मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि ती अफवाच ठरो ही प्रार्थना

ही अफवा होती. ibn ने माफी मागितली.

सगळच असहय्य करणार आणि प्रचंड चीड आणणार आहे हे.

टि.व्ही. वर पण सांगितले की ही अफवा आहे म्हणून. अफवा पसरवणे हे पण disaster आहे Sad

अफवाच असेल तर ठीक आहे. rediff.com वरची बातमी ..........

01:18 PM: Railway Police Commissioner A K Sharma has denied reports of shooting near the Chhattrapati Shivaji Terminus station. However, all trains towards CST have been stopped as a precautionary measure. CST station has been evacuated as well.

~~~~~~~~~~~~~~
ज्याची त्याची प्रश्नचिन्हे ...... Happy

अजूनही व्ही टी स्टेशनवर आवाज येत आहेत पेण ते कसले आहेत ते कळत नाहीये अस सांगतायत टीव्हीवर.

आय बि एन ची रिपोर्टर वायर्लेस पाशी ऊभी आहे, कुठे ही काहीही फायरिंग नाही आणे सगळ शांत आहे अस म्हणतायत..

सध्या ताज, ओबेरॉयला गोळीबार सुरू आहे. इतरत्र नाही.

सगळ्या अफवा आहेत...

अरे पण ओबेरॉय क्लिअर झाले असे वर वाचले.

खरच अफवा आहे का? कारण माझ्या मित्राचा भाऊ तिथल्या पोलिसस्टेशनमध्ये अड्कलाय.. त्याचा तसा फोन आला होता...

आणि हाइट म्हणजे तो पोलिसस्टेशनला कशाला गेला होता कल्पना करू शकाल का? त्याचे ऑफिस कामा हॉस्पिट्लच्या बा़जूला आहे. त्याच्या ऑफिसमधल्या एका महिलेला मगाशी एक अनोळखी फोन आला मोबाईलवर.. तो माणूस हिंदीत बोलत होता.. त्याने विचारले की मुंबईत काय परिस्थिती आहे सध्या? हिने विचारले की आप कौन्?तर तो म्हणे अपना बेटा समझलो.. हिने काही न सांगता फोन कट केला.. आणि तो नंबर कुठला आहे ते चेक केले तर तो नंबर पाकिस्तानचा आहे असे कळाले.. या गोष्टीची माहिती पोलिसांना द्यायला ती आणि माझ्या मित्राचा भाऊ पोलिस स्टशनवर गेले ते तिकडेच अड्कले.. मगाशी त्याचा माझ्या मित्राला फोन येऊन गेला.. पण आता फोन लागत नाहीये..

तेव्हा मुंबईकर मंडळी,अनोळ्खी कॉलपासुन सावधान.. कोणालाही कसलीही माहिती देउ नका व्यक्ती माहित नसेल तर...

बापरे, मयुरेश!! काय सांगतोस!

आत्ताच सांगितलं की ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाऊसमध्ये अजूनही अतिरेकी आणि ओलीस आहेत. Sad

Sad Angry

हे नेवी कमांडोज बघुन जिवात जिव आला, हे आधीच आले असते तर कदाचित येवढी लोक गेली नसती...
ह्यांना माहिती आहे असल्या टाईओ चा वॉर्फेयर..
परवा रात्री तर सि एस टी च्या मागे एक अतिरेकी मॅगजीन रिलोड करत होता ..... एक सिक्युरिटी गार्ड हातात साधी ३०३ हाती घेवुन दबा धरुन बसलेला होता.. मागुन बस, रिक्षा, स्कुटरीं ची वर्दळ अगदी व्यवस्थित चालु होती.......
छातीत चर्र्र झाल अक्षरशः

सगळे न्यूज चॅनेल्स ब्लॉक केलेत.
अफवा पसरू नये म्हणून की परिस्थिती भयानक आहे म्हणून?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अरे मयुरेश सांगतोय ते नविनच आहे, पाकिस्तानात लोकांना अपडेट मिळतच आहेत, तिथले नागरीक मुद्दाम पॅनीक पसरवायला रँडअम कॉल्स ही करत असतील.... साल्यांच्या रक्तातच हराम आहे..

हे आधीच करायला हवं होत ...

हे आधीच करायला हवं होत ...>>>>>> तस केल तर कदाचित लोक गैरसमज करुन घेतील आणी आणखीन पॅनीक पसरेल....

पाकिस्तानला कायमच चिरडण्याची वेळ येऊन ठेपलीये आता!

IBN वर Breaking News होती.. मुंबईत मोबाईल जॅमर्स लावले आहेत म्हणून...
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

अज्जुका म्हणतेय त्यात तथ्य वाटतेय कारण माझे काका गिरगावात व्हि.टी. बंद करायच्या जस्ट आधी पोहोचले पण आता गिरगावात दुकाने वगैरे बंद करायला लावत आहेत. परवाच्या अतिरेक्यांच्या व्हि.टी. ते चौपाटीच्या वरातीवरुन तर ही पुर्व तयारी नसेल?

पाकिस्तानला कायमच चिरडण्याची वेळ येऊन ठेपलीये आता!
साल्यांच्या रक्तातच हराम आहे.. >> १००% अनुमोदन .....

CST चं firing खरंच अफवा आहे का? विनाचे बाबा VT station वर आहेत. सिंहगडची वाट पहात. पोलिसांनी आतुन बाहेर आणि बाहेरुन आत जायला बंडी केली आहे. त्यांनी ही firing आवाज ऐकले. ८ जण गेले अशी चर्चा सुरु आहे म्हणे. असं त्यांनी २० एक मिनिटांपूर्वी सांगितलं. आता परत त्यांना फोन केला तर म्हणताहेत बहुदा अफवा होती. पण अजुन स्टेशन मधुन लोकांना बाहेर जाऊ देत नाहीयेत. खरं खोटं कोण जाणे की आम्ही घाबरु नये म्हणुन बाबा अफवा आहे म्हणताहेत?? any way fingures crossed...

ओबेरॉय क्लिअर अशी सगळीकडेच न्युज आहे.

नाही. ओबेरॉयला अजून अतिरेकी आहेत.
ताजला एकच अतिरेकी आहे. त्याने नवीन इमारतीतील सर्व दिवे बंद केले आहेत, आणि तो गोळीबार करतो आहे.

नुसत्या संशयावरून अमेरिका सगळया अफगाणिस्तान ईराकची होळी करते. इराकच्या सर्वेसर्वा सद्दाम हुसेनला फाशी देते .
मग आपल्याकडे पाकिस्तान विरुध्द तर ढीगभर पुरावेच पुरावे आहेत.
आपणही आता कोणताही वीधीनिषेध न बाळगता पाकड्तांना ठेचुन काढायला हवे. आपल्या संयमाचा फार फार अंत पाहीला आता.
पण जे बुश करू शकतात ते आपले हे नेभळट राजकारणी ज्यांना केवळ आपलाच खिसा भरण्यात रस आहे ते हे करू शकतील का हीच शंका आहे.

सीएसटी स्टेशनवर गोळीबार नाही । उपनगरीय रेल्वे वाहतूक खोळंबली। पोलिसांच्या बंदुकीतून चुकीने गोळी सुटल्याचे मध्यरेल्वेचे मुख्य पीआरओ श्रीनिवास मुडकेरीकर यांनी मटा ऑनलाइनला सांगितले । स्टेशनभोवती पोलिसांनी घेराव घातला।

sarivina.. अफवाच असावी, पोलीस कॅमेरा समोर येवुन ईतक खोट नाही बोलायचे.. पण सेफटी करता कदाचित लोकांना आत बाहेर जाऊ देत नसावे....

Pages