निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
उजु, वाढदिवसाच्या खूप खूप
उजु, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
वरिल सर्व फोटो ए-वन
अॅड. उज्वला (उजु),
अॅड. उज्वला (उजु), वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मुम्बई गटग वृत्तांताची ईथे
मुम्बई गटग वृत्तांताची ईथे लिंक द्या ना. मला वाचायचे आहे.
हा आमचा,पावसाळी ढगात-गेलेला
हा आमचा,पावसाळी ढगात-गेलेला पालीचा प्रचंड पहाड(बॅकसाइड..) .. (मंजे मी त्याला..तसं गमतीनी-मूळ बल्लाळेशवर म्हणतो!
)

सायली,नलिनी,जिप्सी फोटो
सायली,नलिनी,जिप्सी
फोटो मस्तच!
उजु, वाढदिवसाच्या शुभेच्छा !
सरिवा, सायली, कृष्णकमळं बघून
सरिवा, सायली, कृष्णकमळं बघून मन भरलं ग अगदी. धन्यवाद माझी इच्छा लगेच पूर्ण केलीत म्हणून. फोटो अप्रतिम आलेत.
जिप्सी ही लिली आहे का? रंग फार छान.
अतृप्त आत्मा, फोटो छान.
काल रात्री ज्याची आठवण झाली
काल रात्री ज्याची आठवण झाली त्याच्या विषयी :
माझ्याकडे विविध प्रकारचे पक्षी, प्राणि, फुले, फळे, वनस्पती, काही गवत प्रकार्, देवदेवतांचे चित्रे, केक आयसिंग डिझाइन, ज्वेलरी डिझाइन, भेटकार्ड. अशा प्रकारचे जुन्या वर्तमानपत्र आणि मासिकातुन चित्रांची कात्रणे कापुन जमा केले होते.जुन्या रोलच्या कॅमेराने काढलेले फोटोही होते. असे काही काही जमा केलेला माझा निसर्ग खजिना होता. मी ऑफीसच्या कामानिमित्त एका ठीकाणी गेले होते. तिथे लाकडाचा मोठा टेबल होता.त्यावर जाड काच होती. काचेखाली त्यांनी चित्रे ठेवलेली होती.त्यातले एक मला फार आवडले. मी त्यांना म्हटले हे चित्र फार सुंदर आहे. त्यांनी ते लगेच मला काढुन दिले.
मी असे कुठेही गेलेली असले तरीही जे जे सुंदर असे दिसायचे ते ते मी माझ्या खजिन्यात आणुन ठेवायचे. काही दुर्मिळ चित्रेही होती. माझ्याकडे ७ वर्षांनी येणारी कारवी, एकाच वेळी खुप फुललेले ब्रम्हकमळ, बुट घातलेला कोंबडा, हटके रांगोळी, झुंबरे यांची कात्रणे होती. प्रत्येक चित्राविषयी गंमतीदार आठवण, त्यांचा खजिनापर्यतचा प्रवास, घडलेले विनोद यावर एक पुस्तकही लिहिले असते. येवढा सुंसर माझा निसर्ग खजिना होता. त्यात मी विविध विषयावर लिहलेले खुप लेखन साहीत्यही होते. त्यात ७० % निसर्ग वर्णन असायचे. कधिही मला कंटाळा आला की मी ते वाचायची. चित्रे पहायची शांत वाटायचे. काल खुप आठवण आली.
माझा निसर्ग खजिना म्हणजे स्वातीच्या नक्षत्रातील शिंपल्यात सापडलेला मोती.
एकदा खुप पाऊस पडला होता तेव्हा ते सगळे भिजुन गेले. सर्व कागद एकत्र चिकटले. फोटोचेही रंग एकमेकांत मिसळले. ते सर्व निसर्गात विलिन झाले.
तेव्हापासुन माझा छंद आणि लेखन बंद झाले.
मी मा. बो. वर वाचन करत असे. येथिल इतर धाग्यांवरील विचित्र प्रतिसाद वाचुन मला आयडी ओपन करावा असे वाटत नव्हते. नि. ग. हा धागा शांत बसु देत नव्हता म्हणुन उशिरा आयडी ओपन केला.
तसेही नि. ग. वरील एकाही मैत्रिणीने मला नि. ग. वर बोलावले नाही. ४ वर्ष झाली. खुप वाट पाहीली मग काय मी स्वःताहुन आले उन्हाळ्यात आलेल्या पावसासारखी न बोलावताही. :स्मितः
हा धागा मला खुप आवडतो. यात अनेक रंग मिसळलेले आहेत. रंगीबेरंगी आहे हा. यातील एक एक रंग घेवुन छान चित्रे तयार होतील. निसर्ग रंगात रंगणारी आपली मने. मन मोहुन टाकणारी येथिल फुले. नजाकतीने केलेल्या येथिल गप्पा.
मागच्या आठवड्यात रॉकी माऊंटन
मागच्या आठवड्यात रॉकी माऊंटन नॅशनल पार्क ला गेलो होतो. तेथे पाहीलेल्या एका वाईल्ड फ्लॉवर.
कंसराज - तुम्ही वर टाकलेले
कंसराज - तुम्ही वर टाकलेले रॉकी माऊंटन नॅशनल पार्क मधील रान फूल colorado blue columbine flower हेच आहे का जरा गुगलून पहाणार का ?
अतृप्त आत्मा, फोटो छान>>>>>>>
अतृप्त आत्मा, फोटो छान>>>>>>> +१
हो शशांक, ते blue columbine
हो शशांक, ते blue columbine flower आहे.
अतृप्त आत्मा- छान आहेत
अतृप्त आत्मा- छान आहेत प्रचि
कंसराज - सुंदर आहे रान फुल शक्य असल्यास ते प्रचि मोठा करुन टाका ना.
सुदुपार... सरिवा,देवकी, हेमा
सुदुपार...
सरिवा,देवकी, हेमा ताई धन्यवाद...
जिप्सी कडल्या पावसाळी पाहुण्याचे रुपडे काय लोभसवाणे आहे..
आणि रंग पण काय मोहक आहे..
ताम्हणी घाट अगदी स्वर्गीय वाटतोय...
कंसराज त्या फुलाची रंग संगती कीती सुरेख आहे नाही! खुप नवल वाटते या निसर्गाचे...
कामिनी छानच आहे तुझा छंद... पण थांबवु नकोस, जोपस त्याला... जी कात्रण खुप जास्त आवडतात ती ल्यामीनेट करुन ठेवत जा... आणि इथे नि.ग. मुळे तर अजुन भरच पडेल तुझ्या खजीन्यात...
शोभा ताई वाढदिवसाचे एकीला मोदक आणि एकीला टोमाटो असे का? G
:
कामिनी छानच आहे तुझा छंद...
कामिनी छानच आहे तुझा छंद... पण थांबवु नकोस, जोपस त्याला... जी कात्रण खुप जास्त आवडतात ती ल्यामीनेट करुन ठेवत जा... आणि इथे नि.ग. मुळे तर अजुन भरच पडेल तुझ्या खजीन्यात... >> +१०० अनुमोदन सायली.
जंगलात वणवे लागतात त्याच राखेतुन नवीन झाडे उगवतात, वेळ लागतो पण पुन्हा जंगल निर्माण होते. निर्सग जसा थांबत नाही, तसाच छंद पुन्हा सुरु करा मला खात्री आहे आम्हाला ही त्यातुन नवनवीन माहीती मिळेल
तसाच छंद पुन्हा सुरु करा मला
तसाच छंद पुन्हा सुरु करा मला खात्री आहे आम्हाला ही त्यातुन नवनवीन माहीती मिळेल स्मित+++ अगदी अगदी
शोभा ताई वाढदिवसाचे एकीला
शोभा ताई वाढदिवसाचे एकीला मोदक आणि एकीला टोमाटो असे का? G खो खो>>>>>>>>ते टोमॅटो नाहीत. लक्ष्मण फळ आहेत.
फोटो मस्त शोभा१, त्यांना
फोटो मस्त
शोभा१, त्यांना लक्ष्मण फळ म्हणतात हे पहिल्यांदाच कळले. आपल्याइथे कुठे होतात ही फळे? इंग्रजी मधे persimmon म्हणतात. मला आणि लेकीला खुप आवडतात ही फळं. मी लहानपणी भारतात कधीच पाहिली नव्हती. जपानमधे असताना ऑटममधे नेहेमी मिळायची. आणि मागच्या वर्षी मात्र भारतातही एकदा /दोनदा मार्केट मधे मिळाली.
शोभा, लक्ष्मण फळ हे नाव
शोभा, लक्ष्मण फळ हे नाव पहिल्यांदाच कळलं .. पण ही फळं खूप खाल्लीत चायनात.. मला सोडून कुणालाच त्याचं टेक्श्चर आवडलं नाही..
तुला कुठे मिळालं?? मुंबईला मी अजून तरी पाहिल्याचं आठवत नाही... मे बी नॉर्मल फळं विकणारे नसतील ठेवत..
आज दुपारी शिंदेवाडी पुढे
आज दुपारी शिंदेवाडी पुढे कामाला गेलो होतो... ज्या शेतावर गेलो होतो तिथली हिरवाइ बघितल्या बघितल्याच हा धागा आठवला... तेंव्हा एंजॉय पावसाळी शेतं..आणि हिरवाइ!

हे आपले- पालक!

ही आपट्याची पानं तर बघा..पावसामुळे कशी झाड सोडून बाहेर ...येताहेत!

. लक्ष्मण फळ आहेत. >>> शोभा,
. लक्ष्मण फळ आहेत. >>> शोभा, यामधे जरा चकचकीत लाल रंगाची 'अमृतफळे म्हणून मिळतात.खाऊन पाहिली नाहीत.आता आणेन.
अरे व्वा! ऊस, मका, पालक, घास
अरे व्वा! ऊस, मका, पालक, घास शिवाय त्या छोट्या ऊसाची कुरपणी पण सुरू दिसतेय.
अत्रुप्त आत्मा, मस्त वाटले ही हिरवाई पाहून.
कंसराज. फोटो मस्त. कामिनी
कंसराज. फोटो मस्त.
कामिनी छानच आहे तुझा छंद... पण थांबवु नकोस, जोपस त्याला... जी कात्रण खुप जास्त आवडतात ती ल्यामीनेट करुन ठेवत जा... आणि इथे नि.ग. मुळे तर अजुन भरच पडेल तुझ्या खजीन्यात... >> +१०० अनुमोदन सायली.
लक्ष्मण फळे काय आहेत? मुंबईला मिळतात का आणि चव कशी असते ? मी प्रथमच पाहतेय आणि ऐकतेय सुद्धा या बद्दल.
अतृप्त आत्मा, हिरवाई छान.
सुंदर आहे रान फुल शक्य
सुंदर आहे रान फुल शक्य असल्यास ते प्रचि मोठा करुन टाका ना>>> ईनमीन तीन, फोटो वर डबल क्लीक केल्यास मोठा होईल फोटो.
I love persimmon
I love persimmon
बापरे!!! कित्ति आहे
बापरे!!! कित्ति आहे वाचायला,जरा ४..५ दिवस ईकडे फिरकले नाही तर.सग ळे फोटॉ अन माहीती छानच ..कृष्णकमळ।परवा मला एथे लंडनला एका घराच्या बागेत दिसली.ते घर एकदम जवळचे वाटू लागले.आपले पणा वा टायला माणसे,घर असेच फक्त पुरत नाही,अनेक लहान लहान गोष्टी तुम्हाला आपलेसे करुन घेतात.
आज श्रावण महीन्यातील पहीला
आज श्रावण महीन्यातील पहीला पाऊस पडत आहे. मी खिडकीत बसुन पावसाचा आनंद घेत आहे. पावसात भिजणारी झाडे मला नुकतेच लग्न झालेल्या नववधु प्रमाणे भासतात. लहानपणापासुन आपण ज्या मुलीला पहात असतो, ती नववधु झाल्यानंतर तीचे रुप वेगळेच दिसते. त्याचप्रमाणे झाडेही आपण रोजच पहात असतो, पण पावसात भिजणारी झाडे ही वेगळीच दिसतात. जशी नववधुच्या मुखकमलावर वेगळीच चमक असते. तसेच भिजणारे झाड चमकत असते. प्रत्येक वर्षी मी हे न कंटाळता पहात असते.
आज मी गाणे गुणगुणत आहे.
श्रावणात घन नीळा बरसला रिमझीम रेशीम धारा.
कामिनी, मस्त.
कामिनी, मस्त.
सुप्रभात!!!!
सुप्रभात!!!!

काल या एका सुंदर आणि फक्त
काल या एका सुंदर आणि फक्त पावसाळ्यातच दर्शन देणार्या फुलाची गाठ पडली - सर्वत्र हिरवेगार झालेलं माळरान आणि त्यामधेच उमलेली ही पांढरी शुभ्र छोटीशी फुले. अगदी जमिनीला लागून असलेले एकच हिरवे गोलसर पान (१ इंच व्यास असेल साधारणतः) आणि त्यामधून वर आलेली एक नाजूक हिरवी छडी (३-५ इंच लांबीची) - त्यावर झुलणारे एखादे वा दोन फुले ... नेमकी अंजू बरोबर नव्हती - तिने जेव्हा फोटो पाहिले तेव्हा तिला फार चुकल्यासारखे झाले कारण हे आहे एक ऑर्किड - Habenaria grandifloriformis - Single Leaved Habenaria
फोटो मात्र आंतरजालावरचे .....
शशांक, मी पाहिलीय हि इवली
शशांक, मी पाहिलीय हि इवली इवली फुले.
याचं मराठी नाव काहि केल्या आठवत नाहीए. मघापासुन मी काढलेला फोटो शोधतोय आत्ता सापडला. 
इवलुसं टोपड घालुन टुकुटुकु बघणारी हि इवलुशी श्वेतपरी
Pages