अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मजा आली, मागच्या जानेवारीत जाणार होते ते या वर्षी जमले अखेर .... Happy
नीतीचे गाणे खुपच मस्त. आदित्य, देसाईंचे उ.उ मस्त मजेदार होते. स्वातीचे गाणे मात्र राहिलेच.

आयडी हॅक झाला वाटतं...

मी आले होते प्रिन्स्टन स्टेशनला, पण देसाईंनी मला नेलेच नाही. फक्त विकुंना नेले.

लोला.. तुम्ही विकूंच्या मागे लपलात. विकू एवढे धिप्पाड की तुम्ही मागे उभ्या असलेल्या दिसलातच नाहीत.. काय करणार? होते असे कधी कधी... Proud

हो हो ती मिळाली. आणि आता त्याची रेसिपीही. Happy
मी करणार, पण तसा रंग, चव, टेक्स्चर जमलं तर खरं!

मजा आली लोकहो...
आमची न्यूपोर्टची बस अगदी ठरलेल्या एका वेळेला एका ठिकाणी पोहोचली. काही जण वेळेआधीच येउन दाखल झाले होते. तर इतर उशीरा आले.
आम्ही पोहोचलो तेंव्हा देसाई व भाईंची घरचे कार्य असल्याने लगबग सुरू होती तर वैद्यबुवा हातात मद्याचा चषक घेउन देखरेख करत होते. सिंडरेला वेळेवर आल्याची अफवा होती. थोड्याच वेळात आम्बोळे कुटुंब सामानाच्या आठ दहा पेटार्‍यांसह डेरेदाखल झाले.

माबोवरील वादांना हल्ली हिंस्त्र वळण लागत असल्याने यापुढे वादात न पडण्याचे झक्की यांनी ठरवले आहे. परिणामतः त्यांनी मोफत मद्यवाटप बंद केले आहे. पण बुवांनी ती उणीव भरून काढली, यापुढे बुवा वाढीव आत्मविश्वासाने काही पेटत्या बाफवर दिसल्यास आश्चर्य वाटू नये.

सगळे जमेपर्यंत चांगलीच भूक लागली होती. त्यामुळे बवडे व चिकन कबाब अनुक्रमे सव्वातीन व पावणेतीन मिनिटात फस्त झाले. उंधियो, काजू राईस, कोळंबी राईस, मेथी चिकन व माहिम हलवा मला विशेष आवडला. श्रीखंडही खूपच आवडले, पण तसे मी स्वतःच लिहिणे बरे दिसणार नाही.

सां. कार्यक्रमात निती यांचे गायन, देसाईंच्या उ उ वि ची (मोफत) झलक, आदित्यचे नामन वेद्..आणि यू नो यू नो ने धमाल आणली. सगळ्यात जास्त आवडले ते एबाबा आणि बाईंचे मिले सूर मेरा तुम्हारा.. भाई, बुवा आणि श्री बोके यांचे विद्रोही समूहगायन हा एक थरारक अनुभव होता.

माझ्याकडे सगळे कार्यक्रमात रमले असतांना एकटेच कोपर्‍यात पुस्तक वाचत बसलेले सो. भ. प. विकुमहाराज, श्रीखंडाचे पातेले चाटण्यात मग्न बुवा, बाळांना सांभाळणारे दोन बाबालोक असे तीन फोटो उपलब्ध आहेत इच्छुकांनी संपर्क साधावा.

जीएस Proud
हलवा माहिमी नव्हता. बदामी होता. पुढच्या वेळी नाइकांना माहिमी आणायला सांगू. Proud Light 1

भावोजींनी मृणच्या बा.भा.चा उल्लेख केला नाही तरी मी मोठ्या मनाने सांगते श्रीखंड फार छान झाले होते.

आवडत नाही पण काय करणार खावं लागलं नाइलाजाने. मागच्या गटगमधे खाल्ल नाही तर स्कूटरची मागणी केली हो भावोजींनी माझ्या बाबांकडे. अपमान झाला म्हणे ह्यांचा. आता ह्यावेळी आणखी चार चाकी मागतील की काय ह्या भितीने पाण्यासोबत गिळलं कसं बसं. तुम्ही घरची मंडळी म्हणून सांगते, कुणाला बोलू नका ह्या गोष्टी.

सिंडरेला, अमेरिकन जावई करायचा. त्यांना माहितच नसते, जावयाला काही द्यायचे असते. माझा जावई बघा - उंच आहे, सशक्त आहे, मी वाट्टेल ती कामे सांगतो त्याला नि तो करतो. नि कधी सौ. त्याला काहीबाही द्यायला जाते तर तो फारच संकोचतो. मग मी पण म्हणतो, बरं असू दे.

भावजींना सांगा, अमेरिकेत रहायचे असेल तर अमेरिकनांसारखे रहा! काही उपकार नाही केलेत लग्न केलं म्हणजे!

जरा जुनी ऑल इन द फॅमिली ही सिरियल बघा! आम्ही इथे आलो नि पाहिली नि तेंव्हाच ठरवून टाकले, आपल्याला मुलगी झाली तर जावई अमेरिकन करायचा. म्हणून वेळ आल्यावर त्याने विचारले, तुमच्या मुलीला मागणी घालायचा विचार आहे, तुमची परवानगी आहे का? मी लग्गेच हो म्हंटले!
Light 1 Happy

Pages