निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागुताई - पापलेट्,कोलंबी ईत्यादी झाडांच्या फांद्या किंवा फळे असतील तर क्रुपया घेऊन या +++P Proud

मधु मकरंद, बर्‍याच दिवसांनी आलात.. आणि कोतवाल / काळा गोविंद पक्षाची छान माहिती सांगीतलीत...
या कोतवाल प़क्षाची एक गम्मत आहे.. लाहान पक्षांच्या पिल्लांची/ अंड्याची तो त्यांचे आई बाबा नसतांना देखभाल करतो... त्यांच्या घरट्याकडे ल़़क्ष ठेवतो.. मोठे प़क्षी आले की त्यांच्यापासुन बचाव करतो.. थोडक्यात
म्हणजे खरोखर कोतवाली करतो :)... हे मला परवा प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. जेव्हा एक घुबड जांभळाच्या
झाडावर येऊन बसले तीथेच बुलबुल चे घरटे असावे ... तेव्हा सगळे पक्षी विचीत्र कलकलाट करु लागले,मला
शंका आली की साप वगैरे असेल, पण बघते तर काय चक्क घुबड बसले होते... मग काय ह्या कोतवाल प़क्षांनी खुप जोर जोरात घिरट्या घालुन हुसकावुन लावले त्याला.. आणि मग सगळी कडे एक निरव शांतता....:)

असेच साळुंकीचे पण असते... ती सुद्धा एतर पक्षांची मदत करते...:)

अरे वा ! नवीन धागा सुरु झाला पण : अओ:
मनिमोहोर, प्रस्तावना खूपच छान. फोटो ब-याच वेळाने आता दिसतोय. मस्त आहे. पण जिप्सीने टाकलेले फोटो दिसत नाहीत असे का ?
शोभा निवडुंग्/ब्रम्हकमळ ची फुले फुलली का ग? छान दिसतंय.

. मग काय ह्या कोतवाल प़क्षांनी खुप जोर जोरात घिरट्या घालुन हुसकावुन लावले त्याला.>>>>> म्हणून तर त्याला कोतवाल म्हणायचे. कोतवाली करतो तो कोतवाल !!! त्याला विविध आवाज काढायचे तंत्र अवगत असते. शिकारी पक्षांची दिशाभूल करता येते.

त्याला विविध आवाज काढायचे तंत्र अवगत असते. शिकारी पक्षांची दिशाभूल करता येते.>>>>>धन्यवाद मधु-मकरंद. हि नविन माहिती. रच्याकने कोतवाल म्हणजेच Black Drango ना? म्हणजे फॅन्ड्रीमधली काळी चिमणी. Happy

२१ व्या भागाचे अभिनंदन...

rose1.jpgrose3.jpg

खुप दिवसांनी आले.. सगळं वाचुन झालं. मनीमोहर, मनोगत छान आहे. ब्रम्हकमळ... सुंदर

नलिनी... तेरड्याचा कलर सुंदर आहे... जिप्सी.. चेरी, सफरचंद मस्त आहेत.

मी तर वाट बघतेय की कधी एकदाचे गणपती येतायत आणि मी कोकणात पळतेय...

दादरला कोण कोण जाणार आहेत? अंजली चितळे मुंबईत आहेत आणि त्यांना यायचेय आजच्या दादर गटगला. मला दादर गटग कुठे आहे आणि किती वाजता आहे एवढे कळले तरी त्यांना कळवता येईल मला.

माझ्याकडे दिनेशदांचा जो फोन आहे तो भलत्याच बाईला जातोय, तत्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणे कठिण झालेय.

अंजली चितळे मुंबईत आहेत आणि त्यांना यायचेय आजच्या दादर गटगला. मला दादर गटग कुठे आहे आणि किती वाजता आहे एवढे कळले तरी त्यांना कळवता येईल मला.>>>>हो, यासाठीच वरची पोस्ट टाकली होती. दिनेशदांना फोन केला होता पण दुसर्‍याच कुणीतरी उचलला. Sad

हो, यासाठीच वरची पोस्ट टाकली होती.>>>>>>>>>>>>>>.

tulaa swapna paDale hote kaa mi malaa hi maahiti naviy mhanun...

ti baai jilaa fon jaatoy ti ata vaitaagli asnaar.. bichaari kuthetari mandait bhaaji ghetey aani lok fon karun pidtaahet dineshadaa aahet kaa vicharat Happy

बायांनो, आता निसर्गाच्या गप्पा येऊ द्या. >>>>>>..तु फक्त आम्हालाच बोल. Sad

मधु-मकरंद मस्त माहिती. धन्यवाद!
शोभा निवडुंग्/ब्रम्हकमळ ची फुले फुलली का ग? छान दिसतंय.>>>>>>>>.मी नसताना फुलली. पण घरातल्या फोटोग्राफर्ने फोटो काढलेत.:फिदी: हा जुना फोटो आहे. Happy

मी तर वाट बघतेय की कधी एकदाचे गणपती येतायत आणि मी कोकणात पळतेय...>>>>>>>..जीव तुटका तुट्का होतो. Sad

माझ्याकडे दिनेशदांचा जो फोन आहे तो भलत्याच बाईला जातोय, तत्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणे कठिण झालेय.
दिनेशदांना फोन केला होता पण दुसर्‍याच कुणीतरी उचलला. अरेरे>>>>>>>.दिनेशदा पुण्याला येताना, आईसाठी, आईकडे मोबाईल ठेवून आले होते. आताही तो कदाचित त्यांच्या आईकडेच असेल. Happy

are pan aaj tar te asatil naa mumbait.>>>>>>....आज दुपारी येणार होते बहुतेक.

परत त्याच नंबरावर फ़ोन करून विचार ना? त्यांची आई असेल, तर ते कधी येणार ते तुला कळेलच. Happy

मधु-मकरंद खूपच सुंदर पोस्ट, छान माहिती शेअर केली. सगल्या पोस्टी आवडीने वाचतेय....
साधना - सायली माझ्याकडे आली होती.... मस्त गप्पा रंगल्या...

Anjali chitle udya vashit yet aahet. Tyanni mala phon kela hota.

Anjali chitle udya vashit yet aahet. Tyanni mala phon kela hota.>>>>ओके ग्रेट Happy

उद्या वाशीत भेटणारे मायबोलीकरः
१. दिनेशदा
२. साधना
३. जागू
४. सामी
५. जिप्सी
६. पलक
७. अंजली
८. कामिनी८

और कोई हय????

सर्वांना, धन्यवाद!
मनीमोहर, मनोगतासाठी सर्वांना अनुमोदन.
गौराम्मा, गुलाबपण मस्तच!

जिप्सी, सफरचंदाचा फोटो भारीच, त्याला झब्बू शोधण्यासाठी बाहेर पडावे लागेन आता.

और कोई हय????>> मी पण उपस्थिती लावेन म्हणते, अर्थात दुरध्वनीने.

साधना, अगं तो फोन दिनेशदादाच्या आईकडे असतो.

मग आता कोण कोण येणारे ते फिक्ष झाले, आता काय काय आणणारेत ते सांगा.

माझ्याकडे पालकच्या बीयांची ऑर्डर आहे. त्याची भाजी उगवुन त्याने पालक पनीर होइलच यथावशाश. तोवर बाकीच्यांनी रेडि-टु-इट पदार्थ आणावेत ही नम्र विनंती..

मी पण येणार आहे.
तुम्हाला सगळ्यांना भेटायची खूप उत्सुकता आहे.
तीन ते पाच ना दुपारी ? आणि कुठे ?

मग आता कोण कोण येणारे ते फिक्ष झाले, आता काय काय आणणारेत ते सांगा.>>>>>आपण हि चर्चा सामीने सांगितलेल्या "नवी मुंबई" बाफवर करूया का? Happy

परत एकदा कन्फर्म केले. उद्या जेवणासाठी जमणार नाहीये त्यांना त्यामुळे आपण सेंटरवनच्या फुडकोर्टात दुपारी तिन वाजता चहापानासाठी भेटत आहोत.

(ओळख पटावी म्हणुन प्रत्येकाने उजव्या हाताच्या करंगळीत लाल गुलाब वगैरे धरला तरी चालेल..:) )

Pages