मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार - सांगितल्या प्रमाणे संपर्का साठीचे वेब साइट/ पत्ते/ e-mail देत आहे. अजुन कुणी हवेत? कुणाकडे अजुन माहिती असल्यास कृपया टाका/ जोडा.

लोकसभेची मार्गददर्शिका
http://loksabha.nic.in/

लोकसभा अध्य्क्ष, विरोधी पक्षनेते, फोटो वर टिचकी मारल्यावर सर्व संपर्काची माहिती मिळेल.
http://164.100.47.134/newls/sittingmember.aspx

येथे महाराष्ट्रावर टिचकी मारल्यावर आपले ४८ प्रतिनिधी दिसतील
http://164.100.47.134/newls/Statewiselist.aspx

येथे आपले ४८ खासदार, त्यांच्या नावावर टिचकी मारल्यावर तुम्हाला संपर्काची माहिती मिळेल.
http://164.100.47.134/newls/statedetail.aspx?state_name=Maharashtra

पंतप्रधान कार्यालय
http://pmindia.nic.in/

पंतप्रधानांची वेबसाइट, संपर्कासाठी पत्ता
http://pmindia.nic.in/pmo.htm

The Prime Minister's Office
South Block, Raisina Hill,
New Delhi,
India-110 011.
Telephone: 91-11-23012312.
Fax: 91-11-23019545 / 91-11-23016857.

येथे तुम्हाला पंतप्रधानांना (कार्यालयाल) e-mail पण करता येतो, विषयानुसार वर्गवारी आहे.
http://pmindia.nic.in/write.htm

राष्ट्रपतींशी (Supreme Commander of Indian Armed Forces) संपर्क
http://presidentofindia.nic.in/

E-mail: presidentofindia@rb.nic.in

भारत सरकारची मार्गदर्शिका
http://goidirectory.nic.in/

राष्ट्रिय मानवी हक्क आयोग (येथे रितसर तक्रार करण्याची सुविधा आहे), बहुतेकांना हा विनोद वाटेल.
http://nhrc.nic.in/

राजीव गांधीचे १९९१ मध्ये एका आत्मघातकी हल्ल्यात निधन झाले तेव्हा आत्मघातकी दहशतवाद कदाचित आपल्याला नवीन होता. त्यानंतर मुंबईला पहिला दहशतवादाचा झटका बसला तो १९९३ मध्ये. तेव्हापासून हे सुरुच आहे आणि गेल्या २-३ वर्षात या गोष्टींनी तर कळस गाठलाय. गुजरात काय, जयपूर काय, मुंबई तर खूप वेळा. बायकांच्या भिशीत जसा एकेकीचा नंबर लागतो, तसा एकेका शहराचा नंबर लागतोय. अनेक निरपराध लोक आजवर अशा हल्ल्यांमध्ये मेलेत. त्यात सुरुवातीला खुद्द पंतप्रधान राजीव गांधी, अनेक सामान्यजन, बडी धेंडं, फॉरेनर्स, शूर सैनिक, पोलिस अधिकारी, लहान आणि निरागस मुले (लोकमत मधील, खाली अकोला विभागातील "अन मायबापाचे घर पोरके झाले" ही बातमी बघा - http://onlinenews.lokmat.com/staticpages/main/index.php ) सगळे येतात. आज २००८, म्हणजे १५ वर्षे झालीत तरी हे सुरुच आहे. आणि काल मनमोहन सिंग एन डी टी व्ही वर म्हणाले की अशा समस्यांना सोडवण्यासाठी "a fedaral gency should be established to deal with such things, a national security policy/law etc. should be implemented etc. etc."
मला त्यांची नक्की वाक्यं आठवत सुद्धा नाहीत, इतके ते गुळ्मुळीत होते.
??????????????

आपल्याकडे अशी एजंसी नाही? असा कायदा नाही? रतन टाटा पण हेच म्हणाले की अशा गोष्टी वारंवार होत असुनही त्यांच्याशी डील करणारी यंत्रणा अस्तित्वात नाही... क्राय्सिस मॅनेजमेंट साठी काही नाही. साधारण १५-१६ वर्षात एक नुकतंच जन्मलेलं बाळ पण शिकून, सवरून दहावीची परीक्षा पास होतं... मग आपले शासन, पुढारी मतिमंद आहेत काय? १५ वर्षात दहशतवादाच्या विरुद्ध काहीच प्रगती नाही?
Is there something- like an information transparency act, under which the common man can get an update from the Indian government regarding progress made on all such cases so far?
Our political leaders have to realize that they are there because we voted for them, and not because they belong there. So they are responsible, they are answerable and there are certain performance measures that they have to satisfy. And if they do not, we do not vote. Gone is the time for politicians who are uneducated hoodlums. We need educated, serious leaders here who are innovative and quick with a fresh outlook.

कालपासून सतत वेगवेगळ्या ठिकाणी बातम्याच बघणं चाललंय. आज तर दिवसभर सीएनएनवरही दाखवतायत.
कै. विजय साळसकर एकमेव एन्कांऊटर स्पेशालिस्ट होते (प्रदीप शर्मा, दया नायक इ. पैकी) ज्यांच्या चारित्र्यावर डाग नव्हता. ईश्वर सर्व मृतांच्या आत्म्यांस शांती देवो.
--------
श्री. मनमोहनसिंगाबद्दल आदर राखून नमूद करावसं वाटतंय की ते फारच गुळमुळीत बोलतायत. आतंक भडकलेल्या राष्ट्राचे पंतप्रधान इतके गुळमुळीत.... तेही इंग्रजीतून बोलतायत... हिंदीतूनपण बोलले का? नसतील तर कुणीतरी त्यांना आठवण करून द्यायला हवीय की आपली राष्ट्रभाषा इंग्रजी नाहीये !!! दहशतवाद्यांच्या हल्ल्याने वाईट वाटतंय आणि टीव्हीवरचा पंतप्रधानांचे गुळमुळीत शब्द ऐकून संताप होतोय !!!

ही घटना इतकी भयाण आहे,नि मन सुन्न करणारी आहे की कशातहि लक्ष लागत नाही. इतके दिवस भेकडपणे बाँब लपवून पळून जात. आता उघड उघड शस्त्रे घेऊन खुश्शाल आमने सामने लढाई करायला हे लोक उभे राहू शकतात, म्हणजे त्यांची किती तयारी असली पाहिजे, केव्हढे हे औधत्त्य! कुठून आले एव्हढे बळ यांना? नि आता दोन दिवस झाले अजून संपले नाही! काही कळत नाही.
पण आपले काहीतरी खरडून मन रिझवायचे.

पण आपण पोलीसांवर नि लष्करावर नि NSG वर भरोसा ठेवून बसण्यापलीकडे काही करू शकत नाही. ते जे करताहेत तेच योग्य असेल असे समजू या. कारण मला तरी अश्या प्रसंगी काय करावे ते अजिबात माहित नाही, तर जे करताहेत त्यांच्यावर विश्वास ठेवावा.

मुख्य म्हणजे एकूण किती असे हल्लेखोर आहेत, ते नक्की माहित आहे का? सगळे हल्लेखोर एकतर मेले किंवा पकडल्या गेले का? हे कसे खात्रीलायक रीत्या सांगता येईल? हे सगळे संपले असे कधी जाहीर करता येईल? शाळा कॉलेजे राहू देत, पण बाकीचे व्यवहार किती दिवस बंद ठेवणार?

जे आतमधे अडकले आहेत त्यांना, आपण मारले नाही तरी ते लोक मारणार नाहीतच कशावरून? तेंव्हा त्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे की अतिरेक्यांना पकडण्याचा, नि हे सगळे थांबण्याचा प्रश्न आहे? नाहीतर तेहि मरायचे नि अतिरेकीहि सुटायचे!

उदय - फारच छान! मी नुकतेच पंतप्रधानांना आणि राष्ट्रपतींना लिहीले.

वैभव - केवळ आज लिहून थांबायला नको, त्याचा चिवट पणे पाठपुरावा करायला हवा. आजच्या दिवसाला हजारो पत्रे येतील, पण १५ दिवसा नंतर ओहोटी लागायला सुरवत होईल, आणि त्यानंतरचाच काळ महत्वाचा आहे (जेव्हा सामान्य लोकं विसरायला लागतात)...

काल झी वर पाकिस्तानच्या पंतप्रधानाची मुलाखत दाखवली. म्हणत होता भारतीयांना सवय झाली आहे पाकिस्तानवर संशय घ्यायची. आणि मग तो मोबाईल सापडला त्यातील फोन हे पाक वरून येत होते. फक्त कुठल्या शहरातून येत होते हे मात्र कळत नाहीये. एखादा अतिरेकी जर जिवंत सापडला तर त्याच्याकडून सर्व काही उगाळून घेण्याचा प्रयत्न करता येईल.

मला एक कळले नाही की ताजमधे इतका दारुगोळा आणला गेला तेंव्हा ताजच्या व्यव्स्थपकाला याचा जरा देखील संशय आला नाही का?

मृण्मयी, तू दिलेल्या लिंकमधील बातमी खरी असेल असं वाटत नाही. खरा पत्ता लागत नाही तोवर अतिरेक्यांना मराठी म्हणू असा काहीसा विचार असावा अफवा पसरवण्यामागे.
खरंच, सुट्टी एंजॉय करायचा मुळीच मूड राहिलेला नाही. सीएनएन बघून मनात अतिशय चीड दाटून आलीये. असं वाटतं की तिकडे पोचून ह्या नालायक राजकारण्यांना सरसकट गोळ्या घालाव्यात. भारत पुढे येतोय नी प्रगती होतेय ह्याचा गवगवा चालतो सगळीकडे. पण टि.व्ही बघितला की लक्षात येतं की आपली प्रगती कुठवर आलीये ते.

पण आपण पोलीसांवर नि लष्करावर नि NSG वर भरोसा ठेवून बसण्यापलीकडे काही करू शकत नाही. ते जे करताहेत तेच योग्य असेल असे समजू या. कारण मला तरी अश्या प्रसंगी काय करावे ते अजिबात माहित नाही, तर जे करताहेत त्यांच्यावर विश्वास ठेवावा.

>>>
झक्कीसाहेब ,तुमच्या प्रांजळपणाला दाद दिली पाहिजे. तुम्हाला अशा प्रसंगी काय करायला पाहिजे हे माहीत नाही? धत तेरी! सगळे आयुष्य फुकट गेले. इथे बघा ना किती तरी 'तज्ज्ञ' सरकारने ,पोलीसानी, पंतप्रधानानी ,आर आर आबानी, लष्कराने काय काय करायचे असते अन हे का केले नाही ते का केले नाही याबद्दल तुफान मार्गदर्शन करीत आहेत. ते वाचा ज्ञानवंत व्हा अन पुढच्या स्फोटात ,गोळीबारात त्याचा वापर करून दहशतवादाचे कंबरडे मोडा. पण हो , तुम्ही तर तिथे अमेरिकेत ए सी मध्ये सुरक्षित? तुम्ही कसे येणार त्यांचा खात्मा करायला.? असो दुधाची तहान ताकावर भागवा . तुम्ही तिथून मौखिक अथवा टंकलिखित गोळीबार करा. एक पीसी, अन दोन बोटे असली की मोफत सल्लागार केंद्र उभारता येते.सरकारला उपदेश करता येतो.तेही घरात बसून .भाजलेले शेंगदाणे तोंडात टाकीत. ते तुमच्याकडे आहेच. पण आधी इथले वाचा. पूर्वसूरींचे मार्गदर्शन घ्या.का? काय अडचण आहे? ७६ वर्षांचे पंतप्रधानाना देखील इथे मार्गदर्शन उपलब्ध आहे तर तुम किस खेतकी मूली हो?

असो. एनी वे. मायबोलीकरांसाठी एक विलक्षण माहिती आहे. कामा हॉस्पिटलमधले अतिरेकी, ज्यानी कामटे साहेबाना अन साळसकराना मारले ते चक्क शुद्ध मराठीत बोलत होते...
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

अस वाचल कि करकरे, साळस्कर आणि काम्टेना मारणारे दहशतवादी अस्खलीत मराठीत बोलत होते? कुणाला याबद्दल काहि माहिती आहे का?
कल्पू

असो. एनी वे. मायबोलीकरांसाठी एक विलक्षण माहिती आहे. कामा हॉस्पिटलमधले अतिरेकी, ज्यानी कामटे साहेबाना अन साळसकराना मारले ते चक्क शुद्ध मराठीत बोलत होते...
--- मारणारे मराठी होते? बातम्यात कराची (पाक), बोटीने आले, गुजराथ मार्गाने आले असे आहे. प्रधान मंत्र्यांचे पण पाक कडे बोट आहे. तुम्ही थोडे विस्तारित लिहा आता...

तोयबा ने आम्ही या प्रकरणात नाही असे सांगितले (रेडिफ), मग कोण आहे? सामान्यत: ते जबाबदारी घेतात असा आजवरचा प्रघात आहे).

मला असं वाटतं कि हि अफवा आहे. कुठल्याही मोठ्या वृत्त संस्थेने अतिरेकी मराठी असल्याची बातमी दिलेली नाही. कृपया आपल्या ते मराठीत बोलत असल्याचे कुठे कळले ते लिहा.

अशी शक्यता आहे की हा कट पाकमधे रचला असावा पण बहुतेक दहशतवादी इथलेच वापरले असावेत.
अशोक कामटेंच्या निधनामुळे सोलापुरात लो़कांनी आपणहुन बंद पाळला,फार कमी वेळा एखाद्या पोलिसाची अशी प्रतिमा असते.
आणि ते सोलापुरात असताना त्यांच्या बदलीसाठी बोंबा मारणारे सगळे राजकारणी श्रद्धांजली द्यायला पुढेपुढे करत होते.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

इच्छुकानी महाराष्ट्र टाईम्सचे प्रथम पृष्ठ पहावे.
निधड्या छातीने रस्त्यावर येणारे पोलीस अधिकारी फक्त महाराष्ट्रीयनच होते. मुम्बै कोणाच्या बापाची हा प्रश्न उपस्थित करनारे अधिकारी तेव्हा कोठे होते?

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

दहशतवाद्यांची 'मराठी बोली'?
28 Nov 2008, 0204 hrs IST
प्रिंट मेल Discuss शेअरबुकमार्क/शेअर करा

Del.icio.us Google Bookmarks

Facebook Yahoo MyWeb

StumbleUpon Reddit
और >>
सेव प्रतिक्रिया मत:

टीम मटा । मुंबई

एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह तिघा वरिष्ठ पोलिस अधिका-यांची हत्या करणारे ‘ कामा हॉस्पीटल ’ मध्ये बुधवारी रात्री घुसलेले दहशतवादी अस्खलित मराठीत बोलत होते... कामाच्याच एका कर्मचा-याने ही माहिती दिल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

' कामा' हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री घुसलेल्या दहशतवाद्यांनी तेथील दोघा वॉचमनवर गोळ्या झाडल्यानंतर तिथेच जवळ असलेल्या व युनिफॉर्ममध्ये नसलेल्या तिस-या कर्मचा-याच्या पोटाला एके-४७ रायफल लावून 'तू इथे काम करणारा कर्मचारी आहेस का', असे अस्खलित मराठीत विचारल्याचे कळते. त्यावर कर्मचा-याने अतिरेक्यांचे पाय धरले आणि 'मी येथे काम करीत नाही... हार्टअॅटॅक आलेल्या माझ्या पत्नीला येथे अॅडमिट केले आहे', असे सांगितले. तेव्हा 'खरे सांगतो का खोटे' असे दहशतवाद्यांनी दरडावून विचारले. त्यावर 'नाही साहेब, आईशप्पथ खरे सांगतो', असे उत्तर दिल्याने दहशतवाद्यांनी त्याला सोडून दिल्याचे कळते.

ही माहिती याच कर्मचा-याने कामा हॉस्पिटलचे अधिकारी आणि आरोग्य खात्याला दिली. दहशतवादी अस्खलित मराठी बोलत असल्याचे कळल्याने पोलिस चक्रावले आहेत. याच तीन दहशतवाद्यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे तसेच विजय साळसकर यांची हत्या केल्याचे समजते.

कारवाईला वेळ का?
दरम्यान, दहशतवादीविरोधी कारवाईची सगळी सूत्रे एनसएसजीचे डायरेक्टर जनरल हलवत असून ओबेरॉय, ताज आणि नरीमन बिल्डिंग येथे मोठ्या प्रमाणात नागरिक असल्याने त्यांना इजा होऊ नये, याची खबरदारी घेत कारवाई केली जात असल्याने अतिरेक्यांविरोधातील कारवाईला वेळ लागत आहे. दहशतवाद्यांना हुसकावून लावल्यानंतर एनएसजीचे कमांडो हॉटेलांचा एकएक मजला रिकामा करीत आहेत, असे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सांगितले.

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

वैभव,

हि म.टा. ची बातमी आहे.

कल्पू

ती बातमी मटात कूठेतरी वाचली.

टोणग्याला नक्की त्रास कशाच्या होतोय हे कळत नाही.

मी अनेक सुचना केल्या पण तज्ञ म्हणून न्हवे. हा कॉमन सेन्स आहे. आणी तो देणारा मी एकटाच नाही. इथाल्या बहुतेकांनी, जे इतर वेळी त्यांचे मत नोंदवित नाहीत त्यांनी पण लिहीले आहे.
आर आर रडल्या सारखे बोलतो हे येथील बहुतेक सर्व मायबोलीकरांनी लिहीले कारण ते तसे बोलत होते. ते गृहमंत्री आहेत. कॉमन माणूस नाहीत. वर मनमोहन सिंगांबद्दल पण लिहीले आहे, रतन टाटानेही हे सांगीतले. सर्व लोक काही पागल नाहीत. आणी तू 'तज्ञ' म्हणून शालजोडीतला मारतोस तसेही नाही. आम्ही सर्व कॉमन माणस आहोत. ज्यांचात चिड निर्मान झालीये.

तू तर साधा निषेध पण नोदंवला नाहीस वर "मायबोलीकरां करिता विलक्षन माहीती" असे लिहून तू बघा हे "तूमच्या" पैकी एकाने केले असे सुचवू पाहतोस. मी याचा तिव्र निषेध करतो. ह्या अशा मनोवृत्ती मूळेच दहशतवाद्यांविरुध्द काहीही करता येत नाही.

ते मराठी असतील, कदाचित जोशी, देशपांडे, पाटिल असतील तरी ते अतिरेकीच अशीच इथल्या सर्वांची धारणा आहे. तूझ्या इतर पोस्टात सर्व मुस्लीम तसे नाही असे अनेकदा लिहीलेले वाचले, मग सर्व हिंदू देखील तसेच आहेत असे तू आडून सुचवतोस हे इथे बरोबर नाही वाटत. ( खरच. तू इतर वेळी योग्य लिहीतोस पण इथे, "बघा, आता घ्या" हे तूझ्या दोन्ही पोस्ट मध्ये दिसत आहे. मला चूकीचे वाटले म्हणून लिहीतोय. मी सर्व प्रथम पुरुषी घ्यायची गरज नाही तरी. तेव्हा कृपया ... आणी हो तू लिही की ते बरोबर कसे आहेत ते. )

३६ तासांनंतर ३ ठिकानी दडलेल्या २०-२५ अतिरेक्यांना कंठस्नान घालवता येत नाही. ईटस अ शेम. विचार करा असे १०० लोक विविध शहरात घुसले तर भारताची फ्या फ्या उडेल. हे तज्ञ मत नोंदवून मी हे पोस्ट संपवतो. इंटरनॅशनल कम्यूनिटीत "भारतातील सुरक्षा व्यवस्था व ते हाताळान्याची पध्दत" हा विषय आता अनेक दिवस सुरु राहील.

तूझ्या इतर पोस्टात सर्व मुस्लीम तसे नाही असे अनेकदा लिहीलेले वाचले,

>>>>>

हे जरा मला कुठे पाह्यला मिळेल का?

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

ताजमध्ये अजूनही १५-२० नागरिक ओलीस आहेत, अशी बातमी आहे.
नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचू नये, म्हणून कार्यवाही अतिशय काळजीपूर्वक केली जाते आहे..
.
गेली काही वर्षं 'बॉम्बे हाऊस'शी खूप जवळचा संबंध आला आहे..ताजला लागलेली आग बघवतच नाही..
आणि माझी मैत्रिण व तिच्याबरोबरचे शास्त्रज्ञ अजून बेपत्ताच आहेत..

शोधावे लागेल. ऍक्स्ट वाक्य तसे नसेल पण तो सुर असतो व जो बरोबर आहे. पण या वेळी असते ती नाही .
बरोबर आहे चिन्मय.

मुंबईत झालेल्या घटनेचे असे अनेक प्रतिसाद आले ते वाचून नक्कीच काहीतरी मोठा कट रचला आहे हे दिसते,
१) तिन्ही पोलीस अधिकारी एकत्र गेलेच कसे नी का? त्यांना अतीरेक्यानी मारून टाकेपर्यंत त्यांच्यासाठी असलेला security लवाजमा गेला कुठे?
किंवा ह्या घटनेचा फायदा घेवून कोणीतरी अंतर्गत दुश्मनी काढून त्यांचा खून केला का? ह्या (खून होण्यात)घटनेत कुठल्यातरी भारीभक्कम राजकरणी माणसाचा हात असावा काय ?
२) त्यांची गाडी नेमकी कामा हॉस्पीटल च्या मागेच कशी गेली? हा खून दूरदर्शन वर त्यांची चिलखत घालून तयारी झाल्यावर लगेच काही मिनीटात गाडीत बसून कामा हॉस्पीटलकडे कूच केल्यावर झाला तेव्हा आणि किती पोलीस खात्यातील माणसे त्यांचाबरोबर होती?
३) ताज मध्ये अतीरेक्यानी चक्क कन्ट्रोल रूम घेतला तेव्हा reservation नक्कीच आधीपासून केले असेल? हॉटेल्मध्ये हा डेटा नक्कीच उपलब्ध असेल. कुणालाही ह्याचा संशय आला नाही?
४) कुठल्यातरी राजकारण्याचा आशीर्वाद ह्यात नक्कीच आहे?
५) अनेक हल्ले होवून मुंबईत होवून सुरक्षा इतकी कमजोर का? सीमारेक्षेवर काहीच control का नाही? प्रमुख borderlines सील का नाही केल्या?
६) मराठी बोलणारा अतीरेकी ही एक अफवा असु शकते...

................................ हे थांबणार कधी?

माझ्या मते
१) भारताला याचा पुसटस देखील ईंटेलिजन्स नसण
२) कोस्ट गार्ड ला चुकवुन हे सगळे अतिरेकी बिनबोभाट आत घुसणे
३) एन एस जी कमांडोज ना लोकेशन्स वर डिप्लोय व्हायला वेळ लागणे
या ३ गोष्टी अतिशय घातक ठरल्या आहेत, एकदा इतके हेविली आर्म्ड लोक आत घुस्ल्यावर कितीही प्रगत देश असला तरी तिथल्या पोलीसांची धांदल ही ऊडणारच, सगळ्या अतिरेक्यांच्या पोजिशन्स कळुन तिथे कुमक तैनात करायला वेळ हा लागणारच.
एन एस जी वर बोट ठेवण्याइतक आपल्या कोणाचही अश्या गोष्टीं मध्ये एक्स्पर्टीजच नाहीये, ती लोक आज समोर उभी आहेत म्हणुनच आजुन रक्तपात टळला आहे....

हे सर्व थांबायला हवं.

टोणगे- तुम्ही तुम्हाला असलेली माहिती लिहा, मत लिहा, ते वाचायला नक्कीच आवडेल. आता अशा प्रसंगी आपल्या सारख्याने प्रामाणिक मत नोंदवणे अपेक्षीत आहे, झाला तर फायदाच आहे, तोटा नक्कीच नाही.

ते अतिरेकी कोणत्याही धर्माचे, जातीचे, देशाचे नागरिक असतील, त्यामुळे (माझ्या) वरिल मतांमधे काडिचाही फरक पडेल असे वाटत नाही. या अतिरेक्यांनी सर्व देशाला वेठीला धरले आहे.... माझ्या सकट बहुसंख्य लोकं हतबल/ गोठलेली/ थिजलेली आहेत.

मनुस्विनी- या लेखाचे शिर्षक थोडे गल्लत आहे (अतिरेकी दगाच करणार, चुकीच्या अपेक्षा नकोत) पण खुप महत्वाची माहिती देतो. हे तिघेही समोरुन नेतृत्व करणारे होते... म्हणुन तर Sad आपले दुर्देव. हल्ल्याची तिव्रता/ खोली १२ तासा नंतरही समजु शकली नव्हती, ते तर सुरवातीलाच बाहेर पडले होते.

http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=MainEdition-1-1-28-...

बाय द वे टोणेगे मला इंग्रजी बोलायला येत म्हणजे मी काय ब्रिटीश किंवा अमेरिकन झालो का? मराठी बोलता कोणालाही येऊ शकतं. ९-११ च्या अतिरेक्यांना इंग्रजी येत होत मग ते काय अमेरिकन ख्रिश्चन होते काय?

सुतावरून स्वर्ग गाठने ह्यालाच म्हणतात.

श्री. विजय साळस्कर यांना गोळ्या लागल्यानंतर ते अर्धा तास मदतीसाठी याचना करत होते, पण त्यांना रुग्णालयात नेलं गेलं नाही, अशी आजच्या लोकसत्तेत बातमी आहे.

मी पण वाचलं हे मटामधे.. पण ते खरं असलं तरी त्याचं एवढं काय? तो केवळ एक दुवा आहे इतकंच.
त्यावर "बघा मराठी लोक अतिरेकी आहेत!" असा वरचा सूर वा "मराठी बोलतात ते. काय ते कौतुक!" असला मूर्ख सूर दोन्हीही गाढवपणाचेच. बादवे.. दाउद आणि तत्सम इतर लोकही मराठी बोलतातच की. आडनाव पण मराठी आहे त्याचं 'कासकर'.
असो.

केदार, फडतूस लोकांशी वाद घालण्यात शक्ती वाया घालवू नकोस.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मराठी बोलता कोणालाही येऊ शकतं. ९-११ च्या अतिरेक्यांना इंग्रजी येत होत
लै भारी राव म्हणजे आता पाकिस्तानच्या अतिरेकी प्रशिक्ष्कण केंद्रात मराठी शिकवतात की काय.
सरळ शक्यता ही आहे की अतिरेक्यात स्थानिक आणि पाकीस्तानी दोघांचाही समावेश होता.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

Pages