अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उचलू हो Princeton Junction वरून. एक फोन टाका.. आणि वेळात या.. Happy

प्रिंस्टनच्या आधीचं स्टेशन गेलं (North Brunswick) की फोन करायचा आणि आल्यावर स्टेशनच्या खालून भुयारीमार्ग वापरून या बाजूला येऊन उभे रहायचे...

बुवा - १
सिंडी - २+१
एम्टी - २+२
सायो - १
जीएस - २+१
नाईक - २+१
नीती - २
आंबोळेज् - २+२
भाई - १
देसाई - १
माणूस+बाईमाणूस - २
अबे - १
विकु - १
---------------------------------------
एकूण - २०+७
==============================================================

मेनू :

अ‍ॅपेटायझर्स :
आंबोळेज् : बव
बामा : चिकन समथिंग

मेन कोर्स :
बुवा : पोळ्या ('मी त्या आपल्या यांच्याकडून घेईन, ते त्या आपल्या त्यांच्याकडून घेतील' ब्रँड)
भाई : मसाला राईस
जीएस - श्रीखंड
एम्टी - मेथी चिकन
सायो - उंधियो
सिंडी - मृणची बाकरभाजी
देसाई - कोलंबीभात ('एग्झॉटिक' ब्रँड)

डेझर्ट्स :
बुवा चॉकलेट केक
नाईक - माहिमी हलवा
नीती - गाजर हलवा

पेयपान :
सॉफ्ट ड्रिंक्स / पाणी / चहाकॉफी - अबे / विकु?

अपेयपान :
बुवा : हवो
झक्की - रंपा ('आज प्या उद्या अनुमोदनं द्या' ब्रँड)

मिसलेनियस :
झक्की : ताटंवाट्याचमचे आणि अर्थातच ग्लासं.

आम्ही कटाप Sad
घरातील २ मेंब्रं आजारपणाच्या सीमारेषेवर घुटमळतायेत कालपासून. Sad
इतक्या ऐनवेळी कॅन्सल करायला लागतयं म्हणून अगदी ओशाळायला होतयं. मनापासून दिलगिरी, मंडळी.

काय ही टांगारुगिरी! Proud
बिल्वा, काळजी घेणे! Happy

झक्की Lol

सायो, १० ला यायचय ना?

भाई, हन्नी वोडका तय्यार हय! $५० तयार रख्खो.

उंधियो आणि गाजरहलव्यासाठी मला पण यायची जाम्च इच्छा होत आहे. शिवाय नगांना भेटणं पण आलच Happy
मजा करा आणि फोटो काढा आणि ते पाठवा पण

>>बुवा, तुम्ही बाकी बरेच प्रकार आणताय. आणखी सॉफ्ट ड्रिंक्स कशाला?!>> कर्रेक्ट
बुवा, १० नको, सव्वा दहा, साडे साडे दहाच्या मध्ये या.

हो हो फोटो काढा आणि पाठवा. आणि हो, वृ पण लिहा बरं. Happy
एक स्पेसल कोपचे वृ पण पाठवालच. Proud (बाई, वाचताय ना?)

गौराक्कांचा फर्ष्ट गटगचा फोटू नक्की काढा अन पाठवा. त्यांना भेटायची फार इच्छा होती. Happy

दुधाची तहान ताकावर हो देसाई.
ते पदार्थ फोटोवर्दी नसतील तर तुमचे सर्वांचे काढा आणी पाठवा. हा का ना का.
माणसं वर्दी की पदार्थ ते तुमच्या सगळ्यांवर सोपवते Happy

मी म्हणणारच होते वर्दी, दर्दी, सर्दी, गर्दी घेउन गझला पाडा म्हणून पण कंट्रोल केलं स्वतःला

Pages