पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला इन्स्टंट उपम्याची रेसिपी हवी आहे. म्हण जे आधी पूर्ण तयारी करून ठेऊन ऐन वेळी फक्त उकळते पाणी घातले की उपमा तयार होइल अशी. शिवाय अशा अजून कुठल्या पदार्थांच्या रेसिपी असतील (इन्स्टंट) तरी हव्या आहेत.

webdictionary3.blogspot.in

या ब्लॉगवर काही रेसिपी आहेत.त्यातील बनाना केक छान आहे.
तुम्हाला ज्या रेसिपी पाहिजे आहेत त्याचे नाव कम्मेंत मध्ये टाकून तुम्ही ती रेसिपी मिळवू शकता.

मला साबुदाणा वडा ची पाककृती हवी आहे . मायबोली वर नाही मिळाली (कदाचित फारच basic प्रश्न असेल हा म्हणुन नसेल )
त्याचबरोबर साबुदाणा वडा कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स असतील तर त्या पण please दया

साबुदाणा वडा करताना त्यात शिजवलेले वरी तांदूळ (भगर) घातले तर वडे हलके होतात. तेल जरा कमी पितात.
आणि शक्य असेल तर तळयच्या आधी २ तास हातावर मळून चपटे करून ठेवले तर वरचा साबुदाणा मस्त फुलतो (हे रुचिरामधे आहे बहुतेक. मी स्वतः असे आधी थापून/ वळून कधी केली नाहीत)

भिजलेल्या साबुदाण्याच्या साधारण निम्मी शिजलेली भगर. थोडी कमी-जास्ती चालेल.

इन्स्टंट रेसिपी >> वावे, शिरा (उपम्यासारख्या पद्धतीने) करता येतो.

व्हाईट सॉस बनवून ठेवला तर त्यात आयत्या वेळी फक्त शिजवलेल्या भाज्या (फ्लॉवर, गाजर, फरसबी, कॉर्न, मटार इ.) घालून + मीठ मिरपूड घालून भाजी तयार होऊ शकते.

प्रज्ञा९ शन्कराच्या कुठल्याही उपासाला भगर/ वरी चालत नाही.:अरेरे: पण रुचिराचा प्रयोग करुन बघता येईल. बाकी उपासाला तुझी आयडीया वापरुन बघेन.:स्मित:

अग महाशिवरात्र आलीय ना परवा म्हणून लिहीले.:स्मित: बाकी इतर वेळेस सहज बदल म्हणून साबु. वडे नाश्त्याला तुझ्या पद्धतीने करुन बघेन.:स्मित:

मन्जूडी भगरीला वरीचे तान्दुळच म्हणतात. आणी आमच्याकडे खरच उपासाला ( सोमवार वगैरे) आम्ही ती खात नाही, कारण सोमवार दही भाताचा नैवैद्य दाखवुन सोडतात. बाकी कुणाला तसे चालत असेल तर माझी काय हरकत असणार? पण शिवरात्रीला दोन्ही वेळेस काय खाणार? म्हणून सकाळी खिचडी आणी रात्री वडे असतात.

रश्मी.., माझे तुमच्या पोस्टीवर काही म्हणणे नाही. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे हे पूर्णपणे मान्य आहे.

पण अमक्या उपासाला हे चालते तमक्या उपासाला हे चालत नाही हे स्तोम सध्या खूपच वाढले आहे हे इतक्यातच स्पष्टपणे जाणवले. पोटाला/ शरीराला काय चालेल याचा विचार न करता देवाला काय चालेल याचा विचार जरा जास्तच केला जातो.

शंभर टक्के सहमत आहे मंजूडी.. मी कुठलेच उपास करत नाही आणि नशिबाने सासूबाई सुद्धा! मुळात उपास करायचा म्हणजे अमुक १० पदार्थ खायचे नाहीत आणि निवडक ५ पदार्थ खायचे आणि ह्याचा कुठल्याही देवाशी संबंध जोडायचा हे इतक हास्यास्पद आहे!
ज्याची त्याची (अंध)श्रद्धा!

गाजर हलवा प्रेशर कुकरमध्ये केला तरी बाहेर दुधात गाजर घालून आटवत केलेल्या हलाव्यासारखी चव येते का? कृति काय?

भरपूर टॉमेटो उरले आहेत कसे संपवू? टिकाऊ उपाय सांगा. धन्यवाद.

पण अमक्या उपासाला हे चालते तमक्या उपासाला हे चालत नाही हे स्तोम सध्या खूपच वाढले आहे हे इतक्यातच स्पष्टपणे जाणवले. पोटाला/ शरीराला काय चालेल याचा विचार न करता देवाला काय चालेल याचा विचार जरा जास्तच केला जातो>?>> +१/

वास्तविक महाशिवरातअवग्वगैरे उपास काही न खाताच करायचे असतात हेच लोक विसरून गेले आहेत. त्याऐवजी पचायला जड असलेला साबुदाणा, शेंगदाणा, तळलेला पापड, वडे असल्या चोचल्यांची भर जास्त असते. त्यातही उपासाचे गुलाबजाम, उपासाच्या पुरणपोळ्या वगैरे पदार्थ बघून मला हातपाय जोडावेसे वाटतात. बरंयामध्ये काही लॉजिक असेलच असे नाही.

शेंगदाणा चालतो, शेंगदाणा तेल चालत नाही.
जिरे चालतात, मोहरी चालत नाही.
भेंडी चालते, गवार चालत नाही.
हिरव्या मिरच्या चालतात, लाल तिखट नाही.

का? माहित नाही! आमच्यात अशीच पद्धत आहे!

देवासाठी उपास करायचाच असेल, तर पूर्ण श्रद्धेने जेवढं शक्य आहे तेवढे लंघन करून करा. उपास शक्य नसेल तर श्रद्धा ठेवा. पण विनाकारण पचायला जड आणि पित्तकारक पदार्थ खाऊन उपासाच्या नावाखाली पोटाची वाट लावू नका.

धन्यवाद!!!

भरपूर टॉमेटो उरले आहेत कसे संपवू? टिकाऊ उपाय सांगा. धन्यवाद >>> केचप, वड्या. अगदीच काही नाही तर गेला बाजार प्युरी करून त्याच्या फ्रोझन क्युब्स बनवा.

मृण्मयीने लिहिलेली सनड्राइअड टोमॅटोची चटणी आहे इकडेच. ती बनवता येईल. टोमॅटॉ अर्धे चिरून उन्हात ठेवून वाळवता येतील.

गाजर हलवा प्रेशर कुकरमध्ये केला तरी बाहेर दुधात गाजर घालून आटवत केलेल्या हलाव्यासारखी चव येते का? कृति काय? >>

येवू शकते तशीच चव पण मग त्यात खवा/मिल्क पावडर्/कंडेन्स्ड मिल्क असं काहीतरी घालावं लागेल.

धन्यवाद अल्पना. तू काल कुठेतरी मुलासाठी बस-स्नॅक्स आयडियाज विचारल्या होत्यास ना? यापैकी प्रकार मी देते बघ काही आवडत का? चण्या-फुटाण्याचे बसैयेसारखे एकादे दुकान असेल तर तिथले वेगवेगळ्या प्रकारचे चणे - लाल, हिरवे, पिवळे, खारे दाणे, बत्तासे, गोड-तिखट शंकरपाळे, चकल्यांचे तुकडे, बटन बिस्कीट्स - गोड/ खारट, चीझलिंग्स, स्लाईस केक, चॉकोज जर ब्रेफाला खाल्ले नाही तर, जेली क्यूब्स, चिक्की, रेवडी, तिळाचे छोटे लाडू, मीठ लाऊन उकडलेले काळे / काबुली चणे, अधेमधे केळ्याचे, बटाट्याचे चिप्स, जेम्सच्या गोळ्या पण देते Happy शक्यतो चुरमुरे आणि लाह्या देत नाही ते वाटायला आणि खायला सोयिस्कर पडत नाही असा अनुभव आहे.

सनड्राइअड टोमॅटोची चटणी >>> हे इंटरेस्टिंग वाटतय. शोधते आता.

उरलेल्या ब्रेड ची एखादी तिखट रेसिपी आहे का? सँडवीच,ब्रेड फ्राय किंवा ब्रेड रोल नको.. झटपट होणारी आणि खूप तेल न पिणारी हवीये! सुचवा ना..

Pages