युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबू पिळायचं आणि दूध फाडायचं. चाळणीत गाळून घ्यायचं. एक अर्धा तास ठेवलंस की सगळं पाणी निघून जाईल. तो छाना. त्यात अगदी गोळे वळता येतील इतपतच कणीक घालायची. पण अडीच लिटरला दोन लिंबं लागतील बहुदा. नेटवर सापडतंय प्रमाण का बघ.

पनीर आणि छाना वेगवेगळे प्रकार आहेत गं नी. पनीरपेक्षा छाना खूप हलका असतो, शिवाय त्याच्या वड्या नसतात. रवाळ चक्क्यासारखा दिसतो

छानाला आम्ही छेना म्हणतो. साखर घालून खायला खूप आवडायचा मला लहानपणी.बर्‍याच वर्षात केला नाही. आता करेन Happy

छेना म्हणजे पनीरच्या आधीची स्टेप. दूध फाटले की पाणी काढून टाकल्यावर जे राहते ते. कलाकंद सारखे रवाळ टेक्श्चर असते त्याला. वाटीत घेऊन खायचा.

मी कुठे म्हणतेय एकच आहेत. मागल्या पानावर बघ ती पनीर बरोबर झालं नाही तर काय? असं विचारतेय Happy

छेना म्हणजे पनीरच्या आधीची स्टेप. दूध फाटले की पाणी काढून टाकल्यावर जे राहते ते. कलाकंद सारखे रवाळ टेक्श्चर असते त्याला. वाटीत घेऊन खायचा.>>मस्त लागतो.

थोडी कोरडी कणिक घालुन परत एकदा फिरव, घट्ट झाली तरी चालेल. मग तेलाचा हात लावुन तिंबुन घे. कणिक फुप्रो मध्ये मळतांना थोडे थोडे पाणी टाकुन मळावी लागते.

मी फुप्रो मधे पीठ पाणी तेल मीठ मोजुन एकदाच घालते गोळा बनतो नीट. पीठ पाणीचं प्रमाण ३:२ ते २:१ च्या मधे येत साधारण.

घरी नाचणीचं सत्व कसं बनवतात?
मी नाचणी भिजवली ती चोवीस तास झाले तरी तशीच होती - फुगली / मऊ झाली नाही. शेवटी तशीच पाणी काढून मोड आणायला ठेवली. एका दिवसानंतर अगदीच तुरळक दाण्यांना मोड आलेत, आणि जरा वास येतोय Sad

गौरी, मोड वगैरे काढायची गरज नसते. १२ तास भिजवले कि सरळ वाटायला घ्यायची. हा चोथा पाण्यात खळबळत रहायचा. एक दोनदा हे सगळे वाटावे लागते. मग ते सगळे गाळून घ्यायचे. गाळण्यावर राहतो तो चोथा. तो फेकायचा.
खाली राहते ते दूधाळ पाणी तसेच ४/५ तास स्थिर ठेवायचे. जो साका खाली बसतो ते सत्व. मग वरचे पाणी अलगदपणे ओतून टाकायचे. खाली राहील तो साका पसरट ताटात ठेवून खडखडीत वाळवायचा. तेच सत्व.
वास येत असेल तरी खळबळ धुवून, वरीलप्रमाणे सत्व करता येईल.

( एक मायबोलीकरीण असे सत्व घरी करुन विकत असे. हवे असल्यास संपर्क देईन. )

ही टिप नक्की कोणाची आहे ते आठवत नाहीये म्हणून इथेच लिहितेय- काल कोफ्ते केले होते. पण तळण्याऐवजी अप्पेपात्रात शॅलो फ्राय केले. एकदम मस्त झाले- कुरकुरीत, पण तेलकट नाहीत. ज्या व्यक्तीची ही मूळ कल्पना आहे, तिला अनेकानेक धन्यवाद.

बहूतेक मिनोतीची टिप आहे ही. मी पण हल्ली अप्पेपात्रात करते कोफ्ते.
मध्यंतरी भजी पण केली होती एकदा अप्पेपात्रात. Happy

बहूतेक मिनोतीची टिप आहे ही. मी पण हल्ली अप्पेपात्रात करते कोफ्ते.
मध्यंतरी भजी पण केली होती एकदा अप्पेपात्रात. >>>

आम्ही साबुदाण्याचे वडे करतो . भन्नाट होतात .
माझ्या मैत्रिणीने सांगितलेले. एकदा करून बघितले.साबा खुश ! आता हल्ली त्या वडे तळण्याच्या भानगडीत पडतच नाही.

अरे मग तेल तर खूप वाचत असेल की. ते उरलेले तेल म्हणजे कठिण काम असते, फेकवत पण नाही आणी वापरावे तरी प्रॉब्लेम.

स्वस्ति ते साबु वडे नॉनस्टीक अप्पेपात्रात होतात का? तू कशात करते? की बिडाच्या की नॉनस्टीकच्या?

आणी मिनोती उर्फ कराडकरला अनेक धन्यवाद. तिच्या टिप्स पण दिनेशजींसारख्या महत्वपूर्ण आणी सोप्या असतात. तिच्या लिखाणावरुनच कळते की ते सर्व ती किती मनापासुन आणी आवडीने करते ते.

साबु वड्यांची टीप मला पण हवी! कसे करायचे? माझ्याकडे तर बिडाचे आप्पेपात्र आहे. त्यात होतील का?

साबुदाणावडे. कचोरी सगळे आप्पेपात्रात होतात. आकार गोल करायचा.

मिनोतिला अपमानास्पद वागणुक मिळाली इथे. लज्जास्पद प्रकार होता तो.

धन्यवाद दिनेशजी. इथे असे काही झाले असेल तर त्यात काही नवल नाही. माबोवर असे अनेक लोक आहेत, जे स्वतःचे योगदान तर काहीच देत नाहीत, पण दुसरा कोणी काही चांगले करत असेल तर त्याची/ तिची टर, खिल्ली उडवणे हे नित्यनेमाने करीत असतात. माझ्या काही मैत्रिणी तर याच प्रकाराने कंटाळुन माबो सोडुन निघुन गेल्या. आता त्या माबोचे नाव सुद्धा घेत नाहीत.:अरेरे:

बापरे टुनटुन, असेही झाले आहे का?
पण आपण फार मनाला लावून घेऊ नये शेवटी माबो एक सोशल नेटवर्किंग साइट आहे ना! अशा गोष्टी होणारचं!

बरे मला एक सांगा साबु वडे आप्पेपात्रात करताना आतमधून कच्चे राहणार नाहीत हे कसे कळते?

आप्पेपात्राच्या कप्प्यात तेल घातले आणि त्यात वडा सोडला कि तो जवळजवळ अर्धा तेलात बुडतो, त्याबाजूने सोनेरी झाला कि उलटायचा, आणि दुसर्‍या बाजूने सोनेरी होतो. तेवढ्या वेळात, त्या आकाराचा वडा नक्कीच शिजेल. शंका आल्यास एक फोडून बघायचा, म्हणजे वेळेचा अंदाज येईल.
( साबुदाण्याच्या वड्याचे पिठ भिजवताना, त्यात शिजलेला वरीचा भात ( भगर ) मिसळायचा. त्याने वडे कुरकुरीत होतात आणि जास्त तेल पित नाहीत. )

सोबतची चटणी वाटताना काकडी किसलेले पाणी वापरायचे.. ही दूर्गा भागवतांची टिप.

दिनेशदा ही फारच भन्नाट टीप आहे माझ्यासाठी! साबुदाणा वडे करायला मी घाबरायचेच ते तेल बघून. आता नक्की करणार. सर्वांना धन्स! Happy

मस्त टिप. पण दिनेशजी बरेच लोक शंकराच्या उपासाला ( सोमवार, शिवरात्र वगैरे) भगर वर्ज्य समजतात, म्हणजे आमच्याकडेही तसेच आहे. तेव्हा इतर वेळेस करुन बघता येईल.

माधवी खरे आहे तुझे. सोशल नेटवर्किंगमध्ये चालायचेच असे. व्यक्ती तितक्या प्रकृती.

मला अजुन एक टीप हवी आहे,
हॉटेलमधे ते दाल तडका घेतो तेव्हा तडक्यामधला लसूण, कढीपत्ता, मिरची कसली कुरकुरीत असते.
असा कुरकुरीत तडका कसे बरे करावा?

टुनटुन, आमच्याकडे एकादशीच्या संध्याकाळी असे वडे करतात. सकाळची भगर उरलेली असते ती वापरून.

माधवी.
तेल चांगले तापल्यावर हे घटक घातले तर कुरकुरीत होतात. यासाठी मोहरी ही तापमापक म्हणून वापरायची. तेलात मोहरी घातल्याबरोबर तडतडली म्हणजे तेल योग्य तेवढे तापले असे समजायचे. पण नंतर गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर हे पदार्थ जळतात. तडका पॅन / लोखंडी पळी वापरले तर चांगले.

दिनेशदा
मी असा प्रयत्न एकदा केलाय पण काही जमलं नव्हतं. एक्तर जळून जातं किंवा कुरकुरीत होत नाही. जरा सरावाने जमेल बहुतेक.

जमेल जमेल. नक्कीच जमेल. फोडणीची पळी / पॅन मात्र जाड हवे. चपातीला लोखंडी तवा वापरला असेल तर चपात्या करुन झाल्यावर त्यात फोडणी करता येते. फोडणीतले जिन्नस थोडे परतायचे. तव्यात तेलही कमी लागते, पण फोडणी पदार्थावर ओतताना मात्र जरा कसरत करावी लागते. मी उथळ चमच्याने ती पदार्थावर टाकतो. मग डावभर पदार्थ त्या तव्यावर टाकायचा, आणि लगेच काढून घ्यायचा.

माधवी माझे पण हेच होते. पण एक करावे की लोखंडी पळी घेऊन त्यात तेल तापले( दिनेशजींनी वर लिहील्याप्रमाणे) की लगेच खाली घेऊन ( ओट्यावर) मग त्यावेळी ते जिन्नस ( म्हणजे लसुण, मिर्ची वगैरे ) एका ताटलीत घेऊन वेळ न घालवता एका मागे एक असे पटापट टाकावे.

माझ्या साबा असेच करतात. त्यांची फोडणी नाही जळत. मला जरा घाई करण्याची सवय असल्याने माझे आधी असेच व्हायचे, पण आता जरा कमी झालेय.

Pages