मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे संशयी मन पुन्हा पुन्हा सांगतय की हा सगळा प्रकार म्हणजे सुरक्षादलांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे, आणखीही काही होणे बाकी आहे.
.................................................................................................................................
सावध, रात्री वैर्‍यांच्या आहेत ! !

काही लेटेस्ट अपडेट?

पुन्हा आग लागली ताजच्या मागच्या बाजुला !
एक लक्षात घ्या एका बाजुला लक्ष वेधुन घेउन कदाचीत दुसर्‍या बाजुला काही मोठे षडयंत्र घडत असण्याची शक्यता आहे ! !
.................................................................................................................................
सावध रात्री वैर्‍याच्या आहेत !! ........... !

आयबीएन-लोकमतावरून कळलं की नरीमन हाउस येथे कारवाई सुरु आहे.
दरम्यान आज (कधीतरी दिवसभरात.. मला नेमकं माहीत नाही) ताज हॉटेलाच्या महाव्यवस्थापकांची पत्नी आणि मुलांना हल्लेखोरांनी उडवलं अशी बातमीही कळली.

केदारा, तिघे अधिकारी एका गाडीतून कसे काय गेले यावर बर्‍याच लोकांनी शंका व्यक्त केलीये. आयबीएन-लोकमतावरच्या चर्चेत राजापुराच्या खासदारांनी - कर्नल सुधीर सावंतांनी - हळूहळू तो रोख करकर्‍यांना उडवायचा कट असण्याकडे (संदर्भ - साध्वी प्रज्ञासिंह प्रकरण) वळवला. (मनातल्या मनातः कहर आहे म्हटलं.) उलट दिशेने सरकाराला खिंडीत पकडायचा असाच प्रयत्न अडवाणींनी माध्यमांना मुलाखती देताना केला. (यावरही मनातल्या मनात म्हटलं, यांनाही दंडवत!)
पोलिसांना राजकीय वेठीला बांधणे थांबेल का? मनात प्रश्न उठतो.

अजून एक धक्कादायक निष्कर्ष समोर येतोय - एटीस वगैरे विशेष पोलिसदलांनादेखील ओलिसाची प्रकरणं हाताळण्याचं व्यूहात्मक प्रशिक्षण नाहीये.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

ताजमध्ये अजून धुमश्चक्री सुरूच आहे.. आणि आग झपाट्याने पसरते आहे.. सर्व अतिरेकी मारले गेले, ही बातमी चुकीची होती.

तिघे जण एका गाडीत जाण्याचे कारण....... हल्ल्याची सुरुवात होती अन हे तिघे अश्या घटनांचे तज्ञ म्हणुन परिस्थितीचा अंदाज घेण्याचे काम चालु होते. कामा हॉस्पीटल च्या पार्किंग लॉट मध्ये ही घटना झाली. हॉस्पीटल मध्ये कोणी आढळले नाही म्हणुन हे तिघे लोक पुन्हा सीएसटी कडे जायला निघाले होते. पण तेंव्हा पार्किंग मधल्या लपलेल्या हल्लेखोरआंनी त्यांना गाठले.

त्यांचे मृतदेह तिथेच टाकुन गाडी घेउन हल्लेखोर ताज कडे पळुन गेले..... ती गाडी मग ताज बाहेर सापडली.....

माजिद मेमन, राम जेठ्मलानी इ आता तयारी करत असतील अतिरेक्याना वाचवण्याची, त्याना योग्य तो न्याय(?) मिळवुन देण्यासाठी.

माझे मत त्या अतिरेक्याना मुर्दाच पकडावे. एक अफझल गुरु आपल्यावर हसतोय तितका खुप झाला. तुम्हाला काय वाटते या पकडलेल्या अतिरेक्याना सोनिया गांधी मुलायम्सिंग यादव फाशी होउ देतील??

सर्व शहीद झालेल्या पोलिस आणि नागरीकांना आपल्या सर्वाकडुन श्रद्धांजली.

हो. ती सरव्यवस्थापकांची बातमी ईसकाळवर आहे.
तिथेच दुसर्‍या बातमीत असंही आहे की कामटे कामा रुग्णालयात शहीद झाले.

खरय आपल्या देशाची खास करुन मुंबईची अवस्था फारच वाईट आहे.
अशा कीती तारखा लक्षात ठेवायच्या हे खरच.
आताच समजल ताज मधील सगळे आतंकवादी मारले गेले.

केदारः
४-५ (कामाच्या) लोकांना पाठवायचा माझाही विचार आहे/ होता... कृपया तु ड्राफ्ट तयार कर. मी पुन्हा येई पर्यंत (आता मी ओ मधे आहे!) येथे पत्ते नाही दिसल्यास मी टाकेल. सर्व खासदारांचे, पंतप्रधान पत्ते लोकसभा डॉट कॉम वर आहेत. हे सर्व पत्ते जागेवरच रहाणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे चिवटीने पाठपुरावा करावा लागेल. या धाग्यातून निवडक, चांगले मुद्दे घ्यायला हरकत नसावी...

एकाच गाडीत ३ जण जाण्याच्या बद्दल --- प्रथम हे चुक वाटतेच. एक-एक हिरा जातो म्हणजे हळ हळ वाटणारच. त्यांच्या झालेल्या चुकांतून आपण शिकावे. जमिनीवरची परिस्थिती अशी असते की सारासार विचार करायला वेळही नसतो. आता एकच गाडी असेल आणि एकच व्यक्ती गेली असती तर "जिवाच्या भितीने मागे" असा शेराही मिळू शकतो. तुर्तास त्यांचा तसा निर्णय त्या वेळेला योग्य असतो... असेल त्या साधनांनी/ सामग्रींनी त्यांनी सामना करायचा प्रयत्न केला. सेवा बजावतांना गेलेत म्हणुन आदर, माझे शतशः प्रणाम. आपण अनमोल रत्न गमावले. पण आता निव्वळ गमावणे बस झाले...

या अतिरेक्यांनी ताज आणि ओबेरॉयमध्ये कंट्रोल रूम्स स्थापन केल्या होत्या. जबरदस्त तयारी होती त्यांची. आणि दूरचित्रवाहिन्यांनी अप्रत्यक्षपणे अतिरेक्यांना मदत केली. टिव्हीवरील कव्हरेज बघून अतिरेकी गोळीबार करत होते.

काळी चौकट लावावी मायबोलीला वर्षभर ! सुन्न, सुन्न झालंय मन सगळं वाचून.

किती दारु गोळा आहे (असावा) त्यांच्यकडे ? एव्हढा वेळ कसा तग धरु शकतात? मला हे प्रचंड मानसीक तयारी करवलेले, कडवे, सराईत कमांडोज वाटतात...

मला अजूनही शंका आहे: दुसरीकडे सिमापार अजून मोठा कट शिजतो आहे...किम्बहुना या हल्ल्यात आपल्याला गाफिल ठेवून दुसरे काहितरी मोठे करण्याचा डाव आहे. भारतातल्या इतर सर्व मुख्ख्य शहरातही रेड ऍलर्ट जारी करायला हवा.

दहशतवाद्यांची तयारी आपल्या तयारीपेक्षा १० पट चांगली असावी.मनमोहनला म्हणाव तुला काही जमत नाही तर उगच फाल्तु वाचन करुन इंटरव्यु देउ नकोस ,उगाच आमची चिडचिड होते.आज टाईम्स नाउ वरील चर्चेमध्ये पेज ३ कल्चरवाले लोक खुपच पेटले होते.च्यायला लोकलमध्ये,रस्त्यावर,मंदिरात बाँबस्फोत होत होते तेंव्हा हे लोक पार्ट्यांमध्ये दंग असायचे आता यांची उठबस असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेल्समधे हल्ला झाला तर लगेच साक्षात्कार झाला.
बाकी वरीष्ठ पोलिस अधिकारी ओव्हरकाँफिडंसमुळे तर मारले गेलेले नाहीत ना???

----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

चिन्या तूझी सिग्नेचर इथे फारच लागू होतेय.

इथे याहू वर पण दाखवतायत Siege at Indian Hotel Ends म्हणजे निदान तिथे तरी परिस्थिती आटोक्यात आली असावी...

काल पासुन जेंव्हा दहशतवादी हल्ल्याची बातमी वाचली तेंव्हापासुनच मन उद्विग्न होते. हेमंत करकरे, सालस्कर आणि कामटी याना वीरमरण आले या सर्व शहिद पोलिसाना, अधिकार्याना सलाम.

राजकारणापायी दहशतवाद कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी तो त्याचे खरे रुप वेळोवेळी दाखवणारच आता तरी बोटचेपे धोरण सरकारने सोडावे व कार्यवाही करावी, अजुन किती निरपराधांचे जीव घेणार?

खरे तर मायबोलीवर व काही वाहिन्यांवर हा दहशतवादी हल्ला केवळ "मुंबई वर अतिरेकी हल्ला" असले शिर्षक पाहुन अजुनच चीड आली. अरे तुम्ही का केवळ मुंबई घेउन बसलाय, हा हल्ला म्हणजे भारतावर हल्ला हे एक युद्धच आहे. त्याला केवळ एका प्रदेशापुरता म्हणुन गुंडाळण्यात अर्थ आहे का? अजुनही देशाच्या एका भागात झालेला हल्ला केवळ त्याच पुरता मर्यादित ठेवणार असाल तर उद्या तुमच्या आमच्यावरही वेळ येणारच. ईथे पुर्ण देशाचा विचार करणे आवश्यक आहे.

दहशतवादी ज्या सहजपणे पाटोपाठ ईतके हल्ले करु शकते यातच त्यांचा उद्देश सफल झालेला दिसतो.

केदार्,माझी सिग्नेचर या परीस्थितीत अगदी लागु होतेय पण शेवटची ओळ आहे 'खड्ग गळाले भुमिवरी' आणि दुर्दैवाने सध्या आमच्या देशातील जनतेकडे खड्गही नाही आणि ते उचलण्याची हिम्मतही नाही.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

हेमंत करकरे, सालस्कर श्री कामटी यांच्या मृत्युला मिडिया चॅनेल्स ही तितकेच जबाबदार असल्याचे वाचले. सतत त्यांना चॅनेलवर दाखवुन जणु काही त्यांच्या हालचाली, ठावठीकाणा सतत दाखवल्या गेल्या. अतिरेक्यानी याचा वापर करुन बरोबर त्यांच्या मानेवर, छातीवर नेम धरुन ठार केले, काही जण म्हणतात की ते ग्रेनेड मधे मारल्या गेले. तरी असले हिरे आपण गमावलेत हे खरे. मिडिया चॅनेल्सनी तरी अश्या प्रसंगी भान ठेवायला हवे. अगदी ते शिरस्त्राण व चिलखत घालुन जाताना दाखवले व त्यानंतर दोन मिनिटातच अतिरेक्यानी त्याना लक्ष्य केले.

आणि शेवटी काय तर सोडुन देतील ह्या अतिरेक्याना...किन्वा नीसट्तील हे लोक .....
मला नाहि वाटत ह्यन्च्या हाति एक्सुद्धा लाग्तोय ...

updates: ताज मधुन ३ अतिरेक्यांना अटक.

आता असं ऐकलं की तथाकथित व्ही आय पीज हॉटेलजवळ येऊन 'परिस्थीतीची पाहणी' करताहेत. त्यामुळे सुरक्षायंत्रणेवर आणखी ताण पडतोय. कशाला तडफडताहेत हे तीथे?

कॅमेरा आहे ना तिथे, म्हणून!

खरंच स्वाती!

थँक्स्गिव्हींगसाठी काही करण्याचा उत्साह उरला नाही. कंप्युटरसमोरून हलवत नाही. एकेक बातमी ऐकून, बघून आणखी सुन्न व्हायला होतंय.

"मुंबई वर अतिरेकी हल्ला" असले शिर्षक पाहुन अजुनच चीड आली.
---- शिर्षक मला योग्य वाटते. मला चिड आलीच तर अतिरेक्यांची आणि त्यांच्याविरुद्ध काहीही ठोस न करणार्‍या सरकारची. शरीराच्या एका भागावर आघात झाला आहे, म्हणजे बाकीच्याही भागाला यातना होतातच, हे पण तसेच आहे. व्यापक स्वरुपात हा हल्ला सबंध देशावरच हल्ला आहे आणि न केवळ मुंबई सिमीत. काल बीबीचे शिर्षक तयार करतांना समीर (किंवा आणखी कुणालाच) यांना त्याच्या व्याप्तीचा अंदाज नव्हता, पण तो तसा असणे निव्वळ अशक्य गोष्ट आहे. हा अंदाज तर १२ तासा नंतरही (अतिरेक्यांशिवाय) कुणाला होता?

तथाकथित व्ही आय पीज हॉटेलजवळ येऊन 'परिस्थीतीची पाहणी' करताहेत. त्यामुळे सुरक्षायंत्रणेवर आणखी ताण पडतोय. कशाला तडफडताहेत हे तीथे?
--- त्यांना सांगा कॅमेरा नाही आहे, त्रासच आहे यांचा... की ते त्यांच्या सुऱक्षेतून काही काळा साठी काढलेल्या NSG कमांडोजची परत यायची वाट बघत आहेत?

माननीय प्रधानमंत्री भाषणात काय म्हणाले ? लोखंडी हाताने सामना करणार अशी काही भाषा होती कां?

स्वतंत्र भारतातल्या सुजाण नागरीका
ऐकतो आहेस ना रे बाबा
स्फोट आणि किंकाळ्यांचे आवाज
पण तू घाबरू नकोस
दोन परावलीचे शब्द लक्षात ठेव
निषेध आणि श्रद्धांजली
हे दोन शब्द तूला वारंवार वापरायचेत
तू हळहळ विस्फोटात जखमी झालेल्यांसाठी
मग निषेध कर तूझ्या स्वातंत्र्यावरच्या भ्याड हल्ल्यांचा
तू अश्रू ढाळ शहीद झालेल्यांसाठी
आणि मग जरा याद करो कुर्बानी म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहा
मग पून्हा झोपी जा पूढच्या हल्ल्यापर्यंत
कुणास ठाऊक पूढचा हल्ला तूझ्या वरच असेल
मग ह्याही हल्ल्याचा कुणीतरी निषेध करेल
तुलाही कुणीतरी श्रद्धांजली वाहेल Sad

ओबेरॉय हॉटेलमधे पकडलेला अतिरेकी बहुधा पाकिस्तानी - फरीदकोट इथला असल्याचं TOI मधे आलंय.

आणि न्यूज चॅनल्सच्या अतिउत्साहाचा परिणाम करकरेंना भोगावा लागला असं IBN वर ऐकलं.

from a mumbai blogger http://arunshanbhag.com/

http://twitter.com/arunshanbhag

this one is also good http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/7752003.stm

I called few of my friends in Pune who have their families in Mumbai, and they are watching movies. This is unbelievable.
And as usual, the stupid people standing outside hotel were showing their desperateness by attacking the female CNN reporter.

(one of the online comment)
"watching an indian massacre on thanksgiving evening is so three centuries ago"

Pages