युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झंपे एकदा गहू वाजवून पहा.. म्हणजे कळेल, मराठीत असे काही शब्द आहेत ज्यांचे वर्णन कोणत्याच शब्दात करू शकत नाही.

४ किलो गव्हाला एक किलो भाजुन घेतलेले सोयाबीन आणि १०० ग्रॅम मेथी घालतात. सोयाबीनमधे तेलाचे प्रमाण जास्त असल्याने चक्की / घरघंटी जॅम होते. तसेच आपल्याला प्रक्रिया न केलेले सोयाबीन पचवायला त्रास होतो. बाजारात मिळणारे सोया मीन्स / चंक्स अशी खास प्रक्रिया केल्याने पचायला सोपे असतात. त्यांचा वापर वाढवावा किंवा ते भिजवून, कुस्करुन कणीक मळताना मिसळावेत.

दिनेशदा! धन्स!! तुमचीच वाट पहात होते......... आता करतेच!
बाजारात मिळणारे सोया मीन्स / चंक्स अशी खास प्रक्रिया केल्याने पचायला सोपे असतात. त्यांचा वापर वाढवावा किंवा ते भिजवून, कुस्करुन कणीक मळताना मिसळावेत.>>>> हे जास्ती सोपे वाटतेय खरंतर! Happy
धनश्री, हो, भाजूनच घेईन. मी तशी साधा आशिर्वाद आटावाली..... सध्या जरा पौष्टीकतेचा किडा चावलाय..... म्हणून हे प्रयोग!

ते तर झालेच गं नंदिनी! (आता परत हे सुचवून तू माझ्या 'आदर्श सुगृहिणी' होण्याच्या इच्छेला खिंडार पाडतेयस!! Wink )

'पंजाबी शक्कर' नामक गुळासारखी पावडर इथे मिळते. ती कमी प्रोसेस केलेली साखर असते की गुळाचीच पावडर असते?

सोयाबीन ऐवजी चण्याची डाळ वापरु शकतो..असे मालती कारवारकरांच्या पुस्तकात लिहिले आहे.

ओवी, मुंबईमधे (पार्ला, बोरिवली) देशपांडे यांची सर्व पीठे मिळतात. कणीक, ज्वारी, बाजरी, बेसन, भाजणी, नाचणी इ.इ. कणीक खूप प्रकारची मिळते. लोकवन, सिहोर, सोयाबीनयुक्त इ.इ. खूप सुंदर क्वालीटी आहे. मी स्वतः घरी हीच कणीक वापरते. ५ किलो आणी वरची ऑर्डर असेल तर ते घरपोच देतात.
नक्की वापरुन बघा. माहितीसाठी त्यांची वेबसाईट पहा: www.tasteforlifefoods.com

वत्सला, ती ओलसर असेल तर काकवीत भिजवलेली साखर असेल, कोरडी असेल तर कमी ब्लीच केलेली असेल.
अर्थात दोन्ही आरोग्यपूर्ण आहेत. पंजाबात साखर भरुन पराठे करतात.
गुळाची पावडर गुळासारखीच दिसते Happy

देशपांड्यांच्या पिठासाठी +१०००००००००००००००००००००००००

त्यांची सर्व पिठे उत्तम आहेत.

ज्वारीच्या भाकरीचा रंग पिवळसर दिसतोय - चवीला काही वेगळी लागली नाही... पचायला पण त्रास झाला नाही. पीठ ६ महिने जुने आहे, पण मग असं का झालं असावं?

मटर पनीर मसाला मटर पनीर करताना वापरायचा. पाककृती मसाल्याच्या पाकिटावर लिहिलेली असेल.

हा प्रश्न विचारण्याची ही योग्य जागा आहे की नाही ते माहीत नाही. माझ्याकडे लहान मुलांचे बरेच स्वेटर्स, मोजे, टोपडी (लोकरीची) वगैरे पडून आहेत. बाळ झाल्यावर कुणीकुणी हौशीने विणून दिलेले असे. ते माझ्याकडून नक्की वापरले जाणार नाहीत.उगीचच कुणाला तरी देऊन टाकून त्यांच्याकडे अडचण करण्यापेक्शा काही वेगळा उपाय आहे का? ती लोकर उसवून परत विणायला वापरता येते का? तसं असेल तर विणकामाची आवड असलेल्या कुणाला तरी देईन. कारण त्यातली टोपडी वगैरे खरंच कुणी घालेल असं नाही वाटत.

वत्सला पंजाबी शक्कर म्हणजे खांडसरी साखर. गुळाच्या ऐवजी वापरता येते. चवीत फारसा फरक पडत नाही. आम्ही बर्‍य्याचदा गुळाऐवजी शक्कर वापरतो. घी-शक्कर + चावल /रोटी मस्त लागतं. तूप पातळ करून त्यात शक्कर घालून मग गरम गरम भातात किंवा गरम गरम मकईची रोटी कुसकरुन त्यात घालायचं.

दोन अडीच लीटर घरच्य्या गाईचं दुध पाठवलंय साबांनी. गाईचं दुध प्यायला, चहा-कॉफीला आवडत नाही आम्हा तिघांनाही. नेहेमीचं दुध आहेच घरात, त्यामूळे हे एक्स्ट्रॉ आहे. काय करु?
(खरं तर ५ लीटर होतं, कामवालीला दिल्यानंतर आता अडीच लीटर उरलंय)

बेसना ऐवजी काही दुसरे वापरता येते का? >>> मी_मस्तानी, मुगाचे पीठ वापरता येते. वाण्याकडे किंवा देशाबाहेर इंडियन ग्रोसरीत मिळते.
मूग वातूळही नाहीत आणि पित्तासाठीही चांगले.

विरजण लावून दही-लोणी-तूप (लैच वेळखाऊ प्रकरण! ;-))
खरवस (चीक उपलब्ध झाल्यास), खीर, पनीर.

माझ्याकडून दर वेळी गाईच्या दुधाचं पनीर बिघडतं.
गोड-तुप इ कमी केलंय खाणं. केलं तरी चवीपुरतं घेवून नंतर गोड पदार्थ तसेच पडून रहातात.
थोड्या दुधाचं दही लावेन.... बाकीचं पनीर करुन संपवावं याच विचारात होते.पण पनीर नीट जमलं नाही तर? (हल्ली दर वेळी च्युइ पनीर होतंय. )

फ्लेवर घालून गायीच्या दुधाचा दर्प/रंग कितपत बदलतो याबद्दल मी अज्ञ - पण कमी गोडाचा थंडगार असा रोझ मिल्कशेक/ चॉकलेट मिल्कशेक / थंडाई - फालुदा / कुल्फी असेही करून पाहता येईल.

छानार दालना (छाना करून त्यात थोडी कणीक्/मैदा, तिखट, मीठ घालून) कोफ्ते तळ. आणि त्याची ग्रेव्ही कर.
आवडत असेल तर छाना नुसता सुद्धा खाऊ शकतेस. तब्बेतीला चांगला असतो.

Pages