पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोया चंक्स साधारण १० मिनिटे उकळत्या पाण्यात टाकावे. ते चांगले मऊ पडतात. मग ते दाबून त्यातले पाणी पूर्णपणे काढून टाकवे. चिकन ग्रेवी सारखा रस्सा करून चिकन ऐवजी सोया चंक्स घालावे.

सोया चंक्स ची भाजी...
वाटीभर सोया चंक्स पाण्यात १-२ तास भिजवुन घ्यावेत. ते फुलुन येतात.
आता एका कढईत रोजच्या भाजीला लागते त्या पेक्षा जरा जास्त तेल घ्यावे. त्यात मोहरी,जीरं टाकावे...ते तडतडले की लसुण आलं पेस्ट टाकावी.
त्यात कांदा पेस्ट किंवा भरपुर चिरलेला कांदा घालुन तो मस्त फ्राय करावा.. मग चंक्स मधलं पाणी पिळुन टाकुन चंक्स कढईत घालावेत. व ते ही फ्राय करुन घ्यावेत.
आता त्यात एव्हरेस्ट १ चमचा चिकन मसाला आणि आपला साधा मसाला टाकुन तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करावे.
मग त्यात टोमॅटो प्युरी टाकुन मिक्स करावे
पाणी अ‍ॅड करावे.. ( आमटी होईल इतपत नाही )
मग झाकण ठेवुन शिजु द्यावे...मीठ टाकुन ( हवं तर साखर ही ) कोथिंबिरीने गार्निश करुन सर्व्ह करावे

टिप : कुठल्याही नॉर्मल भाजी सारखी ही भाजी मी बनवते .काहीही ज्यादाचे एफर्ट्स टाकायच्या भनगडीत मी पडत नाही.

फ्लावर बटाटा, मटार बटाटा, वांग बटाटा रस्सा, कोबीची टॉमेटो घालुन भाजी, यात सोया चंक्स छान लागतात. वर लिहील्याप्रमाणे आधी भिजवुन पिळून मग घालायचे. ते रस्सा शोषुन घेतात त्यामुळे पाणी जास्त घालावे लागेल.
सोया चंक्स साधारण १० मिनिटे उकळत्या पाण्यात टाकावे. >> त्या पाण्यात मीठही घालावे म्हणजे चंक्सच्या आत अळणी लागत नाही.

अग मिनी सोया वड्या बर्या पडतात...... एक वाटी दोघांत पुरते कारण ते पाण्यात टाकले की फुलतात....मला वाटते ३ वाट्या बस होतील.....

सोया चंक्स प्रचंड चिवट नसतात का? दोन-तीन महिन्यापूर्वी एक पाकिट आणलं होतं एकदाच व्हेजसूप मधे घातल्या, मला रवंथ करत बसावं लागला Sad तसंच होतं का that is the point Sad about how nutritious it is? Sad

वेल मी कान्दा खोबरे पण भाजुन त्याचे वाटण ( त्यात् आले लसुण आणी गरम मसाला घालते) सोया चन्क्स करता वापरते. दाट ग्रेव्ही होते. अनिश्काने वर मस्त कृती दिलीच आहे.

रश्मी अग कांदा खोबर्याचं वाटण बनवायचा फार फार फार फार आळशीपणा मी करते....म्हणुन शॉर्ट्कट्स मारत असते जिथे तिथे

जुने झाले,अगदी एक्सपायरी डेट जवळ आली असली तर चंक्स चिवट होतात. चिकन खाणाऱ्यांना कदाचित (बोल्ड अक्षरात कदाचित) फार विचित्र नसेल वाटत पण व्हेजिटेरियन्स ना तेवढं चिवट पण नाही आवडत. जुनाट पनीर कसं लागतं Sad

काळ्या वाटाण्याची उसळ आत्तापर्यंत एकदाही खाल्लेली नाही पण आवडेल असं वाटलं म्हणून ह्यावेळी एक पाकीट आणलंय. त्याची अंगासरशी रस ठेवून उसळ करता येईल का आणि ती चांगली लागेल का ?

माझ्याकडे मालवणी मसाला नाही आणि तिखट अजिबात खात नाही.
इतर उसळी करतो तशी गोडा मसाला घालून चांगली लागेल का ? खूप नारळ वापरायचा नाहीये पण कांदा-थोडं खोबरं ह्यांचं वाटण वापरुन करता येईल.
वाटाणे आदल्या दिवशी भिजत घालायचे ना ?

काळ्यावाटाण्याची उसळ कमी तिखट होउ शकते...तुम्हाला खुप खोबरं नाही वापरायच तरी हरकत नाही...थोडंस्स खोबरं आणि जरा जास्त कांदा व टोमॅटो यांच वाटण ;लावु शकता....कृती कुठल्याही कडधान्या सारखीचं .. पण वाटाणे कुकर ला लाउन २-३ शिट्या मारुन घ्या.... ( मला ही भाजी नाहीच आवडत... त्यामुळे मी जास्त काही सांगु शकत नाही)

धन्यवाद अनिश्का., आज भिजवते रात्री.
बर्‍याच जणांकडून काळे वाटाणे आवडत नसल्याचं वाचलं आहे त्यामुळे जरा धाकधूक आहे. पण चणे, पांढरे-हिरवे वाटाणे आवडतात तर हे का नाही असे वाटले Happy

खावून बघ म्हणजे कळेल Wink

अगं जास्त उग्र असते इतर वाटाण्यांपेक्षा इतकच. मला कधीतरी खायला आवडते. माझ्या हातची नाही, माझ्या मालवणी मैत्रिणीच्या हातची.

अगो...मी सासरकडुन मालवणी त्यामुळे कुठल्याही कार्यात ही उसळ हवीच..पन माझी जाव आहे नं ती चिकन किंवा मटन मसाला वापरुन बनवते ही उसळ... म्हणुन ती जरा तरी घशाखाली उतरते..

अगो, काळ्या वाटाण्यांची उसळ चांगली लागते. का.वा. छोल्यांइतक्या शिट्या करून शिजवून घ्यावे लागतात. कांदा-खोबर्‍याचं वाटण आणि गूळ घाल. तिखट, मीठ आणि गोडा/ गरम मसाला. आवडत असेल तर फोडणीत कढीपत्ता. मस्त चव येते.

Ago, dont use tometoes. telaat kanda fry kar becoz u wanna use less coconut , tyaat thode vaatap taak. mast fry karun ghe telatach chilli powder tak. aani usal kartaana tyaat thode shijalelel vatane mixer la laavoon taak. grevy thik hote ani hav changali lagate. garam masala must.

काळे वाटाणची उसळ आवड्त नसल्यास काळे वाटाणे गवार, भेंडी वगैरे भाज्यांमधे घालावेत. खुपच मस्त लागतात. कधि कधि बटाटा घालुन कंटाळा येतो. मी तर नेहमी खुप भाज्यात वापरत असते. आमटी पण छान होते. मसाल्याची करतो ना तशीच करायची . कांदा ओले खोबरे तेलावर परतुन वाटण करुन.....

काळ्या वाटाण्यांची उसळ चांगली लागते. ... मालवणी मसाला वापरुन .. मी थोडी दाट ग्रेवि हो ण्या साठी.. थोडे वाटाणे मिक्सर ला लावते.

अर्रे, धन्यवाद सर्वांना Happy
सामीने सांगितल्याप्रमाणे कांदा-खोबर्‍याचं वाटण चांगलं परतून घेईन. गोड्या मसाल्याबरोबर थोडा गरम मसालाही घालेन. मंजूडीने सांगितल्याप्रमाणे गूळ घालेन म्हणजे उग्रपणा कमी होईल वाटाण्यांचा.
प्रिति १ टिप छान आहे. उद्या चवीचा अंदाज आला की मग व्यंजन म्हणून वापरता येईल भाज्यांमध्ये.

परवा इथे विचारलं आणि त्या रात्री वाटाणे भिजत घालायचेच विसरले. आज केलीय काळ्या वाटाण्यांची उसळ. मंजूडीने सांगितली तशीच केलीय फक्त कढीपत्ता नाही घातला. मस्त झालीय चटपटीत ! आमच्याकडे चिरंजीवांसकट सगळ्यांना खूप आवडली. धन्यवाद Happy

येस, नक्की करणार Happy

काल लिहायचं विसरले.. कढीपत्ता घातला नाही पण आलं-लसूण पेस्ट घातली होती आणि गोडा + गरम मसाला. त्यामुळे ती चटपटीत चव आली होती. सुकं खोबरं आणि कांदा भाजून वाटण केलं.

Pages