचे तुप,खवा या सगळ्याचा समावेश होता..
मुख्य म्हणजे ही काही मार्केटींग कंपनी नसुन शुद्ध अहार लोकांपर्यंत पोहचावा,तो पण थेट शेतातुन आणि या सगळ्यात शेतकर्याशी आपले एक नाते जुळावे हा एक निस्वार्थे भाव... श्री येते यांनी गोमुत्रा पासुन फ्लोअर क्लीनर त्यांच्याकडे उपलब्ध असल्याचे सांगीतले... तसेच कोकणातली काही विशिष्ठ प्रजातीची मगजदार जांभळाची रोपे त्यांनी स्वता तयार केली होती ती ज्यांच्या कडे जागा असेल त्यांनी स्वेच्छेने घेऊन जावीत असे जाहिर केले..
तद् नंतर सामुहीक शांती मंत्र सगळ्यांनी म्हटला आणि नंतर स्वादिष्ट अशा अल्पोपहार नी सभेचा समारोप झाला.
शेवटी श्री लागु (मंजु ताईंचे यजमान) यांनी वेगवेगळ्या भाज्यांच्या बियांची वाटप करुन शेवट आणखी गोड केला. यात दोडकी, लाल भोपळा, काकडी,पालक, फुल/पान कोबी, टमाटे यांचा समावेश होता..
त्यादिवशीचे गटग हे मंजु ताईंच्या राहात्या घरी होते.. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी असे गटग होत असते.
प्रत्येक गटग चे पालकत्व एक एक सभासद घेत असतो त्या नुसार एस म एस / मेल पाठवण्यात येतात..
आहे की नाही सगळ इंन्टरेस्टींग !
मी लेकीला यासाठी नेले होते की तीलासुद्धा निसर्गाची आवड आहेच, पण त्याबरोबरच मराठी भाषा कानावरुन जाणे खुप आवश्यक आहे शिवाय पर्यावरण जपणे कीती गरजेचे आहे हे ह्या पीढीला पण जाणुन घेणे तितकेच गरजेचे आहे... (बापरे मजकुर खुप मोठा झाला, वेगळा धागा काढायला हवा होता काय?)
वा - सायली पातुरकर - खूपच
वा - सायली पातुरकर - खूपच सुंदर उपक्रम आणि अनुकरणीयही आहे - या मंडळींचे ( श्री दिलीप कुलकर्णी आणि पोर्णिमा कुलकर्णी (दापोली), यांचे "निसर्ग मंडळ" ) पुण्यात काही काम चालू आहे का ? असल्यास जरुर कळवणे.
तुळसीचे असे अनेक प्रकार
तुळसीचे असे अनेक प्रकार (उपप्रकार) आहेत - गुगलवर अजूनही मिळतीलच - पण कोणती पंढरपुरी आणि कोणती रानतुळस हे सांगणे अवघड - कारण वेगवेगळ्या प्रांतांप्रमाणे स्थानिक नावे बदलतात ...
Ocimum tenuiflorum
Ocimum basilicum
Ocimum americanum
Ocimum gratissimum
सरिवा, शिवलिंग
सरिवा, शिवलिंग अप्रतिम.
दिनेशदा सुट्टी संपली का ? तुम्ही नसताना जे प्रश्न उत्तरे झाले ते चेक करा म्हणजे त्यावर शिक्कामोतब करता येईल.
अत्रुप्त आत्मा , पांढरी लीली छान आहे. तुम्ही काढलेली फुलांची रांगोळी नेहमी छान असते.
वर्षा रान हळद छानच...
Sayali Paturkar : खुप छान. मीही असायला हवी होती असे वाटत आहे.
सायली - छान माहिती दिलीत..मला
सायली - छान माहिती दिलीत..मला हि यायला आवडेल..
धन्यवाद शशांकजी, कामिनी ,
धन्यवाद शशांकजी, कामिनी , गोरम्मा..
शशांकजी, मला असे आठवते की पुण्यात देखिल यांचे उपक्रम आहेत.. मंजु ताई कडुन कन्फ्रर्म करुन जास्त माहिती मीळेल...
त्या तुळशीचे उद्या फोटो टाकते..
श्वेतपरी,अडेनियम,पांढरीलिली,स
श्वेतपरी,अडेनियम,पांढरीलिली,सब्जा,रानहळद सगळे मस्त.
शिवलिंग आवडल्याचे आवर्जून सांगितलेल्या सर्वांना धन्यवाद.
सायली,निसर्ग मंडळाच्या बैठकीचा वृत्तांत छान.'आधी केले मग सांगितले' असे या कुलकर्णी दांपत्याबद्दल म्हणता येईल.त्यांचे 'गतिमान संतुलन' हे मासिक प्रकाशनही मस्त असते.वैदिक गणितासह (४ भाग) पर्यावरणविषयक त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.त्यांचे कुटुंबीय आमचे चांगले परिचित आहेत.त्यांच्याकडे कुडवळ्याला जायचे कधीपासून मनात आहे. पाहू केव्हा योग येतोय!
http://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A...
http://www.mahaedutechnet.org/nisargsneh/dilip_kulkarni.htm
येथे त्यांचाबद्दल वाचता येईल.
kamini8 >>> धन्यवाद ...
kamini8 >>> धन्यवाद ...
अत्रुप्त आत्मा यांनी
अत्रुप्त आत्मा यांनी काढलेल्या पांढर्या लिलीच्या फुलांचा हा क्लोज-अप
व्वा,सुरेख जिप्सी!
व्वा,सुरेख जिप्सी!
सायली, मस्त वृतांत. सगळे फोटो
सायली, मस्त वृतांत.
सगळे फोटो ही सुरेखच.
इतक्या सार्या शुभेच्छा मस्त
इतक्या सार्या शुभेच्छा

मस्त वाटतय मला
आभार तरी कसे मानू इतक्या प्रेमानी दिलेल्या शुभेच्छांचे.
असे हे जगाचे फिरे चक्र
असे हे जगाचे फिरे चक्र बाळा
हिवाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा...
काहींना हिवाळा आवडतो, तर काहींना उन्हाळा आणि काहींना पावसाळा. खरंतर प्रत्येक ऋतुचं एक वेगळच सौंदर्य असतं. अगदी ग्रीष्माच्या कडक उन्हाळ्यात आणि धुवांधार पावसातही. फक्त हे सगळं अनुभवायला तुमची रसिक नजर तयार असली पाहिजे.
मे महिन्यात आणि जुलै महिन्यात काढलेली एकाच जागेचे हे प्रचि.

जिप्सी तुझ्याकडे सगळीच फुले
जिप्सी तुझ्याकडे सगळीच फुले कुठुन येतात.
Pages