मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

CNN अमेरिका वर लाईव्ह दाखवत आहेत.

ह्या हल्याल्या भेकड हल्ला असे म्हणन्या पेक्षा भेकड जनतेवर हल्ला म्हणा. ज्या सरकारला आपले नागरिक सुरक्षित ठेवता येत नाही ते सरकार भेकड तसेच हे सर्व सहन करनारी जनता भेकड.

very sad

1.35am: Encounter specialist Vijay Salaskar killed in gunfight with terrorists. Anti-terrorism squad chief Hemant Karkare also reported killed! Cops are in a complete state of shock!

1.32am: There is no official line of information forthcoming. Even the television channels are flashing contradicting reports. But it has been established that it is a terrorist attack

1.15am: Firing reported at Hotel Ramada, Juhu. Four policemen killed in gun fire.

1.05am: One more blast at the Taj Hotel and one at the Oberoi Hotel

1.04am: Firing continues at CST station. 1 journalist injured. Firing from police van

1.02am: Two terrorists driving a state government car is reported to be heading towards Malabar Hill where the chief minister and other dignitaries stay.

12. 57am: Terrorists are reportedly holed in Room No 360 and 361 of Taj hotel.

12.55am: 45 police personnel have entered New Taj Mahal Hotel. Entire area cordoned off. Entire police force is on the streets.

12.52am: 2 terrorists shot dead at Girgaum Chowpatty and 2 terrorists have been arrested. They were attired in army fatigues, were clean-shaven and fair

12.48am: Blast on dome of Old Taj Mahal hotel. Heavy smoke visible. 150 employees of Hindustan Lever who were having a seminar there, trapped inside the hotel. HLL Managing director suspected to be among them

12.46 am: 2 terrorists in black Honda City reportedly firing randomly

12.41am: Firing reported from outside Maharashtra assembly! Stations evacuated. Police sealed a suspicious boat at Mazagaon Dock - an extremely sensitive area.

12.40am: Terrorists reported to have escaped in a police van from Cama Hospital!! This is the height!

12.37am: 100 reported injured. CST station (outstation) littered with blood. Two terrorists have escaped from Cama hospital.

12.30 am: Army stationed across Mumbai. 200 NSG commandos expected to land in Mumbai any moment. Police about to launch offensive inside Taj Mahal hotel and Oberoi hotel. First priority is to take hostages out safely.

Report 12.20am: Terrorists lob hand grenade from Taj Hotel. Another blast outside Oberoi Hotel. 4 injured.

Report 12.18 am: Terrorists using AK 47 guns.

Report 12.13 am: 18 people reported dead. 30 injured.

Report 12.08 am: 10 people reported killed.

Report 12.02 am: Firing still reported from CST station. Grenade lobbed at police van. 2 terrorists holed up inside Capitol Cinema.

Report 11.59 pm: Terrorists enter Cama hospital. Firing reported from there. Trains stopped at Byculla. Firing still reported from Oberoi Hotel. 3 people arrested at Oberoi hotel. Not sure if they are the terrorists.

Report 11.52 pm: 3 police officers injured.

Report 11.47 pm: 2 terrorists are holed up inside Oberoi Hotel. 2 terrorists reach GT hospital. Maharashtra DGP A N Roy advises Mumbaikars to stay indoors. Railways IG KP Raghuwanshi confirms it's a terrorist attack.

अ वेन्स्डे या सिनेमाची आठवण झाली! ' हम आप को ऐसेही मारेंगे - आप क्या करोगे?' है कोई जवाब!! Sad

डेक्कन मुजाहिदीन ने जबाबदारी स्वीकारली आहे... रोज उठून एक नवीन दहशतवादी संघटना तयार होते आणि असे हल्ले होतात... काय चाललंय...

>>> ज्या सरकारला आपले नागरिक सुरक्षित ठेवता येत नाही ते सरकार भेकड तसेच हे सर्व सहन करनारी जनता भेकड.

आणि याच सरकारला हीच जनता पुन्हापुन्हा बहुमताने निवडून देते!

कमाल म्हणजे मुंबई कडे लक्ष्करी पथक रवाना असे आत्ता सांगीतले? अरे कमाल आहे. मुंबई मध्ये असे पथक आधीच तयार नको का?

मैत्रेयी आजही वेन्सडेच आहे.

केदार बरोबर आहे.. पण इतक्या ठीकाणी ऍटेक्स.. अशा गोंधळाच्या परिस्थितीत करणार तरी काय? म्हणजे सामान्य जनता.. पोलिस त्यांचं काम करत आहेतच.. पण नंतर कामं करून काय फायदा? हीच सुरक्षा,काळजी आधी का नाही घेत? सारखे आपले हल्ले,स्फोट,गोळिबार होत असतात मुंबईमधे.. घ्या ना काळजी आधीपासून!

मटात त्या नायजेरीयन हल्लेखोराचा फोटो पण आहे. म्हणजे आपले रिपोर्ट्स जास्त धाडशी म्हणायचे पोलिसांपेक्षा..
आत्ताच सिएनेन वर वाचलं, की अन-ऑफिशिअल न्युज आहे की त्या लोकांनी परदेशी लोकांना ओलिस ठेवलेच आहे. प्लस अमेरिकन्,ब्रिटीश पासपोर्ट्स असलेल्या लोकांची माहीती मागितली आहे..
एटीसचे अधिकारी, पोलिस यांचा मृत्यु.. Sad
काही कळत नाहीए.. इथे बसून नुस्ता जिवाला घोर लागलाय.. तिथल्या लोकांची काय परिस्थिती असेल.. किती टेन्शन... युद्धच वाटतेय खरंच! Sad

दयामाया नकोच आता! सरकारने कणा ताठ करायची वेळ आली आहे....पण तसे होईल काय?...???
..................................................
देव मस्तकी धरावा | अवघा हलकल्लोळ करावा

हे थैमान थांबतच नाहीये. चालूच आहे. १० वाजल्यापासून.. एकदाच स्फोट होऊन थांबलं नाहीये.. हे युद्धच आहे.

इथे सरकार कुणाचंही आलं तरी काहीही फरक पडणार नाहीये. त्या ठिकाणी जाउही नका.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

....पण तसे होईल काय?...?? >>>> नाही.. वोट बँके वर लक्ष ठेवून अजून चाटतच बसणार त्यांची.. Angry

बाबू नाना कणा आहे का ताठ व्हायला?
करकरेंना गोळी कशी लागली त्याचीही चौकशी व्हायल पाहीजे. अजुनही त्या आयबीनवर मध्येच गोळ्या ऐकू येत आहेत.

आत्ताच सीएनएन वर दाखवले, लंडनच्या एकाने फोन करुन सांगीतले की त्याचे मित्र ताज हॉटेल माध्ये अडकलेत पण त्यांना अतिरेक्यांनी ओलीस नाही ठेवलय, अतिरेक्यांनी सगळ्या परदेशी लोकांचे पासपोर्ट बघुन फक्त अमेरीकी आणि ब्रीटीश लोक ताब्यात घेतले.

cama हॉस्पीटल वर गोळीबार. कुल्याब्यात पेट्रोल पंपावर स्फोट, किमान ७८ लोक मारले गेलेत. किमान ५ ठीकाणी ब्लास्ट Sad

हो रुनी बरोबर. त्यांनी ५० लोकांना ताब्यात घेतले असे आता कळाले.

महा सरकार किंवा भारत सरकारला अशी ईंटेल होती का नाही हे पण त्यांनी सांगायला पाहीजे

ओलीस ठेवले कोणाला तर मग अजुनचं भयंकर्..काय मागणी करतील देवचं जानो. Sad

>>> दयामाया नकोच आता! सरकारने कणा ताठ करायची वेळ आली आहे....पण तसे होईल काय?...???

नक्कीच तसे होणार.

उद्या गृहमंत्री शिवराज पाटील यावेळी दिवसभर एकदाही सदरा न बदलता अतिरेक्यांना कडक इशारा देतील; भाजप 'पोटा'चे पुनरज्जीवन करण्याची मागणी करेल; सध्याचे कायदे अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुरेसे आहेत असे सांगून शिवराज पाटील आणि मनमोहन सिंग ही मागणी फेटाळून लावतील; उद्या सोनिया गांधी, मनमोहन सिंग, शिवराज पाटील आणि लालकृष्ण अडवाणी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी व जखमींना भेटण्यासाठी मुंबईला भेट देतील; विलासराव देशमुख मृतांना व जखमींना आर्थिक मदत जाहीर करून मदतीचे धनादेश सोनियांच्या हस्ते वाटतील आणि इतक्या VIP न्च्या आगमनाने वाहतूक मुरंबा होऊन मुंबईकर आपल्या नशिबाला बोल लावत मिळेल त्या वाहनाने कामावर जायचा प्रयत्न करतील.

२-३ दिवसात सर्व काही पहिल्यासारखे सुरळीत होऊन काही दिवसातच जनता हा हल्ला विसरून जाईल.

पाच खासदारांसह २०० लोकांनी स्वतःला एका मोठ्या खोलीत बंद करून घेतलं आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या एका खासदाराने फोन करून वाहिन्यांना ही बातमी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार ताजमध्ये आतल्या अनेक खोल्यांना आग लागली आहे. किमान ७-८ स्फोट झाले आहेत. आणि अतिरेक्यांनी परदेशी नागरिकांना ओलीस ठेवलं आहे.
श्री. विश्वास नांगरे पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

बोरीवलीला फायरिंग झाल्याची लेटेस्ट बातमी ऐकली आत्ता. Sad

२-३ दिवसात >> ? माढेकर ओव्हर ऐस्टीमेट करताय. उद्या सकाळीच लोकल मध्ये लोक निघनार कामावर जायला व हेडींग असेल की जनजिवन सुरळीत.

सर्वांनी दोन- तिन दिवस सर्व गोष्टी ठप्प करायला पाहीजेत. कोणीही कसल्याच कामावर जायला नाही पाहीजे मगच काहीतरी कारवाइ होन्याची शक्यता आहे नाहीतर ये रे माझ्या मागल्या.

त्या साखदारांना पकडा आणी ओलीस ठेवन्या पेक्षा यमसदनाला पाठवा म्हणाव त्या अतिरेक्यांना.

ताज आणि ओबेरॉय या दोन ठीकाणी अतितेक्यांनी लोकांना ओलीस ठेवलय अस कन्फर्म झालेले सांगीतले - सीएनएन.
व्हाइट हाउस कडुन हल्ल्याचा निषेध - सी. एन. एन.

बोरीवलीमधेही फायरींग.
२-३ दिवसात ते होणारच आहे. पण वरच्या भाषणात कुठल्याही पक्षाचं नाव कुठेही घातलं तरी तेच झालं असतं.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

हेमंत करकरेंना काल धमकी मिळाली होती--NDTV
----- मुंबईवरील भेकड हल्ल्याचा निषेध -----

व्हाइट हाउस कडुन हल्ल्याचा निषेध >>> त्यांना काय लागतय निषेध करायला.. त्यांनीच बनवलेली भूतं आहेत ती..

अजून कोणा नेत्यांनी मोठीमोठी स्टेटमेंट कशी नाह केली???

सर्वांनी दोन- तिन दिवस सर्व गोष्टी ठप्प करायला पाहीजेत. कोणीही कसल्याच कामावर जायला नाही पाहीजे मगच काहीतरी कारवाइ होन्याची शक्यता आहे नाहीतर ये रे माझ्या मागल्या. >>>>> exactly.. लगेच सगळं नीट होतं म्हणूनच फावतं ह्यांचं..

हम आप को ऐसेही मारेंगे - आप क्या करोगे?' है कोई जवाब!! >>>

अगदी खर आहे...हे अतिरेकी आपल्याला खदाखदा हसत असतील की येवढा उपद्रव करतो यांना...पण निष्क्रियतेचा कळस असलेली ही जमात आहे....हालत नाहीत की डोलत नाहीत......अफझलसारख्या अपराध्याला पाठीशी घालणारी पिलावळ जो पर्यंत आमची भाग्यरेखा ठरवतेय तो पर्यंत या राक्षसांचा नायनाट होणे केवळ अशक्य आहे!

.......................................................
वीरांच्या गाथा नच उरल्या | हतबल झाली माझी माता

हेमंत करकरे हे बुलेटप्रूफ जॅकेट आणि हेल्मेट घालून अतिरेकी विरोधी कारवाईमधे भाग घ्यायला गेले होते असं सांगितल आत्ता इथे -http://idesitv.com/nepal.php
आणि तरीही छातीत ३ गोळ्या लागून मृत्यू.. हे कसे काय?? काय घडले असावे?

८० मृत आणि ९०० जखमी असं times of india वर आहे...

९०० जखमी !!! एवढा मोठा आकडा मी पहिल्यांदा पाहतोय... Sad

हेमंत करकरे कारवाईवर निघतानाचा व्हिडीओ ibnवर आहे.. त्यानंतर दोनच मिनिटांत त्यांचा मृत्यू झाला.

मुंबईवरील अतिरेकी हमल्यात हेमंत करकरे, विजय साळसक्र आणि अशोक कामटे शहीद झाले... याखेरीज अजून कितितरी पोलिस लोक व निरपराध सामन्य माणसे बळि गेली आहेत...अजून विश्वास बसत नाहीये..
काय लिहाव कुठे लिहाव कळत नाही...अजून काय काय पहाव लागणार आहे देव जाणे....
या तिन्ही शहिदान्ना त्रिवार प्रणाम, देव त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो!!
संसदेवर हल्ला, बाँब्स्फोट, अन आता हा हमला... हिन्दुस्थान अजून किती दिवस गप्प बसणार आहे... अजून किती दिवस राजकीय फायद्या तोट्यात आम्ची अस्मिता अन देशाची इज्जत गहाण पडणार आहे...??
उद्याचा दिवस काय काय घेवून येतोय देव जाणे..............

तूर्तास इतकच्...... संवेदना गोठलेल्या!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

विश्वास नांगरे पाटीलही जखमी... Sad

९००??? Sad

Pages