मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता सांगताहेत की ताजमधे अजून २-३ अतिरेकी लपलेले आहेत म्हणून...

ंमोदींनी १ कोटी रुप्यांची मदत जाहिर केलीय, महा.सरकारने फक्त ५ लाख.आणि हे देशातले सगळ्यात प्रगतीशिल राज्य म्हणे.
करकरेंच्या घरीही मोदीच आधी पोचले,आबा आणि विलासराव त्यांच्या 'साहेब' आणी 'म्याडम'ची वाट पहात असावेत.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

साहेब छातीचा कोट करुन रक्षण करणार होते ना? का नाही धावले?
मड्डम बोलून चालून विदेशीच, फायद्यासाठी आता भारतीय नागरिकत्व घेतले म्हणून काय झाले?

आताच सकाळी ताज मधुन सुटलेला ब.न्धक साजन कपुर सान्गत होता.. ६३० मधे रुम भरुन दारुगोळा आणी १७ अतिरेकी होते एकुण. तसेच जेवणा वरुन भा.न्डत होते.. त्यन्च्या जवळ फक्त सुका मेवा आहे.. अन भान्डणात मारामारी पण करत होते.. एकमेकान्शी..

वर चाफा ने लिहिलय तसेच वाटतेय..
काहीतरी अजुन प्लान्स असतील त्यान्चे.. अन सध्या लक्श इथे वेधुन घेतलय..
प्रश्न हा आहे की.. आता तरी पुढची सुरक्षा बघताहेत का? शिवाय ६ डीसे.न्बर येतोय.. त्यामुळे पण जास्त काळजी वाटतेय..

फारच वाइट घडतय.. सुन्न झालोय..

नरिमन हाऊस च्या बाहेर लोकांची गर्दी दाखवतायंत आयबीएन लोकमत वर. लोकांची पण कमाल आहे, गोळीबार अजून सुरू आहे, एखादं प्रेक्षणीय स्थळ पहायला केल्यासारखी गर्दी केलेय. Sad

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अक्कल असल्या सारख ईथे कोणी तरी साध २०-२५ जणांना कंठस्नान घालता येत नाही असा बेजवाबदार शेरा ही मारला होता....>>>>

प्रश्न हा नाहिये महाशय!
२५ जण एवढी शस्त्रास्त्रे घेऊन सीमे मध्ये शिरली!
त्यांनी सगळे प्लानबर हुकुम केले!
कार्यवाही करणार्‍या जवानांविषयी व अधिकार्‍यांविषयी आम्हाला नितांत आदर आहे! ती ज्या अवघड परिस्थिती मध्ये ही मोहीम हाताळतायेत ती केवळ विलक्षण आहे!
वाईट ह्याचे वाटते की आम्ही १२५ कोटी लोकं केवळ षंढासारखे वागतो... भ्रष्ट राज्याव्यवस्थेला आम्ही लगाम नाही घालत... ही परिस्थीती निर्माण झालिये ती भ्रष्टाचार्‍यांच्या झोळ्या भरण्याच्या लालसेने, सत्ता पिपासू प्रवृत्तीने...
११/०९ च्या घटनेनंतर अमेरिकेत असे काही घदलय का? आणि आमची मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, ह्यासारखी शहरे वारंवार ह्या घटनांना सामोरे जातायेत! हे असे का घडावे?? का आम्ही ह्या किडीचे समूळ उच्चाटण करू शकत नाही? आम्ही का एक होऊ शकत नाही? अरे इथे बोलातांना देखिल आम्ही समोरच्याला हिणवण्याचाच प्रयत्न करतोय... असे का?

अशा वेळी आपण इतर भारतीय राज्यांकडून त्यांची सुरक्षा सेना, पोलिस दल मदतीला घेऊ शकत नाही का?

ट्रायडेंट क्लियर !
आय बि एन वर नेवी चे एलीट कमांडोज बोलतायत!

हे अतीरेकी जर इतक्या दिवसापासून ताजमध्ये तळ ठोकून होते पण कोणालाच त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या नाही? कारण सर्व व्यवहार गुप्तपणे चालत असतील तर तिथे काम करणार ताज कर्मचारी नी काहीच नोटीस नसेल केलेले?]जसे रूम क्लीन करणारे वगैरे.. अश्या मोठ्या हॉटेल्स्मध्ये सर्व security check करत का नाहीत tourist place आहे म्हणून?

मी आता पर्यंत बोललो नाही पण स्वतः फार अक्कल असल्या सारख ईथे कोणी तरी साध २०-२५ जणांना कंठस्नान घालता येत नाही असा बेजवाबदार शेरा ही मारला होता....
विचार करा, आपले आप्त जर कोणी आत असले असते तर आपण असाच विचार केला असता का..... >>>>. हो मीच तो शेरा मारला. तो शेरा मारण्याचे कारण तूम्हीच सांगीतले. आमच्या आत्पांपैकी एक जण ताज शेफ आहे, त्याला २ गोळ्या लागल्या तो आता आय आय सि यू मध्ये रिकव्हर होतोय.
हे इथे आत्ता लिहीतोये इतकेच. तेही तुंम्ही अक्कल शब्द वापरल्यामूळे नाहीतर लिहीलेही नसते. माझा आप्त मला इतर भारतियांपेक्षा जास्त जवळचा नाही.
आणि त्या हॉटेल मधे लोक कारवाई चालू असताना कॅमेरे नेतात, पळून जातात मग मी तिथे कारवाई करनार्‍यांना बेजबदार म्हणनारच. उगीच आरडा ओरडा करु नका. माझ्या पहिल्यापासूनच च्या पोस्ट वाचा आणी मग अक्कल काढा.

सीएसटी स्टेशन वर परत गोळीबार झालाय अस सा.न्गत आहेत Sad
काळजी घ्या सगळे.

हे अतिरेकी ताजमध्ये अजिबात नव्हते. बुधवारी रात्रीच तिथे गेले आहेत. नरिमन हाऊसजवळ राहत होते. ही खोलीभर स्फोटकं असण्याची गोष्ट अजून कोणीही कन्फर्म केलेली नाही.

latest news:
CST बाहेर पुन्हा गोलिबार.
पोलिसांचा घेराव.
परत पोलिस ! त्याच जुन्या बंदुकि घेवून !

GT रुग्णालय आणि रिझर्व्ह बॅन्केच्या बाहेर गोळीबार सुरू आहे.

जी टी होस्पीटल बाहेर ३ जणांनी बहुतेक सरंडर केलय.....
आता म्हणतायत पेशंट होते, आणी पोलीसांनी प्रिकॉशन म्हणुन हाथ वर करुन बाहेर आणल...

हे अतिरेकी या रुग्णालयाच्या आत कसे पोहोचले?????

हे सगळं कुठल्या साईटवर दिसतंय? माझे वयस्कर काका एवढ्यातच व्हि.टी. ला पोचले असतील म्हणून मला काळजी वाटते आहे. प्लिज लिंक द्या.

अंधेरीला अहुरा सेंटर मध्ये बाँब आहे असे सांगत आहेत. ती बिल्डिंग रिकामी केली आहे आणि पोलीस शोध घेत आहेत. पण मी तरी प्रार्थना करतेय की ही अफवाच असावी. मी अत्ता त्यच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये बसली आहे.

अरे हे काय चाललय काय Sad ...

दुसरीकडे परत गोळीबार.. ह्याचा अर्थ हे नक्कीच युद्ध चालू झाल्यासारखे वाटते आहे.. Sad Sad Sad

==================

व्हीटी ला फायरींग ही अफवा आहे असे एन डी टी व्ही वर दाखवतायत.

ओ मॅन. दोन दिवस ह्यांनी इतर अतिरेक्यांचा काहीच शोध का केला नाही. किंवा असे काही होईल ह्याची शक्यता का वाटली नाही. ह्याला बेजवाबदार पणा नाही तर काय म्हणाव. मिल्ट्री, nsc, rpf, atc सर्व जण असुनही परत नविन जागेवर गोळीबार कसा काय होऊ शकतो. टायर्ड ऑफ दिस.

rediff, ibnवर ही बातमी आहे. आणि पोलीसांनी दुजोरा दिला आहे. cstला जाणार्‍या सर्व गाड्या थांबवल्या आहेत. प्लॅटफॉर्म क्र. १४ व १५ ला गोळीबार झाला.
जीटी रुग्णालय रिकाम्.म करण्याचं काम सुरू आहे.

मला तर वाटतं भारताकडे काहीच resources नाहीत.

मनिषा, नाही गं. NDTV.COM वर अपडेट मधे Fresh firing at CST station, Taj असे लिहिलेय Sad

IBN Live च्या website वर Breaking News म्हणून दाखवत आहेत...
==================

रेल्वे पोलिस कमिशनरनी आत्ताच टीव्हीवर साम्गितलय की ती अफवाच आहे.

अफवा आहेत म्हणतायत आता....रेल्वे कमिशनर "फॉल्स अलार्म...."

अशक्य आहे. जे काही चालू आहे ते खरंच वाटत नाहीये. ४० तास झालेत आणि अजून संपलं नाहीये. सीएसटी वरचा गोळीबार ही फक्त अफवाच आहे असं सांगताहेत.

~~~~~~~~~

Pages