निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मांजर समोरच्या झाडावर जायला
मांजर समोरच्या झाडावर जायला लागल आणि कावळ्यानी हल्ला चढवला..

शेवटी माघार घ्यावी लागली मांजराला
दारी पाऊस पडतो, रानी पारवा
दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो, आला ग सुगंध मातीचा
बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा
वसुंधरा आज नवरसात बुडाली, माळ बगळ्यांची बघ आकाशी उडाली

श्रीयाळराजाचा सण चांगुणा मातेचा, नागपंचमीचा देव तो ग शोभला
कुणी गौरी ग पूजिती, गोफ रेशमी विणती, आला ग सुगंध मातीचा
बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा....
(अशोकजी परांजपे)
श्रावणातील पहिला सण "नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!"
ज्_एस , जिप्सी, दोन्ही फोटो
ज्_एस , जिप्सी, दोन्ही फोटो छान.
सुधीर, योगेश - फोटो मस्तंच
सुधीर, योगेश - फोटो मस्तंच ....
नाग - Naja naja शास्त्रीय नाव ....
सगळ्यांना नागपंचमीच्या
सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा...
सुप्रभात. नागपंचमीच्या
सुप्रभात.
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
जिप्स्या, नागाचा क्लोजप हवा
जिप्स्या, नागाचा क्लोजप हवा होता.. तूझ्या कॅमेरातून छान दिसला असता तो.
बीबीसी च्या एका क्लीपमधे एक
बीबीसी च्या एका क्लीपमधे एक मजेशीर बाब बघितली... वेडा राघू ज्यावेळी मधमाशी पकडतो त्यावेळी तशीच खात नाही. फांदीवर किंवा तारेवर घासून तिची नांगी काढतो. मग तिला थोडीशी पिळतो आणि तिचे विष काढून टाकतो... किती पिढ्यांकडून हे शहाणपण त्यांच्याकडे आले असेल !
हा आमच्या घरचा आहे घरगुती
हा आमच्या घरचा आहे घरगुती

बाबौ... जागु! तुझ्या खिडकीतुन
बाबौ... जागु! तुझ्या खिडकीतुन दिसला होता काय? असे नागोबा आजुबाजुला फिरत असतान्ना तु इतकी कूल कशी राहु शकतेस??
बहुदा हि बया कॅमेरा सांभाळत
बहुदा हि बया कॅमेरा सांभाळत झाडे / प्राणी / पक्षी पहात जागते नी बाजुला क्रोशा करते. झोपतच नाही. म्हणुन तर हेहेहेहेहेहे एवढे सगळे करते ती.
कवठी चाफा छान आहे. गुलाब लय
कवठी चाफा छान आहे. गुलाब लय भारी! जागूच्या बागे बद्दल काय बोलावं? माझ्याकडेही ओवा आहे त्याची भजी व कोथिंबीरी सारखा उपयोग करते पण ह्याशिवाय अजून कसा वापरता येतो?
हा आमच्या घरचा आहे घरगुती :
हा आमच्या घरचा आहे घरगुती : मला बिळातुन नागोबा..... ची आठवण झाली.
नागपंचमीच्या हार्दिक
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व फोटो मस्तच.
जिप्सी तुमची जी काही कविता देऊन फोटो द्यायची स्टाईल आहेना, ती लई भारी. मस्त वाटतं.
आर्या कुल नसते मी फोटो
आर्या कुल नसते मी फोटो काढायसाठी धडपडत असते. हल्ली माझी छोटी राधा पण साळुंखी ओरडली की साप साप करते आणि म्हणते कॅमेरा, फोटो काढू चला.
मंजू मिस्क भाजीत वगैरे घालता येते. मी ऋषीच्या भाजीत घालते.
कामिनी
मोनाली अग मी सगळ एकदम नाही करत. क्रोशा फक्त रविवारी आणि जमल्यास कधीकधी रात्री.
ही काश्मिरमधली फुलातली माकड

माकड फुले छान आहेत.
माकड फुले छान आहेत.
@हा आमच्या घरचा आहे घरगुती
@हा आमच्या घरचा आहे घरगुती >>> ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआ
स्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्कन काटा आला अंगावर!
पाणबुडीचा "डोळा" जसा शत्रु बघायला - वर येतो..त्याच दृष्याची आठवण झाली,जमिनीतुन वर आलेला तो..आणि त्याच्या डोळ्यातले भाव बघून!
जागू तै...भ्या नाई का वाटत!
मॉरिशियसच्या जास्वंदी
मॉरिशियसच्या जास्वंदी बघितल्यात का ?
माझं पुर्ण मॉरिशस वाचायचं
माझं पुर्ण मॉरिशस वाचायचं राहीलंय, नेट जरा स्लो आहे म्हणून फोटो ओपन व्हायला वेळ लागतोय.
त्या गुलकंद गुलाबांची १
त्या गुलकंद गुलाबांची १ गंम्मत सांगायची र्हायलीच!


मी ते घेतले की..मार्केटातनं घरी येईपर्यंत आधी गाडीत लावतो...
हे असे..
आणि मग,एकदा येशी लावला..की त्या दरवळानी...घरी येई पर्यंत गाडी गुलाब गुलाब हो जाती है..!
वा मस्तच. गुलाबही गुलाब.
वा मस्तच. गुलाबही गुलाब.
गुलाब गाडीत लावायची आयडीया
गुलाब गाडीत लावायची आयडीया मस्तच... असेच य्लांग य्लांग नावाच्या झाडाची फुले लावली तर गाडी सुगंधी होऊन जाते.
सुप्रभात... व्वा सगळ्यांचे
सुप्रभात...
व्वा सगळ्यांचे नाग मस्तच...
हा आमच्याकडचा ...
:
(कोणाला ही थेंबांची रांगोळी शिकायची असल्यास सांगणे)
हे आज उमलले...
हे आज उमलले...


बदकांची माळ फुले....
बदकांची माळ फुले.... अजुनी.... हौदात.....
सायली , तिन्ही फोटो अप्रतिम
सायली , तिन्ही फोटो अप्रतिम !
धन्यवाद हेमा ताई.... आज सगळे
धन्यवाद हेमा ताई....
आज सगळे गेलेत कुठे?
सायली, हि रांगोळीची पद्धत
सायली, हि रांगोळीची पद्धत कुठली ? आमच्याकडे मातीचा पूजतात तर शेजारी गुप्तेकाकूंकडे, सात नाग, सात नागिणी चंदनाने रेखाटत असत.
वा नागोबा, जास्वंद, बदकं सर्व
वा नागोबा, जास्वंद, बदकं सर्व मस्त.
मी रांगोळीने पाच नाग काढते. दोन मोठे, तीन छोटे. आईकडे चंदन उगाळून पाटावर भरपूर नाग काढतात आणि त्याची पुजा करतात.
दिनेश दा आम्ही पण चंदनानी नाग
दिनेश दा आम्ही पण चंदनानी नाग कागदावरच काढुनच पुजा करतो...
ही रांगोळी माझ्या आजोबांनी स्वता: तयार केली आहे... मी लहान पणी पासुन दर नागपंचमीला
दारात काढते :)...
अंजु धन्यवाद..
Pages