पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामी काही वेळेस आम्बटचुका आणी पालक एकत्र करुन त्याची बेसन लावुन पातळ भाजी करतात. त्यात भिजवलेली हरबरा डाळ आणी शेन्गदाणे घालायचे. वरुन नेहेमीप्रमाणे लसणाची फोडणी द्यायची.

ते गोंगुरा (आंबटचुकाच ना)?

आधी उकडून पाणी फेकून मग काहितरी परतायची जे काही त्यात घालयचे ते घालून अशी आईची कृती आठवतेय.(आपण केली नाही कधीच. मातोश्रीच करायच्या).

रश्मी, प्लिझ मला विपूत पुर्ण रेसिपी देशील का? ,
ते गोंगुरा (आंबटचुकाच ना)? >झंपी , मला माहीत नाही ग. आईला विचारून क्रुती टाकशील का?

खारं वांगं - खडा मसाला वाटुन घालतात याला. पाणी न घालता तेलावर परतुन शिजवतात. अगदीच वाटलं तर पाण्याचा थोडासा हबका द्यायचा नाहीतर नीट परतल्यावर कुकरच्या भांड्यात घेउन कुकरमधे शिजवायचं. हिरव्या वांग्यांचं मस्त होतं खारं वांगं. बाकी मसाला नेहमीच्या वांग्यासारखाच असावा. घरी विचारुन सांगते

घोंगुरा म्हणजे अंबाडी.

घोंगुरे की सब्जी म्हणजे तीच ना त्या रामपाल यादव मुका नसतो व शाहीद कपुर मुका असतो त्या षिनेमातली?

आंबट चुक्याची अळूसारखीच (चिरलेली भाजी + ह.डाळ + दाणे कुकरला लावून नंतर बेसन लावून घोटून फोडणी, भाजीत गूळ मस्ट.) मस्त होते भाजी.

आंबट चुक्याची कोशिंबीरसुद्धा छान होते.

चुका पातळ अन लांब लांब चिरून घ्यायचा. दहिवड्यांकरता करतो तसल्या मधुर दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. मीठ, साखर पहायचं. हवी असेल तर वरून पळीभर तेलाची हळद, जिरं घालून फोडणी द्यायची.
दही मात्र परफेक्ट हवं या रेसीपी करता...

ऑमेल्ट साधे मीठ व मीरपुड पण घालुन होते तसेच कान्दा, मिर्ची, टॉमेटो घालुन पण होतेच की. हाफ फ्राय करताना डायरेक्ट तव्यावर फोडुन टाकुन त्यावर मीठ, मीरेपुड घालायची.

अन्डा भुर्जी करताना थोड्या तेलात हिन्ग घालुन कान्दा परतायचा ( हवी असल्यास हळद घालणे), त्यात हिरवी मिर्ची बारीक चिरुन टाकायची. टॉमेटो पण बारीक चिरुन तो पण परतायचा. त्यात मग फेटलेले अन्डे घालुन भुर्जी फार कोरडी होणार नाही अशी परतायची. मीठ घालायचे.

अन्डा करीत अन्डी उकडुन त्याचे तुकडे कान्दा कोबर्‍याच्या वाटणा मध्ये घालुन शिजवायचे.

मी खुप दिवस एका भाजीवाल्या कडे सफेद वांगी बघते आहे....दुरुन अंडी ठेवलीत असे वाटते... ही सफेद वांगी काय प्रकार आहे?? कधी पाहिला नाही.....आणि याची भाजी नेहेमी प्रमाणे करायची असते का?????/

अनिश्का भाजीवाल्याला विचार ती सातार कर्‍हाड साईडची आहेत का? असतील तर मग प्रश्नच नाही, खूप चवदार असतात. नेहेमीची वान्गी करतात तशीच करायची. सीमाची रेसेपी आहे बघ वान्ग्यान्ची.

नमस्कार, मी मायबोलीची नवीन सदस्य. कोणी कोबीची मुटकुळी ह पदार्थ ऐकलेला किन्वा खाल्लेला आहे का?? आज्जेसाबा करायच्या. आता वयापरत्वे त्यांना आठवत नाही कशी करतात ते (८५ वर्शे वय.) . मला साबा नाहित. आणि नवर्याला खूप आवडतो हा प्रकार. माहेरी कोणालाच माहिती नाही याबद्दल. कोणी मदत करु शकेल का मला?

mala 50 mansansathi Chicken kiti kilo ghyawi lagel koni praman sangel ka ?, mala devnagri madhe typing jamat nahiye

मनुरुचि, त्यात मोठे किती, लहान किती?
कोरडे / रस्सा की बिर्याणी बनवायची आहे, हे लिहिलेत तर अंदाज नीट येईल.
एक तरूण हेल्दी माणूस मॅक्झिमम २०० ग्राम पर्यंत मीट एका जेवणात खाऊ शकतो.

Pages