मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता गांधीजींनी काय केलं आणि आपण सगळे एकत्र येऊन काय काय करू शकतो याच्या जाहीराती झळकतायंत आयबीएन लोकमत वर. प्राऊड टू बी इंडीयन?? Sad

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आतातरि एटिएस ला कळले असेल कि खरे.दहशत वादि कोण ते?
शेवटि हिन्दु आणि सैन्य च मदतिला आले ना?
हिन्दु व सैन्य हे पोलिसांचे नैसर्गिक मित्र आहेत?
जेहादि नाहित?

गांधिजि च्या मुळे तर हि समस्या निर्माण झालि.
तेव्हा गांधिजि काय करणार.

या आत्मघाति दहशत्वाद्या समोर
सत्याग्रह करुन चालणार नाहि.

नरिमन हाउस वर हल्ला केला ( कारण तेथे ज्यु राहतात)
हि महिति दहशत्वाद्याना इथल्या स्थानिक मुस्लिमानि दिलि असे पोलिस सुत्रांचि माहिति आहे.

एकूण २६ अतिरेकी मुंबईत आले. २० बोटीने आणि ६ विमानाने.
ती बोट सापडली आहे. त्यात शीर नसलेले २ मृतदेह सापडले आहेत. 'कुबेर' हे त्या बोटीचे नाव आहे. पोरबंदरहून ही बोट १३ तारखेला निघाली होती. अतिरेक्यांनी ही बोट पळवली असावी.
.
ओबेरॉय आणि ताजला अजूनही गोळीबार सुरू आहे.

अजूनही नाही का ह्या अतिरेक्यांना मारु शकलेत? किती वेळ अजून?

अजून ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाऊस या तिन्ही ठिकाणी चकमकी सुरू आहेत. ओबेरॉयला आणि नरिमन हाऊसला बरेच ओलीस आहेत.

काही नविन अपडेट्स मिळु शकतील का ?
आजुनही चकमक चालुच आहे का?

मी काही या विषयातला जाणकार नाही... पण जरा जास्तच वेळ लगत आहे.
कन्दहार विमान अपहरणामधेपण असाच वेळकाढुपणा केला... आणि अम्रुतसरला उतरलेल विमान जाउ दिल... तरी नशिब आता कोणाला तुरुन्गातुन सोडणार नाहित (बहुतेक).

१९९३ ला एअर इंडिया बिल्डिंग मध्ये जो बाँबस्फोट झाला तेव्हा मी तिथेच शेजारी एक्सप्रेस टॉवरला होते. माझ्या नोकरीचा पहिला दिवस होता तो. स्फोटाने आमची बिल्डिंग तर हादरलीच पण १९व्या मजल्याच्या काचाही फुटल्या. पटापट एलिव्हेटर्स बंद करण्यात आले. सगळी जनता नरिमन पॉईंटहून चर्चगेट आणि व्हि.टी स्टेशनला चालत जात होती. त्यावेळी हा प्रकार नवीनच होता त्यामुळे कुणालाच काही कल्पना नव्हती की काय चाललं आहे.आत्तासारखेच ४,५ मिनीटांच्या अंतराने ६,७ जागी स्फोट झाले होते तेव्हाही.

NSG commandos मुंबईत यायला वेळ लागला, हे खरं.
पण अशा कार्यवाहीत नागरिकांचा जीव वाचवणं हे महत्त्वाचं असतं. आपण घरात बसून भाष्य करणं योग्य नाही. सैन्य आणि nsg कर्तव्यात कसूर करणार नाही, याची आपण खात्री बाळगू शकतो.
अतिरेक्यांकडे बराच दारुगोळा आहे. ते कुठे लपून बसले आहेत, याचा पत्ता नाही.
त्यामुळे वेळ लागू शकतो.
.
ताजी बातमी : ओबेरॉयला २ अतिरेकी ठार केले. आत अजून ४० लोक अडकले आहेत. नरिमन हाऊसची परिस्थिती जैसे थे.

NSG commandos मुंबईत यायला वेळ लागला, हिच मोठी चूक आहे. इ़कॉनॉमीक कॅपीटल ऑफ इंडीया इथे nsg, ats, raf, अशी सर्व पथक, सर्वकाळ ( २४ x ७) सज्ज असायला पाहीजेत. मुंबई वर हमले होतात / होतील हे शेंबड्या पोरालाही कळतयं. मग सज्ज का नको? पोलीस, यंत्रना काम करत आहे याबद्दल त्यांचाबद्दल आदर आहेच पण ती व्यवस्तिथ का कार्यरत झाली नाही हा प्रश्न लोकांनी विचारायला पाहीजेच.

घरात बसुन भाष्य करने योग्य नाहीच पण काही मिनीमम गोष्टी, त्याच पध्दतीने व्हायला पाहीजेत. मिडीयावर दाखवले तसे रस्तावर येऊन हेल्मेट घालने, जॅकेटस घालने, संगीनी तयार करने ( मॅगझिन्स बंदूकीत घालने) हे फक्त प्रसिद्धी लोलूप लोकच, नाहीतर मुर्ख करतात, हे ऑफीसर्सला कळू नये का? हे झटझट झाले पाहीजे. गाडी चालवताना आपण ब्रेक मारतो तसे.

आणि गुजरात पोलीसांनी आठवड्याभरापुर्वी खबर दिली होती म्हणतात, मग तरी सुध्दा दुर्लक्ष का केले ?? लगेचच security वाढवायला हवी होती संपुर्ण मुंबईत

केदारच्या वरच्या पोस्ट ला पुर्ण अनुमोदन २४ x ७ तयारीतच हवे, मुंबई हे प्रथम पसंतीचे टार्गेट आहे. रात्र तसेच दिवस दोन्ही वैर्‍याचीच आहे. हल्ला झाल्यावर नंतर NSG गोळा करणे म्हणजे 'तहान लागली आणि विहीर खोदली' असा होतो.

NSG मुंबईत (जे नं १ चे टार्गेट आहे) तयार नसतात तर मग असतात कुठे ? सर्व लोक दिल्लीच्या high profile लोकांच्या रक्षणात व्यस्त असतात कां? आता या क्षणी ते high profile लोकं संरक्षणा विना कसे जगत असतील?

गुजरात पोलीसांनी आठवड्याभरापुर्वी खबर दिली होती म्हणतात
---- या खबर देण्याला काही अर्थ असतो कां? दिवसातून हजारो अत्यंत ठोबळ इशारे मिळातात, फिल्टर कसे करणार? 'मुंबईत हल्ले होणार हे आम्ही आधी सांगितलेच होते ' हा आता विनोद वाटतो... , ते सांगण्यासाठी IB च्या अधिकार्‍याची (कधी गृह सचिव) अवशक्ता नाही.

पकडलेल्या अतिरेक्यांना भर चौकात जिवंत जाळा...
किंवा ठेचून मारा...
किंवा स्पीड ब्रेकर च्या जागी रस्त्यात ठोका... आणि वरनं गाड्या जाऊद्यात....

जर कोणी मानव हक्क वाले त्यांना वाचवायला पुढे झाले तर त्यांना अतिरेक्यांचे साथिदार समजून जागेवरच गोळ्या घाला...
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!

मला माहीती कायद्या अंतर्गत एक पत्र राज्य व एक केंद्र सरकारला पाठवायाचे आहे. पण त्याचा पत्ता माहीती नाही. नेट वर शोधले पण प्रकाश पडला नाही.
कोणाला तो माहीती आहे का? प्लिज इथे द्याल का?

इतक्या प्रतिक्रीया मनापासुन आल्या आहेत सगळ्यांच्या कि आता जाणवतय हे दहशतवादाचा प्रश्न आता घराघरापर्यन्त पोचलाय. फक्त निषेध व्यक्त करण्यापेक्षा काहीतरी करायला पाहीजे ही तळमळ सगळ्यांना आहे.
.
या हल्ल्याच सगळ्यात मोठ नुकसान म्हणजे आपले दिग्गज पोलीस ऑफिसर मारले गेले. त्यांची हानी भरुन न येणारीच आहे.
माझा मावसभाउ मिलीट्रीत होता. कारगिलच्या वेळेस तिथेच बॉर्डर वर होता. हे लोक थंडीपावसात देशाच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालुन उभे असतात. प्रत्यक्क्षात जरी युद्ध नसल तरी युद्धसदृश परिस्थीती आपल्या बॉर्डरवर कायम असते. तो म्हणायचा कि सैन्यात आणि पोलिस खात्यात येणारा व्यक्ती फक्त पैशासाठी म्हणुन काम करायला येत नाही त्यातही एवढा जीवावर उदार व्हायचा जॉब करायच कारण फक्त पैसा हे कधीच नसत. खुप उदात्त ध्येय, निष्ठा लागते असली काम करायला. ती वर्दी चढवायच्या पुर्वतयारीतच अतोनात कष्ट आहेत. पण आपल्या नालायक राजकारण्यांनी फक्त पोलीसांच्याच नाही तर मिलीट्रीतल्या लोकांनाही स्वताच्या तालावर नाचायला लावलय. कितीतरी असे अतिरेकी आहेत ज्यांना पकडण्यासाठी जीवाच रान केल त्यांना वरुन ऑर्डर आली म्हणुन सोडुन द्याव लागलय. आणि खर्या माहीती सगळ्या बाहेर येत नाहीत, राजकारण्यांना सोयीच्या तेवढ्या बाहेर पडतात. आत्ता झालेल्या हल्ल्यात सुद्धा मारल्या गेलेल्यांचा प्रत्यक्ष आकडा वेगळाच आहे.
.
पोलीस खात्यात काम करणारा व्यक्ती कुठलीही गोष्ट वरुन ऑर्डर आल्याशिवाय करत नाही त्यामुळे त्यांनी केलेल जरी काहींना दोन दिवसापर्यन्त चुक वाटत असल तरी ते हुकमाचे ताबेदार आहेत. ड्युटी करण एवढच त्यांना माहीत आहे भले ते त्यांच्या मनाला पटो न पटो. या राजकारण्यांना सरळ करा म्हणजे सगळेच प्रश्न सुटतील.
हिंदु माणुस भेकड नक्कीच नाही पण चांगल्या नेतृत्वाच्या अभावामुळे काहीही करु शकत नाही. हिंदु माणसाची अस्मिता जागृत करायला आज टिळकांसारख्या प्रभावी लेखणीची आणि सावरकरांसारख्या ध्ययवादी लोकांना एकत्र आणुन संघटना चालवु शकणार्या नेत्याची गरज आहे. पुन्हा एखादा शिवबा तयार होइल काय?

राजकिय इच्छाशक्तीचा अभाव असे पर्यंत हे असेच चालत राहणार. प्रत्येक पक्षाचा डोळा मतपेटीकडे. विरोधी पक्षात असताना बाता मारणारे कंदहार प्रकरणात कसे वागतात ते सर्वानाच माहिती आहे. प्रत्येक हल्ल्यात पाकिस्तानचे नाव पुढे येते तरीही आम्हाला मात्र "समझोता" एक्सप्रेस चालु करायची असते. कोणत्याही राजकिय पक्षाला हा प्रश्न सोडवण्यात काडिचाही रस नसावा आणि त्यामुळे सत्ताधारी बदलुन फरक पडेल यावर माझा विश्वास नाही.
त्यामुळे आपण या हल्ल्याचा धिक्कार करुया, शहिदाना श्रध्दांजली वाहुया, पुढार्‍याना लाखोली वाहुया डोक्यावरुन पाणी म्हणजे फारतर येक कर्तव्य म्हणुन रक्तदान करुन येउया..

ताजमधले ५ अतिरेकी एन एस जीच्या कमांडोंनी यमसदनास पाठवले असे ऐकले, खरे का?? खरे असेल तर उत्तम झाले!

अरे या मनमोहन, पिल्लवळीला उचला रे...
याही परिस्थीतीत याना electronic reader वापरून देशाला संदेश द्यावा लागतो? याच्या कुठल्या एका तरी वाक्याला मुम्बैतले एखादे शेम्बडे पोर तरी घाबरेल का रे...?
911 च्या वेळी बुश ने दिलेले भाषण (भाषण कसली आग ओकला तो अन नन्तर आगीचे नुसते लोळ उठवले साता समुद्रापार) अन आज आम्च्या पंतप्रधानांनी केलेले भाषण... NDTV वार्ताहार परवडले..
अशोक कामट्यांच्या अग्नीदहनाचा प्रसंग फारच हृदयद्रावक होता त्यान्च्या लहान मुलाने या वयात बापाला मुखाग्नी देणे आणि अवघे पोलिस दल जमलेले. खर तर आम्चा बान्ध तेव्हाच फुटला जेव्हा त्यान्ना guard of honor दिला गेला. त्या बिगूलाचे सूर सर्व गोठलेल्या संवेदना चराचरा कापत गेले...
मनमोहन चाचा, आता xx मधे घुसा अन तुमच्या आम्च्या सर्व गेल्या अन येणार्‍या पिढ्यांचा उद्धार करा, निदान तुमच्या पश्चात एक तरी पुतळा असा भारतात राहू दे ज्यावर कावळा बसला तरी वंदन करायला बसेल शिटायला नाही..
जय हींद!!!!
ता.क.: पाकिस्तान वरून अतीरेक्यांच्या मोबाईल वर सतत फोने येत होते आणि मुम्बै पोलिसान्नी तो मोबाईल हस्तगत केला आहे अशी नुकतीच खबर आली आहे...पाकिस्तान पुन्हा एकदा मोठ्या हल्ल्याची तयारी करत असला तर नवल वाटायला नको.... मंडळी तयार रहा... येणारे दिवस बरच काही घेवून येणार आहेत. निदान आता तरी आपलि घाण आपण साफ करतो का अमेरीकेचा toilet paper वापरतो हे कळून चुकेल..

शालिनीताई,

किमान आता तरी धडा शिकून तुम्ही अफझल गुरुला माफी देणार नाहीत अशी आम्ही अाम्ही आशा करतो. साऱ्या जगाचं लक्ष तुमच्या कडे लागलं आहे. आमच्या पोलिसांना आपले प्राण गमवून अतिरेक्यांना पकडायचं आणि राजकीय कारणासाठी तुम्ही त्यांना माफ करायचं हे आता चालणार नाही.

आज खरंच इंदिरा गांधी पंतप्रधान असायला हव्या होत्या. त्यांनी लगेच अफझलला फाशीवर चढवला असता. आजच्या राजकारण्यात तेवढी धमक नाही.

अरे त्या IBN लोकमत वरच्या अमित मोडक ला हाकला...
काय तोतर्‍या आणि मोडक्या भाषेत बोलतोय तो...
'दहशतवाद्यांच्या हातात बंदूक्स होत्या....'

म्हणा पंतप्रधानच जिथे मिळमिळीत बोलतात तिथे यांचं काय...

बाकी... ताज मधे अजून अतिरेकी आहेतच...

_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!

>> या हल्ल्याच सगळ्यात मोठ नुकसान म्हणजे आपले दिग्गज पोलीस ऑफिसर मारले गेले.
खरच हे फार मोठे नुकसान आहे... आपले (!) नेते मेले आसते (काही अपवाद वगळता) तर कही वाटल नसत... त्या नेत्यान्ची जागा घ्यायला बरेच जण मिळतील... पण या पोलीस ऑफिसर ची जागा कशी भरून निघणार?!!

>> हिंदु माणुस भेकड नक्कीच नाही पण चांगल्या नेतृत्वाच्या अभावामुळे काहीही करु शकत नाही
आपल्या गीतेतच सान्गितले आहे, 'यदा यदा हि धर्मस्य...'... त्यामुळे आपण वाट पाहू....

ताज, ओबेरॉय मध्ये ठिक आहे, जास्त होस्टेजेस आहेत, नरिमन हाऊसची काय भानगड आहे, तिथे तर एन एस जी पण दिसत नाहीयेत, फक्त जास्त आर्म्ड पोलीस दिसतायत... नरिमन हाऊस तर ईतक मोठ पण नाहीये.. याचा शेवट होता होता काय काय होणार आहे काय माहीत.....

मी जे इतक्या वेळ लिहीतोय की ज्या रितीने मेले ती चूक त्या बद्दल आता लोक आय बि एन वर बोलत आहेत. तिघे मोठे लोक एका गाडीत जातात हे नक्कीच चुक ह्याचा शोध घ्यायला हवा. पण तो घेतला जाणार नाही.

मनमोहन भेदरलेले दिसत होते. त्या आबा सारखे. हे आपले लिडर्स.

नमस्कार मंडळी,

हा मुंबई वर झालेला हल्ला !!!!!!! अत्यंत वाईट घटना .....

शहीद करकरे, साळसकर ,कामटे यांना माझा सलाम,

मराठी माणसाचे सांडलेल रक्त वाया जाता कामा नये ही आपल्या सर्वांची
जबाबदारी आहे.

जय महाराष्ट्र

नमस्कार मंडळी,

हा मुंबई वर झालेला हल्ला !!!!!!! अत्यंत वाईट घटना .....

शहीद करकरे, साळसकर ,कामटे यांना माझा सलाम,

मराठी माणसाचे सांडलेल रक्त वाया जाता कामा नये ही आपल्या सर्वांची
जबाबदारी आहे.

जय महाराष्ट्र

तेच आत्ता ऐकलं. खरंच इतका प्रचंड अनुभवी माणुस अशी कृती कसं काय करून बसला असेल?
पोलीस दलाबद्दल जे काय बोलताहेत ते पण खूप पटण्यासारखं आहे.

आय्.बी.एन्.लोकमत वरील चर्चा आपल्या चर्चे सारखिच चालू आहे...
ते देखिल म्हणतात ...सगळे राजकारणी चोर आहेत.

म्हणूनच मी बातम्या बघण कधिच सोडल होत...
-------------------------------------------------
~ भारत कधी कधी माझा देश आहे...

Pages