निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सर्वच फोटो सुंदर! असे नागाचे
सर्वच फोटो सुंदर!
असे नागाचे फोटो, रांगोळी कधी पाहिले, ऐकले नव्हते. मस्तच कल्पना!
आमची नागपंचमी म्हणजे आदल्या दिवशी ज्वारीच्या लाह्या करून आणायच्या, नागोबाची पुजा करायला शेतात, आजूबाजूला कुठेतरी वारूळ नक्कीच सापडते. सकाळी सकाळी दुध लाह्या वाहून वारूळाची पुजा कारायची, पुरणपोळीचा स्वयंपाक अन आजीने सकाळीच कडूनिंबाच्या झाडाला बांधून घेतलेले मोठमोठाले झोके.
जिप्सी, तू काढलेल्या सफरचंदाच्या फोटोला एक झब्बू! आमच्या दारासमोर जे झाड आहे त्याचे हे फोटो.
नलिनी, दोन्ही फोटो मस्त
नलिनी, दोन्ही फोटो मस्त
नलिनी, दोन्ही फोटो झक्कास
नलिनी, दोन्ही फोटो झक्कास
सुप्रभात!!!
सुप्रभात!!!
जिप्सी सुंदर आहे प्रचि,
जिप्सी सुंदर आहे प्रचि, बाप्पा येताहेत तयार रहा
नलिनी सुंदर झब्बु ,
जिप्सी, फोटो बघूनच मन प्रसन्न
जिप्सी, फोटो बघूनच मन प्रसन्न झालं
सुप्रभात... नलिनी झक्कास
सुप्रभात...
नलिनी झक्कास फोटो...
जिप्सी तुमच्या पोस्ट नेहमीच मार्मीक असतात...
अरे वा आज गणपतीबाप्पांच्या
अरे वा आज गणपतीबाप्पांच्या दर्शनाने नि.ग. ची सुरुवात. धन्स जिप्स्या.
वरचेच फुल फ्लॅश मारून.

व्वा कसले टवटवीत गुलाब
व्वा कसले टवटवीत गुलाब आहेत!
गेल्या महिन्यात एका प्रदर्शनात भेट दिली होती... तीथे या चित्राच्या प्रेमात पडले....
पण असे चित्र (७ फुटाची फ्रेम नक्कीच असेल) घरी लावायाचे म्हणजे एखादा वाडाच असायला पाहिजे... म्हणुन फक्त मोबाईल मधे घेतले...
मस्त फोटो. नले, मध्यंतरी
मस्त फोटो.
नले, मध्यंतरी सफरचंदाला लावलेले मेण अशी मेल फिरत होती.. आजच्या लोकसत्तामधला लेख बघ.
http://www.loksatta.com/navneet-news/wax-coating-apple-737425/
'अॅन अॅपल अ डे कीप्स डॉक्टर अवे' (रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला म्हणजेच आजाराला स्वत:पासून दूर ठेवा) या म्हणीला प्रमाण मानून आपण सफरचंदाचं सेवन करत असतो. सफरचंद विकत घेताना ती छान लालसर, ताजी, चमकदार अशी बघून घेतो. झाडावरून काढून दुकानात ही सफरचंदं पोहोचायला बरेच दिवस जातात, तरी ही सफरचंदं ताजी, चमकदार कशी दिसतात? या सफरचंदांवर मेण लावलेलं असतं त्यामुळे ती चमकदार दिसतात. सुरीने या सफरचंदांवर घासलं तर तुम्हाला हे मेण दिसतं.
जेव्हा सफरचंद झाडावरून काढली जातात त्या वेळी त्यांच्यावर निसर्गत:च मेणाचं आवरण असतं. सफरचंदामधील बाष्प निघून जाऊन ती शुष्क होऊ नयेत यासाठी निसर्गत:च ही योजना केलेली असते. सफरचंद चांगली स्वच्छ दिसावी म्हणून व्यापारी ती छान घासून पुसतात त्या वेळी हे नसíगक मेण निघून जातं. आता ही सफरचंदं वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवायची असतात त्यासाठी ती टिकावीत म्हणून त्यांच्यावर मेणाचं आवरण लावलं जातं.
फळांवर किंवा चमक येण्यासाठी खाद्यपदार्थावर लावण्यात येणाऱ्या मेणाच्या प्रकारात नैसर्गिक आणि कृत्रिम म्हणजेच पेट्रोलियम बेस असे दोन प्रकार पडतात. नैसर्गिक मेण म्हणजेच कार्नोबा (पामच्या झाडापासून), मधमाश्यांनी तयार केलेलं मेण, आणि शेलॅक मेण हे होत. शेलॅक मेण लाखेचा कीटक तयार करतो. हे मेण इथॅनॉलमध्ये विरघळवून वापरलं जातं. पेट्रोलियम मेणामध्ये हायड्रोकार्बन असतात. पेट्रोलियम मेण आरोग्याला हानीकारक असतं.
सफरचंदांवर पाम झाडाच्या पानांपासून तयार झालेलं मेण वापरलं जातं. या मेणामध्ये मेदाम्लाचे ईस्टर, हायड्रोकार्बनच्या लांब शृंखला, अल्कोहोल यांचा समावेश असतो. या पामच्या झाडाव्यतिरिक्त इतर वनस्पतींपासूनसुद्धा मेण मिळवता येतं. सफरचंद थोडय़ा कोमट पाण्यात धुतली तर नैसर्गिक मेण जाऊ शकतं. व्यापाऱ्यानं कोणतं मेण वापरलंय हे आपल्याला कळणं अशक्य आहे पण खूप चमकदार फळं दिसली तर जरा सांभाळून!
अनघा वक्टे, (मुंबई) -office@mavipamumbai.org
जिप्सी - खास जिप्सी टच् फोटो
जिप्सी - खास जिप्सी टच् फोटो - केवळ केवळ.....
जागू - तूदेखील फोटोग्राफीतील वेगवेगळे प्रयोग करायला लागलीस तर ..... मस्त
सायली - ती सात फुटी फ्रेम - राजा रविवर्मा यांनी काढलेले दिस्तंय बहुतेक ... महाराष्ट्रीय नऊवारी साडी पाहिल्यानंतर रविवर्मा इतके इंप्रेस्ड झाले की त्यांच्या नंतरच्या सर्व चित्रात सर्व स्त्रिया (आणि सर्व देवीही) अशा नऊवारी साडीतच त्यांनी रेखाटल्या ....
दिनेशदा - नेहेमीप्रमाणेच मस्त माहिती ...
होय, मला ही तसच वाटतय. राजा
होय, मला ही तसच वाटतय. राजा रविवर्मानी काढलेले हे एक प्रसिद्ध चित्र आहे.
नलिनी,जिप्सी,जागू, मस्त फोटो
नलिनी,जिप्सी,जागू, मस्त फोटो !
राजा रविवर्मानी काढलेले हे एक
राजा रविवर्मानी काढलेले हे एक प्रसिद्ध चित्र आहे. >>>>> बहुतेक "नल - दमयंती" - ही दमयंती असावी - तिच्या समोरील हंसामुळे तसे वाटतंय ....
म्हातारी उडता नयेचि तिजला माता मदीया अशी
कांता काय वदो नवप्रसव ते साता दिशांची जशी - असे काहीसे आठवतंय - मोरोपंतांच्या आर्यांबाबतचे ...
शशांकजी / हेमा ताई दंडवत
शशांकजी / हेमा ताई दंडवत तुम्हाला.... _______ /\_________
बहुतेक "नल - दमयंती" - ही दमयंती असावी - तिच्या समोरील हंसामुळे तसे वाटतंय +++ १००%
दिनेश दा छान माहिती..
दिनेश दा छान माहिती.. एकदा १
दिनेश दा छान माहिती.. एकदा १ किलो सफरचंदं घेतले होते तर त्यावर मेणाचा थर होता, मला वाटल तो मेणबत्ती साठी वापरतात तो मेण असेल, पण असे सफरचंदं खाल्यावर त्रास काय होतो??
धन्यवाद सर्वांना! जिप्सी,
धन्यवाद सर्वांना!
जिप्सी, तुझ्या कॅमेर्यातून बाप्पा पाहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नाही. बाप्पांच्या प्रतिक्षेत.
शशांकजी / हेमा ताई दंडवत तुम्हाला.... _______ /\_________>>>> सायलीला अनुमोदन.
दिनेशदादा, ह्या माहितीसाठी तसेच जास्वंदीच्या फोटोसाठी पण धन्यवाद!
जागू, तुला साष्टांग दंडवत, काय म्हणून जमत नाही तूला ते सांग बरं एकदा!
दोन्ही फोटो मस्तच!
जिप्सी, फोटो बघूनच मन प्रसन्न
जिप्सी, फोटो बघूनच मन प्रसन्न झालं, तुझ्या फोटोमध्ये नेहमीच सजीवतेची झाक असते.
दिनेशदा छान माहिती, आम्ही सफरचंदाची साल काढुन खातो. सुरीने कितीही घासले तरी मेण जात नाही.
दमयंती छान आहे.
फोटो कौतुकाबद्दल धन्यवाद
फोटो कौतुकाबद्दल धन्यवाद
सुरीने कितीही घासले तरी मेण जात नाही.>>>>>याच्यासाठी गेल्यावर्षीच्या लेह लडाख टूरमधील मनालीच्या ड्रायव्हरने सांगितलेले कि थोडा वेळ सफरचंद गरम पाण्यात ठेवावी. मेण निघुन जाते.
(जास्त वेळ ठेवू नका नाहीतर शिजलेलं सफरचंद खावे लागेल :फिदी:)
लेह लडाख टूरमधील मनालीच्या
लेह लडाख टूरमधील मनालीच्या ड्रायव्हरने सांगितलेले कि थोडा वेळ सफरचंद गरम पाण्यात ठेवावी. मेण निघुन जाते. : जिप्सी धन्यवाद, मी करुन पाहीन.
जागूला नीट भांडता येत नाही, (
जागूला नीट भांडता येत नाही, ( इतकी वर्षे मायबोलीवर आहे तरीही.. )
शशांक, कुठलेही पेट्रोलियम उत्पादन आपल्या शरीरात शोषले जात नाही हे खरे आहे का ? मी वाचले होते कुठेतरी.
सहज आठवले "आनंदी गोपाळ" नाटकात, गोपाळ वाटीभर रॉकेल प्यायल्याचे सांगतो. डॉ. आनंदी जोशी यांच्यावर
आधारीत या नाटकात सुहास जोशी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर भुमिका करत असत.
शशांक, कुठलेही पेट्रोलियम
शशांक, कुठलेही पेट्रोलियम उत्पादन आपल्या शरीरात शोषले जात नाही हे खरे आहे का ? >>>> नक्की माहिती नाही पण बहुतेक खरे आहे हे - कुणा डॉ. ला विचारले पाहिजे - जास्त माहितीकरता ....
नमस्कार लोक्स पुष्कळ
नमस्कार लोक्स
पुष्कळ दिवसांनी आलोय ईथे.
बडोद्याला लक्ष्मी विलास पॅलेसच्या भिंतींवर पण रविवर्मांच्या चित्रांचा खजिना होता.
दिनेशदा शिकायला लागेल बाबा
दिनेशदा
शिकायला लागेल बाबा ही कमी पण 
ही मी नि.ग. ला वाटलेल्या गुलछडीच्या बाळांची आई.

थोडा वेळ सफरचंद गरम पाण्यात
थोडा वेळ सफरचंद गरम पाण्यात ठेवावी. मेण निघुन जाते>>> मी हेच केल होत पण नाही गेल मेण.
जागूला नीट भांडता येत
जागूला नीट भांडता येत नाही>>>>जागू, कुणाशी भांडतेय? म्हणजे भांडण्याचा प्रयत्न करतेय?
जिप्सी मस्त बाप्पा. जागू फोटो
जिप्सी मस्त बाप्पा.
जागू फोटो सुंदर.
सायली मस्त पेंटिंग.
सुप्रभात निगकर. निग पार ३
सुप्रभात निगकर. निग पार ३ र्या पानावर

सुप्रभात!!! छान फोटो,
सुप्रभात!!!
छान फोटो, स्निग्धा
निगकर्स जागे व्हा!!! सोनसकाळ
निगकर्स जागे व्हा!!!
आली नटुनी थटुनी हो, श्रावणी गौराबाई
Pages