मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळ इतक भय.न्कर आहे की डोक अगदी सुन्न होऊन गेलय. कधी स.न्पणार हे...

का हे अस सारखा सारख होतय... देवा तुच सा.न्भाळ रे आता....

नरिमन हाउस मोकळे झाले....

अरे chinoox,
thats obvious...काश्मीर हून मुम्बईत कमांडो बलवायला लागले तर सम्पलोच आपण Happy
मि म्हणत होतो या हल्ल्याच्या आड , वेळ काढत दुसरीकडे काही मोठा कट शिजवला जातोय का अशी शंका आहे..
असो.
मि तर म्हणने या अतीरेक्यांची मुंडी छाटून ताजच्या घुमटावर आणि गेटवेच्या प्रवेश्द्वारावर कायमची ठोका!! त्यासारखा दुसरा थेट सन्देश नसेल.. या भेकड औलादीची अशीच औरंगजेबी छाटणि करायला हवी..

अजून नरिमन हाऊस मो़कळे झालेले नाही.. आणि तिथे गर्दी जमून फटाके फोडताहेत. शुद्ध वेडेपणा.

लाजो.. मी आणि कल्पना पण टी व्ही समोरच बसलोय... आम्ही पण सुन्न झालोय. आणि एकमेकिंना धीर देतोय. सगळं ठीक होईल अशी आशा करतोय. फक्त यापुढे असं होउ नये म्हणुन आपल्या नेत्यांनी काहीतरी करायला हवं.

अतिरेक्याचि मुंडि छाटुन))) योग्या अरे त्यालि फाशि दिलि तरि ( मन्मोहन सोनियाने)
पुष्कळ झाले.

अरे अपले मा. प्रधनमंत्री म्हणता आहे ह्यात हाल्यात परदेशी शक्तीचां हात आहे आणि त्यानी त्या थांबवल्या नाहीत तर जबरदस्त किंमत मोजावी लागेल... >>> अजुन पोकळ धमक्या आणि जर तरची भाषा.. कसल्या षंडांच्या हाती देश गेला आहे... आणि देशमुख, पाटील तळवे चाटता आहेत मॅडमचे... ते पण साले षंडच...

नरिमन हाऊस ऑपरेशन ओव्हर असे दाखवतायत.. आणि लोकांची गर्दी किती? ती बाल्कनी पडेल इतकी लोकं आहेत त्यावर. आता. त्या गर्दीत लहान मुलं पण दिसतायत..

नाही. अजून ते ऑपरेशन संपलेले नाही.

ताजमध्ये ३ मोठे स्फोट झाले आहेत.. आणि गोळीबार अजून सुरू.

पोलिस कमिशनए हसन गफुर यांच्यामते ताजमध्ये अजुनही एक आतंकवादी आहे....

चिनूक्स, अरे पण कमांडो जाताना दाखवले... नाही, आता आवाज येतोय मागून ईट्स नॉट ओव्हर म्हणून

आणि आता ४५ तास झालेत, त्या दहशतवाद्यांची पण कमाल तयारी दिसतेय न झोपता इतका वेळ गोळीबार करतायेत.. की बरेच जास्त आहेत ते संख्येने? आणि मिडियावाले सारखं कन्फ्यूज करतायेत.. कधी ताज मध्ये एक अतिरेकी आहे म्हणतायेत तर कधी बॉलरुम मध्ये ६-७ आहेत, बरोबर होस्टेजेस आहेत म्हणतायेत.. काही कळत नाहिये.

योग, तुझ्याशी सहमत... हे वेगळंच प्रकरण वाटतंय..

ताजमध्ये अजून काही नागरिक आहेत, हे नक्की. ताजच्या व्यवस्थापनाने तशी माहिती दिली आहे. एक अतिरेकी जखमी झाला आहे. पण ज्या पद्धतीने आत स्फोट होत आहेत, त्याअर्थी आतमध्ये अजून अतिरेकी असले पाहिजेत.

होस्टेजेस वाचु नाही शकले Sad

तिथे अजून ३ अतिरेकी आहेत..

चिनूक्स, कुठले चॅनेल्/साईट बघतोयस तू? इथे तर वेगळेच दाखवतायेत....

ibn.
आणि ताजच्या काही लोकांशी संपर्क आहे.

नरिमन हाऊस मधे खूप गोळीबार सुरू आहे आणि अशा स्थितीतही तिथे जनता सिनेमा बघावा तशी लहान मुलांना घेऊन उभी आहे. खरचं हे दृश्य पाहून मलाही आपला समाज मुर्ख आहे असेच वाटते आहे.

नरिमनच्या पहिल्या माळ्यावर बॉम्ब फोडला म्हणे.

ही CNN वाली लोकं देखील तेच तेच दृश्य आणि त्याच त्याच मुलाखती दाखवून डोकं उठवतात. कालच्या शिळ्या बातम्या आणि शिळ्या मुलाखती आज दाखवून काय उपयोग जेंव्हा इतकं काही ताज सांगा दाखवायला असताना.

बापरे ताज मधे परत एकदा explosion झाले आहे.

ताजला पुन्हा एकदा आग लागली हे दाखवत आहेत.

chinoox , तु स्वतः लोकांशी संपर्कात आहेस म्हणुन विचारतो, मिडीया दाखवतय ते आणी तुला लोकांन कढुन जे कळतय त्यात ताळमेळ आहे का ?

माझा संबंध फक्त ताजच्या काही लोकांशी आहे. या मंडळींना आत जायला परवानगी आहे. मी फक्त ndtv आणि ibn बघतो आहे. या दोन्ही वाहिन्यांवर बर्‍यापैकी चांगलं कव्हरेज आहे. ताजमध्ये अजून नागरिक अडकले आहेत, आणि सतत स्फोट होत आहेत. गोळीबार सुरूच आहे.
ताजच्या बाहेर अक्षरशः जत्रा भरली आहे.

बापरे.. आत्ता इतका गोळीबार दाखवला आवाजासहीत ताज मधे आणि तिथे जवळ लोकं उभी आहेत. खरचं जत्रा भरली आहे.

सत्यजित,

कवितेद्वारे मांडलेली व्यथा चीड अगदी भिडली मनाला...

हे 'युनायटेड प्रो-टेररिस्ट अलायन्सचे' सरकार कधी जागे होणार आहे ? काल टिव्ही वर भारताचे पपेट मिनिस्टर मनमोहन सिन्ग कबूल तरी करत आहेत की दहशतवादविरोधी कायदे लगेच कडक करतो म्हणून.

टाडा, पोटा सारखे जे कायदे होते ते यांनी सत्तेवर आल्यावर रद्द केले, मोदींनी गुजरातमध्ये केला तर तो राज्यपालांमार्फत अडवून ठेवला. एवढे दिवस लोक म्हणत होते की कायदे कडक करा तर कालपर्यंत सांगत होते की गरज नाही. आज स्वतःहून म्हणत आहेत हेही नसे थोडके.

मनमोहन सिंग, शिवराज पाटील असले कुठलाही जनाधार नसलेले कणाहीन कळसुत्री हुजरे दहशतवादाशी लढायला कसले नेतृत्व देणार....

असो..

आपली जनता तर बिचारी हतबल होतीच येवढ्या जबरदस्त हल्ल्या समोर पण आपल्या पोलीसांचे सुद्धा निष्कारण प्राण गेले.. हा हल्ला स्पेशल ओप्स, स्वॉट वगैरेंनीच परतवायच्या लाईकीचा होता.....

मुन्डी छाटणे.. जाहीर जाळणे.. यानी कोणालाही धडा मिळणार नाही.. 'ती' लोक मरायच्या तयारीने आली आहे...
.. अशा प्रतिक्रीया भारतीय सन्स्क्रुतीत नाही...

अतिरेक्यान्चा हा बेत मी म्हणेन अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाली... त्यानी ही हॉटेल उडवली असती तर एवधा परीणाम झाला नसता...

पाकिस्तान बेचिराख केल तरी हा प्रश्न सुटणारा नाही.. आपल्याच बरोबरचे काही जण 'या' लोकानबरोबर आहेत..

सध्याचा दहशतवाद हा इन्टरनेट वरून चालतो...
The new Al-Qaida ( http://video.google.com/videoplay?docid=4820091963875722741&hl=en)

ती लोकं मरायच्या तयारीने आली असतील... पण अपरिमित छळाच्या नाही.... त्यांना सोलुन सोलुनच मारायला हवे...

Pages