Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
परवा मुलीच्या मैत्रिणीचे आई
परवा मुलीच्या मैत्रिणीचे आई बाबा व मुलगी येणार आहेत लन्च ला. इडली सांबर अशी फार्मैश झाली आहे.
त्याबरोबर साईड डिश आणि गोड काय करावे सुचवा प्लीज.
तसं तर कहीही चालेल पण गोड
तसं तर कहीही चालेल पण गोड म्हणून पायसम् करा ..
आणि परवा एका तामिळ मैत्रिणीने तूर + चणा डाळ भिजवून वाटून त्यात ब्लँच्ड् ग्रीन बीन्स् घालून आणि वरून फोडणी देऊन काहीतरी एक प्रकार केला होता तसलं काहितरी करू शकता ..
तो ' काहीतरी एक प्रकार '
तो ' काहीतरी एक प्रकार ' चवीला लागत कसा होता? चांगला असेल तर तिला कृती विचारणे.
@आर्चना, गाजर हलवा/ दुधी हलवा
@आर्चना, गाजर हलवा/ दुधी हलवा / शेवयांची सुका-मेवा, केशर सामग्री घालून राजेशाही खीर / मँगो शिरा उर्फ केसरबाथ
असे गोडाचे ठेवता येईल. साईड डिश - कॉर्न भेळ / कडक पुर्यांवर वाफवलेले कडधान्य (राजमा / मूग / चणे इ.) - कांदा- टोमॅटो - कोथिंबीर - चाट मसाला - मीठ - चटण्या घालून असे ठेवता येईल.
धन्यवाद अरुन्धती व सशल
धन्यवाद अरुन्धती व सशल
सुनिधी, अनियन सेव्हर म्हणजे
सुनिधी, अनियन सेव्हर म्हणजे काय ? डबा असतो का ?
फ्रिजमधे ठेवताना जरा जरी उघडा राहिला तर दही / लोण्याला तो वास लागतो, म्हणून ठेवत नाही मी.
हो डबाच असतो. गूगल केलंत तर
हो डबाच असतो. गूगल केलंत तर ईमेज दिसेल. असेच टोमॅटो, लसूण , लिंबासाठी पण येतात डबे.
आभार.. आता भारत वारीत बघतोच.
आभार.. आता भारत वारीत बघतोच.
दोन प्रश्न १. "bulgar wheat"
दोन प्रश्न
१. "bulgar wheat" च्या रेसिपीत बारीक लापशी रवा वापरला तर चालेल का?
२. Onion Powder व grill seasoning मुंबईत कुठे मिळेल?
परवा मुलीच्या मैत्रिणीचे आई
परवा मुलीच्या मैत्रिणीचे आई बाबा व मुलगी येणार आहेत लन्च ला. इडली सांबर अशी फार्मैश झाली आहे.
त्याबरोबर साईड डिश आणि गोड काय करावे सुचवा प्लीज.>> दलियाची खिर ओल खोबर घालुन
साईड डिश सुन्दल!
http://www.maayboli.com/node/34248
deepac73, १. "bulgar wheat"
deepac73,
१. "bulgar wheat" च्या रेसिपीत बारीक लापशी रवा वापरला तर चालेल का? - त्या ऐवजी जाड दलिया वापरा.
२. Onion Powder व grill seasoning मुंबईत कुठे मिळेल? - गोदरेज नेचर बास्केट किंवा तत्सम दुकानात मिळु शकेल... नक्की माहित नाही. मुम्बईकर सम्गतिलच.
माझ्या सहकार्याने चंदिगडच्या
माझ्या सहकार्याने चंदिगडच्या सिंधी स्वीट्समधून चणे आणलेले. आपले साधेच चणे होते पण त्यांना पुदीना, लिंबू रस, चाट मसाला वगैरे लावलेला. कसले भरी लगत होते... आता मला त्या चण्यांनी पुरतं झपाटलंय
प्लीज कुणीतरी सांगा ना की घरचे चणे कसे असे स्वादिष्ट करता येतील??
सगळा माल मसाला लावून ओव्हनमधे सुकवू की कढईत मंद आंचेवर भाजू?
चणे नुसतेच अवनमधे गरम
चणे नुसतेच अवनमधे गरम करायचे.
लिंबाचा रस + पुदीना पावडर + चाट मसाला असे सगळे एकत्र करुन ( कदाचित त्यात थोडे तेल घालावे लागेल )
चणे गरम असतानाच त्याला चोळायचे. आणि मग परत थोडा वेळ अवनमधे ठेवायचे.
काबुली चणे पाण्यात भिजवायचे
काबुली चणे पाण्यात भिजवायचे .कापडावर पसरुन त्यातले पाणी टिपले गेले कि तेल गरम करुन त्यात मंद आचेवर तळायचे.गरम असतानाच त्यावर पुदीना पावडर,चाट पावडर पसरायची. तळायचे नसतील तर पुसटसे तेल लावुन/स्प्रे ओव्हन/मावेत भाजायचे वरुन मसाला पसरायचा.
दिनेशदा | 6 March, 2013 -
दिनेशदा | 6 March, 2013 - 17:00 .................... त्याला पर्याय म्हणून काळे ( किंवा कुठल्याही गडद रंगाचे ) कापड वापरता येईल, असे वाटते. कांदा सुकवायचा काहीतरी चांगला उपाय मिळाला पाहिजे. >>>
सोलर कूकर वापरला तर..?
हो अविनाश चांगला पर्याय आहे.
हो अविनाश चांगला पर्याय आहे. पांढरा राहिला पाहिजे कांदा !
दिनेशदा, चणे जास्त भाजले
दिनेशदा, चणे जास्त भाजले जाणार नाहीत ना?
सुलेखा, ते चने तळलेले नव्हते. आपले साधेच फुटाणे होते, पण तुमची पध्द्तही छान वाटतेय.
मला कॉटेज चिजपासुन पनिर कसे
मला कॉटेज चिजपासुन पनिर कसे बनवायचे सांगाल का?
नाही मनी, फक्त ओलावा कमी होईल
नाही मनी, फक्त ओलावा कमी होईल एवढेच भाजायचे (कुरकुरीत होतील ) आणि मग त्यात मसाला मुरेल.
पेरू, त्यापेक्षा थेट पनीर करणे सोपे आहे कि !
गुळाची पाउडर, मुंबईमधे कुठे
गुळाची पाउडर, मुंबईमधे कुठे मिळेल?
मुग्धा, शॉपराइट मध्ये
मुग्धा, शॉपराइट मध्ये ऑरगॅनिक गुळाची पावडर मिळते. निर्मल लाइफस्टाइल, मुलुंड वेस्ट.
धन्स अमा.
धन्स अमा.
पण माझ्याकडे एक कॉटेज चिजचा
पण माझ्याकडे एक कॉटेज चिजचा मोठा डबा आहे. म्हणुन त्याचे पनीर करायचे आहे.
दुधीच्या कोफ्तेकरी साठी
दुधीच्या कोफ्तेकरी साठी कोफ्ते बनवताना बेसना ऐवजी काही दुसरे वापरता येते का? माझ्या मुलाला बेसनाची allergy आहे.
मला गहू दळून आणतांना त्यात
मला गहू दळून आणतांना त्यात सोयाबीन घालतात त्याचे प्रमाण सांगा ना.... ५ किलो गव्हाला १/२ कि. सोयाबीन असे वाचलेय कुठेतरी.... नक्की अंदाज नाहीये. आणि गहू कोणता बरा इथे मुंबईत त्यासाठी? पुण्यात लोकवन वापरत होतो... इथे आमच्या नेहमीच्या दुकानवाल्याने MP चा सांगितलाय..
ओवी एमपी सिहोंर पण चांगला
ओवी एमपी सिहोंर पण चांगला आहे.
गहू परखण्यासाठी दोन गोष्टी मला माहित आहेत.
एक तर दाणा गोल गरगरीत असावा (अगदी जोंधळ्याप्रमाणे नव्हे) थोडा उभट पण फुगिर... शिवाय मूठभर हातात घेऊन खुळखुळवला तर त्याचा बदबदीत आवाज आला तर पिठ छान पडते आणि पोळ्या सुरेख होतात. चपटा गहू असेल तर त्याचे पीठ नीट पडत नाही आणि पोळ्याही छान होत नाहीत.
बदबदीत आवाज म्हणजे कसा नक्की?
बदबदीत आवाज म्हणजे कसा नक्की?
गव्हाची लापशी किंवा पिठले
गव्हाची लापशी किंवा पिठले मोठ्या प्रमाणावर शिजायला ठेवा, मग तो पदार्थ उकळताना तसा आवाज येईल्.:फिदी: कृपया हलके घ्यावे.
मी_मस्तानी: बेसना ऐवजी तांदूळ
मी_मस्तानी: बेसना ऐवजी तांदूळ पीठी वापरता येईल.
धन्स दक्षे!! गहू चांगले
धन्स दक्षे!! गहू चांगले खुळखुळवून घेईन! आता ते सोयाबीनचे प्रमाण सांगा! सोयाबीन पचले (!! ) कणकेतले, की थोडी नाचणी पण घालायचा विचार आहे.... कोणी करत नाही कां इथे असे?
Pages