युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इं ग्रो मध्ये परवा फ्रोजन सिताफळ(की त्याचा गर) पाहिला. कोणी ट्राय केला आहे का तो प्रकार? काहीच फीडबॅक माहिती नसताना घ्यायची हिंमत नाही झाली माझी.

मी येथे नविन आहे. मी हा बाफ पुर्ण वाचुन काढला. खुप छान आणि उपयुक्त माहिती आहे. मला काल एका मैत्रिणिने १०-१२ बेबी कॅबेज दिले आहेत खुप छोटे आहेत. त्याचे काय करता येईल?

यावेळी नवर्‍याने बोनलेस,स्किन-लेस चिकन आणलय त्याची करी कोणत्या रेसिपिने चा.न्गली होइल? मला फार बेसिक रेसिपी येते तेही नेहमी मि लेग-पिस वाप्रुन करते.

प्राजक्ता, माझा नवरा बोनलेस स्किनलेस चिकन तुकडे करुन मॅरिनेट करतो. मॅरिनेशनकरता दही+आलं+लसूण्+लाल तिखट+ मीठ+लिंबू वगैरे.. ग्रेव्हीकरता तेलावर हवा असल्यास कांदा वगैरे परतून त्यावर मसाला (संजीव कपूरचं हैद्राबादी चिकन मसाला वगैरे) परतून तेल सुटल्यावर पाणी, नारळाचं दूध घालून मग त्यावर मॅरिनेटेड चिकन पीसेस घालून चांगली उकळी काढतो.

अरे वा! भारी वाटतेय रेसिपि पण नारळाच दुध आणी हैदराबादी मसाला नाहिये त्याएवजी दगडु-तेली मसाला चालेल का?

माझ्याकडे दतेम नाहीये त्यामुळे कल्पना नाही ग. पण चवीला तिखट असेल तर नारळाच्या दुधाने माईल्ड होईल थोडी ग्रेव्ही. अर्थात तुमच्याकडे तिखट चालत असेल तर हरकत नाहीच.

इथे शोनूने लिहीली होती बहुतेक दतेम चिकनची रेसिपी. नक्की आठवत नाही. पण दतेमची एक रेसिपी बघून आमच्या घरी एकदा चिकन करण्यात आलं होतं.

धन्यवाद सि.न्डी! मगाशी सर्च मधे कसे सापडले नाही काय माहिती? सध्या सायोच्या रेसिपीने चिकन केलेय फक्त
है.मसाल्याएवजी दतेम टाकलाय.
रेसिपी जमौन आल्यास विपुत कळवेल.

बोनलेस स्किन लेस चिकन चे हजार तरी प्रकार आहेत. चिकन ६५ वगैरे भारतीय, पेपर चिकन, मंचुरिअन भारतीय चवीचे. नॉर मसाला वापरून आणि थाय रेड करी मस्त लागते. बो.स्कि चिकनवरच माझे किचन चालते त्यामुळे कायम फ्रीझर मध्ये असतातच पाकिटे.

नाशिककर मायबोलीकरानी मनावर घेतल्रे तर मिळू शकेल दतेम ची रेसिपी!आत्ता वर्षाचा मसाला करायचा सिझन आहे,होऊन जाईल दतेम! इतके वर्णन ऐकल्यामुळे खुप उत्सुकता आहे दतेम बद्द्ल!

नाचणीचा कोंडा पडला आहे खुप. काय करावे...कशात वापरावे काही सुचत नाही.
थालिपीठ/ धीरडे करावे का?

अमा! नेक्स्ट टाइम तुम्हाला विपु नक्कि!
हा दतेम इथे इंग्रोमधे मिळतो का? त्याच नावानी का कोणत्या?>> नाही मिळत! नाशिकहुन आणावा लागेल.
मीनाशिकची असुन दतेम वै. वापरत नव्हते. (म्हणजे आई त्याच्याकडुनच सगळा क च्चा माल आणून मसाला करते पण तो गोडा मसाला आणी करतानाच माझ्यासाठी पण जास्तिचा करते.)
दतेम जनरली मसाल्याच्या भाज्या,नॉनव्हेज साठी वापरला जातो.मी पण पहिल्या.न्दाच वापरतेय तो.
बाकी दगडु तेली चा.न्दवडकराचे सगळे प्रॉडक्ट खात्रिशिर आहेत.

बोनलेस स्किन लेस चिकन चे प्रकार लिहू का? पाककृती नव्हे नुसतीच लिस्ट.

चिकन ६५, चिकन फ्रँकी, सुकी चिकन ची भाजी/ केसाडिया साठि फिलींग. काठी रोल साठी फिलिन्ग,
चेट्टीनाड चिकन. थाय रेड करी, चिकन साते( मी सटाय म्हटल्यावर मला घरून तु,क. मिळालेला. )
नुसतेच फ्राइड चिकन. ( सकाळी मॅरिनेड करून ठेवले तर संध्याकाळी घरी आल्यावर लगेच करता येते)
नॉर मिक्स वापरून हैद्राबादी बिर्याणी, चिकन सँडविच. जबरी लागते. बॉइल्ड चिकन चे बारके तुकडे करून मेयॉनेज, क्रीम अन काय काय घालून सकाळी बनवून ठेवले तर संध्याकाळी घआलकये. ) चिकन टिक्का, चिकन सलाड,, ग्रिल्ड चिकन, चिकन सूप मध्ये घालायला. तुकडे कामी येतात. झंपा लाहिरीच्या पुस्तकात दोन इराणी बायका कायम आज चिकनचे काय करायचे अश्या गप्पा मारत अस्तात तसे वाट्ते आहे.

अश्विनीमामीच्या लिस्ट मधे अजुन काही प्रकार्.....चिकनचे लोणचे, मेथी चिकन, पालक चिकन (पालक पनीर प्रमाणे) ,मेथी+पालक चिकन, हराभरा चिकन, चायनीज डिशेश,बटर चिकन, बिर्याणी, पास्ता मधे ...... असे बरेच प्रकार.... एवढे प्रकार पुरतील ना? कि अजुन हवेत? ..:स्मितः...

त्याची करी कोणत्या रेसिपिने चा.न्गली होइल? >> मला करि करायची होती आणी हाताशी वेळ कमी होता त्यामुळे यातले माहित अस्लेले( केलेले नाही) ऑप्शन्स बाद होते.आणी अजुनही काही सुचत नस्ल की मायबोलीच आठवते प्रश्न विचारायला.
असो! अमा आणी विद्या लिस्टसाठी धन्यवाद!
सायोने वर दिलेल्या रेसिपिनेच केले फक्त दतेम वापरला आणी नारळाच दुध नसल्याने घातल नाही.घरात सगल्ञा.न्ना आवडले.

आर्या, नाचणीचा कोंडा तसा नि:सत्व असतो. वापरायचाच असेल तर नेहमीच्या चपातीच्या पिठात अगदी थोड्या प्रमाणात ( दोन वाट्या कणकेला एक टेबलस्पून ) वापरता येईल. थालिपिठात / धिरड्यात पण असाच अगदी थोडा वापरायचा नाहीतर थालिपिठाचे / धिरड्याचे तु़कडे पडतील.

मला सध्या अंजिरं खायला सांगितली आहेत (ताजी, सुकी नव्हे) ४ आणली तरिही ती खुप नाजुक असल्याने टिकत नाहित वरती.. मग फ्रिजात ठेवली तरिही तिच गत. अंजिरं टिकवावीत कशी? Uhoh

<<आर्या, नाचणीचा कोंडा तसा नि:सत्व असतो<< ओह... दिनेशदा! Sad
आईही तो कोंडा फेकायचाच म्हणत होती. पण मला वाटलं उलट कोंड्यात सगळं सत्व असतं.म्हणुन मी फेकु देत नव्हते.

आर्ये नि:सत्व असला तरिही त्यात भरपुर फायबर असेल, पोट साफ होतं त्याने, त्यामुळे अगदीच टाकाऊ असेल असं मला नाही वाटत.
दिनेश जास्ती चांगलं सांगू शकतील.

केळी विशेष ज्यांना आवडतात त्यांना नॅचरल चं आईसक्रीम आवडेल...मला केळी आवडत नाहीत (शिकरण सोडुन) म्हणुन मला ते आवडलं नाही... Sad

Pages