पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोड नको!! डबाभर गाईच्या दुधाच्या सायीचे गोड पदार्थ करतीये आठवडाभर! तिखट हवाय!! मिनी पिझ्झा बघते! अजून पण सांगा सुगरणींनो!

ब्रेडचे चे पकोडे ? ब्रेड्चे स्लाईस तिरके कापून पिठात बुडवून तव्यावर शॅलोफ्राय करायचे. मस्त लागतात Happy

थँक्स प्राची मृणाल. साबा साबुंना चीज नाही आवडत त्यामुळे चीज चिली टोस्ट/पिझ्झा नाही करता येणार!फारच फिल्टर्स आहेत माझे!.. आखूड शिंगी,बहुदुधी... टाईप्स!!

धन्स अकु! पण मी मायबोली च्या सर्च विंडो मध्ये ब्रेड टाकून मिळालेल्या सगळ्या रेसिपीज पाहिल्या आणि मग इथे प्रश्न टाकला! Happy

मंजूडी, रेसिपी छान आहे,माझा नवरा स्वतः करून खाईल नॉनव्हेज म्हटल्यावर...मी एगीटेरीयन आहे पण साबा नाही खात अंडे आणि चीज. मला बहुतेक आता टोस्ट सँडविच चाच पर्याय दिसतोय माझे सगळे क्रायटेरिया बघता..

ब्रोकली वापरुन (अगदी कच्ची नको, थोडी परतलेली किंवा ग्रील केलेली) चीझ आणि मेयॉनीज शिवाय एखादं सलाड सुचवाल का?

Gayatri,

first check how stale the bread is. there is a best by date for any commercially produced bread. Beyond that it is not safe to use.
If over date and smelling please dispose off the bread otherwise seniors may get stomach infection.

फ्रिझमध्ये ठेऊन हवे तेव्हा दूध साखर/ दही साखर घालुन.( एका दिवसात सम्पणार असतील तर) पण जास्त वेळ रहाणार नाहीत फ्रिझमध्ये

पोहे पॅटिस, पोह्याची उकड ( नानबा)

पोहे घालून मिक्स भाज्यांचे कटलेट, दही पोहे, गोपाळकाला (लोणच्याचा खार घालून) इ. इ.
इथे प्राचीने सुरु केलेला पोहे फॅन क्लब आहे, त्यावर अनेक रेसिपीज मिळतील
http://www.maayboli.com/node/46458

काल मला इथल्या सूपरमार्केट्मध्ये Onion powder, Garlic powder/chunks, Tomato powder हे प्रकार दिसले छोट्या हर्ब्सच्या बाटल्यांमध्ये. हे कशांत वापरता येते? कसे वापरायचे? विकत घेऊन आता संपवायच कसं? असं नको म्हणून चौकशी.

वरती गा.गुजराथी साठि.. ब्रेड आण उकडलेले बटाटे एकत्र मिसळून त्यात आवडिप्रमाणे तिखट मिठ ंमिशळुन लाटुन पराठे करता येतात..

Onion powder, Garlic powder/chunks, Tomato powder > जसे नॉर्मल घटक वापरतो तसेच वापरायचे बहुतेक. पण वाळवलेल्या पावडरी बर्‍यापैकी स्ट्राँग असतील...

गोळवणी नावाचा पदार्थ कसा करतात? एकदा `आम्ही सारे खवय्ये' मधे वीणा जामकर ने दाखवला होता. आता तो सर्च करता येत नाहीये.

अमूल फ्रेश क्रीमचे दोन टेट्रा पॅक घरात आहेत. मी महिनाभर घरात नसल्याने त्याचे काही टिकाऊ पदार्थात रूपांतरण करता येईल का? काहीच जमलं नाहीतर पॅक तसेच ठेवून जाईन. आल्यावर मग बघू.

Pages