युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाचणीच्या पिठाचा उपमा नाही पण पण त्याची ताकातली उकड केली आहे जिरं लसूण कढीलिंब वैगेरे घालून. मला आवडली पण घरात बाकीच्या कोणी रंग बघूनच हात ही लावला नव्हता.

मनीमोहर इथे रेसिपीची लिंक आहे का? लिंक अशी नाहीये पण सांगते मी कशी करते ते.
हिरव्या मिरच्या बारीक कापून,, थोडं आलं ( किसलेलं ), लसूण ठेचलेला, कढीपत्ता हे तेलात जिरं, हिंग आणि अगदी थोडी हळद घालून केलेल्या फोडणीत परतून घ्यायचं. अर्धी वाटी नाचणीच पीठ दीड वाटी आंबट ताकात कालवून घ्यायचं त्यात मीठ घालायचं आणि मग त्या फोडणीत घालायचं. जरा ढवळून गॅस बारीक करून वाफा काढायच्या . पीठ शिजल की रंग बदलतो. मला सैलसर आवडते म्हणून मी पाणी जास्त घालते. अंदाजाने पाणी घातलं वरून तरी चालत. शिजली की वरून कच्चं तेल आणि कोथिंबीर घालायची . आंब्याच्या लोणच्या बरोबर मस्त लागते. गरम गरमच छान लागते . गार नाही चांगली लागत त्यामुळे डब्यात बिग नो.

नाचणी पीठाची कढी छान होते. मी पोस्ट नॅटल मधे प्यायले आहे.
बेसना ऐवजी नाचणी लावायची दह्याला.

मला तर कुठल्या पेशंटच्या स्कीन डिसिजचा फोटो टाकला चुकून वाटलं.... Rofl>> Rofl

कामां , थालीपीठची आयडीया आवडली. माझा अंदाजही दहीच Happy जाड पीठ असेल तर उपमा होईल. ममो म्हणते तशी उकड मी पण करते. पीठ खपवायचंय का ? दोसे खूप छान कुकुरीत होतात नाचणी पीठाचे हल्ली मी तांदूळाचे करतच नाही . १ :१:३ (चमचा मेथी:१वाटी उ डाळ: ३ वाट्या ना पीठ) नोंदवून ठेवते....

नाचणी पिठाचे डोसे ची डिटेल रेसिपी मिळेल का ? प्रमाण दिले आहे तुम्ही . डाळ किती वेळ भिजवायची? त्यात पीठ कधी घालायचे ? अनायसे पीठ आहे घरात . करून बघेन

मी पण मंजूताईंनी दिले आहे ते प्रमाण वापरुन नाचणीचे डोसे/इडल्या/उत्तपे करते.
१/३ कप उडदाची डाळ आणि पाव चमचा मेथ्या ५-६ तास भिजवून वाटून घ्यायचे. १ कप नाचणीचे पीठ जरा पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा थोडे जाड भिजवून त्यात वाटलेली डाळ घालून वायर विस्कने फेटत एकजीव करुन घ्यायचे. फेटताना डोसे/इडली/उत्तपे जे काही करणार त्याच्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचे. हे पीठ उबदार जागी ८-१२ तास ठेवायचे. आमच्याकडे थंडीत इडलीसाठी पीठ १५-१६ तास ठेवावे लागते. या प्रमाणात दोघांचे एक वेळचे जेवण होते. इडल्या छान फ्रीज होतात त्यामुळे मी नेहमी डबल बॅच करते.

Pages