मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला खटकलेली गोष्ट. BBC ने आता काय Mr. Qasab असा शब्द प्रयोग वापरायला सुरवात केली आहे कां?

http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/7796381.stm

अजुन एका बातमीत मला Mr. Qasab वाचायला मिळाले. BBC त्या दहा अधमांना attackers मानते पण terrorist नाही; terrorist शब्द स्वतः त्यांच्या साठी वापरत नाही पण आता राईस, मुखर्जी म्हणाले असतील तर त्यांच्या '' " वाक्यात जरुर वापरतात. काय शब्दप्रयोग वापरायचा हे प्रसंगानुरुप असते आणि त्याबाबत (BBC) त्यांचे काही धोरण आहे. मला हे धोरण समजलेले नाही.

Mr हा उपसर्ग (prefix) सभ्यगृहस्थाच्या (Gentleman) खालोखाल मानला जातो अशी माझी समजुत होती... मग लादेन, (मुल्ला) ओमार यांना पण हे Mr. लावतात कां? (बहुधा नसावे, माझ्या वाचण्यात तर नाही आले)

इंग्रजी भाषेचे माझे ज्ञान जुजबी/ कामापुरते आहे, तज्ञ काय म्हणतात?

गुंड्,मवाली,देशद्रोही, नी अशिक्षीत लोक देशाचा कारभार सांभाळणार मग काय होणार देशाचे?
--- उद्या दाऊद कासकर पण निवडणुक लढवेल आणि लोकसभेत/ विधानसभेत बसेल. आश्चर्य नको वाटायला.

लोकसभेत, ५४३ पैकी १२० खासदारांवर (भाजप २९, काँग्रेस २४, सपा ११, राजद ८, CPM 7, बसपा ७, NCP 5 and CPI 2) एकूण ३३३ विविध प्रकारचे गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत.
अधिक माहिती साठी http://www.deeshaa.org/2008/07/19/data-on-criminals-in-the-indian-parlia...

उदय, धन्यवाद माहीती दिल्याब्द्दल.

टोणगा,
अरण्यरुदन म्हणजे छाती फोडून रडणं का? मघाशी फक्त अंदाजाने अर्थ काढून लिहिले म्हणून पुन्हा confirm करते अर्थ अरण्यरुदन चा.

केदार,
कोकणात तश्या बर्‍याच शिव्या सारख्या प्रकारच्याaction ( I mean those action that are similar in nature) वर तोंडात येतात. तेव्हा तुम्हाला नक्की कोणती म्हणायची कल्पना नाही पण तुर्तास असो. इथे ते लिहिणे वा चर्चा करण्याचा हेतू नाहीये हे लक्षात घ्या.

म्रु,
मग मला मायबोलीची खास स्टाइलने गाडी रूळावर आणण्याचा किताब हा मिळाला'च' पाहीजे.

अरण्यरुदन - अरण्यातील रुदन (रडणे), निरुपयोगी रडणे, तुम्ही कितीही रडले तरी त्या कडे कुणी लक्ष देणार नाही.

च्च च्च. अग मनू तू माझ्या लिहीन्याचा वेगळा अर्थ घेतलास बहूतेक. ऐनीवे.

Mr. Qasab
खरे तर honourable Mr. Qasab असे म्हणयला पाहिजे! म्हणतीलहि!

अविनाश धर्माधिकार्‍यांच्या शब्दात सांगायचे तर हिशेब चुकता करायला हवा होता. मग ते रॉचे एजंट पाकमधे घुसवून त्या नीच अतिरेक्यांना व विमान पळवणार्‍यांना ठार करणे असो वा अन्य काही असो. ते करायला हवे होते आणि योग्य वेळी त्याला प्रसिध्दी द्यायला हवी होती.

असे केले असते तर भारतावरही दहशतवादाचा आरोप केला गेला असता.तो तुम्हाला आणि अविनाश धर्माधिकारींना चालला असता का???
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

>>असे केले असते तर भारतावरही दहशतवादाचा आरोप केला गेला असता.तो तुम्हाला आणि अविनाश धर्माधिकारींना चालला असता का???
<<
आपण उपरोधाने बोलत नसाल असे गृहित धरून विचारतो, न चालण्यासारखे काय आहे?

पाकडे उघड उघड विमाने पळवतात, त्यान्चे आय एस आय चे अधिकारी विविध अतिरेकी कारवाया घडवून आणतात. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यान्चे लोक मारले तर आपण अतिरेकी? वा? मग काय करावे म्हणता? गळ्यात सुताच्या लडी घालून, खादी पान्घरून ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान म्हणत सदभावना यात्रा काढाव्यात? का कश्मीर त्यान्ना देऊन टाकू या? का देशभरात कोट्यावधी सन्ख्येने सगळे हिन्दू मुस्लिम बनू या? भारताला अधिकृतरित्या दारुल इस्लाम जाहीर करू या मग सगळे अतिरेकी आत्मे सन्तुष्ट होतील, कसे?
अजून काही नामी उपाय सुचवताय का ज्यायोगे भारतावर अतिरेकी म्हणून बालन्ट येणार नाही?

खरे तर honourable Mr. Qasab असे म्हणयला पाहिजे! म्हणतीलहि!
>>>

ते तसे कॉन्ग्रेसवाले म्हनतील. आणि 'गर्वसे 'वाले कसाबजी म्हणतील.:)

हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

कसाबजी Lol
अमेरिका या सगळ्यात आपली मदत करेल हा केवळ भ्रम आहे.त्यांना तर आतून नुसत्या उकळ्या फुटत अस्तील,ह्या तथाकथित 'सुपरपॉवर'चे हाल पाहून.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

मोदीला पंतप्रधान करावे काय?

संदर्भ - गुजरात मध्ये हिंदू रामाच्या देवळात दोन मुस्लीम जोडप्यांनी काझीला बोलावून निका लावला. सेक्यूलर पिलावळीच्या तोंडात चपराकच बसली. दुसरेंदा.

त्यांचाशिवाय दुसरा काही पर्याय येत्या निवडनूकीत?

रामाच्या देवळात निका लावणे आणी देश चालवणे यात थोडा फरक पडतो असे मला वाटते.
मोदी टाईप राज्यकारभार म्हणजे-लोक,स्वतःचा पक्ष आणी अर्थातच विरोधक या कुणालच न जुमानता केवळ नोकरशाहीच्या जोरावर राज्य चालवणे.संसदीय लोकशाहीला गुंडाळून ठेवत वर्षातुन एकुण २०-२५ दिवसच विधानसभा बोलावणे,इ.इ. हे सर्व थोड्या कालावधीसाठी छान वाटेलही पण नंतर मात्र याचे वाईट परिणाम दिसू शकतात.गेली दोन वर्षे गुजरातमधेच राहतोय व निवडणुकाही जवळून पहिल्या,इतका आत्मकेंद्री नेता भारतात झाला नाही असे वाटते.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

>>पण एकंदर रेकॉर्ड बघता भाजप तितकाच नालायक, निष्क्रिय आहे जितका काँग्रेस पक्ष.<<

अगदी अगदी १००% खर आहे

>>>उद्या दाऊद कासकर पण निवडणुक लढवेल आणि लोकसभेत/ विधानसभेत बसेल. आश्चर्य नको वाटायला<<<

म्हणजे काय?
अनेक मुखवट्यांच्या आडुन तो केव्हाच तिथे पोचला आहे. त्यासाठी त्याला वेगळी निवडणउक लढवायची गरजच् नाहीये.

या विषयावर आतापर्यंत बहुतेक सर्वानी आपली मते नोंदवून झाली आहेत. बाकी इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी नवीन धागा चालू करावा.

Pages