निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रच्याकने मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची राहुन गेली...

साधना रोम मध्ये कसे वाटत आहे.

मला रोमात कसेतरीच वाट्ते.. म्हणुन रोमातुन प्रतिसाद टाकतेय Happy

मला रोमात कसेतरीच वाट्ते.. म्हणुन रोमातुन प्रतिसाद टाकतेय : धन्यवाद साधना रोमात बसुन देखील आमची आठवण काढत आहेस.

पेण वाशीचा रस्ता हायवेला लागूनच आहे. पेण वाशीतले लक्ष्मीचे देऊळ छान आहे. समोर एक मोठ तलाव आहे. आम्ही दर नवरात्रात देवळात जातोच. गणपतीतही एक फेरी होते. गणपतीचे कारखाने जास्त दादर ह्या गावात आहेत. अक्षरशः शेती आहे. शेतात सगळीकडे गणपती सुकत लावलेले दिसतात.

अच्छा. रोम, म्हणजे रीड ओन्ली मोड होय !:G Biggrin Biggrin :

सायली - या वात्रट मुला-मुलींकडे स्मित डोळा मारा लक्ष देऊ नको अजिबात ... Happy
नाही हो.. मला नाही वाटले वाईट...

सगळ्यांना कवठी चाफा आवडला तर!

आदीजो.. छान माहिती दिलीत, बरेच लोकं लाभ घेऊ शकतील याचा..

जागु, तोरड्याची फुलं लागली की फोटो टाक..

हा आमच्या कडचा मिरची जास्वंद (मिरची च्या आकाराच्या कळ्या येतात) आणि कुंडीत देखील खुप बहरतो..
mirchi.jpg

पावसात झाडे चिंब भिजतात तेंव्हा वेगळीच चमत येते त्यांना.
माझ्याकडील खायच्या पानांचा वेल

ओवा (ओव्याच्या वासाची भजीसाठी वापरात येणारी पाने)

हळद (पाठी आमच्या पावसाच्या नाल्याचा मिनी धबधबा :स्मित:)

तोंडलीचा वेल

तोंडली

अरे वा सायली अग आमच्याइथे पण बर्‍याच जणांकडे आहे ही जास्वंद. मला पण फांदी आणून लावायची आहे. फार सुंदर दिसतात ही पिटूकली जास्वंद.

मिरची जास्वंद नामकरण चांगल आहे Happy

आदिजो ने दिलेल्या माहीतीचा पुणेकरांनी तरी नक्कीच फायदा घ्या.

व्वा छानच आहेत जागु तुझ्याकडची झाड...
ओवा, हळद आणि विड्याचा वेल माझ्याकडे पण आहे कुंडीत.

हो अग, इकडे मिरची जास्वंदच म्हणतात त्याला.. लाल, पांढरा, राणी कलर, फिकट गुलाबी
रंगाचा पाहिला आहे मी.. माझ्या कडे राणी कलर चा आहे..

माझे एक स्वप्न आहे की मला माझ्या बागेत जास्वंद आणि गुलाब ह्यांच्या विविध प्रकारांचा संग्रह करायचा आहे.

तुम्हाला हे फेसबुक पान वाचायला नक्कीच आवडेल.
थेट निसर्गातून / Day to day nature

आर्या Happy
नलिनी नक्कीच तुझ स्वप्न पुर्ण होईल...
मस्त पेज शेयर केलयस....

हे मैत्रीणीच्या बागेतुन....
rose_0.jpgshoe_0.jpg

सगळी माहिती आणि फोटो छानच आहेत.. माबोचे खास शब्द ही मस्तच...
नलिनी तुझं स्वप्न लवकर सत्यात येऊ देत .. माझ्याकडे ३-४ प्रकारची गुलाबाची रोपं आहेत.. हवी असल्यास नक्की कळवा.. जास्वंद कुंडीत मावेना म्हणून गावी पाठवली.. जमल्यास फांदि घेऊन येईन..

@ सायली--जर कुलकर्णी दाम्पत्याचा ठाण्यामधे ग्रुप असेल तर प्लिज सांगा...मला जॉईन करायाला खुप आवडेल्...तसेच त्या जांभुळ रोपापैकि शिल्लक असेल तर प्लिज मला द्याल का? (मला पाच रोपे लावता येतील).

कवठी चाफा..जास्वंद...गुलाब..नागवेल.. अगदी एक नंबर!

सर्वच फोटो सुरेख. बरीच माहिती माझी वाचायची राहिली आहे, हल्ली लक्ष केद्रितच होत नाहीये. फोटो बघून मात्र फ्रेश वाटतं.

हे घ्या आमच्या मार्केटयार्डात येणारे गुलकंद गुलाब..! यांना हे नाव मीच दिलय..याचा (खासकरून..)गुलकंद करतात,म्हणून नव्हे...तर यांच्या वास इतका गो...........ड असतो! की डोळे बंद करून घेतला,तर गुलकंदच आहे की काय असं वाटतं!

https://fbcdn-sphotos-g-a.akamaihd.net/hphotos-ak-xap1/t1.0-9/p403x403/10511130_678735702212719_25719221060953587_n.jpg

याच प्रकारात अजून एक अगदी डार्क पिंक कलरचा गुलाब येतो..ब्लॅक लेडी म्हणून (अत्ता फोटू नाय नेमका! Sad ) त्याचं रूप आणि गंध म्हणजे... नाव सार्थ करणारं ..अगदी-ब्लॅक मॅजिक ब्युटी!

लै भारी! गुलकंद गुलाब..
दिनेश दा आम्हाला पण बघायच्या आहेत मॉरिशियसच्या जास्वंदी...
नलिनी माझ्याकड ११ प्रकारचे जास्वंद आहेत :), आता फुलं लागलीत की फोटो टाकीन...

थेट निसर्गातून / Day to day nature>>> मस्त आहे ते पेज. आजचा नागपंचमी स्पेशल लेख छान आहे.

बाकी सर्व फोटो मस्त फ्रेश व सुगंधी Happy

गौराम्मा, सायली, खूप खूप धन्यवाद. हे स्वप्न साकरायला सुरवात करायलाच आणखी काही वर्ष वाट पाहावी लागणार.
मी बाग फुलवायला सुरवात केली की नक्कीच तुम्हा सर्वांना साकडे घालणार. Happy
दिनेशदादा, मला माहीत आहे, जास्वंद पाहिल्यावर माझी आठवण नक्कीच आली असणार तुला. Happy फोटोंच्या प्रतिक्षेत.
अत्रुप्त आत्मा, गुलाब भारीच एकदम!

जिप्सी : तु विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर टाईप करायला वेळ लागेल म्हणुन राणीच्या बागेत सांगेन. चालेल का?

नलिनी नक्कीच तुझ स्वप्न पुर्ण होईल.
गुलकंद गुलाब छान नाव
जागु, विड्याचे पान आहे त्याचे नाव काय, बाजारात विकायला असतात ती वेगळी दिसतात.

Pages