मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जामोप्या, ते आपल्या देशात शक्य नाही रे Sad त्या राहुलराज ने भरवस्तीत दहशत माजवली, त्याला पोलिसांनी मारला तर पोलिसांवर किती टीका झाली ?

....... इन्दिरा गांधी असायला हवी होती.. ? ती काय करणार होती ? स्वतः मुसलमानाशी लग्न करून मुसलमान झाली... फिरोज खान .... नन्तर राजकारणावर परिणाम व्हायला नको म्हणून गांधी आडनाव लावले....

इकडे काही जण पाकिस्तानाला कायमचं ठेचून काढा वगैरे मागण्या करताहेत. पण सध्याची आंतरराष्ट्रीय राजकारणाची परिस्थिती पाहता आणि जागतिक राजकीय उतरंड पाहता तसे काही होण्याची शक्यता वाटत नाहीये.
१. याचं कारण अमेरिकेची सैन्यव्यवस्था अफगाणिस्तानात, इराकात अगोदरच अडकून पडलीये. दहशतवादविरोधी तथाकथित युद्धात गेले काही महिने त्यांना म्हणावं तितकं यश येत नाहीये.. त्यांच्या सैन्ययंत्रणेची दमणूक झालीये. त्यामुळे अफगाणिस्तानाशेजारच्या पाकिस्तानात युद्ध झाले तर सतराशे साठ ठिकाणांच्या भानगडी उपसणे अमेरिकेला अवघड ठरेल.
२. अफगाणिस्तानातलं तालिबानांचं जाळं उखडून काढणं अमेरिकेला पुरतं संपवता आलं नाहीये. कारण अफगाणिस्तानाची आणि पाकिस्तानाच्या अफगाणसीमेला लागून असलेल्या बलुचिस्तानाची सीमा सच्छिद्र आहे .. पाकिस्तानी सरकाराचं बलोच सीमाभागांमध्ये फारसं नियंत्रण नाही. अमेरिकेने मुशर्रफांच्या लष्करी राजवटीवर राजनैतिक दबाव आणूनदेखील बलोच सीमाभागात आसरा घेतलेल्या तालिबानांना पाकिस्तानी सैन्याकरवी ठेचून काढणं अमेरिकेला जमलं नाहीये.. कारण पाकिस्तानी सरकाराचा या भागात अंकुशच नाहीये - एका प्रकारे अराजकच. त्या भागात टोळीप्रमुखांचं बळ चालतं, सरकाराचं नाही.
पाकिस्तानाच्या पश्चिम सीमेवर अशी अराजकाची परिस्थिती असताना त्यांची पूर्व सीमा भारताविरुद्धच्या युद्धाने पेटणे अमेरिकन हितसंबंधांना बाध आणेल. कारण अमेरिकन हितसंबंधांकरता सध्यातरी पाकिस्तान अडखळत्या पद्धतीने का होईना जरा शांत राहणं, त्याची मरायला टेकलेली लोकशाही यंत्रणा सुधारणं अमेरिकेची गरज आहे.
३. पाकिस्तानाची अमेरिकनांना सध्या असलेली व्यूहात्मक गरज पाहता अमेरिका पाकिस्तान शासनावर दुहेरी धोरण योजेल असं दिसतंय. भरपूर मदत देऊ करणं (जेणेकरून पाकिस्तानी लोकशाही सरकाराला स्वतःची कामगिरी म्हणून काही गोष्टी आयत्या सांगायला होतील. आणि पाकिस्तानातल्या अतिरेक्यांना त्यांच्याच सरकारामार्फत दाबणं अमेरिकेला सुकर होईल.) आणि पाकिस्तानी शासनाला इस्लामी दहशतवादाविरुद्ध (विशेषकरून बलोच-अफगाण सीमेवर) लढायला भाग पाडणं. त्यादृष्टीने ते भारतालादेखील सबुरीचा सल्ला देतील. भारतातल्या सध्याच्या किंवा पुढच्या सरकाराने येत्या दीडेक वर्षांमध्ये मुंबईतल्या ताज्या घटनांसारख्या कुठल्याही घटनांवरून निर्वाणीचे इशारे दिले तरीही अमेरिका भारताच्या तोंडात लाडू कोंबून आपल्याला गप्प ठेवेल. भारतालादेखील 'सुसरबाई, सुसरबाई, तुझी पाठ मऊ' म्हणत पाकिस्तानातल्या लोकशाही सरकाराबरोबर इस्लामी दहशतवादाविरोधातल्या तथाकथित जागतिक लढ्यातलं दक्षिण आशियाई भागीदार व्हावं लागेल.
४. भारत आणि पाकिस्तान आण्विक प्रहारक्षमता असलेली राष्ट्रं आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये तणाव वाढल्यावर अख्ख्या जगातून राजनैतिक प्रयत्न/दबाव वापरले जाऊन युद्ध टाळले जाईल. तसंच, भारताने नुकताच अमेरिकेबरोबर अणुकरार केला आहे. त्यामुळे त्यातल्या लाभांच्या बदल्यात भारताला अमेरिकन हितसंबंध (अमेरिकेने अणुपुरवठादार देशांना या कराराकरता लॉबिंग करून राजी करवलं म्हणून) आणि जागतिक सत्तासंतुलन यांचं भान बाळगून तोंडात कोंबलेला लाडू हळूहळू चावत गिळावा लागेल.
५. सध्याची जागतिक आर्थिक मंदी आणि त्याचा अमेरिका-युरोपीय देशांवरचा (आणि आशियाई देशांवरचाही) दुष्परिणाम बघता, क्रयक्षमतेच्या दृष्टीने जगातली चौथी असलेली भारतीय अर्थव्यवस्था पाकिस्तानाशी युद्ध छेडले जाऊन वेठीस धरली जाऊ नये अशी आंतरराष्ट्रीय समूहाची इच्छा असणार.

एवढी कारणं असताना भारत-पाकिस्तान उघड युद्धाची शक्यता सध्या अजिबात दिसत नाही. आपण जनतेनेही वास्तव मान्य केलं पाहिजे, की मनमानी करायला अमेरिकेच्या ढुंगणावर लाथ मारून आपण अजूनतरी जगातली क्र. १ महासत्ता बनलो नाहियोत Happy (रांगेत आपल्यापुढे चीन आहे. :फिदी:). आंतरराष्ट्रीय राजकारणात महासत्तेखेरीज इतर सत्तांनी आपल्या वकुबानुसार आणि महासत्तेची मर्जी राखत प्रसंगानुरूप राष्ट्राभिमान मिरवायचा असतो. एरवी थुंकीनिशी गिळायचा असतो.
तूर्तास आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांना आपल्या शक्तिनुसार जपणं आणि आपली सुरक्षायंत्रणा काटेकोर बनवणं एवढ्या गोष्टी आपण करू शकतो. अजून एक गोष्ट सहजसाध्य दिसते - मुंबईतल्या २६/११ हल्ल्यांच्या धाग्यादोर्‍यांतून दहशतवाद-तालिबानांचा/अल कायदा वगैरे मंडळींचा इस्लामी दहशतवाद यांचा संबंध सज्जड आहे हे पुराव्यानिशी दाखवून अमेरिकेच्या काठीने आपल्याला त्रासणारा दहशतवाद धोपटून घेणे. राजनैतिक हुशारीने नीट योजलं तर तोंडात कोंबलेल्या लाडवाबरोबरच हाही फायदा आपल्या पदरात पडेल.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

03:05 PM: Prime Minister Manmohan Singh [Images] asks his Pakistani counterpart Yousuf Raza Gilani [Images] to send ISI chief to Delhi [Images] to share information on Mumbai terror attacks, says Gilani's spokesman.

03:04 PM: Huge explosion rocks Taj Hotel. Prior to this, constant exchange of fire was going on. Unconfirmed reports said a person was rescued and taken in an ambulance from the hotel lobby.

आत्ताच्या राजकारण्यांपेक्षा बर्‍या म्हणायच्या त्या. त्यांनी बांग्लादेश सेपरेशन व ब्लू स्टार successfully handle केलं. आत्ताच्यांना काहीच जमत नाही.

<इन्दिरा गांधी असायला हवी होती.. ? ती काय करणार होती ? स्वतः मुसलमानाशी लग्न करून मुसलमान झाली... फिरोज खान .... नन्तर राजकारणावर परिणाम व्हायला नको म्हणून गांधी आडनाव लावले...<>>

इंदिरा गांधी असायला हव्या होत्या? त्या काय करणार होत्या?
.
इतिहास वाचला तर त्यांनी नक्की काय केलं, ते कळेल. त्यांचे विरोधकसुद्धा त्यांचं कर्तृत्व मान्य करतात.

अत्ता आज तक वर साजन कपुर ची मुलाखात ऐकली... तो ताज मध्धे बन्धक होता म्हने. त्याच्या मते आतन्कवादी 'आज तक'/न्युज च्यानेल पहात होते आणि त्यामुळे त्यांना कमांडो चि पोसीशन कळत होती!!!

स्वताच्या फायदया साठी हे मिडिया वाले जास्ती जास्त माहिती देतात आणी त्याचा फायदा आतन्कवाद्यांना होतो!!!

--
IP

आता काय तर म्हणे मनमोहनसिंघानी गिलांनींकडे आय एस आय चिफला दिल्लीला पाठवण्याची मागणी
केली आहे अतिरेक्यांबाबतची माहिती शेअर करायला.. सहीच.. म्हणजे जी संघटना अतिरेक्यांना पाठीशी घालते तिच्याच मुख्याला चर्चेचे आमंत्रण.. कमाल आहे ...

मयुरेश,
summon या शब्दाचा अर्थ 'आमंत्रण' असा नाही.

बाई ग्रेट होत्या पण दहशतवादाच्या सुरूवातीला दहशतवादानेच जीव घेतला त्यांचा. हे त्यांना तरी निपटलं असतं का?
अर्थात सध्याचे पीएम आणि इतर लोकांपेक्षा कदाचित बरं झेपलं असतं.

हिम्स,
आपले राजकारणी शेपूट घालून बसलेत हेच तर लाजिरवाणं आहे ना. आणि दुसरे अक्कल काढतायत त्याचंही काही वाटत नाहीये त्यांना.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अगदी पटतय फ तुम्ही जे म्हणताय ते... मला वाटते राजनैतिक हुषारी बरोबर राजनैतिक इच्छाशक्ती, मुत्सद्दीपणा पाहिजे. तरच शक्य आहे. पण बर्‍याचदा आम्ही रणांगणावर जिंकतो पण वाटाघाटींमध्ये गमावतो.

>>केली आहे अतिरेक्यांबाबतची माहिती शेअर करायला.. सहीच.. म्हणजे जी संघटना अतिरेक्यांना पाठीशी घालते तिच्याच मुख्याला चर्चेचे आमंत्रण.. कमाल आहे ...
मोरा, सोपंय. काल दिवसभरातल्या घडामोडींनी भारतीय जनता क्षोभलीये हे पाहून मनमोहन सिंगांनी पाकिस्तानाला किंमत मोजावी लागेल असा अप्रत्यक्ष इशारा दिला. हे सर्व पाहून अमेरिकन शासनाने प्रसंग उमजून लगोलग त्यांचे फोरेन्सिक तज्ज्ञ आणि गुप्तवार्ता जाळं मदत म्हणून भारताला देऊ केलंय. आणि मी वर लिहिलंय त्यानुसार मोबदल्यात भारताने पाकिस्तानाविरुद्ध भांडण उघडू नये, सबुरीने घ्यावं अशी चांगदेवी चिठ्ठीही पाठवली असणार.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

फ, चांगले मुद्देसूद विश्लेषण...

राजनैतिक हुशारीने नीट योजलं तर तोंडात कोंबलेल्या लाडवाबरोबरच हाही फायदा आपल्या पदरात पडेल.>>>
ही अशी हुशारी दाखवणारा एक तरी नेता अस्तित्त्वात आहे का.. आणि असेल तर त्याला त्याच्याच पक्षातून तसेच बाकिच्या पक्षातून जो काही विरोध होईल त्याचे काय? आज पर्यंतचा इतिहास बघता सगळ्या राजकीय पक्षांचे एकमत होणे अशक्यप्राय गोष्ट आहे..

काल वास्तविक पहाता, मनमोहन सिंग व अडवाणी मुंबई एकत्र दाखल होणे गरजेचे होते, जेणे करुन सत्ताधारी व विरोधी ह्या बाबतीत एकाच मताचे आहेत असे दिसले असते पण... ह्या @#$@#% राजकारणामुळे की कशामुळे ते माहित नाही पण आडवाणी एकटेच पुढे आले आणि मनमोहन सिंग नंतर आले..

शहीद अधिकार्‍यांच्या घरी जाऊन त्यांच्या आप्तांची भेट घेणे महाराष्ट्रातील नेत्यांनी करणे गरजेचे होते परंतु त्यांच्या आधी नरेंद्र मोदी तिथे पोहोचले...

हे बघता तू म्हणतो आहेस तसे एका दगडात दोन पक्षी मारणे आपल्या राजकारण्यांना शक्य झाले तर त्यांचा जाहिर सत्कार केला तरी तो कमी वाटेल...
==================

चिन्मय,रेडिफची पुढची बातमी वाच.. ISI chief will come to India on PM's request... requestcha अर्थ काय घ्यायचा आता?

अवघड आहे सगळं
नुसतं टीव्ही वर बघून आणि ऐकुन मन सुन्न झालंय... जे प्रत्यक्ष या प्रसंगातून गेलेत त्यांची अवस्था काय असेल...:(
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे...:)

एक वेगळी कल्पना.....

ह्या मागे अमेरिकाच नसेल कश्यावरून?
कारण पकिस्तानात अमेरिका उभी आहे!
आज वर अमेरिकेने हेच केलय अफगणिस्तान, इराक, इस्त्रायल, पाकिस्तान सगळी कडे शिरून तिथे अंमल बसवलाय त्यांनी!

कृ फारच भयानक कल्पना... Sad
==================

मयुरेश,
TOI पण तेच सांगतो आहे
PM to Pak: Send ISI chief to New Delhi

आडवाणी एकटेच पुढे आले आणि मनमोहन सिंग नंतर आले.. >>
त्यांचे काय रे ते निघाले ही असतील मॅडम म्हणाल्या असतील 'नका जाउ' , नाही आले.

हो, आणि हे साले अमेरिकन एकदा कुठे दाखल झाले तर तिथुन पुन्हा परत जात नाहीत.

इराकवरिल हल्ल्याच्या वेळीही त्यांना भारतीय किनार्‍यावर अमेरीकन तळ बनवायचा होता... काय तर म्हणे युद्धनौकांना इंधन भरण्यासाठी...

Pha,
तुझे सगळे मुद्दे बरोबर आहेत पण बूश आता गेल्यात जमा आहे..इराक अफगान च्या फियास्को नन्तर सर्व dynamics बदलले आहे.. in fact नेस्त्नाबूत पाकीस्तान हे अमेरीकेसाठी जास्त मोकळ रान असेल त्यांची उदद्दीष्टे साध्य करायला (तूझे पोस्ट अमेरिकेच्या अंगाने आहे म्हणून)... आणि सद्द्य परिस्थितीत खर तर भारताने जास्त प्रेशर टाकायला काहीच हरकत नाही कारण अमेरिकेत सत्ताबदल चालू आहे.इथे बरेच वेळा म्हटल जात आपण कृती करत नाही... हीच वेळ आहे, अख्ख्या मुम्बै, महाराष्ट्र, देशाने रस्त्यावर उतरावे, हातात पा़कीस्तानचा धिक्कार, कारवाईची मागणी चे बॅनर घ्यावेत्..धडक मोर्चा मंत्रालय, दिल्लीवर न्यावा.. आणि असे आंदोलन उभे करावे की सरकार पाक विरुद्ध कारवाई करायला मजबूर होईल.. देशभरातील या लोकांदनापुढे अमेरिक अन इतर राष्ट्रेही दबाव टाकू शकणार नाहीत.. पण हे आंदोलन्च प्रथम होणार नाही हेच दुर्दैव!
आबाना अत्ता प्रेस conference मधे पाकीस्तान बद्दल प्रश्ण विचारल्यावर, केवळ शिव्ञा द्यायचे बाकी होते..ज्या आवेशात व भावनाभरात त्यांन्नी "भारत माता की जय" ही घोषणा दिली त्यावरून पुढे काय मोठी खळबळ माजणार आहे याचा अंदाज येतोय..
good for a change, we saw one politican saying bharat mata ki jay in last 3 days...हेही नसे थोडके.

<इन्दिरा गांधी असायला हवी होती.. ? ती काय करणार होती ? स्वतः मुसलमानाशी लग्न करून मुसलमान झाली... फिरोज खान .... नन्तर राजकारणावर परिणाम व्हायला नको म्हणून गांधी आडनाव लावले...<>>

आपला लडा हा आतंकवादाशी आहे, कुठल्याही धर्म, जाति बरोबर नाही आहे. आपले विधान कुथल्याही धर्माच्या लोकांना वाईट वाटेल असे करु नये.

ताज व नरिमन हाऊस मुक्त .. लोकमत

आता मनसेने रस्त्यावर उतरुन पाकिस्तान विरुध्ह मोर्चे काढले पाहिजेत आणि सामान्य लोकांनी त्यात मोठ्या प्रमाणात सामिल व्हायला पाहिजे.

खरं आहे योग. मौका भी है और दस्तूर भी अमेरिकाने बनाया हुवा है!

मनसे कशाला ह्यात... दोन दिवस कुठे तोंड लपवून बसलेत काय माहित.. मनसे वाल्यांची काही गरज नाही..
फक्त सामान्य लोकच हवेत.. मनसे वगैरे कोणी बरोबर आले की लगेच परत घाणेरडे "राजकारण" सुरू करतील...
==================

yes...that will certainly be in the interest of manse and as well as india... the need of hours i to get under any such one banner whether manse or fanase...

योग,
आबांचा video आहे का कुठे ?

मनसे किंवा कुठल्याही पक्षाने काढावा मोर्चा, पण सगळ्यांचा सहभग महत्वाचा आहे. अत्ता माय्बोली जे वातावरण आहे ते ६ महिने जरी देश्भर राहीले तर सरकार ला ठोस पावल उचलावीच लागतील.

दहशतवादाविरुद्ध लढायला तुम्हाला मनसे कशाला हवी आहे?
एकीने, भारतीय बनून राहिलो आपण, तरी अतिरेक्यांची परत हिंमत होणार नाही.
बदल घडवून आणण्यासाठी सतत राजकीय पक्ष आणि भ्रष्ट राजकारण्यांच्या कुबड्या कशाला?

बरोबर आहे हिम्स, पण ते नविन पिढीचे प्रतिनिधी आहेत ना म्हणुन मी बोलले. नाहितरी त्यांची मारामारीची भाषाच ईकडे पाहिजे, नुसते चर्चा करुन काय साध्य होणार आहे?

रस्त्यावर उतरुन, मोर्चे काढुन, आणि गल्ल्यांमध्ये निषेधाचे फलक लाउन त्यांचे मतपरिवर्तन होईल असे मला तरी वाटत नाही....

आता जे आतंकवादी पकडले गेले आहेत ना, त्यांना मृतांच्या नातेवाईकांच्या हवाली करायला हवे....
सोलुन सोलुन मारायला हवे साल्यांना....

आणी जर कोणी मानवी हक्क आयोगवाले आले तर त्यांना विचारावे की जेव्हा हे आतंकवादी गोळ्या मारत फिरत होते तेव्हा त्यांना समजावयाला का गेले नाही म्हणुन????

Pages