अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवो, मी आणतो म्हंटलं ना? आता तुम्हाला नकोच असतील मी आणलेल्या पोळ्या तर सांगून टाका एकदाचे काय ते! Angry Proud

इकडे एका ठिकाणी उत्तम पोळ्या मिळतात. हव्या असल्यास मी आणू शकेन. किती हव्या सांगणे.
(घरच्या पोळ्या असल्यासारख्या असतात).

बुवा इतका थयथयाट का करताय!! Lol
ज्याचं करावं बरं..!! Proud

पर्देसाई, मग एग्झॉटिक काय ते सांगा की!
मला पर्सनली तुमची पापलेटाची आमटी आवडेल. Happy

मला पर्सनली तुमची पापलेटाची आमटी आवडेल << मग पर्सनली येऊन खाऊन जा... चारचौघींना सांगू नका.. श्श्श्श्श
वाचल्यावर पां. शां टाका ... Proud

बाकीच्यांना कोलंबी भात (कधी आणलेला नाहीय मी)

हे बघा, अजून एक पोळ्या काढणारे आले. आता कळलं का थयथयाट करत होतो ते? Proud

बाई, आलं लक्षात ते. Happy

देसाई, तुम्हाला सोपं असेल तर आणा. मी सहसा शुक्रवारी जातो एडिसनला त्यामुळे तिकडून आणल्या असत्या पण आणा तुम्ही. मी पैसे देईन, कारण मी बाकी काही आणत नाहीये. Happy

मला एकदम फुलदाणीत आमटी अन त्यात लाईव मासे पोहतायत असं दृश्य डोळ्यापुढे आलं. Lol

म्हणजे हो बुवा? ह वो आणि चॉकोलेट केक पण आणणार होतात ना? Happy Happy म्हणून तर ईबा सहानुभूती दाखवत होत्या. ना??

नाही, एडिसन मध्ये एका एग्जॉटिक धोत्र्याला... आपलं धोतरधारीला कंत्राट देणार होतो. Proud

बायदवे परदेसाई - घरच्यासार्ख्या पोळ्या कुठे मिळतात तो पत्ता द्या आधी. (मी पोळ्या आणायचे ऑफर करत नाहिये नुस्ताच पत्ता हवाय Happy )

आता जे लोक जे काही आणताहेत ते परत दुसर्‍याला आणायला सांगु नका. भयंकर गोंधळ होतोय.
काहीतरी नविन आणायला सांगा नविन लोकांना. घरचच कार्य आहे. भार वगैरे काही नाही. Wink

घरच्यासार्ख्या पोळ्या कुठे मिळतात तो पत्ता द्या आधी << त्या प्लेन्सबरोमधे मिळतात.. मागच्या वेळी ऑफर दिली होती तुम्हाला (पत्ता देण्याची)...

(पण धोतर्‍या, अजगर इत्यादी अपेक्षा ठेवू नये. रात्र-झगा मिळेल).. Proud

चालेल बुवा. पोळ्या मी विकत आणून तुम्हाला (त्याच भावाने) विकत देतो. शनिवारी सकाळी.
६० सांगतो (इतर भरपूर खाणं आहे) की जास्त हव्यात?'

पुरेत साठ.
मग देसाई कोलंबीभातच आणणार म्हणता? (इतके डिस्लाइक्स येऊनही?! :P)

बामा, एक नॉनव्हेज अ‍ॅपेटायझर आणाल का मग?

भाई, फैनल लिष्ट टाका कोण काय आणणार त्याची, म्हणजे गोंधळ नको. Proud

>> कुणालाही नीट न कळू देणे हा या बाफचा मुळ उद्योग आहे भाई
Lol

इतके डिस्लाइक्स येऊनही?! >>डिस्लाइक्स ना लाइक्स मध्ये बदलाय्चा चॅलेंज घेतला असेल त्यांनी मनोमन Happy

अरेच्या देसाई , आता द्या ना मग.पत्ता. मागच्या वेळी पत्ता सांगायची ऑफर दिली तेव्हा त्यावर एक्सपायरी डेट् असल्याचे म्हणाला नव्हतात. Happy

मला दोन पाउंड. (इतका कोकणस्थीपणा नाही हो करणार आठ डॉलर्ससाठी! :P)

Pages