Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साबुदाणा वडे करायला मी
साबुदाणा वडे करायला मी घाबरायचेच ते तेल बघून >> अगदी अगदी . मलाही वडे आवडत असूनही तेलक्ट असल्यामुळे कंटाळा यायचा.
सासरी सगळ्याना गोड आप्पे भयंकर आवडतात .
पण बीडाच्या तव्यावर तुप खूप लागतं. आणि आमच्याकडे स्वतःच आपेपात्र नव्हतं.
मग या दिवाळीला नॉन्स्टिक आपेपात्र साबांना गिफ्ट दिलं , वर साबुदाणे वड्याची टीप पण सांगितली.
त्या पण खुश , आयतं खायला मिळतं म्हणून मीही खुश
वडे अगदी कुर्कुरीत होतात आणि तेल त्यामानाने कमी लागतं. फक्त इटुकले-पिटुकले होतात
@ टुनटुन आणि अस्मिता
@ टुनटुन आणि अस्मिता
धन्यवाद
potato ricer puran
potato ricer puran karnyasathi waparta yeil ka?
हो
हो
पुदिन्याची चटणी हिरवीगार कशी
पुदिन्याची चटणी हिरवीगार कशी ठेवायची? मी ती मिक्सरमधे फिरवताना ती काळी पडते.
चटणी करताना थोडं लिंबू पिळा.
चटणी करताना थोडं लिंबू पिळा. मी ह्या चटणीत पुदिना, कोथिंबिरीच्या जोडीला थोडी पालकाची पानं पण घालते. छान हिरवा रंग येतो.
सोयाबीन पीठ (गव्हाच्या कणकेत
सोयाबीन पीठ (गव्हाच्या कणकेत घालण्यासाठी) कुठल्या कंपनीचं चांगलं कोणी सांगेल का?मी एकदा 'भगीरथ' कंपनी चं आणलं होतं. ते जरा ऑफ -white रंगाचं होतं. आता जे आणलंय ते सकस' चं आहे जर पिवळट रंग आहे. रंगत एव्हढा फरक का? कुठलं चांगलं?
चैत्राली, गहू दळून आणतेस का?
चैत्राली, गहू दळून आणतेस का? ते दळायला देताना त्यातच सोयाबिन थोडं भाजून घालायचं.
अगं मी गव्हाचं पिठ पण
अगं मी गव्हाचं पिठ पण readymade चं आणते, 'सकस' चं किंवा 'अग्रज'चं. दळायला नाही देत. म्हणू सोयाबीन पण readymade!
केळाची (भुकटी) पावडर आहे
केळाची (भुकटी) पावडर आहे भरपूर (५०० ग्राम)... काय काय करता येईल?
मिल्क्शेक व्यतिरिक्त अजुन काही करता येईल का?
पिकलेल्या केळ्याची आहे का ? (
पिकलेल्या केळ्याची आहे का ? ( विचारतोय कारण सहसा कच्च्या केळ्याची असते )
पिकलेल्या केळ्याची असेल तर शिरा, सांज्याच्या पोळ्यासारख्या पोळ्या, शिकरण वगैरे करता येईल.
कच्च्या केळ्याची ( हि शक्यतो टोमॅटो केचपला दाटपणा आणण्यासाठी किंवा स्वतंत्र सॉस साठी वापरतात ) असेल तर थालिपीठ, वडे वगैरे करता येतील.
दिनेशदा , थांकु
दिनेशदा , थांकु थांकु.!!!

थालीपीठ, वडे चांगला पर्याय आहे... पिक्लेल्या केळीची आहे पावडर.
मी केक किन्वा फ़ज बनवता येईल का असा विचार करत होतो.
कॅलरी गेली तेल लावत
मग बनाना केक, पॅनकेक हे पण
मग बनाना केक, पॅनकेक हे पण ऑप्शन्स आहेत.
आईसक्रीम पण करता येईल. ( हा फ्लेव्हर आपल्याकडे नाही फारसा )
एक सुरेख दिसणारी मोठी पपई
एक सुरेख दिसणारी मोठी पपई आणली, पण अगदी बेचव आहे. चाट मसाला लावून थोडी खाल्ली . अजून काय करता येइल ?
बन्डु, केळ्याची भुकटी कुठे
बन्डु, केळ्याची भुकटी कुठे मिळाली ? इंटरेस्टिंग वाटतोय प्रकार.
रावी, सूप करा.
रावी, सूप करा.
रावी, थाई फूडमध्ये सॉम टम
रावी, थाई फूडमध्ये सॉम टम नामक कच्च्या पपईचं सॅलॅड असतं .. ते मला वाटतंय पिकलेल्या बेचव पपईचंही (किसण्या ऐवजी) छोटे तुकडे करून छान लागेल ..
नमुन्यादाखल ही एक रेसिपी ..
http://www.thaitable.com/thai/recipe/green-papaya-salad
बन्डु पॅन केक कर मस्त लागेल
बन्डु पॅन केक कर मस्त लागेल किंवा ती भुकटी वापरून केळ्याच्या पुर्या सुद्धा करता येतील. मस्त लागतात.
केळ्याच्या पुर्या सुद्धा
केळ्याच्या पुर्या सुद्धा करता येतील >> हो केळीच्या पुर्या मी खाल्ल्यात दक्षीकडे छान लागतात
रावी, इतर काही गोड फळांबरोबर
रावी, इतर काही गोड फळांबरोबर ही पपई लोटून देऊन फ्रूट स्मूदी मस्त होईल.
दिनेशजी बनाना आईस्क्रीम जो
दिनेशजी बनाना आईस्क्रीम जो खाईल तो दुसर्या आईस्क्रीमला हात नाही लावणार्.:फिदी:
पण मी माझ्या शेजार्यांकडे खाल्लेले आहे, त्यामुळे रेसेपी नाही टाकु शकत्.:अरेरे:
अतीशय सुंदर लागते हे. मात्र naturals मध्ये मिळते का नाही हे नाही माहीत.
बाकी केळ्याच्या पुर्या, केक, वड्या, हलवा मस्तच पर्याय.
मात्र naturals मध्ये मिळते का
मात्र naturals मध्ये मिळते का नाही हे नाही माहीत. ]>>>>>>>>>> भारतात नॅचुरल्स मधे बनाना फ्लेवर आलाय....
भारतात नॅचुरल्स मधे बनाना
भारतात नॅचुरल्स मधे बनाना फ्लेवर आलाय....>> बरोबर. आम्ही एक 'गोविंदु' नावाचा पदार्थ करतो पिकलेल्या केळ्यांचा. कुस्करलेली पिकलेली केळी, ओला नारळ, नावाला साखर आणि सुकामेवा हे सगळं कढईवर एकजीव होईपर्यंत परतायचं. एकदम मस्त लागतो. याच गोविंदूत दूध घालून तो फ्रीझ केला आणि कपात भरून विकला, की नॅचरल्सचे बनाना आईसक्रीम म्हणून विकता येईल- हे पैसे देऊन ते आईसक्रीम खाल्ल्यावर प्राप्त झालेले ज्ञान!
चेंबूरला सरोज हॉटेलमधे,
चेंबूरला सरोज हॉटेलमधे, पानपोळी असा प्रकार मिळतो. ( आठवड्यातून एकदाच ) केळ्याचे गोड सारण भरुन वाफवलेला पदार्थ असतो तो. छान लागतो.
केळ्याची भुकटी कुठे मिळाली
केळ्याची भुकटी कुठे मिळाली ?>>> अगो- भुसावळ ला मिळ्ते ... आमच्या गावी ... तिथुनच आणली आहे.
बन्डु पुरीला मळतो तशी कणिक
बन्डु
पुरीला मळतो तशी कणिक मळायची त्यात अंदाजाने फ्लेवर साठी भुकटी टाक, मला थेट केळ्यांचा अंदाज आहे भुकटीबद्दल मी सांगू शकणार नाही. कच्चा रवा पाव वाटी किंवा मूठभर मिक्स कर.. म्हणजे पुरीत तेल रहात नाही. कडकडीत मोहन घालून ही कणिक घट्ट मळायची... दोन प्रकार करता येतात यात, जर पुर्या पाकात टाकणार नसशील तर कणिकेत पीठी साखर घालायची आणि नुसत्या तळून खायच्या. किंवा साखर न घालता तळल्यावर साखरेच्या एकतारी पाकात टाकून ठेवून खायच्या.. यम्मी!
पौर्णिमा मी पण असाच हलवा
पौर्णिमा मी पण असाच हलवा करते, फक्त आधी नारळ कधी घातला नव्हता. नंतर एका पाककृतीत त्याविषयी वाचायला मिळाले, मग आता घालते. शिकरणाला मस्त पर्याय्.:फिदी: आणी चटकन तयार होणारा.
अनिश्का आता naturals मध्ये बघीतलेच पाहीजे.
धन्यवाद
धन्यवाद
आपले हे असे खास पदार्थ,
आपले हे असे खास पदार्थ, स्थानिक पातळीवरच का राहतात ? ( उदा. बोरकूट / पिकलेल्या केळ्याची भुकटी )
जळगावला पण अशी भुकटी करतात असे ऐकले होते. तिथले हवामान यासाठी अगदी योग्य आहे. वसई भागात पुर्वी सुकेळी मिळत असत. अजूनही तूरळक मिळतात. सुक्या मेव्यासारखीच लागतात. पण वसईबाहेर कुठे दिसत नाहीत. दादरलाही क्वचितच दिसतात. हि केळी सुकवण्यासाठी बांबूच्या कामट्यांचे सांगाडे वापरतात. त्यातून जो रस घोळतो त्यात परत परत केळी घोळवतात. त्यामूळे ती फारच चवदार लागतात. ट्रेकिंगला जाताना, कमी वजनात भरपूर कॅलरीज देणारा हा प्रकार आवर्जून न्यावा... भरकटलो मी !
दक्षिणा ताई, कालचं हा प्रकार
दक्षिणा ताई,

कालचं हा प्रकार करुन गट्ट्म हि झाला... !
सोबत थोडा शिरा पण होता... आम्रखंड आणि पुरण पोळी सुद्धा... बटाटे वडे आणी फरसाण ...
विचित्र प्रकार झाला हा सर्व..
Pages