मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय बोलावे कळत नाहि. मला तर.....

तूमच्यातिल कोनाला वाचनाचि आवड आहे का?? १ पूस्तक सुचवायचे होते.......

अगदि बरोबर.. सरळ या आतंकवाद्याना लोकांच्या हाती द्यावं काय करायचं त्यांच ते बरोबर लोक करतील.. काहि तुरुंग नको

अगदि बरोबर नील....................

योग,
आबा पाटलांना कालचा अधिकार्‍यांचा मृत्यू खूप मोठा शॉक देऊन गेला की काय????
==================

उठा बापू उठा आणि
द्या पुन्हा अंहीसेचे धडे
तुम्ही उभारल्या पोकळ भींतीना
जाउ लागलेत तडे
रक्ताळलेला हा शुभ्र पंचा
कुठवर मिरवत फिराल
वाटल नव्हत .. त्याच्या शस्त्रास्त्रांच्या ढिगार्‍यात
तुम्ही एक रिकाम काडतुस होउन उराल
अस का केल बापू तुम्ही?
घर झाडू पण दिल नाहीत
आता घर साफ कराव म्हणल
तर भीतींच उरल्या नाहीत
एक गोचिड चिरडवी म्हटल तर
तुमच महात्म्य आडव येत
आपलच रक्त बोटाला लागव
तर हीरव्यांना वावड होत
तुमची आधराला घ्यावी काठी
तर ते उगारली म्हणतात
ती हाणुन आमच्या पाठी
ते सदैव कण्हत असतात
तुम्ही येवढी सवय केलीत
दुसर्‍यांचा मार खायची
त्यांनी एक हात छाटला
तर दुसरा पुढे करायची
तुम्हाला नोटेवरती छापलय
तुम्ही सारं जग व्यापलय
पिसाळलेल कुत्र देखिल
गोंजाराव म्हणत आपलय
तुमच्या अंहीसेच्या कुर्‍हाडीला
अर्धमाचा दांडा
पित्यानेच का घालावा
पोराच्या म्स्तकी धोंडा?
उठा बापू उठा आणि
द्या पुन्हा अंहीसेचे धडे
आम्ही अंगाखांद्यावर खेळवतोय
तुमचे रक्तपिपासु किडे...

अतिरेक्यांनी ताजमधून आता गोळीबार केला, त्यामुळे एका बघ्याला गोळी लागली.
कार्यवाही सुरू असताना अशा उपटसुंभांना तिथे प्रवेश कसा दिला जातो?
कालसुद्धा एक इसम बिनदिक्कत आत जाऊन चित्रीकरण करून आला.

ताज व नरिमन हाऊस मुक्त .. लोकमत >>>>>>>>>>>>>

अजुन मुक्त झले नाही........... अफवा पसरवु नका म्हणुन सांगा लोकमत वाल्यांना

chinoox,
राजकीय पक्षच हवा असे नाही पणा कुठलीतरी संघटना तरी हवीच ना. नाहीतर काहीच पुढे जात नाही फक्त चर्चा होत रहाते. [याचे एक उदाहरण HG वर पण आहेच]

उद्या तु, मी, केदार, टोणगा असे काही लोक ठरवुन निघालो तर आहे का शक्य .. मला तरी नाही वाटत.

अरे बापरे आणि तारीख वेळ सुध्दा दिली आहे बातमीच्या खाली
२८ नोह ०८ ३.२९ ... अवघड आहे.

<<नाहीतर काहीच पुढे जात नाही फक्त चर्चा होत रहाते. [याचे एक उदाहरण HG वर पण आहेच<<>>

याचा रोख 'सुपंथ'कडे असेल तर आपला गैरसमज नसावा.
त्याबाबतीत आमचे काम सुरूच आहे.
त्यासंबंधी निवेदन लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर सोपअवण्यात आली होती.
माझी एक खूप जवळची मैत्रिण अद्याप बेपत्ता असल्याने त्याबाबतीत निवेदन लिहिण्याची मला इच्छा झाली नाही. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे. पण माझा नाईलाज आहे.

हा विषय अधिक वाढू नये, म्हणून इथे लिहीत आहे. विषयांतराबद्दल क्षमस्व.

चिनुक्स, असा चिडू नकोस..
अजुन शंभर एक लोकांना सोडायला पाहिजे तिथे. ते सगळे मेले की मग बाकीच्यांचे डोके जागे वर येईल..

माफ करा पण मला ह्याच्या शिवाय दुसरे काहीही सुचत नाही आहे..

जर पोलिस तिकडे अतिरेक्यांशी मारामारी करत असतील तर सामान्य माणसांना तिथून कुठेतरी लांब जावे इतकी साधी अक्कल कशी नाही...

आणि मिडियावाले पण असे योग्य इशारे द्यायच्या ऐवजी भलत्या सलत्या breaking news दाखवण्यात काय साध्य करुन घेतात...
==================

0454 PM: Heavy firing on the second floor of Taj Mahal hotel [Images]. The firing is going on in a corner room, facing the Gateway of India. It is learnt that a bystander way outside the hotel was also hurt in the cross-fire.

0450 PM: The commandos have been systematically attacking floors. A rocket-propelled grenade went off with a big bang and flash. For a while, there was fire on the other side of the building. Commandos are on the roof. They are also firing from the outside.

04:30 PM: Terrorists holed up inside the Nariman House are exchanging fire with NSG Commandos. The commandos are receiving fire from the ground floor and second floor of the building.

ibn वर आत्ता सांगितलं की लोक मुलाबाळांसहित 'गंमत' बघायला ताजच्या बाहेर गोळा झाले आहेत.
अतिरेक्यांनी आपल्याला मारावे, हीच आपली लायकी आहेत. इतक्या मूर्ख समाजाचे अजून काय होणार?

आरती, एखादा उपक्रम सुरु करणे इतकं सोपं नाहिये की आज पोस्ट टाकलं आणि उद्या देणग्या येणे सुरु, परवा मदत देणे सुरु. केदार, उपस, मराठमोळी अशी मायबोलीकर मंडळी उसगावात राहुन असं initiative घेतात त्याचं आपल्या सर्वांनाच कौतुक असलं पाहिजे. किमान असं नामोहरम तरी आपल्याच मायबोलीकरांनी करु नये ही किमान अपेक्षा..

ibn वर आत्ता सांगितलं की लोक मुलाबाळांसहित 'गंमत' बघायला ताजच्या बाहेर गोळा झाले आहेत.
अतिरेक्यांनी आपल्याला मारावे, हीच आपली लायकी आहेत. इतक्या मूर्ख समाजाचे अजून काय होणार?>>>
वा वा वा सुरेख.... चौपाटीवरची भेळ खायला आल्यासारखे जमलेले दिसतायेत सगळे.. खूप जोरात टाळ्या...

सकाळ मधे जो फोटो दिला आहे ना पत्रकारांचा तो पण असाच आहे.. सगळे जण एका लायनीत उभे आहेत काही बातमी मिळते का त्याच्या साठी...
==================

अरे बाबांनो कधी संपणार हे सगळं? झाले की तीन दिवस.... मला तर आपल्या कमांडो/पोलिस आणि इतर लोकांचीपण दया येतेय आतल्या लोकांबद्दल...

आणि आत्ता हा एन् डी टी व्ही वर पेपर्स वाचत वाचत, चुका करत बोलणारा कुमावत का कोण इंटर्नल सीक्युरिटीवाला बघितलात का? त्याला काय होतय ते पण माहित नाही असं दिसतय... असे लोक असतील तर हसणारच सगळे आपल्याला...

>>किमान असं नामोहरम तरी आपल्याच मायबोलीकरांनी करु नये ही किमान अपेक्षा..

अनुमोदन.

अरे चिनुक्स चिडतोस काय असा ... एक्तर मी 'सुपंथ' ला काही म्हंटलेले नाही. मी स्वता केदार च्य संपर्कात आहे. शिवाय 'आमचे' हा शब्द सुपंथ च्या बाबतीत योग्य नाही वाटत. ते नक्किच सगळ्यांनी मिळुन करण्याचे काम आहे. आणि त्याची तर अत्ता कुठे सुरवात आहे.

२ एक वर्षांपुर्वी झाडे लावण्याची एक मोहीम हातात घेतली होती. [इथेही मला कुणालाही दोष द्यायचा नाही ]

गैरसमज नको म्हणुन उदाहरण दिले नाही ..पण तो झालाच. असो.

जयस्वाल म्हणे की मेट्रो ची सुरक्षा वाढवणार आणि सागरी सुरक्षा पण वाढवणार... म्हणतात ना? "अब पछताके क्या फायदा? जब चिडियाँ चुघ गई खेत"

आत्तापर्यंत मुंबईला बसलेले असंख्य हादरे बास नव्हते का डोळ्यात झणझणीत अंजन घालायला?

शोकांतिका आहे ही... Sad

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

'सुपंथ' या विषयावर चर्चा योग्या त्या बाफवर करावी, ही विनंती.
मी माझं स्पष्टीकरण दिलं आहे. गैरसोयीबद्दल माफीसुद्धा मागितली आहे.

चिनूक्स कित्ति छान बोललास रे!!!!!!!!!!!!!!!!!

sarivina ...
माझे दुसरे post वाचलेस का बाई. मी ganeraly सुध्दा असे नामोहरम करत नाही कुणाला. तर इतके चांगले काम करणार्‍यांना कसे करेल.

तुम्ही लोक ना समजुन न घेता पडले तुटुन, अनुमोदन काय लगेच.

एखादा उपक्रम सुरु करणे इतकं सोपं नाहिये >> हेच मी chinoox ला समजाउन सांगत होते की संघटना असेल तर फायदा असतो.

असो.

इथे वाद नको आहे या गोष्टींवरुन खरतर. Itsme, तुम्हाला ते वाक्य लिहायची गरज नव्हतीच खरतर, आणि सरिविना म्हणाल्या ते मला पटले म्हणून मी अनुमोदन दर्शवले, काय चुकले? एनिवे, माझ्याकडून हा विषय संपला.

आबांचा तो विडीयो आता रेकॉर्डेद कुठे आहे का माहित नाही...live बघितल.
online प्रतिक्रीयांमधे एक फार डोळे उघडणारी प्रतिक्रीया होती..कदाचित टोकाची वाटेल पण कुठेतरी तत्थ्य आहे:
indian should realize thats it is not shining but facing its own civil war...

खरच, पोलिस मेले, कमांडो मेले, आम जनता मरतीये, शेतकरी मरतोय, कायदा सुव्यवस्था यावरून संपूर्ण उडालेला विश्वास, रोखठोक बोलू न शकणारा राष्ट्रप्रमुख, अन हिन्दू दहशत्वाद का इस्लामिक या चर्चेत गुंतलेलेली मिडीया.... अजून काही पुरावे हवेत का अंतर्गत बंडाळीचे..?? असो... विषय फार मोठा आहे तूर्तास त्या उरल्या सुरल्या अतीरेक्यांन्ना आता सम्पवा म्हणाव भले ताज उडवावा लागला, दोन जवान अधिक शहीद झाले किव्वा चार ओलिस मेले तरी चालतील... हे लिहाव लागतय, दुर्दैव!:(
पण जितके operation लांबेल तितके पुढचे सर्व अवघड होवून बसणार आहे आणि दहा अतीरेक्यांन्ना वेठीस आणायला तीन दिवस अन पाचशे चा फोर्स लागतो तिथे अक्ख्या भारतभर असे सुसूत्रीत हमले एकाच वेळी कुणि घडवून आणले तर? हा दुष्ट विचारच पाक, चिन सारख्या "टपलेल्या" राष्ट्रांसाठी मोठे कट करायला पुरेसा आहे... तशी वेळ न येवो... पण जे दिसतय ते फार फार चिंताजनक आहे...
शिवराज पाटील मर्द असाल अन झालेल्या गोष्टीची थोडि तरी शरम असेल तर राजिनामा द्या... अन्यथा अमेरीकेच्या intelligence cheif ने तुमच्या नाकर्तेपणाचे उघड उघड वाभाडे काढलेच आहेत..
केदार, या असल्या नेभळाटांना "you are fired" असे जनतेने म्हणायचा कायदा आहे का शोधशील का..? साला राजिनामा तरी कुणा कुणाचा मागयचा..? मंत्रालय अन संसद भवनात फक्त द्वारपाल उरतील बहुतेक, a democracy with no parliament...
satya,
भारी लिहीलय्स...

मोदींनी नाटकबाजी करून नयेः मुख्यमंत्री

खरच का ही वेळ आहे.

जोपर्यंत आपण हळहळ च व्यक्त करतोय तोपर्यंत आपण भेकडच .. >>> हे जास्त खर आहे

आरती Happy संपला विषय..

एटिएस नि जर कर्नल पुरोहित व प्रज्ञा ठाकुर याचा छळवाद करण्या पेक्षा थोडे लक्ष जर गुजरात पोलिसानि जे लिडस दिले होते त्या कडे
लक्ष दिले असते तर हि वेळ त्यांच्या वर आलि नसति.
पण यांचे आपले एकच तुणतुणे कि आज याचे नाव आले उद्या आणि कुणाचे. आता तरि कळले ना दहशत्वादि कोण म्हणुन.
मेलेल्या पोलिसात एक तरि मुस्लिम आहे का?
मुमबै कमिशनर एक मुसल्मान आहे हे लक्षात घ्यावे.(हसन गफुर)
असे असल्यावर स्फोट होणार नाहि तर आनखि काय होणार.

आता तरि एटोएस नि जिहाद्या वर लक्ष केन्द्रित करावे. व हिन्दु संत व सैन्य अधिकार्‍या ना छळु नये

हे पटतय का...:
लष्कर किव्वा फिदायीन दस्ते कधीच इतका वेळ engage ठेवत नाहीत...their mdoe of operation is to cause max impact/max damage in one shot including blowing themself up or the structure.. त्यांच्याकडे इतके शस्त्र वा rdx वगैरे असेल तर ताज, नरिमन वगैरे पूर्ण उध्वस्त करण्याचे काम ते कधिही करू शकतील.. but they have preferred the long battle.. why?
तीन दिवस हे जे छोट युद्ध(?) चालु आहे त्यावरून असा संशय येतोय की their task is to enagage the forces and buy time for something else... मला अजूनही हे एक diversion वाटते आहे.. सर्वांच मुख्ख्य लक्ष आत्ता इथे आहे... may be we should check whats happening around or accross LOC... Any incidents reported from there...? any link...?

योग,
सीमेवरील सैन्य आहे तिथेच आहे. काश्मीरात ब्लॅक कॅट्सचा वेगळा दस्ता आहे. भारतात इतरत्र त्यांचा वापर केला जात नाही.
मुंबईत आलेले सैन्य हे पुणे व जबलपूर येथून आलेले आहे.

Pages