मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अतिरेकी हल्ल्याच्या अनेक दिवस आधी मुंबईत आले होते. कुलाब्यातच घर भाड्याने घेऊन राहत होते. तीन दिवस आधी त्यांनी पन्नास हजार रुपयांचा सुका मेवा खरेदी केला होता. याचा अर्थ त्यांना स्थानिकांची मदत होतीच.

अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आपण मराठीच आहोत असं भासवण्यासाठी त्यांनी जुजबी मराठी शिकूनही घेतले असेल्..काय माहित.. किंवा ते स्थानिक रहिवासीही असू शकतील. दुसरीच शक्यता खरी असण्याचे चान्सेस जास्त आहेत.

---------------------------------------------------------------------------
आपण फक्त 'सलाम' ठोकायचे .. Sad

कुमार केतकर ला म्हणावे जरा विचार करुन अग्रलेख लिहा... केवळ सपादकीय मुळे सगळा पेपर अवाचनिय होतो... http://www.loksatta.com/daily/20081128/edt.htm

स्थानिकांच्या मदतीशिवाय यातलं काहीही शक्य नाहीये. दुवे मिळोत न मिळोत. स्थानिक मदत आहेच त्यांना हे उघड आहे.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सरळ शक्यता ही आहे की अतिरेक्यात स्थानिक आणि पाकीस्तानी दोघांचाही समावेश होता.
---- त्याला मराठी बोलता येत होते एव्हढेच. अतिरेक्यांची 'तयारी' बघितली तर त्यांना २५ वाक्य गुजराथी, मराठी, कानडी (उर्दु, ईंग्रजी, हिंदी येते हे गृहीत) शिकणे अवघड नाही.

आत्ता एक विचित्र बातमी ऐकली.
TOIची एक पत्रकार ताजमध्ये होती. काल स़काळपर्यंत ती चौथ्या मजल्यावर अडकून पडली होती. नंतर तिच्याशी संपर्क तुटला. आज तिचा फोन रायगडला ट्रेस झाला आहे.
ही पत्रकार दिल्लीहून मुंबईला एका लग्नासाठी आली होती. ती राहत असलेली खोली आगीत नष्ट झाली आहे. तिचा फोन आज मुंबईहून रायगडला कसा पोहोचला?

स्थानिकांनी मदत नकळत केली असणार, त्याना काय माहित हे कशा करता सामान घेतायत ते.....

चिनूक्स,
याचा अर्थ तिचा मोबाइल घेउन काही अतिरेकी जे पळाले ते रायगड कडे पळाले असणार. ती कदाचित अजून आतच अडकली असेल. किंवा तिला घेऊन ते पळाले असतील. २ हायजॅक केलेल्या गाड्या अजून मिसिंग आहेतच.
म्हणजे कोकणी मुस्लिम ही लिंक परत गडद झाली. that explains अतिरेक्यांचं मराठी बोलणं.
बर कुठे वाचलीस/ बघितलीस ही बातमी?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मोदी बोलतायत.... १ करोड जाहीर केलेयत मृत पोलीस्/आर्मी जवानांच्या घरच्यांनकरता...
१) मनमोहन सिंगाचे भाषण निराशाजनक झाले अस म्हणतायत
२) पाकिस्तान नी पिस अग्रीमेंट धाभ्यावर बसवले आहे अस स्पष्ट सांगितल...
चला कोणात तरी हिंम्मत आहे, अस म्हणणार होतो, पण काय ,हे ऑपोजिशन वाले आहेत त्या मुळे कितपत दम आहे काय माहित...

*

झकास , लिंक बद्द्ल धन्यवाद, नक्कीच पंजाबी मिश्रीत उर्दु आहे........

अरे काय आहे येवढ ह्या अतिरेक्यान कडे, एन एस जी चे डी जी उन्नीक्रिशनन शहीद झाल्याची बातमी आलीय...
एन एस जी ला पण टक्कर द्यायच्या लायकीची त्यांच्या कडे हत्यारे, सामग्री आहे? आणी अतिरेकी स्किलफुल आहेत की होस्टेजेस मुळे एने एस जी ला मागे सरकाव लागतय...

माणसा , धन्यवाद , माझा युध विशयक बी बी ची तुला आठवण झाली याचे मला समधान वाटले. ह्या आणि अशाच युध सद्रुश्य परिस्थितिला आपण किति सज्ज आहोत हे पडताळुन पाहावे हेच मला त्या बी बी वर सुचवायचे होते. असो.
आताची स्थिति हि युधच आहे. गड्यानो " तिसरे महयुध" हे पुस्तक आता तरि वाचा. हे सर्व आधीच " प्रेडिक्ट" केले गेलेय. आता भारतिय नेत्रुत्वाने खम्बीर तेने कठोर निर्णय घ्यायची वेळ आलिये हे खरे. सर्व शहिदांना माझे विनम्र अभिवादन.

मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद... अजून हे संपत नाही आहे.. Sad

एन एस जी ला पण टक्कर द्यायच्या लायकीची त्यांच्या कडे हत्यारे, सामग्री आहे?
---- त्यांच्या कडे Human Shields आहेत, NSG ना त्यांच्या पण जिवाची होता होईल तेव्हढी काळजी घ्यावी लागतेच.

आज सकाळी महात्मा महेश भट्ट यांनी दिलेली एक मुलाखत बघण्यात आली... त्यांचे मत आहे की 'हमे उनके दिल को समझना होगा की किस हालात मे उन्होने ये कदम उठाया है ' आहे की नाही गम्मत.. याला म्हणतात प्रेम

महेश भटला म्हणाव तु रहा ओलीस तुझ्या कुटुंबियांसमवेत!

खरचं गम्मत आहे या मोठ्या मोठ्या लोकांची. हसावं की रडावं कळतं नाही.

तरीच म्हणलं ही पिलावळ अजून बोलली कशी नाही... त्या भट्टोबा आणि अजून तसल्या सगळ्यांना द्या ओलिस म्हणून.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

आता तर सरळ सरळ "पाक सैन्यानी अतिरेक्याना ट्रेनींग दिल" अश्या बातम्या दिसतायत....
पण पैसे, लॉजेस्टीक्स सगळ लोकल अंडरवर्ल्डनी पुरवल...

'हमे उनके दिल को समझना होगा की किस हालात मे उन्होने ये कदम उठाया है ' Angry
---------------------------------------------------------------------------
आपण फक्त 'सलाम' ठोकायचे .. Sad

हो ना. ह्या महेश भट ला काहि अक्क्लल आहे कि नाहि ? शेकड्याने लोकांना मारणार्या अतिरेक्याच्या मन मे झाकने के लिये जिन्दा रहोगे क्या? असे कोणी विचारावे ह्या गाढवाला.

भूमिका,
मी वाचलं आहे 'तिसरे महायुद्ध'.
त्यावर चर्चा आपण इतरत्र करुयात. इथे त्या थोर पुस्तकाची चर्चा नको.
काय आहे, इथे माझ्यासारखी सामान्य, हतबल झालेली माणसं आहेत.
त्या पुस्तकात लिहिलं आहे की, बापू २०२५ साली आम्हाला तारणार. तोपर्यंत आम्ही जगतो की मरतो, हे कोणी पाहिलं आहे?
तेव्हा इथे फक्त 'मुंबईवरील अतिरेकी हल्ला' याच विषयावर कृपया चर्चा करावी, ही नम्र विनंती.

भुमिका, खरचं गं तुझा तो बीबी मला आठवला हे सर्व वाचताना. पण त्यावेळी तुझी जी टिंगल टवाळी झाली त्याबद्दल आता वैषम्य वाटतं आहे Sad

चिनूक्स, मी आत्ता हेच लिहायला आले होते. इथे बापूपुराण नकोय आत्ता. प्लीज..

_/\_

Aagau what I meant is Lang does not matter. Ttya lokat Marathi - amarathi Hindu Muslim konihee asu shakte.

ठिक आहे.

बी , अग हेच चित्र डोळ्या समोर होते जेव्हा मी तो बी बी उघडला होता. आताच पाहिले , कि कसे गोळ्या लागुन लोके तडफडत होते. रक्ताचा खच. बघवले नाहि. ज्यानी भोगलाय त्यांच्या मनाचा विचारहि करुन थरकाप होतो. विचार करा , तिथे तु किवा मी असतो तर ? काय केले असते? कसे वागलो असतो?

म्हणुन तयारी हवी. म्हणजे मनावर संयम ठेवुन योग्य निर्णय घेता येतो. गोळ्या चालु असताना टी वी वर पाहिले कि लोके उभे राहुन धावत आहेत. अश्या वेळी जमिनिवर झोपुन सरपटत लपण्याची जागा पहायची असते... ते काहिनि केलेहि आणि ज्यानी नाहि केले त्याना रक्त बंबाळ होतानाहि टी वी वर दाखवलाय लाईव. एन डी टी वी वर लाईव दाखव्त आहेत.

अजुन काहि अतिरेकि म्हणे सुटुन पळालेत आणि " ये तो ट्रेलर है... पिक्चर अभि बाकि है... " अशी धमकी दिलिये असे नुकतेच वाचले.

Pages