युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा, अंजीर हे अतिशय नाशवंत फळ आहे त्यामुळे दोन दिवसावर टिकत नाही. आणतानाच काही तयार आणि काही कच्ची आणायची.

कोंडा पोळी किंवा भाकरीत (पिठात घालून) वापरता येईल.

ताजी अंजीरे जास्तीत जास्त २ दिवस टिकतात हा स्वानुभव आहे - त्यापेक्षा आणल्यासरशी व दुसर्‍या दिवशी गट्टं स्वाहा करणे इष्ट!

मी उन्हाळा आहे म्हणुन लिंबु साखर पाक करते
पण पिळलेल्या लिंबाच्या साली चे काय करु नुसत्या साठुन आसतात
खालिल प्रयोग करते या शिवाय आजुन ideas सुचवा

१>हाताच्या कोपरांना, चेहरा घासणे

२>कुकर मधे टाकणे
३>लादीच्या पाण्यात टाकणे

लिंबाच्या साली वाळवून त्याची भुकटी करुन फेसवॉश, हेअर रिंझ म्हणून वापरता येईल.
ओमानमधे अख्खे लिंबू वाळवून त्याची भुकटी करुन त्यावर गरम पाणी ओतून, ते पाणी सकाळचा चहा म्हणून पितात.

प्रिती, त्या लिंबाच्या साली काचेच्या बरणीत घाल. त्यावर भरपूर मीठ घाल आणि ती बरणी ऊन येईल अशा ठिकाणी ठेवून दे. अधून्मधून बरणी चांगली हालव. गरजेनुसार मीठ घालत रहा. चार पाच महिन्यांनी त्या साली मिठात चांगल्या मुरल्या की त्यांचा कडवटपणा जातो. आजारी असताना तोंडाला चव नसते तेव्हा ही लिंबाची साल चाखली की बरं वाटतं. दहीभाताबरोबर वगैरे ही साल तोंडीलावणं म्हणून घेता येते.

आजारी असताना तोंडाला चव नसते तेव्हा ही लिंबाची साल चाखली की बरं वाटतं. दहीभाताबरोबर वगैरे ही साल तोंडीलावणं म्हणून घेता येते.>>> वॉव! हे तर आजारी नसतानाही खायला आवडेल Proud

एक डार्क चॉकलेट (विथ आमंड्स) गिफ्ट मिळालय. डार्क चॉकलेट घरी कोणालाच आवडत नाही. काय करू म्हणजे त्याची कडवट चव कमी होइल. की केकमधे घालून संपवू?

आर्या! नाचणिचा कोन्डा आणि थोडे नाचणिचे पिठ अस मिसळुन (मिठ,ओवा,तिळ,जिर्,मिठ घालुन) पापडाला काढतो तशी उकड काढावी गरम असताना तेल घालुन खायला छान लागते
ईडली ,डोश्याच्या पिठात घालुन डोसे करता येइल.
पोळ्या करताना कणकेत मिसळता येइल.
दक्षिणा म्हणते तस त्यात फायबर बरेच असतात.
(चक्किवाल्याने फार घासुन दळले नसल्यास को.न्ड्यात थोडे नाचणिचे पिठ असणारच)

हा शोध चुकुन लागला. घरातल्या दोन पुरुषांनी गडबडीने भाज्या वगैरे आपल्यामते कुठे त्या ठेवल्या. त्यात कांदे फ्रीजमधे, प्लास्टिकच्या पिशवीत.
पण आज खूप कांदे चिरायचे होते तेव्हा फटाफट (साली) सालं निघाली... (आधी अर्धा तास कांदे शोध शोध शोधले ते काही नव्हेच... एकुणात तितकाच वेळ)... आणि हो. पाणीही कमी गळलं डोळ्यांतून.

वा! दाद, या चुकुन लागलेल्या शोधाचे खुप खुप धन्यवाद तुझ्या घरातल्या दोन पुरुषांना.
पण असे म्हणतात की, डोळ्यातुन पाणी येउ नये म्हणुन कांद्याचे २ भाग करुन पाण्यात ठेवावे.

सणासुदीला किंवा एरवीही अजिबात वेळ नाहीये पण लाडू तर करायचेत, अशा वेळी जेमतेम पाच मिनिटांत होणारा लाडू म्हणजे पंढरपुरी डाळ्याचा (फुटाण्याचे डाळे) लाडू. पंढरपुरी डाळे व साखर मिक्सरमधून बारीक करायला जेवढा वेळ लागेल तोच काय तो वेळ. त्यात पातळ केलेले साजूक तूप घालायचे व लाडू वळायचे. चवीला छान लागतात व पटकन होतात.

काल ओल्या हळदी चे लोणचे केले.
हळद सोलून किसली. तेव्हापासून तळहात गरम गरम पडले आहेत.
थोडी आग होते आहे. काय उपाय करावा?

kailas jeevan

kailas jeevan

कॅन मधले उरलेले नारळाचे दूध दुसर्‍या बाटलीत काढुन फ्रिझ केले तर चालेल का? बरेच उरले आहे आणि उद्या परवा काहि बनवायचा प्लॅन नहिये.

कोल्हापुरहुन आईने गुळ आणलाय १ किलोची ढेप. घरात येव्हढा वापर नाहीये.. २ दिवस जरा ऊन दाखवलय पण खराब होऊ नये म्हणुन काय काळजी घेता येईल.?

जो, मी उरलेले ना दू फ्रीजरमधे ठेवते. आणि केसांना लावायलाच वापरते मग.
शक्यतो खायच्या पदार्थात नाही वापरत.
अर्थात माझ्याकडचे नादु हे कॅनमधले नसते.

किसून फ्रिजात ठेवून दे.
>>
दक्षे, किसेकिसेस्तोवर त्याचा पाक बनायला लागेल. गुळ तसाच हवा न लागता ठेवता आला तर उत्तम.

कोल्हापूरातूनच दोन किलोची ढेप आली होती भेटीदाखल, ती मुंबईच्या दमट हवेतही सहा महिने टिकली.

मी ढेप फोडून (कारण डब्याचं तोंड लहान होतं) प्रत्येक तुकड्याला क्लिंग रॅपमधे गुंडाळून डब्यात भरून फ्रिजबाहेरच ठेवले होते.

दिपु, कैर्‍या आणुन पन्हं करुन (घट्ट पल्प) बाटलीत ठेवुन दे. उन्हाळ्यासाठी रिफ्रेशींग व गुळाचा पण वापर होईल. उरलेला (जास्त उरणार नाही) संपवु शकतेस मग.

Pages