Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२. पातळ भाज्यांमध्ये -
२. पातळ भाज्यांमध्ये - कोणतेही पीठ / डाळ / तीळकूट-दाणेकूट / ओले - सुके खोबरे / कडधान्य हे न वापरता कोणत्या भाज्या करता येतील?>>> फ्लॉवर-बटाटा-मटार-टोमॅटो रस्सा, कांदा-बटाटा रस्सा,
प्रतिसाद खाली संपादित केला
प्रतिसाद खाली संपादित केला आहे.
धन्यवाद सर्वांना! घरातल्या
धन्यवाद सर्वांना!
घरातल्या पथ्यकरी व्यक्तीसाठी पर्याय शोधत होते.
पालक पनीर व मेथी मटर मलाई यांमधील पनीर व मटर, मलाई काढून उर्वरित भाजी चालू शकेल.
पातळ भाज्यांमध्ये सध्या पंजाबी पालक, लसूणी पालक, कां टो फ्लॉ रस्सा, ताकातला चाकवत व पालक (बेसन किंवा इतर पीठ न लावता), काकडी / दुधी / तोंडली / घेवडा / पापडी / दोडक्याची जरा रस ठेवून केलेली भाजी, टोमॅटो-कांदा यांची रस ठेवून भाजी असे पर्याय वापरत आहोत. बटाटा, गवार, वांगे काही दिवस खायचे नसल्यामुळे बटाट्याचे व वांग्याचे अगणित प्रकार बाद आहेत. :|
शेपू पालकची भाजीही पातळसर प्रकारात करता येईल बहुतेक. अळूची भाजीही.
आणखी कुठल्या भाज्या सुचल्या तर सांगा प्लीज.
शेवग्याच्या शेंगांची चिंचेचा
शेवग्याच्या शेंगांची चिंचेचा कोळ आणि नारळाचे दूध घालून भाजी/आमटी करता येते( डाळ घालावी लागत नाही). अप्रतिम लागते चवीला.
@राजसी, ती पोळी साधी पोळी
@राजसी, ती पोळी साधी पोळी आहे, आणि माझ्या १६ वर्षांच्या लेकिने प्रयत्नपुवर्क बनवली आहे. अमेरिकेत राहुन ती शिकण्याचा प्रयत्न करते ह्याचा मला अभिमान आहे.
@ Muktajit, ओके, मुलीचे
@ Muktajit, ओके, मुलीचे अभिनंदन.
वावे, पथ्यकरी व्यक्तीला सध्या
वावे, पथ्यकरी व्यक्तीला सध्या नारळ / खोबरे खायचे नाहीये. पण थँक्स!
काल नेटवर सूटेबल रेसिप्या शोधत होते. त्यात तोंडल्याची गरम मसाला, आले-लसूण पेस्ट इत्यादी घालून केलेली पातळ भाजी, विविध भाज्यांची सौदिंडियन पद्धतीने लोणची आणि माबोवरचा दोडक्याचा ठेचा, सांबार मसाला घालून कोरड्या भाज्या (फ्लॉवर इ.), पंचफोरण किंवा उपम्याची (जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या / सुक्या लाल मिरच्या इ.) फोडणी घालून केलेल्या फळभाज्या यांसारख्या पाकृ मिळाल्या.
अरुंधती, टोमॅटो-कोथिंबीरीची
अरुंधती, टोमॅटो-कोथिंबीरीची पेस्ट घालूनही रस्सा भाजी छान होते. चालत असेल तर त्यात हि.मि.-लसूण घालणे.
लाल भोपळ्याचीही (चालत असेल तर) रसभाजी करता येईल.
लाभो वर्ज्य आहे सध्या. टो-को
लाभो वर्ज्य आहे सध्या. टो-को पेस्ट + हिमि + लसूण आयडिया छान आहे. चवीत व्हेरिएशन येईल तेवढेच! थँक्स मंजूडी.
अकु, तू काय चालणार नाहीये
अकु, तू काय चालणार नाहीये (त्याची यादी जरा लांबच होतेय) त्यापेक्षा काय चालणार आहे त्याची यादी टाक बरं. म्हणजे पटापटा सुचवता येईल
वरदा वेली भाज्या चालणार आहेत
वरदा
वेली भाज्या चालणार आहेत मोस्टली. (ला भो, गवार, बटाटा, वांगं, रताळं, सिमला मिरची, मटार वगैरे नाही.) फळभाज्या, पालेभाज्या, फळं चालतील म्हणून सांगितलं आहे. वरचे अपवाद वगळून.
भेंडी, तोंडली, फ्लॉवर, कोबी, दुधी, दोडका, टोमॅटो, काकडी, मुळा, गाजर, बीट, कांदा, पालेभाज्या बहुतेक सगळ्या, घेवडा ह्या भाज्या चालणार आहेत. [पण त्यात ओले खोबरे/तीळकूट / दाणेकूट/ डाळी / कडधान्ये / कोणतीही पीठे न घालता त्या करायच्या आहेत. त्यामुळे जरा वेगवेगळ्या चवींचं व्हेरिएशन शोधत आहे. मुगाची डाळ वापरलेली चालणार आहे असे सूत्रांनी नुकतेच सांगितले आहे.]
अकु, पंचफोरन घालून कोबीची
अकु, पंचफोरन घालून कोबीची भाजी आणि टमाटो चटणी
मी फॉलो करतो त्या टमाटो चटणीत आले-लसूण नाही. बेदाणे आहेत.
वरदा सांगतीलच.
ज्या ज्या भाज्या पीठ लावून
ज्या ज्या भाज्या पीठ लावून करतात त्यांना मुडा पीठ लाव. कांदा-टॉमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये दुधी, तोंडली, दोडका, गिलके या भाज्या करता येतात. याच भाज्या नुसत्या अद्रक आणि टॉमॅटो ची ग्रेव्ही (कांदा-लसणाशिवाय) वापरूनही करता येतिल.
पालेभाज्या (किमान मेथी, पालक) पण कांदा टॉमॅटो घालून सरसरीत करता येतात. शिवाय मुडा पीठ पण लावता येईल.
भेंडी, गाजर, फ्लॉवर इ भाज्या कोरड्या करताना टॉमॅटो घातला तर अगदी कोरडी भाजी न होता ओलसर मसाल्यावाली भाजी होईल.
खसखशीचं वाटण, हलक्या हाताने
खसखशीचं वाटण, हलक्या हाताने मोहरीचं वाटण असं लावून अंगासरसा रस्सा ठेवून भाज्या करता येतील. दोडक्याला खसखशीचं वाटण उत्तम लागतं.
फ्लॉवरची दुधाच्या रश्शाची पण एक भाजी असते (ती सा.बां ना विचारून लिहेन). फ्लॉवर रोस्ट म्हणून एक बंगाली पाकृ असते. जरा 'शाही' आहे. पण त्यातला दह्याचा वापर बघ. थोडे मसाले, तेल वगैरे कमी करून जमतंय का बघ. अतिशय सुरेख माईल्ड चवीची भाजी होते
दही घालून उकडलेल्या दुध्याचं रायतं. मी बिटाचीही किसून भाजी करते. पण ती परतून असते, रस्साभाजी नाही.
मुळा, गाजर, बीट अशा भाज्यांचे पराठे करता येणार नाहीत का?
थँक्स भरत, अल्पना, वरदा!
थँक्स भरत, अल्पना, वरदा!
कोबीची पंचफोरन भाजी आणि टो. च. सोपी, स्वादिष्ट वाटतेय.
मुडा / मुडापी लावून भाजी - अर्रे हो, हे करता येईल की!
वरदा, मोहरीचं वाटण >> कसे करतात?
भाज्या घालून पराठे, खसखशीचं वाटण चालेल का हे उमेदवाराला विचारते.
अकु, पालक तसेच मुळ्याचा
अकु, पालक तसेच मुळ्याचा पाला/बारीक चिरलेला मुळा व मुडा घालून साधी भाजी करता येइल. यात कांदाही घालता येइल लांब चिरून. फोडणीत लसूण घालणे.
अरुंधती, मी दुधीची भाजी
अरुंधती, मी दुधीची भाजी कांदा, टॉमेटो न घालता पुढील प्रकारे करते. लवंग, दालचीनी, हिंगा ची फोडणी देऊन त्यात भिजवलेले शेंगदाणे टाकायचे. मग हळद , मसाला टाकून परतायचे . दुधीच्या मध्यम आकाराच्या फोडी परतून , पाणी घालून कूकरला ५/६ शिट्या काढायच्या. कूकर थंड झाल्यावर गरम पाणी टाकून उकळी काढायची. त्यात चिंच, गूळ आणि चमचाभर बेसन टाकून उकळायची. चव वेगळी आणि छान लागते. दुधीचीच छान ग्रेव्ही तयार होते. आवडल्यास इतर भाज्या अॅड करू शकतेस.
मुग डाळीचे सांडगे असल्यास
मुग डाळीचे सांडगे असल्यास फक्त कांदा वापरून रस्सा भाजी छान लागते. हेच सांडगे इतर भाज्यांमधे वाटणाऐवजी वापरता येतील. सुर्यफुलाच्या बीया चालणार आहेत का? मी हल्ली बर्याच रस्साभाजीत वाटणासाठी वापरते.
>>दोडक्याला खसखशीचं वाटण
>>दोडक्याला खसखशीचं वाटण उत्तम लागतं.
अगदी! आई 'बाकरभाज्या' करताना भोपळा, दोडकी अश्या भाज्यांना खसखस, अगदी जरासं खोबरं, आलं, लसूण, हि. मिर्च्या आणि तिचा मसाला वाटून लावते. भरपूर कोथिंबीर. पदार्थ अप्रतिम होतो.
काळी मोहोरी थोडा वेळ पाण्यात
काळी मोहोरी थोडा वेळ पाण्यात भिजवून मिक्सरवर वाटून घ्यायची.
कांदा चालत असेल तर बारीक कांदा कापून भाजी परतून घेऊन उतरवायच्या आधी पाचेक मिनिट फेटलेलं दही घालून ग्रेव्ही करता येते. चांगली लागते. आमच्याकडे माश्यांना किंवा परवरला करतात कधीतरी
मकाणे आणले आहेत. त्याचं काय
मकाणे आणले आहेत. त्याचं काय आणि कसं बनवायचं पाहिजे आहे. प्लीज!
मखाणे थोड्या तूपामध्ये परतुन
मखाणे थोड्या तूपामध्ये परतुन घ्यायचे. गॅस बंद करून मीठ घालून ढवळा. डब्यात भरून ठेवा आणि कधीही खाऊ शकता. मी नेहमी बनवून ठेवते. चहाबरोबर मस्त लागत.
खिर बनवा. मिक्स किंवा पनीरच्या भाज्यांमध्येही वापरता येते.
खिर बनवा. मिक्स किंवा
खिर बनवा. मिक्स किंवा पनीरच्या भाज्यांमध्येही वापरता येते.>>> ह्याचीच रेसिपी पाहिजे होती... म्ह्णजे पेस्ट करायची कि कसे? ... मुलीला खायला आणले होते पण त्यात कडक झालेले (नीट न फुललेले ) खूप आहेत जे तिला खाता येत नाहीत .... त्याचे काहीतरी करायचे आहे
प्राची., तूपात परतल्यावर
प्राची., तूपात परतल्यावर क्रंचीनेस येतो.
खिरीसाठी दूध + मखाणे +साखर+ ड्रायफ्रुटस + वेलची पावडर घाला. मखाणे सॉफ्ट झाले की गॅस बंद करा किंवा दूध आटल्यावर गॅस बंद करा. जस तुम्हाल आवडेल तस.
मिक्स किंवा पनीरच्या भाज्यांमध्येही वापरता येते.>>> पेस्ट नाही करायचे असेच घालायचे. थोडे सॉफ्ट झाले की पनीर घाला. एखाद्या पनिरच्या भाजीमध्ये घालून पहा. टेस्ट आवडली तर पुन्हा वापरा.
तुपात परतताना तुपात जिरे,
तुपात परतताना तुपात जिरे, हिंग आणि लाल मिरची पूड, मीठ घालावे. जास्त तूप घालू नये आणि खूप वेळ परतावे म्हणजे छान कुरकुरीत होतात.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/14636 हा कुर्मा पण छानलागतो मखाणे घालून.
तुपावर परतलेले मखाणे जरा
तुपावर परतलेले मखाणे जरा बारीक करायचे मिक्सरमधे. लाल भोपळा किसून तुपावर परतून घ्यायचा, त्यात दूध, साखर, मखाणे, वेलची घालून उकळी आणायची. आवडतील ते ड्रायफ्रुट्स घालायचे. सुंदर रंगाची, मस्त चवीची आणि पौष्टिक खीर तय्यार!
आजी चुलीवरचे खारे वांगे
आजी चुलीवरचे खारे वांगे करायची. चव आठवते पण रेसिपी हवी आहे. त्यात तिखट अजिबात नसायचे. आणी ड्राय असायची भाजी. कुणाला माहित असेल रेसिपी तर द्या.
आरती, प्राची, सहेली ....
आरती, प्राची, सहेली .... मकाण्यांच्या रेसीपीबद्दल धन्यवाद. करुन बघते.
काल आंबट चुक्याचे भाजी घेतली
काल आंबट चुक्याचे भाजी घेतली आहे. माबोवर कुठेच रेसिपी सापडली नाही. कुणी सांगेल का?
Pages