पालक पनीर रोल

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी जुडी पालक, १०० ग्रॅम पनीर, एक मध्यम आकाराचा ब्रेड [१०-१२ स्लाईस], ५ हिरव्या मिरच्या, ५ लसुण पाकळ्या, मीठ चवीनुसार, तळायला तेल.

साहित्यः

क्रमवार पाककृती: 

ब्रेड स्लाईस च्या कडा सुरीने काढुन टाकाव्या,
पनीर चे साधारण दिड ईंच x अर्धा ईंच असे तुकडे करुन घ्यावे,
धुतलेल्या पालकाची पाने, हिरमी मीरची, लसुण मिक्सर मधे बारीक करुन घ्यावे,
त्यात चवी प्रमाणे मीठ आणि अर्धा कप पाणी घालावे,
हिरव्या रंगाच्या या मिश्रणात कडा काढलेल्या स्लाईस एक - एक करुन भिजवाव्या,
हाताने मळुन त्या मिश्रणाचा गोळा तयार करा [साधारण थालपिठाच्या पिठा सारखा गोळा तयार होतो],

छोटा गोळा घेउन तळव्यावर गोल चकती करावी, पुरीच्या आकाराची, त्यावर पनिर चा एक तुकडा ठेउन,
तो तुकडा पुर्ण झाकला जाईल अशाप्रकारे गुंडाळावी.

तापलेल्या तेलात तळावे, सॉस बरोबर खाण्यास द्यावे.

DSC02675.JPG

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी दोन ... :)
माहितीचा स्रोत: 
बहुदा ई टीव्ही मराठी किंवा झि टीव्ही मराठी :)
Submit to kanokani.com

किलिंग दिसताएत. करतेच ह्या वीकांतला.

मस्त वाटत आहे. मी पण करेन. स्मित

करायला सोपी आणि मस्त पाककृती! ब्रेड पालकाच्या मिश्रणात मळून घ्यायची कल्पना फारच आवडली! (अश्याप्रकारे मल्टीग्रेन ब्रेड संपवायला मदत होईल.) थँक्यु! स्मित

कृती आवडली.. जेवायला कुणी येणार असेल तर स्टार्टर्स चांगले वाटतील आणि पटकन होतील!

सही!

मस्तच ...झक्कास रेसिपी ..थॅक्स!

कसली मस्त पाकृ आहे. आजच करणार. तो फोटो पण एकदम टेम्प्टींग आला आहे.

फोटो मस्त.
अशीच पाककृती चीज घालून 'प्राची'ने 'पालक बॉम्ब' नावाने लिहिली आहे इथे- http://www.maayboli.com/node/6575

मस्त दिसतंय हे प्रकरण स्मित

पनीर केवढ घ्यायच??

मस्तच ! करुन बघेन.

'नविन लेखन' मधुन 'नविन पाकक्रुती' मधे हलवणार्‍यांचे आभार स्मित
साहित्यः हा शब्द मला संपादनात दिसत नाही त्यामुळे काढता आला नाही. क्रुपया, प्लीज जरा काढणार का ?

चिज घालून >> अरे वा, अजुन छान लागतील, पुढच्या वेळेस नक्की.

सहीए!!

अरे वा... मस्तच दिसताहेत हे रोल्स.. करायलाही एकदम सोप्पे.
चिज घालुनही छान लागतील नक्कीच...

आरती नवीन क्षेत्र का आता? पण फोटो गन्डलाय ...

हे शॅलो फ्राय केलं तर चालू शकेल का? मस्तच दिसतंय!

आरती, जबरी दिसतायत रोल्स. करुन बघायला पहिजेत.
सखी, मलाही तोच प्रश्न पडलाय शॅलो फ्राय किंवा बेक केले तर???

बादवे, आरती तु साहित्य मधे पनीर लिहीलेच नाहियेस...स्मित की मलाच दिसत नाहिये अ ओ, आता काय करायचं

सखी, लाजो
शॅलो फ्राय करुन बघायला हरकत नाही. थोडे कच्चे लागतील असे वाटते.

आरती तु साहित्य मधे पनीर लिहीलेच नाहियेस >> खरच की स्मित

रॉबीन, नविन नाही, बचपन की आदत स्मित
फोटो च काय आकार - उकार पण गंडले आहेत. वेळेचा अंदाज चुकला थोडा अरेरे

आजच केले. मस्त जमले.
पण तळल्यानंतर रंग एकदम हिरवागार राहिला नाही.. रंगासठी काही युक्ती आहे का?
(मी व्हीट ब्रेड वापरला व लो-मेडियम्-हाय अशा ३ही टेम्परेचरवर तळुन पाहिले , पण रंग नाही आला वरील फोटोसारखा)

धन्यवाद... एकदम झटपट रेसिपी

खुप छान पदार्थ आहे . नक्कि करुन बघिन.

आज केले पनीर रोल. मस्तच लागतात स्मित मी पण व्हीट ब्रेड वापरला. त्यामुळे कॅलरीजकडे दुर्लक्ष केल्यास व्हाट्टहेल्दीफूडसर्जी डोळा मारा

खत्री आहे रेसिपी एकदम... उद्या ट्राय करते.

केले शेवटी हे रोल्स..
काल घरी पालक नवमी साजरी केली.. पालक पुलाव आणि पालक पनीर रोल डोळा मारा
मस्त झालेले पनीर रोल्स पण माझ्याही रोल्सनी रंग बदलला. फोटो काढायच्या आधीच संपले.