निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितीन, तु वाशीला येणार आहेस??? >>> होय, चालेल ना Wink

मग आता कोण कोण येणारे ते फिक्ष झाले, आता काय काय आणणारेत ते सांगा. >> मी भुकेल पोट आणणार आहे Proud

व्वा! सरिवा मस्त. शिंपी आहे हा. एकदम अस्थिर पक्षी.

हा आहे दयाळ (रॉबिन). या झाकणाच्या फटीत काहितरी लपवून ठेवले होते. प्रथमदर्शनी गुलमोहोराची पाकळी वाटत होती.
robin-surai1.JPG

पण मग चोचीत धरून ईकडे तिकडे आपटले. त्याची शिकार वळवळत होती. शेवटी एक पोझ देऊन ऊडून गेला....
ती शिकार साप-सुरई (सापाची मावशी) च्या पिलाची होती.
robin-surai2.JPG

हा क्रमवार पहीला आणि शेवटचा फोटो. (फोटोग्राफर: चि. मल्हार)

सरिवा काय मस्त टिपलयस, तो चक्क नाचतोय अस वाटतय! सुर्य प़क्षी किंवा शिंपी पक्षी असावा! >>>>> तो पक्षी अ‍ॅशी आहे.... Happy

मधु-मकरंद :- मल्हारने काय सुंदर फोटो काढलाय मॅगपाय रॉबिनचा .... Happy त्याला माझ्याकडून जोरदार शाबासकी ... Happy

अ‍ॅशी पक्षी - (फोटो आंतरजालावरुन साभार..)

mg_2622.jpg

हा टेलर बर्ड (शिंपी) - (फोटो आंतरजालावरुन साभार..)

birds-common-tailorbird.jpg

शशांकजी, तुमच्यामुळे रोज येणारा तो पक्षी 'अ‍ॅशी' पक्षी आहे हे समजले.मनापासून धन्यवाद.

पक्षी नाचरा दिसण्यात खरे तर गूगल कारणीभूत आहे.मजा वाटली म्हणून मुद्दाम टाकला.

शिंपी पक्षी रोज येतो,पण त्याचा मनासारखा फोटो अजून मिळालेला नाही.

मल्हारने काढलेला दुसरा फोटो एकदम खास!

http://www.maayboli.com/node/25546 - या लिंकवर मी शूट(?) केलेले काही पक्षी आहेत - (माझा कॅमेरा साधाच असल्याने फोटो क्वालिटीही साधीच आहे Happy Wink ... )

सुप्रभात...
अ‍ॅशी पक्षी मस्त गुबगुबीत आहे... पहिल्यांदाच बघते आहे.. शशांकजी काय पटकन ओळखता तुम्ही..
चि.मल्हार ने खुप छान टिपलेयत दोन्ही फोटोज , दुसरा तर खुपच सही...

व्वा आज सकाळी सकाळी मस्त प़क्षी दर्शेन झाले... Happy

शशांकजी, "अ‍ॅशी आणि शिंपी" बरेचसे साम्य दिसते. खरच तुम्ही पटकन पक्षी ओळखता.

माझ्या परीसरात दिसणारा शिंपी असावा. नर शिंपी ओरडताना गळ्याशी काळी रेघ दिसते. तीन-चार वर्षापूर्वी साध्या कॅमेराने काढलेला फोटो...DSCN2257.JPG

. शशांकजी काय पटकन ओळखता तुम्ही..>>>> + १००
हो सरिवा ...गुगलची करामत. माझ्या उसगावातल्या विन्टर फोटोतही मस्त बर्फ पड्त रहातो.

आजचं खादाडी कम निसर्ग गटग दणक्यात पार पडलं. Proud

दिनेशदा, साधना, इंद्रधनुष्य, जागू, मनीमोहर, कांचन, पलक, सामी, उजु, ईनमिनतीन, जिप्सी, कामिनी८, अंजली चितळे अशी बरीच मंडळी जमली होती. Happy

गप्पाटप्पा, खादाडी, झाडांची/बियांची देवाणघेवाण. जागू, अळुवडीसाठी विशेष धन्यवाद. Wink

इतरांसाठी खादाडीचे फोटो ल व क र च...... Proud

नवी मुंबई धाग्यावर डिटेलमध्ये लिहा. मी मिस केल. त्याच खूप वाईट वाटत होत. ३.३०ला घड्याळाकडे बघून आठवणसुद्धा झाली होती. Sad
साधना, तुम्ही ट्री केक बनवला होता का??? असेल तर फोटो टाका नक्की.
आम्ही खादाडीच्या फोटोंची आतूरतेने वाट बघत आहोत. Happy

खूप मजा आली सगळयाना प्रत्यक्षात भेटुन.
खादाडी सॅालिड झाली.
जागू अळूवडया बेस्ट. कामिनी पातोळ्या अप्रतिम.

Pages