पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मवा, मखाणे डायरेक्ट परतायचे. कधीकधी काळी सालं असतात त्याला अधूनमधून. ती काढून घ्यायची आधी.

उकडलेले अंडे एक-दीड दिवस फ्रिजमध्ये ठेवले आहे. टप्परवेअरच्या डब्यात. सोलून ठेवते. त्यापेक्षा जास्त राहते का ह्याची कल्पना नाही.

हो, फेटलेले अंडेही फ्रिजमध्ये राहते पण तेही एक दिवसाच्या वर ठेवलेले नाही. वापरताना परत हलकेच फेटायचे थोडे.

ज्ञाती, नानबाने दिलीय अ‍ॅस्परॅगसच्या भाजीची अगदी मराठमोठी पद्धत. ह्यातली दुसरी कृती बघ.फार सुंदर भाजी होते त्या पद्धतीने Happy

ओके प्राची, अगो.
हो अगो ती काळी सालं दिसली म्हणूनच विचारलं.
अरे वा, एक दिवस खूप झाला की. कधी उरले तर ठेवता येईल मग.
थँक्स सगळ्या उत्तरांसाठी. :).

_प्राची_, तुमचा प्रश्न बेत काय करावा वर हवा ना?
इंदूरच्या मराठी खाद्य जत्रेत अमराठी लोक पुरणपोळ्यांसाठी रांगा लावताना दिसले होते.
तुमच्या यादीत, मिसळ सोडली तर बाकीचे पदार्थ अस्सल किंवा निव्वळ महाराष्ट्रीय नाहीत.
इंदूरच्या मराठी खाद्य जत्रेत अमराठी लोक पुरणपोळ्यांसाठी रांगा लावताना दिसले होते.
कोथिंबीर वडी, झुणका भाकर, बटाटावडा, थालिपीठ, भेळ असे पदार्थ सुचले.

_प्राची_ यांनी अस्सल मराठी पदार्थच हवेत असं कुठे लिहिलंय? 'करायला सोपे' आणि अमराठी लोक खाऊ शकतील असे पदार्थ हवे आहेत.

_प्राची_, दहीवडे/ ढोकळा/ साबुदाण्याची खिचडी (साबुदाणा मिळत असेल तर) हे पदार्थ आधी करून ठेवता येतील. दाबेलीचं सारण आधी करून ठेवलंत तर मागणीप्रमाणे स्टॉलवर तयार करून देता येईल. वडापाव हाही मस्त पर्याय आहे. गोड शिराही अमराठी लोक आवडीने खातात. मावेमधे गरम करून तर फारच सुंदर लागतो.

युपीमध्ये रहात असाल तर भेळ, बटाटावडा, साबुदाणा वडा, पाव भाजी हे पदार्थ आवडतिल.

उत्तर भारतियांना सहसा श्रीखंड आवडत नाही. माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये कधीच कोणी श्रीखंड खाल्लं नाहीये आवडीने. मिसळ पण आवडेलच याची गॅरंटी नाही (मोडाची कडधान्यं - स्पेशली मटकी खायची सवय नसते, खोबर्‍याचं वाटण आवडेल याची खात्री नसते. )

अल्पनाला मिसळी आणि श्रीखंडाच्या सजेशनबद्दल अनुमोदन.
मिसळ उत्तर भारतीयांना/ बिहार्‍यांना / बंगाल्यांना कुणालाच आजवर खूप्प आवडलेली ऐकलेली नाही. आणि त्यांना खाऊ घालण्याचा बेत एक दोनदा फसला ही आहे. पण तीच मिसळ जर मटकी ऐवजी पांढर्‍या वाटाण्याची केली तर मात्र आवडते.
मंजुडीने सुचवलेले पदार्थ हमखास हिट होतात. कैरीचे/ चिंच्गुळाचे पन्हे ही उ.भा. ना आवडते.

मिसळ उत्तर भारतीयांना/ बिहार्‍यांना / बंगाल्यांना कुणालाच आजवर खूप्प आवडलेली ऐकलेली नाही. <<<< दाक्षिणात्यांना पण आवडत नाही, असा अनुभव. Happy

वडापाव, कांदाभजी, तवा पुलाव, पावभाजी, रगडा पॅटीस असे बंबय्या स्ट्रीट फूड आयटम्स जनरली लोकांना आवडतात.

स्टॉलचे नावपण बाँबे चाट कॉर्नर, मुंबई मसाला , मुंबई मॅजिक असं काहिसंठेवा.
परप्रांतियांना महाराष्ट्रातल्या मुंबईशीच ओळख/ अटॅचमेंट असते सहसा.

मिसळ नको ? अरे बापरे. वडे तळत बसायला नको वाटत आहे. भेळ ईतर लोक पण ठेवणार आहेत म्हणून नको आहे. साबुदाणा खिचडी इथला साबुदाणा वापरून हमखास चांगली होत नाही Sad
पावभाजी ठेवता येइल.
धन्यवाद. परत विचार करतो.

उत्तर प्रदेशीय लोकं दहीवडे भरपूर खातात. त्यांना त्यांच्या पद्धतीचेच आवडतात.

पाव असलेले पदार्थ पण त्यांना जचत नाहीत फारसे. मिसळपाव, पाव भाजी, वडापाव इ.

नुसते आलुबडे केले तर मात्र हाणतात.

आधी धुवायचे >>> Biggrin सॉरी मवा धुतल्यावर मखाण्यांचं काय होइल या कल्पनेनं हसू आलं.

हे पदार्थ सहज सुचले, उ.प्र. लोकांना आवडतील/ नाही हे माहित नाही.

वरईचे तांदूळ / खिचडी, टोमॅटोचे सार, मिरगुंडं?
सांजोरी / साटोरी
मसालेभात, कां-ब-टो-फ्लॉ रस्सा
वाटाणा / मटार उसळ - पाव.
ब्रेड पॅटीस (पाव पॅटीस)
चकोल्या / वरणफळं

खुपच गोंधळ झाला आहे खरा. आता सांगा हे मेन्यू कसा वाटतो आहे ?
१. वडा पाव - ज्याला हवे त्याला नुसते वडे पण देऊ
२. बेसन लाडू
३. कॉर्न भेळ
४. ढोकळा
५. पुरण पोळी - जास्त करणं जमणार नाही. जमतील तेवढ्या
६. साबुदाणा खिचडी
मिसळी च्या बाबतीत आधीच सांगितल ते बर झालं. धन्यवाद सगळ्याना.

प्राची ,मिसळ साउथ/नॉर्थ दोन्ही कडच्या लोकांना आवडत नाही असा अनुभव आहे. कॉर्न भेळ आवडये. कॉर्न पॅटिस पण खूप आवडले आहे आत्ता पर्यंत. बेसन लाडु आवडतो. ढोकळा सगळ्यांनाच आवडतो.
जनरली नॉर्थ इंडिअन घरी आले कि मी हे ठेवते. यातला एखादा पदार्थ चालतो का बघा.
सामोसे किंवा छोले सामोसे चाट
सुरळीची वडी
ढोकळा
पाणीपुरी
कोबीचे पकोडे (गरम असताना चाट मसाला घालून)
पालक किंवा बटाट्याची भजी (ग.अ.चा.म.घा.)
पुरी-भाजी
व्हेज मांचुरिअन/ हक्का नुडल्स/पनीर चिली
गाजर हलवा
हा माझा अनुभव आहे. वेगळा पण असेल इतरांचा.

तुम्हाला स्टॉल ठेवायचाय. पैशाचा विचार करावा लागेल. मास प्रॉडक्शन साठी पुरण पोळी परवडेल अस वाटत नाही.

_प्राची_ -- बटाटेवडे करा. मायक्रोवेव्ह मधे छान गरम होतात. पाव मधे वडा आणि तिखट चटणी घालून द्यायचे. मैत्रिणी मिळून करत असाल तर कठीण नाही.

वडा पाव, बेसन लाडू, पुरण पोळी ढो कळा ह्यात सर्वात बेसन चना इत्यादी आहे. हे त्यांना कित पत आव्डते?
एक दोन ऑप्शन पोटा ला हलके असे ठेवता येतील.

इडली चट्णी, पांढरा ढोकळा,
चिला - पनीर रोल्स. आडे,
इथे एक हयग्रीव रेसीपी आहे ती करून नेता येइल. गार करून( बर्फाच्या पातेल्यात ड बा ठेवता येइल)
द्रोणात देता येइल.

दाबेली. मटार करंजी?

पैशाचा विचार करावा लागेल. मास प्रॉडक्शन साठी पुरण पोळी परवडेल >>> सीमा, माझ्या अंदाजाने प्रॉफिट मेकिंगसाठी स्टॉल नसून हौशीसाठी असावा.. कॉलनीमधे फनफेअर आहे असं म्हणताहेत त्या.

१. भाजीचा बेस असलेल्या कोणकोणत्या प्रकारच्या ग्रेव्हीज करता येऊ शकतात? (उदा. टोमॅटो-कांद्याची ग्रेव्ही)
२. पातळ भाज्यांमध्ये - कोणतेही पीठ / डाळ / तीळकूट-दाणेकूट / ओले - सुके खोबरे / कडधान्य हे न वापरता कोणत्या भाज्या करता येतील?
माहितगारांनी प्लीज सांगा. Happy

प्राची,
वडापाव/ मिसळपाव/ उसळपाव हे प्रकार मुंबई-पुणे-कोल्हापूर त्रिकोण सोडला तर इतर कुठल्याही भागातल्या लोकान्ना आवडत नाही, असं बघितलंय. आमच्या विदर्भातही कोणी खात नाही.
बेसनलाडू ऐवजी तिळ्गुळाच्या वड्या/लाडू कशा वाटतील? बे.ला. पण छानच आहे पण तिळगुळ जरा वेगळा प्रकार..थंडी असेलच सध्या तिकडे.

<<< २. पातळ भाज्यांमध्ये - कोणतेही पीठ / डाळ / तीळकूट-दाणेकूट / ओले - सुके खोबरे / कडधान्य हे न वापरता कोणत्या भाज्या करता येतील?

अकु, अळूचं फदफदं ( आई बेसन कधीच लावत नाही ) आणि पालकाची ताकातली भाजी ( लिहिल्यावर आठवलं की थोडंसं बेसन दह्याला लावायला लागेलच. )

२. पातळ भाज्यांमध्ये - कोणतेही पीठ / डाळ / तीळकूट-दाणेकूट / ओले - सुके खोबरे / कडधान्य हे न वापरता कोणत्या भाज्या करता येतील?

पालक पनीर.
मेथी मटर मलई.

नताशा! अमराथी लोका.न्ना आवडत नाही अस म्हणता येइल.. मी जळगाव वै.कडे सुद्धा गोलि चे वडा पाव दुकान पाहिलेयएत..

मुगभजी
हा.न्डावा
शिरा
कटलेट
रगडा पॅटिस
असे ़काही पर्याय सुचतायत..

पातळ भाज्यांमध्ये - कोणतेही पीठ / डाळ / तीळकूट-दाणेकूट / ओले - सुके खोबरे / कडधान्य हे न वापरता कोणत्या भाज्या करता येतील?<<< आमची सौदिंडीयन करी पावडर घालून बर्‍याच भाज्या करता येतील, पण त्यात पीठ आणि डाळ असतेच. Happy

ग्रिल्ड प्रॉन्स कसे बनवायचे? रेसिपी सविस्तर द्या.

नंदिनी सविस्तर रेसिपी वगैरे नाही पण तुम्हाला प्रॉन्सला जो कुठला लाल मसाला लावायला आवडत असेल तो, चिंच किंवा कोकमाचा जाडसर गर(कमी पाण्यात भिजवून), लसूण पेस्ट, गरम मसाला, तेल, हळद, मीठ लावून थोडा वेळ ठेवा आणि मग स्क्युअरला प्रॉन्स लावून ते दोन्ही बाजुला भाजले जातील असे शेकवायचे. किती मोठे प्रॉन्स आहेत त्यावर किती वेळ शिजवायचे हे जरा अंदाजाने ठरवावं लागेल पण फार वेळ लागत नाही. रंग बदलत जाईल तसे फिरवत राहावं लागतं. मी देसी स्टाइल सांगितलं. इकडे नुस्तं ऑऑ, मीठ, मिरपूड लावूनही केलेलं बाहेर खाल्लं आहे मग डीप म्हणून दुसरं काहीतरी सोबतीला देतात.

. भाजीचा बेस असलेल्या कोणकोणत्या प्रकारच्या ग्रेव्हीज करता येऊ शकतात? >>
अरुंधती, व्हेजिटेबल्स इन एक्झोटिक ग्रेवी (Vegetables in exotic gravy)या रेसीपीत दिलेली ग्रेव्ही करून अनेक भाज्या अ‍ॅड करता येतील.

Pages