युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवाच, संजीव कपूर ने त्यांच्या ब्लॉगवर ही टीप सांगीतली :
साखरेचे खडे डीप फ्रीज मध्ये ठेवा तास दोन तास. मग थॉ केल्यानंतर आपोआपच मोकळे होतात.

सायो/प्राजक्ता - हो ना, तोफु बेचव लागते काही केले तरी, केवळ पौष्टिक व वापरायला सोपे म्हणुन आणले जाते. लाजो, धन्यवाद.

डिश वॉशरमध्ये नेहमीच्या पावडरऐवजी चुकून हाताने भांडी घासायचं लिक्विड टाकलं गेलंय आणि डिश वॉशरमध्ये प्रचंड फेस येतोय...ते लवकर ड्रेन होण्यासाठी काय करावं?
नेटवर वाचून मीठ आणि व्हिनेगर वापरून पाहिलं थोडाच परिणाम आहे.
नुस्तं ड्रेन सायकल लावून तो फेस जात नाही....

होपफुली हा युनिक प्रॉब्लेम नसावा....हेल्प हेल्प हेल्प.

junya maaybolimadhe dineshdanni changalya pratichya bhajya nivadivishai mahiti sangitaleli hoti ata sapadat nahiye plese mala kuni link deil ka?windows 8 vaparayla suruvat kelyapasun marathimadhe umatatch nahiye.

सध्या तूर डाळ शिजत नाहिये..! भिजवून ठेवली (८ तास), कुकर शिजवताना त्यात तेल घातलं.
तरिही कायम डाळंब्याच राहतात.
काही उपाय असल्यास सांगा.

~बंडु

thanks Prady

बंडू, एकतर डाळ चांगली नाही किंवा कूकर नीट लागत नाही. ८ तास भिजवलेली टाळ, बाहेरही लवकर शिजायला हवी.
कूकरमधे पाणी कमी घातले का ? काही डाळी घोटाव्या लागतात. म्हणजे कूकर उघडल्यावर अखंडच दिसते पण घोटल्यावर लगदा होतो.

नाही दिनेशदा ... सर्व उपाय फसलेत... डाळ ही भरपुर आहे... त्या डाळीचं काय करु?
कूकर मधे ही २-३ वेळा शिजवून बघितले.. तरिही डाळ कडक राहते.

१. शिजवताना खायच्या सोड्याची चिमूट टाकून बघा.
२. डाळ भाजून घेऊन मग शिजवून बघा. (हा उपाय कडधान्यांना लागू पडतो. तूरडाळीच्या बाबतीत कधी मी स्वत: केलेला नाही, पण ट्राय करायला हरकत नाही.)

एक वाटी डाळीला, १ टिस्पून तेल किंवा शक्य असल्यास करवंटीचा तूकडा टाकून बघा. ( नंतर आठवणीने काढून टाका. ) तेलाचा उपाय शास्त्रीय आहे.

समजा तरीही शिजत नसली तर डाळ भिजवून, वाटून करायचे काही प्रकार आहेत. त्याचा परतून झुणका करता येतो. सिमला मिरची, गवारी सारख्या भाज्यात घालता येते. त्याचेच गोळे करुन वडाभात / गोळाभात करता येतो.

वेका! डिशवॉशर २-३ दा पुर्ण रन करावे लागेल.. मग होईल क्लिअर..अस होताना बाहेर येणारा जास्तिचा सोप पुशुन घ्या..

वेका! डिशवॉशर २-३ दा पुर्ण रन करावे लागेल.. मग होईल क्लिअर..अस होताना बाहेर येणारा जास्तिचा सोप पुशुन घ्या..

प्रितीभुषण | 3 March, 2013 - 12:49 नवीन
मटण /चिकन मधे घालायचा कादां आधिच भाजुन ठेवला अन वेळेवर फोडणीत टाकला तर चव बदलते का?
<<
नुसता चिरून वाळवून ठेवा. कोरडा असला की पटकन तळला जातो. तळून ठेवलात तर कुबट वास लागेल काही दिवसात.

इब्लिस, हा चांगला व्यवसाय आहे. सुकवलेला कांदा खुप उपयोगाला येतो, पण मला तो मुंबईच्या दुकानात फारसा दिसत नाही. मुंबईच्या हवेत तो नीट वाळतही नाही. काळा पडतो. मी दुकानात विकत घेतलेला पांढराच होता.

आमची माती आमची माणसं, मधे एक उपाय सांगितला होता. एक दोन तीन थरांचा जाळीदार स्टँड घ्यायचा.
त्यातल्या ट्रेमधे कांदा कापुन ठेवायचा व त्याला चारी बाजूने काळे पॉलिथीन गुंडाळायचे. वरतीदेखील पॉलिथीन गुंडाळून एका बाजूला हवेसाठी फट ठेवायची. याने तपमान वाढते व कांदा लवकर सुकतो. अजून मी केले नाही,
पण युक्ती छान आहे.

काळ्या पॉलिथीनला उन्हात तापत ठेवले तर त्यातुन निघणारी अदृश्य द्रव्ये खाण्यालायक नसावित असे वाटते.

सोनाली आणि प्राजक्ता आभार्स ..
ऑलिव्ह ऑइल सोडून बाकीचे पर्याय वापरले....मेहनतीचं काम.....आता पुन्हा ही चूक करायची नाही Wink

सध्या तूर डाळ शिजत नाहिये..! भिजवून ठेवली (८ तास), कुकर शिजवताना त्यात तेल घातलं.
तरिही कायम डाळंब्याच राहतात.>> माझा पण सेम प्रॉब्लेम व्हायचा काही दिवस. सगळे उपाय करुनही डाळ नीट शिजायची नाही. मग वेगळ्या brand ची डाळ आणल्यापासून आता डाळ नीट शिजतीये.
करी करताना कांदा मिक्सर मधे फिरवून मग तेलावर परतला तर करी जरा कडू लागतीये. काही चुकतेय का? कारण एरवी कांदा आधी परतून घेऊन मग मिक्सर मधून फिरवला तर कड्वट चव येत नाही. नवीन रेसिपीत कांदा आधी मिक्सर मधून काढा असे लिहीले होते म्हणून तसे करायला गेले.

शुम्पी Proud

आज काल काल कांदे खोपच खराब निघतात. इंग्रो मधले बेक्कर निघत होते म्हणून मग अमेरिकन ग्रोसरी मधून आणले तरी तीच गत. बाहेरून चांगले दिसतात पण कापला की बेक्कार.

शूम्पी, कांदा घेताना हाताने दाबून बघत जा. खराब कांदा हाताला मऊ लागतो हमखास. तसंच इंडियन स्टोअरम मधून मोठा पॅक आणला की त्यातला निम्मा खराब निघतो त्यापेक्षा अमेरिकन ग्रोसरीतून चार, पाच मोठे कांदे निवडून आणलेले बरे पडतात.

सावली, साधारण ग्रीन हाऊस इफेक्ट सारखे होते ते. प्रत्यक्ष पॉलिथीनचा कांद्याशी संबंध येत नाही.
त्याला पर्याय म्हणून काळे ( किंवा कुठल्याही गडद रंगाचे ) कापड वापरता येईल, असे वाटते.

कांदा सुकवायचा काहीतरी चांगला उपाय मिळाला पाहिजे. आमच्याकडे मोठे(च) कांदे मिळतात. मला एकावेळी अर्धा पण लागत नाही. उरलेला ना बाहेर ठेवता येत ना फ्रिजमधे. शिवाय उन्हाची खात्री नाही. काही वाळवायचे ठरवले तर ढग आलेच समजायचे.

दिनेशदा का नाही ठेवता येत फ्रीजमधे? आमच्याकडे onion saver मिळते त्यात छान रहातो उरलेला न कापलेला कांदा. तसाच ठेवला प्लास्टिक पिशवीत तरी रहातो.

एका गुजराथी मैत्रिणीने कोरी सांबारो की कोरा सांबार नावाची एक सुकी चटणी दिलीये. साधारण आपल्या लोणच्याच्या मसाल्यासारखी लागतेय. त्या चटणीचं काय करता येइल? नुसती संपत नाहीये, भाजीत घालून घरात कोणाला फारशी आवडली नाहीये.

@^^ ती चटणी घालून, वर लसूण, मीठ, ओवा घालून पुर्‍या किंवा पराठे नाहि का करता येणार?

Pages