निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
आताच मॉरिशियसवरचा पहिला लेख
आताच मॉरिशियसवरचा पहिला लेख टाकलाय... ( आपल्या आपल्यात फिरवली तर त्याला रिक्षा म्हणू नये.. एक संतवचन ! )
वरिल दिलीप कुलकर्णी यांची ओळख
वरिल दिलीप कुलकर्णी यांची ओळख मस्त आहे. काय ग्रेट माणस असतात ना काही.
दिनेशदा इज बॅक. आता फोटो व वर्णनांचे धागे येउद्या लवकर.
जिप्सी मस्त फोटो. अजुन फोटो टाक लवकर.
सरिवा, अरे व्वा छानच ग! तुमचे
सरिवा, अरे व्वा छानच ग! तुमचे चांगलेच परिचीत आहेत कुलकर्णी दांपत्य. आणि तु लगेच लिंक्स पण दिल्यात..
धन्यवाद.
आज नेटचा प्रोब्लेम होता तामुळे इकडे फीरकलेच नाही ..
सगळयांच्या गप्पा फोटो छानच.
दिनेश दा खरच बरेचदा आपल्याला खुप गोष्टी पटतात पण आपण अंमलात आणत नाहीत.
जागु खुप दिवसांनी आलीस ग..
मंजु ताई
ही कापुर तुळस...
ही कापुर तुळस मंजेच काळी तुळस
ही कापुर तुळस मंजेच काळी तुळस काय? आमच्याकडे(मार्केट्यार्ड-फुलबाजार..पुणे.) सद्ध्या काळी आणि हिरवी अश्या २ प्रकारच्या तुळशी विकायला येतात. त्यापेक्षा ही वेगळी असते काय?
सायली, ह्याची पानं
सायली, ह्याची पानं सब्जासारखीच टोकाकडे निमूळती आहेत.. पण सब्जाचा रंग अगदी हिरवागार असतो. सब्जाचा सुगंध मात्र दुरपर्यंत दरवळतो. आपल्याकडे नेहमीची जी तुळस असते तिची पानं टोकाकडे गोलाकार असतात.
तुझ्यामुळे कापुर तुळस हा प्रकार कळाला.
तुझ्याकडे कसले कसले बी मागायचे ह्याची आतापसूनच यादी करायला सुरवात करायला हवी.
अत्रुप्त आत्मा, जिप्सी फोटो
अत्रुप्त आत्मा, जिप्सी फोटो मस्त.
सुप्रभात!!!! पाऊस वेड्यासारखा
सुप्रभात!!!!
पाऊस वेड्यासारखा कोसळतोय इथे.
जिस्प्या, तु अगदी आवर्जुन
जिस्प्या, तु अगदी आवर्जुन माझे अभिनंदन केल्याबद्दल तुझे अभिनंदन...
साधना
साधना
चिमणी येऊन, नाचून बागडुन काय
चिमणी येऊन, नाचून बागडुन काय म्हणे मजला
चिवचिव करीन, चिंता हरीन, हस रे माझ्या मुला
— साने गुरूजी
बाळासाठी खाऊ घेऊन जाणारी हि चिऊताई


अरे वा..... मी कापुर तुळस
अरे वा.....
मी कापुर तुळस म्हणुन जी आणलीय तीची पाने हिरवी होती. पण तिच्यावर बारिक काळे किडे झाले आणि पाने खराब झाली.
साधना रोम मध्ये कसे वाटत आहे.
साधना रोम मध्ये कसे वाटत आहे.
सुदुपार. जिप्स्या स्वतःला
सुदुपार.
जिप्स्या स्वतःला चिमणीत पाहतोय
जागु मी पेण मधील वाशी गावात
जागु मी पेण मधील वाशी गावात गेले होते, छान आहे गाव. हायवे च्या जवळ आहे तेच ना.
बाळासाठी खाऊ घेऊन जाणारी हि
बाळासाठी खाऊ घेऊन जाणारी हि चिऊताई <<
जिप्स्या.... ती चिमणीतै नाही. नीट बघ... गळ्याला काळा पट्टा आहे. तो 'चिमणाबाबा' आहे.
त्यान्च्यात 'बाबा' कमावतात आणि भरवतातही पिल्लान्ना!
जिप्स्या स्वतःला चिमणीत
जिप्स्या स्वतःला चिमणीत पाहतोय हे मला आता समजले. तुझ्या प्रतिसादा नंतर. मी वेगळा विचार केला होता.
सुदुपार... आज माझ्या आनंदाला
सुदुपार...
आज माझ्या आनंदाला थाराच नाहीये....
सकाळी वॉक करुन आले, तर ग्राउंड फ्लोअर च्या एका मैत्रीणीने हाक मारली..
आणि माझा हात हातात घेऊन, तीने मुठ उघडुन काय दयावं!
आहे की नाही मज्जा आमची!
अत्रुप्त आत्मा, कापुर तुळशीला
अत्रुप्त आत्मा, कापुर तुळशीला पण खुप सुवास असतो... तुम्ही सांगताय तीचे पण फोटो टाका.
नलिनी यादी तयार कर.. नक्की पाठवीन मी
साधना, रोम मधले पण फोटोज टाकशील प्लीज. दिनेशदांमुळे मोरीशीयस, तुझ्या मुळे रोम दर्शन
होईल..
तो 'चिमणाबाबा' आहे.त्यान्च्यात 'बाबा' कमावतात आणि भरवतातही पिल्लान्ना! फिदीफिदी + १००%
सायली - हा कवठी चाफा आहे का ?
सायली - हा कवठी चाफा आहे का ? Magnolia pumila
सायली, हा कवठी चाफा आहे
सायली, हा कवठी चाफा आहे का?
साधना, रोम मधले पण फोटोज टाकशील प्लीज. दिनेशदांमुळे मोरीशीयस, तुझ्या मुळे रोम दर्शन
होईल..>>>>:हहगलो: सॉरी सायली, साधना सायलीला "रोमात" म्हणजे काय ते सांग.
जागु मी पेण मधील वाशी गावात गेले होते>>>>वाशी गावात कुणाकडे? माझ्या मित्राचे सुद्धा गाव आहे ते. त्याच्याच फार्म हाऊस वर (पेणपासुन पुढे) गेलेलो. मी गेलोय एक-दोनदा वाशी गावात. आता गणपती रंगवायचे काम सुरू असेल ना गावात?
साधना, रोम मधले पण फोटोज
साधना, रोम मधले पण फोटोज टाकशील प्लीज. दिनेशदांमुळे मोरीशीयस, तुझ्या मुळे रोम दर्शन
होईल..
सायली वा कवटी चाफा मस्तच. माझ्याकडे पण येतील काही दिवसात फुले. तू दिलेले तेरड्याचेच बी मी सध्या लावले. त्याची रोपे उगवली आहेत. अर्ध्या लिलिच्या बियाही लावल्या पण त्या नाही रुजल्या. पुन्हा अर्ध्या हिवाळ्यात टाकेन. जास्त पावसाने खराब होतील रोपे म्हणून मी सध्या सगळे बी तसेच ठेवले आहे.
सायली - या वात्रट
सायली - या वात्रट मुला-मुलींकडे
लक्ष देऊ नको अजिबात ...
रोमा - म्हणजे रीड ओन्ली मोड (फक्त वाचण्यासाठी भेट देणारे) - हे माबो चे खास शब्द आहेत. जसे रच्याकने म्हणजे बाय दि वे चे भाषांतर (?) रस्त्याच्या कडेने ....
सायली रोमात म्हणजे रीड ओन्ली
सायली रोमात म्हणजे रीड ओन्ली मोड. बरोबर ना जिप्स्या? तू नविन आहेस म्हणून ही भाषा तुला माहीत नाही. मी नविन असताना मलाही कळायचे नाही.
बरोबर ना जिप्स्या?>>>अगदी
बरोबर ना जिप्स्या?>>>अगदी बरोबर.
बाय दि वे चे भाषांतर (?) >>>>>हे ही बरोबर आहे शशांक.
फोटो आणि माहीती छान आहे.
फोटो आणि माहीती छान आहे.
जिप्सी, मी पेण मध्ये कुठे
जिप्सी, मी पेण मध्ये कुठे गेला होतास हे विचारले तेव्हा काहीही बोलला नाहीस ते , जागुने विचारले असता लगेच सांगितलेस. आता मी का सांगावे.
+
तो पेणमध्ये कुठे गेलेला त्याचे फोटू टाकलेत की......बहुतेक सकुसप होता
जिस्प्या चिमणा भारीय हा. पुढच्या वर्षी चिमणा रिप्लेस करुन टाक फोटो ...
कवठी चाफा सुंदर... मला खुप
कवठी चाफा सुंदर... मला खुप आवडतो. कित्येक वर्षात पाहिला नसावा...
सायली, कवठी चाफा छान आहे.
सायली, कवठी चाफा छान आहे. मज्जा आहे तुझी.
आतील भागाचा फोटोही दे ना.
माहितीसाठी: पुण्यातील जीविधा
माहितीसाठी:
पुण्यातील जीविधा या संस्थेने दिलीप व पौर्णिमा कुलकर्णी यांचे 'निसर्गायण शिबीर' दि २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत 'इंद्रधनुष्य सभागृह' (राजेंद्रनगर, सचिन तेंदुलकर जॉगिंग पार्क, म्हात्रे पुलाजवळ) येथे आयोजित केले आहे. १५ ऑगस्ट पर्यंत नावनोंदणी करायची आहे.
शुल्क रु २०० (नाश्ता व जेवणासहित )
संपर्क: वृंदा पंडित ९४२१८३२९१२
नैसर्गिक चक्रे, पर्यावरणाच्या आजच्या समस्या, पर्यावरणस्नेही जीवनशैली, ऋतूनियमित आहार व आरोग्य अशा विषयांचा समावेश आहे.
-अश्विनी
मुंबईत, ठाण्यात, कसारा घाटात
मुंबईत, ठाण्यात, कसारा घाटात सगळीकडे मुसळधार पाऊस पडतोय का ? संभाळून रहा सगळ्यांनी.
Pages