Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनु ३ - कोथिंबीरीच्या वड्या
अनु ३
- कोथिंबीरीच्या वड्या - टूथपिक लावुन ठेवायच्या - सोबत हवं असेल तर बोल मधे एखाद डिप;
- चटणी स्टफ्ड आप्पे - आयत्या पिठाच्या आप्प्यांमधे पायपिंग बॅग ने चटणी भरायची;
- हांडवा/वो - महाराष्ट्रिय पदार्थ नाही पण बेक्ड भाज्या घालुन केलेल्या हांडव्याचे चौकोनी तुकडे टूथ्पिक लाऊन ठेवायचे. इथे दिनेशदांची कृती आहे बहुतेल कांडव्याची पण मी गिट्स च्या रेडिमिक्स मधे फ्रोझन पीज, कॉर्न आणि लाल कॅप्सिकम, गाजराचे तुकडे घालुन हांडवो करते.
>>लस्सी करुन प्या. फळं घालुन
>>लस्सी करुन प्या.
फळं घालुन स्मूदी करुन प्या.
रुमालात टांगुन पाणी काढुन टाका आणि मिष्टी दोई श्रीखंड करा.... ४००ग्रॅम चे २०० ग्रॅमच होइल
फ्रोझन योगर्ट करा.
शेजार्यांना देऊन टाका.
<<
मिक्फूड/फूडप्रोसेसर नाही माझ्याकडे. स्मूदी कशी करायची?
@रंगासेठ, ताक घुसळायची रवी /
@रंगासेठ, ताक घुसळायची रवी / एग बीटर यांनीही फळांचा गर व मिष्टी दोई एकजीव करता येईल. फक्त जरा जास्त वेळ लागेल.
धन्यवाद. प्रयत्न करुन पाहतो.
धन्यवाद. प्रयत्न करुन पाहतो.
कोथिंबीर वड्या छान वाटतायत..
कोथिंबीर वड्या छान वाटतायत..
रंगासेठ, मी सकाळी स्टीलच्या
रंगासेठ, मी सकाळी स्टीलच्या फ्लास्कमधे दही, बर्फ, मीठ, हिंग, पुदीना असे एकत्र करुन घेतो. गाडीच्या वेगात ते आपोआप घुसळून जेवायच्या वेळेपर्यंत त्याची खारी लस्सी बनते.
<<रंगासेठ, मी सकाळी स्टीलच्या
<<रंगासेठ, मी सकाळी स्टीलच्या फ्लास्कमधे दही, बर्फ, मीठ, हिंग, पुदीना असे एकत्र करुन घेतो. गाडीच्या वेगात ते आपोआप घुसळून जेवायच्या वेळेपर्यंत त्याची खारी लस्सी बनते. >>... दिनेशदा, रोलरकोस्टरने जाता का काय ऑफिसला
ब्रेक मारत मारत मारत जातात
ब्रेक मारत मारत मारत जातात बहुतेक.

अमेरिकेत हळीव काय नावानं
अमेरिकेत हळीव काय नावानं मिळेल? कुठे मिळेल? (मिळेल का?)
नानबा, इंडियन ग्रोसरीत
नानबा, इंडियन ग्रोसरीत असारियो म्हणून शोध/विचार.
इंग्रजीत गार्डन क्रेस सीड्स म्हणतात.
दाद. आफ्रिकेतले रस्ते आणि
दाद. आफ्रिकेतले रस्ते आणि आमचे डिरेवर साहेब.. असा योग आला तर लोणी काढणे पण अशक्य नाही, इथल्या प्रवासात !
नानबा, कधी कधी halim किंवा
नानबा, कधी कधी halim किंवा haalim असे ही लिहिलेले पाहिले आहे अळिवाच्या पाकीटावर.
शान चे हलिम मिक्स हा मात्र वेगळाच प्रकार आहे.
प्लेन व्हॅनीला आइस्क्रिम १
प्लेन व्हॅनीला आइस्क्रिम १ ली. शिल्लक आहे. कुल्फी बनवता येइल का? इतर काहि सुचवा......
जयु, कोल्ड कॉफी वुईथ आईसक्रीम
जयु, कोल्ड कॉफी वुईथ आईसक्रीम साठी व्हॅनिला प्लेन आईसक्रीम मस्त चॉईस आहे!
व्हॅनिला वर चॉकलेट सॉस घालून / किसलेले चॉकलेट / इतर फळांचे तुकडे (जसे अननस, चेरी, स्ट्रॉबेरी, आंबा इ.) / ड्राय फ्रूट्स घालून खाता येईल.
>>आफ्रिकेतले रस्ते आणि आमचे
>>आफ्रिकेतले रस्ते आणि आमचे डिरेवर साहेब.. असा योग आला तर लोणी काढणे पण अशक्य नाही, इथल्या प्रवासा<<
मिक्सर/ब्लेंडर तत्सम उपकरणे नसल्याने, मी ते सगळ दही तसच खाल्लं हा.का.ना.का.
थँक्यॉ स्वाती आणि
थँक्यॉ स्वाती आणि मेधा...
वीकेंडला शोधते आता...
धन्यवाद अकु.
धन्यवाद अकु.
chinese व्हेज फ्राईड राईस
chinese व्हेज फ्राईड राईस करताना भात शिजवताना त्यात एक चमचा कच्चं तेल घाला असं लिहिलेलं असतं. त्यानी काही विशेष फरक पडतो का? मी आज हा भात केला सोया सॉस, रेड चिली सॉस घालून, पण ती खास chinese चव नाही वाटली खाताना. मी असं तेल घालायला विसरले म्हणून का? काय चुकलं असेल?
प्लिज कोणीतरी सांगा..]
भाताची शितं मोकळी व्हावीत
भाताची शितं मोकळी व्हावीत म्हणून तेल घालायला सांगितलेलं असतं भात शिजवताना. त्याने चवीत काही फरक पडत नाही. ती टिपीकल चायनीज टेस्ट अजिनोमोटो किंवा एमएसजी घातल्याने येते. (याने चव चांगली येत असली तरी हे आरोग्यासाठी हानीकारक असल्याने टाळलेलंच बरं)
ती खास चव एमएसजी मुळे येते.
ती खास चव एमएसजी मुळे येते. मोनोसोडियम ग्लुटामेट. पण तब्येतीला चांगलं नाही ते . रेस्टॉरन्ट्सपुरतीच मर्यादित ठेवलेली बरी ती खास चव. अगदी हवंच असेल तर मॅगी सिझनिंग घालून बघा. तेही अर्थात एमएसजीपेक्षा वेगळं नसतंच.
भाज्या योग्य तर्हेने स्टरफ्राय केल्या आणि शेझवान सॉस, सोया सॉस योग्य तर्हेने घातला की खरं तर फ्राइड राईस एमएसजी न घालताही छान लागतो. कच्चं तेल मी तरी घालत नाही भात शिजवताना. मोकळा शिजावा, चिकटू नये म्हणून तेल घालायला सांगतात. पण ते न घालताही भात मोकळा शिजवता येतो.
ओह, अजिनोमोटो! धन्यवाद
ओह, अजिनोमोटो! धन्यवाद अल्पना, शर्मिला..
रातांबे आणलेले आहेत. कमी
रातांबे आणलेले आहेत. कमी खटपटीत काय करता येईल?
उघडून खाऊन (म्हणजे गिळून टाक.
उघडून खाऊन (म्हणजे गिळून टाक. चावू नकोस. दात हिरवे होतील आणि चिकटून बसतील) टाक, नी. नाहीतर उघडून त्या बिया एकत्र करून पिळून (पाणी अजिबात न घालता) त्यात मीठ, साखर घालून ताज्या रातांब्यांचं सरबत करून पी.
आजीबरोबर दापोलीला गेले होते तेव्हा (आसूदच्या) केशवराजला देवळासमोरच जरा वरच्या अंगाला एक रातांब्याचं झाडं होतं. त्याचे ताजे रातांबे काढून हे असं सरबत आजीनं केलं होतं. सोबत चपात्या आणि मसुराची उसळ. अजून ती आठवण मनातून जात नाही आणि ती चव तोंडावरून हलली नाहीये. नंतर आईनं य वेळा हे सरबत केलं असेल पण आजीनं केलेलंच माझ्या लक्षात आहे.
स्वच्छ धुवून बीया काढून टाक
स्वच्छ धुवून बीया काढून टाक आणि फळं मिक्सरमधून भरड वाटून त्यात भरपूर मीठ घालून फ्रिजमधे ठेवून दे, ते नंतर सोलकढीचं आगळ म्हणून, कोकमाचं सरबत करून पिण्यासाठी वगैरे वापरता येईल. नाहीतर जागूने इकडे कोकमाचं सरबत लिहिलेलं आहेच, तो बाफ बघून घे.
माझी आई वर्षभराचं सरबत
माझी आई वर्षभराचं सरबत करायची. त्यातल्या बिया काढणे आणि बरणी उन्हात ठेवणे एवढ्याच स्टेप्स लक्षात आहेत. अधलंमधलं नाही लक्षात.
माझ्या घरी १-२ वर्षापासुन
माझ्या घरी १-२ वर्षापासुन अजिनोमोटो आणुन ठेवले आहे पण अपाय होतो म्हणुन तसच पडुन आहे.काय करावे?
नेमका काय अपाय होतो?
कार्यालयांत चहा कॉफी ठेवतात
कार्यालयांत चहा कॉफी ठेवतात तसला स्टीलच्या पिंपासारखा दिसणारा चहाचा थर्मास आणला आहे घरी शंभर माणसांसाठी एका कार्यक्रमासाठी चहा देता यावा म्हणून. पण एक माहीती हवी आहे..त्यात किती वेळ चहा गरम रहातो ते कोणास माहीत आहे का? ३ तासांपासून ७ तासापर्यंत अनेक तास ऐकले त्यामुळे गोंधळ आहे थोडा. आम्ही घरून चहा करून नेला तर किमान ३ तासांनंतर चहापानाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे तो थंड होईल की काय अशी शंका आहे. कोणास नक्की माहीती आहे का?
तसेच शंभर कपांसाठी चहा पावडर,
तसेच शंभर कपांसाठी चहा पावडर, साखर, आले व दूध ह्याचा अनुभवसिद्ध फॉर्म्युला कोणाकडे आहे का ?
नीधप, कोकमच्या टिकाऊ
नीधप, कोकमच्या टिकाऊ सरबतासाठी कोकमं धुवून कोरडी करायची, प्रत्येकाचे दोन दोन भाग करून बिया आणि मधला चिकट भाग काढून टाकायच्या. आता ज्या बाहेरच्या वाट्या उरतात, त्या प्रत्येक वाटीमध्ये शीग लावून साखर भरून त्या काचेच्या बरणीत रचायच्या आणि बरणी उन्हात ठेवायची. साखर पाघळेल तसतसा सुंदर रंगाचा रस सुटायला लागतो. हा रस काढून घेऊन त्यात मीठ जिरेपूड पाणी घातलं की सरबत तयार! (रस संपला, की मग उरलेल्या आमसुलांची चटणी करायची.
)
व्हाइट सॉस च तयार मिश्रण (
व्हाइट सॉस च तयार मिश्रण ( ऐनवेळी पाणी घालून उकळवून तयार करता येइल असे) कस करायच?
बहूतेक दिनेशदांनी ह्याची पाक्रु दिली होती.
Pages