मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हमे उनके दिल को समझना होगा की किस हालात मे उन्होने ये कदम उठाया है
--- उनके दिल को समझने के लिये ही तो NSG कमांडोज आये है. दिल को शरीरसे निकालकर, बादमे उसे समझना आसान तो बात है नही. सबुरी का फल हरदम मिठा होता है.

'अतीरेकी अस्खलीत मराठीतून बोलले' ही बातमी खरी असली तर त्याचा अर्थ 'बर्‍याच काळापासून मुंबईत किंवा महाराष्ट्रात वास्तव्य करून, भरपूर माहीती गोळा करून, खूप नियोजन करून हा हल्ला होतोय' असा मी घेतला. तसंही त्यांच्या बाकी 'तयारीवरून' ते जाहीर झालेलच आहे. त्यात 'मराठी' अतीरेकी वगैरे डोक्यात सुध्दा आलं नाही.

आता इथे पुन्हा नव्याने 'प्रचार' सुरू झाला का???? कृपया दुर्लक्ष करा!!

आरे आय बि एन वर बघा थंबुराज बोलतायत, महत्वाची माहिती आहे....
होटेल रुम चे दरवाजे आतुन बंद आहेत आणी नक्के माहेत नाही कुठे अतिरेकी आणी कुठे फक्त होस्टेजेस आहेत....

या ibn वर काल बघितलं, एक प्रणव दामले नावाचा नरोत्तम मागच्या बाजूने ताजमध्ये जाऊन कमांडो कार्यवाहीचे चित्रीकरण करून आला. हा इसम जर आत जाऊ शकतो, तर अतिरेकीसुद्धा सहज बाहेर पडू शकतात. या परिसरात इतर नागरिकांना प्रवेश दिलाच कसा जातो? गलथानपणाची हद्द आहे ही.
आजसुद्धा ओबेरॉयसमोर बघ्यांची गर्दी आहे.

२५ जण १.२५ अब्ज लोकांना आव्हान देतायेत!
तरी आम्ही शांत
आजच्या भाकरीवर तृप्त
ना आम्हाला उद्याची भ्रांत
जगणारे जगतायेत
मरणारे मरतायेत
त्यांच्याशी काय घेणे देणे
आम्ही आमची तुंबडी भरतोय
आम्हा काय देशाची चिंता
आम्हा ना घटनांची खेद खंता
आज जनता तोंड वर करून बोलेल
उद्या पुन्हा पैशासाठी, मत घेऊन मागे पळेल
आम्ही पुन्हा जनतेचे राजे
जनतेच्या सरणावरच आमची पोळी भाजे

11:00 AM: Army Commander LT Gen N Thamburaj says the new Taj Hotel building has been totally sanitised and handed over to the police. One confirmed terrorist left in the old Taj building. He says the terrorist has knocked out the lights in two floors and is on the move constantly. The NSG has established contact with this terrorist. The army is confident that operations at the old Taj Hotel building will come to an end in a couple of hours.

10:39 AM: About 30 hostages, mostly foreigners, have been rescued from Trident Hotel. They are being escorted to a bus stationed near the Air India building

शांतपणे न बोलायला काय झालं. एवढ्या भावना असत्या तर हे सैतानी कृत्य केलेच नसते.

As per TOI

an FBI team from Los Angeles, consisting of bomb and forensic experts, left for Mumbai to help in the investigation.

वा, वा.. कृष्णा उत्तम कविता! छन्द कोणता वापरलात? मुक्तछन्द का? सुरेख. पाटणकरांच्या सौंदर्य मीमांसेप्रमाणे आता यातील् 'सौंदर्यस्थळे ' वाचकाना रसग्रहण करून समजवा पाहू... आणि रसनिष्पत्ती कोनती झाली? रौद्र की शोकरस?

नीरो मरा नहीं,नीरो मरते नहीं

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

इतक्या शांतपणे कसा काय बोलु शकतोय हा इमरान इतक्या लोकांना मारून????... >>>> त्याची मेंटॅलिटी त्या लेव्हलची बनली आहे.. त्याला ही कल्पनाही असणार आहे की आपणही कधीतरी मरणार आहोत. पण `जिहाद' साठी मरणं म्हणजे `जन्नत' मिळते असल्या कल्पनांनी भारून गेलेला असणार तोही..

हेटाळणी करणार्‍यांनी हे वाचा आणि तुमचे हारतुरे तयार ठेवा त्यांच्या साठी

कूल, कोण हेटाळणी करताना दिसलं तुम्हाला इथे?

माझ्या भावाचा टॉप बॉस (फॉरेनर) आत्ताच पाच मिनिटांपुर्वी रिलिझ झाला. पण ओळखीचे ATS Officer परवा रात्री १० वा पासून ओबेरॉयला आहेत व या क्षणापर्यंत त्यांच्या मुखात अन्नाचा कणही गेला नाहिये Sad . त्यांचे बॉस श्री करकरे शहिद झाल्याने कुणाची इच्छाही होत नाहिये काही खायची पण सगळे कर्तव्य डोळ्यासमोर ठेउन तिथे चिकटून आहेत.

उन्नीकृष्णन च्या बातमीला कुठल्या न्यूज लिंकवरून पुष्टी मिळत नाहीये..
की 'सबसे मूर्ख' चॅनेलने सोडलेली पुडी आहे?

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

अगदी खर ह्या लोकांना कशाला ह्या चर्चे मधे घेतात. काल तर फारुक शेख आणि शेफाली छाया ? अरे त्या पेक्षा सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया घ्या ना .
आपल्याला फितुरी चा शाप पूर्वी पासुनच आहे.आणि सामान्य माणुस त्याचे परिणाम भोगतोय .कोणीतरी मदत केल्या शिवाय , माहिती दिल्या शिवाय ही लोक इथ पर्यंत जाऊच शकत नाही. . काय आपली सुरक्षा व्यवस्था ? हे अतिरेकी एवढ सगळ घेऊन शिरतातच कसे आत पर्यंत? एका कोळीने म्हणे संशय येऊन पोलिस कंप्लेंट केली. सहा महिने आधि पासुन गुजरात सरकारने वॉर्निंग दिली होती. हे सगळ थांबवता आल नसत क ? कालच्या चॅनल्स वरच्या व्हीडीओ बघुन तर जालियन वाला बाग हत्या कांडाची पुनरावृत्ती झाली अस वाटल.
तेव्हा निदान ब्रिटीशांची तरी राजवट होती आता तर आता तर राज्यही आपलच राज्यकर्ते ही आपलेच आणि मरणारे ही आपलेच आणि कदाचित मारणार्यां मधेही आपलेच ?
खरच खुप भयंकर आहे हे सगळ.अस्वस्थ करणार. कधी थांबणार हे सगळ ?

मुबैकर एटिएस ला= आम्हाला वाचवा या इस्लामि अतिरेक्या पासुन

एटिएस= थांब जरा मला या कर्नल्.पुरोहित व प्रज्ञा ठाकुर च्या घरात आ.डि.एक्स. सापडतय का ते पाहु दे.

आय बि एन सांगतय की ओबेरॉय मधे १ अतिरेकी उरलाय पण ६ होस्टेजेस वाचु नाही शकले.....

संदीप उन्नीकृष्णन शहीद झाल्याची बातमी खरी आहे. आय. बी. एन्. वर सांगितली ती.

टोणगा, लेफ्टनंट जनरल थंबूराज यांनी स्वतः सांगताना दाखवलय, तेही पुडी सोडतील का??? का इतका कडवटपणा ओकताय??

भाऊराव,
दहशतवादी ते दहशतवादीच.
आणि त्या ATSमुळेच आज तुम्हीआम्ही सुरक्षित आहोत, हे लक्षात ठेवा.
ATSच्या अधिकार्‍यांनी आपले प्राण दिले आहेत, सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी, याचं थोडं भान ठेवा.
उगीच उठताबसता गरळ ओकण्याची सवय आहे, ती बदलता आली तर उत्तम.
आपण हिंदू आहोत, यात फुशारकी मारण्यासारखं काहीही नाही.
भारतीय म्हणून राहता आलं तर बघा.

तेही पुडी सोडतील का??? >>>>

ह्या महाशयांना कदाचित हे सगळे लुटुपुटीचे चालले आहे असे वाटत असावे!! त्यामुळे प्रसंगाचे गांभिर्य समजण्या ऐवजी ते यावर हस्यास्पद वक्तव्ये करतायेत!
अर्थात हे हेतुपुरस्सर असेल तर आपण ह्या कडे दुर्लक्ष केलेले बरे!

मुबैकर एटिएस ला= आम्हाला वाचवा या इस्लामि अतिरेक्या पासुन
एटिएस= थांब जरा मला या कर्नल्.पुरोहित व प्रज्ञा ठाकुर च्या घरात आ.डि.एक्स. सापडतय का ते पाहु दे.

अहो भाऊराव त्या 'निरागस' साध्वींचा छळ केल्यामुळेतर करकरेंवर ही वेळ आली.
देवा यांंना माफ कर हे काय लिहीत आहेत ते त्यांना कळत नाही.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

गूगल मधे साधं नाव शोधलं की मेजर संदीप ऊन्निकृष्णन शहीद झालेत हीच बातमी वाचायला मिळतं आहे.

ताज मध्ये तर एकच उरलाय पण त्याच्या बरोबर एक फॅमीली असल्याची शक्यता आहे ......
किती अवघड काम आहे.... मी आता पर्यंत बोललो नाही पण स्वतः फार अक्कल असल्या सारख ईथे कोणी तरी साध २०-२५ जणांना कंठस्नान घालता येत नाही असा बेजवाबदार शेरा ही मारला होता....
विचार करा, आपले आप्त जर कोणी आत असले असते तर आपण असाच विचार केला असता का.....

भाऊराव, अतिरेकी हे अतिरेकी असतात, त्यंाना धर्म, जातपात नसते.
करकऱ्यंाची निष्पक्ष अधिकारी म्हणून ख्याती होती.

नरिमन हाउस मधुन एक अतिरेकी पहाटे ५ वाजता पळुन गेल्याची बातमी आत्ताच झी न्युज वर सांगितली आहे..........

उगीच उठताबसता गरळ ओकण्याची सवय आहे, ती बदलता आली तर उत्तम.आपण हिंदू आहोत, यात फुशारकी मारण्यासारखं काहीही नाही.भारतीय म्हणून राहता आलं तर बघा.
असं कसं साध्वींचा छळ सर्वात महत्वाचा,त्यांच्या नादाला लागालं तर भस्म व्हाल.
चिनु आपण यांना प्रत्युत्तर तरी का देतोय? पण देउयाच नाही तर ही गरळ थांबणारच नाही.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

Pages