पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कावा आम्ही उसळीखेरीज पडवळाच्या, केळफुलाच्या भाजीतसुद्धा घालतो. कावा फक्त थोडे आधी थोडे शिजवून घ्यायचे मग भाजीत टाकायचे.

कांदा खोबरं आलं लसूण गरम मसाला आणि गूळ घालून कावा एकदम यम्मी, हो पण तोच जर रोज रोज खायला लागला तर तो नकोसा वाटतो.

तोतापुरी फार नरम पडलेले नसतील तर त्याची भाजी करता येते. रुचिरात आहे.
कुर्ग मधे त्याला खोबरे व हिरव्या मिरचीचे वाटण लावून कोशिंबीर टाईप करतात. ते शिजवायचे नसते.

रुचिरात आहे.>> ओके बघते
खोबरे व हिरव्या मिरचीचे वाटण लावून कोशिंबीर>> हां, ही कल्पना मस्त आहे.
मला वाटतं इथे एक रेसिपी आहे (अंजलीची आहे का?) एका सॅलडची ज्यात तोतापुरी आंबा वापरता येईल असे लिहिले होते. शोधते.

http://www.maayboli.com/node/43111 करेक्ट. ही रेसिपी सापडली. ही करेन नक्की.
मिरची-खोबरं घालून कोशिंबीरही करेन.

नंदिनी, रेसिपी दे. हिरवे कच्चे आंबेही मिळतात इथे.

जास्त काही नाही. चौकोनी तुकडे चिरायचे आणि फोडणीत घालायचे. हिंग जिरे मोहरी एवढेच घाल. हळद नको. रंग बिघडतो. तिखट्पणा हवाच असेल तर लाल मिरच्या घाल.. तुपाची फोडणी केलीस तरी चालेल.

आंबे खूपच आंबट असतील तर साखर किंवा गूळ घाल, अन्यथा नको. . अगदी गाळ होइपर्यंत शिजवायचे नाहीत. किंचित वाफवल्यासारखे करायचे.

ऑथेंटीक कुर्गी रेसिपी इथे या पानावर आहे. http://www.coorgcreek.com/coorgrecipe.htm

MANGYE PAJJI ,By: Kodimaniyanda Saritha Subbaiah

मी खाल्ला आहे हा प्रकार पण त्यात कांदा नव्हता. तसाही छान लागतो.

(कुठे लिहु सुचलं नाही.) ते रोज रोज रेसीपी टाकणारे कुठे गेले? बिचार्‍यांना पळवून लावले काय इथल्या त्या ह्या चहाटळखोरांनी? (आयडी विसरले..)

त्यांची पियुषची रेसीपी ट्राय करायची होती.

इटालियन रेस्टॉरन्टमध्ये (अमेरिकेतल्या) सुरुवातीला कसलातरी ब्रेड आणि ऑलिव्ह ऑईलचं ड्रेसिंग/डीप टाईप देतात खायला. ते कसं करतात? ऑ ऑ मध्ये लसूण घातलाय, मीठ मिरपूड आहे असं मला वाटतंय. पण कोणाकडे रेसिपी आहे का? मला ते घरी करुन पहायचंय.

वेदिका, ऑऑमध्ये मीरपूड घालूनही करता येतं किंवा बाल्सामिक व्हिनेगर ड्रेसिंगमध्येही तो ब्रेड डीप करता येतो.

वेदिका,

'मॅकरोनी ग्रिल'मधे आधी सर्व्ह करतात तो रोजमेरी ब्रेड असतो आणि सोबत ऑलिव्हऑइलमधे फ्रेश मिरपूड घालतात. 'ऑलिव्ह गार्डन'मधे डिनर रोलच असतो माझ्या आठवणीनुसार. तुम्ही कोणत्या रेस्टॉरन्टमधल्या ब्रेड/डिपबद्दल विचारताय?

इटालियन हॉटेलांत ब्रेड बुडवायला सहसा उत्तम प्रकारचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि मीठ्-मिरपूड्-हर्ब पावडर्/पेस्ट एकत्र केलेलं खाल्लांय.

olive oil for bread dipping गूगल करून खूप सही रेसपीज मिळाल्या.

फळांच्या फ्लेवरचे, मिर्च्या आणि इटालियन मसाल्यांनी इन्फ्यूज केलेले ऑलिव्ह ऑइल आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिनेगर, इटालियन हर्ब्ज त्यांचं एकत्र मिसळण्याचं प्रमाण, सगळं दिलेलं आहे. तुमच्याकरता शोधताना मलापण २-३ भन्नाट प्रकारचे ऑलिव्ह ऑइल डिप प्रकार सापडले.

कराबाजमधे भांगेच्या गोळीसारखी दिसणारी हिरव्या वाटणाची गोळी तेलात मिसळायला देतात. अफाट चवदार लागते. त्याच्यातले घटक काही कळले नाही.

झंपी ही बघ लिंक
http://www.maayboli.com/node/48542

ब्रेड साठी मी ऑ ऑ + रोझमेरी+लसुन ठेचुन ओव्हर नाईट ठेवते. हे मी सॅलड साठीही वापरते.

धन्यवाद सगळ्यांना! मीठ , मिरपूड, लसूण, बल्सामिक व्हिनेगार, रोझमेरी यांतले सगळे किंवा काही पदार्थ वापरायचे असं आता वाटतंय Happy

स्वाती- एका लोकल ठिकाणी हल्लीच खाल्लं २-३ वेळा.

मृण्मयी एखादी tried & tasted रेसिपी केलीत तर जरुर शेअर करा.

अदिति रोझमेरी dried वाली घेता का?

एक शंका : लींबु कापुन टेवल्यावर लगेच वापरावे का? कींवा कीति वेळानंतर वापरले तर चालते?

रेश्मा, बाळांचा खाऊ असा बीबी शोधा. नुसते कॅल्शियम रिच फुड देऊन चालत नाही. चौरस आहार हवा, तरच कॅल्शियम शोषले जाते.

पुण्याच्या दर्शनमधे मिळतात ते मसाला बेक्ड बीन्स कसे करायचे ? कोणता मसाला होता आठवत नाही पण मस्त लागत होते, पावभाजीचा चालू शकेल का ?

ते ऑईल वापरता येइल. थोडासा वास येऊ शकतो अंदाज चुकल्यावर.. व्यवस्थित रेसिपी सापडलीये का तुला?
ऑलिव ऑईल वापरून केलेला केक खाल्ला होता मध्ये, छान हलका होता, शिवाय वास ही आला नाही.

Pages