पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची त्याला आमच्याइथे स्क्वॉश म्हणतात. शिजायला जरा वेळ लागतो. साल काढून चौकोनी तुकडे करून कुकरमधे वाफवून घे आणि बटाटा घालून (किंवा तसाचही) रस्सा कर... आम्ही एवढी एकच रेसिपी करतो. रश्शात वेगवेगळ्या फोडण्या/मसाले वापरून बघता येईल

प्राची ,
हिरवे अन घट्ट बघून घे. दुधी प्रमाणे भाजी करता येईल, सांबारात / आमटीत घालता येईल,
गोल पातळसर चकत्या करुन हळद तिखट मीठ लावून काप करा येतील .

mala "palak kabab" chi receipe havi aahe ... mala "search" Karun nahi milat aahe ... may be Marathi type karat yet nahi aahe tyamule asel ....

बराच वेळ झाला मी चिकन च्या सोप्या रेसिपिज शोधते आहे. फार किचकट प्रकार हाताला लागतात आहेत. मध्यंतरी बर्याच सोप्या वाटणार्या रेसिपिज आल्या होत्या इथे. कुणाला शक्य झाल्यास काही पॉईंटर्स मिळ्तील का?

नविना चिकनच्या सोप्या रेसिपिज साठी तुला आवडणार्या पद्धतीचा मसाला जसे चिकन कोल्हापुरी, चिकन हैद्राबादी वगैरे जे काय असेल त्या गावच्या नावाचा आणि त्या पॅकेट्वरचे instructions follow करायचे. झटपट चिकन बनतं आणि असे दोन पाच मसाले ट्राय केलेस की आपलं आपल्याला काय आवडलं हे कळलं की मसाला/ले फायनल करायचे. Light 1
इथे सायोने कॉस्टकोमध्ये वगैरे मिळणार्या ग्रेव्हीची एक पद्धत लिहिली होती. ती शोधुन बघ. Happy

मैत्रिणीने खुप आंबे दिलेत तिच्या गावाकडचे आता खाऊन खाऊन पण कंटाळा आला आहे. जर रस काढून फ्रीजर मध्ये ठेवला तर किती दिवस टिकेल काळा न पडता, मुरंबा वैगेरे जास्त साखर असलेले पदार्थ नको वाटतात . अजुन काय काय करता येइल ?

आसना तुला खोटं वाटेल काही वर्षांपुर्वी माझ्या ताईने साधारण अशाच वेळ्च्या आंब्याचा कापा फ्रीज करून आमच्या सप्टेंबरच्या मायदेशवारीत खाऊ घातले होते. अर्थात तू भारनियमन वगैरे वाल्या भागात असशील तर कठीण आहे पण विचार कर..

तुझ्या प्रश्नाच्या निमित्ताने मला उगाच भरून बिरून आलंय Happy

@वेका काप करुन ठेवते थोडे, @ नीधप रस काढून साखर न घालता ठेवायचा ना ?
@ सोनाली आंबा पोळी आता काही जमणार नाही ग , @ येळेकर, थोडा रस साखर घालून आटवूनही ठेवीन. चला आता लवकरच सगळे खपतील (आंबे) .....आभार्स

पुदिना नुसताच मिरची-कोथिंबिरीबरोबर वाटायचा. डाळं असेल तर वापरता येईल.

कोथिंबीर नाहीये. Sad इकडे दुर्मिळ आहे कोथिंबीर. Sad
पुदिना भरपूर आहे. Uhoh
डाळं मिळतंय का बघते.

प्राची- पुदीना, मिर्ची, लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो अशी करुन बघ चटणी. पुदीना सोडून बाकी सगळं तव्यावर शेकवून घे. टोमॅटो अगदी लहानसा. आवडत नसेल तर लिंबू पिळ नुसतंच.

कच्चा बटाटा किंवा सफरचंद वापरतात असं ऐकलं आहे. सावलीने तिच्या नाचणी इडलीवर आक्रोडाची चटणी लिहिली आहे.

ओले खोबरे आणि कोथिंबीर नसताना पुदिन्याची चटणी कशी करायची?<<< मी पुदिना+आले+लसूण आणि हिरवी मिरची एवढं वाटून घेते. नंतर लिंबू मीठ आणि थोडी साखर. कढीपत्त्याचं एक टहाळ.. कोथिंबीर नसल्याने थोडी सरसरीत राहते ही चटणी. आमच्याकडे पण सध्या कोथिंबीर दुर्मिळ.

Pages