भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑस्ट्रेलिया पागल आहे की बॅटिंग प्रॅक्टिस करून घेते आहे. ३३२ मध्ये दोनदा भारत आउट होताना पण परत बॅटिंग घेतली.

आणि लगेच तिसरीपण Happy
लीड ५०० पर्यंत लिमिटेड ठेवुन आपण करु का तितके रन्स लास्ट इनिंगमध्ये? (एक अति भाबडा आशावाद Happy )

ऑसीज भारताला घाबरले. भारताला फॉलोऑन देऊन २००१ ची कलकत्त्याची पुनरावृत्ती होईल की काय या भीतिने फॉलोऑन न देता आपली दुसरी बॅटिंग सुरू केली.

आता उद्या उपाहाराच्या आत ऑस्ट्रेलिया सर्वबाद १२० (इशांतचे ६ बळी) आणि नंतर भारत दुसर्‍या डावात एकूण ४५० धावांचा पाठलाग करून ५ व्या दिवशी टी नंतर तासाभरात सामना जिंकणार (त्यात सेहवागचे द्विशतक आणि लक्ष्मणचे नाबाद दीडशतक) ! ! ! ! ! Biggrin Lol Rofl

>>> >> एका दिवसात भारताचे १८ खेळाडू बाद होणे अवघड वाटते.
>> मास्तरा, परत एकदा दात घशात घालून घ्यायचे आहेत वाटतं?

बघ लेका, आज भारताचे जेमतेम ८ जण बाद झाले. तुझीच कवळी घशात गेली. मी काल सांगितलं होतं ना की आपण यावेळी नक्कीच ३ दिवसांत हरणार नाही म्हणून. आता तर आपल्याला कदाचित ५ वा दिवस पण बघायला मिळेल. अ‍ॅडलेडचे प्रेक्षक पर्थच्या प्रेक्षकांसारखे कमनशिबी नाहीत. ते भाग्यवान आहेत. त्यांना चौथ्या दिवसाचा (किंवा खूप नशीब फळफळलं तर कदाचित ५ व्या दिवसाचा पण) सुद्धा खेळ बघायला मिळणार). सामना ५ व्या दिवसापर्यंत जाणे ही ऑसीजसाठी नामुष्की तर भारताचा नैतिक विजय असेल !!! Lol

आता उद्या उपाहाराच्या आत ऑस्ट्रेलिया सर्वबाद १२० (इशांतचे ६ बळी) आणि नंतर भारत दुसर्‍या डावात एकूण ४५० धावांचा पाठलाग करून ५ व्या दिवशी टी नंतर तासाभरात सामना जिंकणार (त्यात सेहवागचे द्विशतक आणि लक्ष्मणचे नाबाद दीडशतक) ! ! ! ! !

थोडा फरक. सचीनचे सुद्धा शतक होईल, पण भारत सामना हरेल, ५० ते ६० धावांनी. नि परत एकदा सचिनचे शतक झाले की भारत हरतो असे म्हणणारे पुढे येतील.
जिंकलो तर भारत जिंकला, हरलो तर बीसीसी आयचे माजलेले खेळाडू हरले असे म्हणायला पाहिजे. हरणार्‍या लोकांशी भारताचा संबंध लाऊ नका. भारत महान, लोकच दळभद्रे, त्याला इलाज नाही.

बाकी सचिनचे शतक झाले तर हरलो काय नि काय काय, आपल्याला आनंद व्हायला नि त्यानिमित्त दारू प्यायला काहीच हरकत नाही. शिवाय नैतिक सामर्थ्य फार वाढले तर इंद्र पण सुंदर सुंदर अप्सरा पाठवेल. मग बिचार्‍या कोहली कडे कोण लक्ष देतो?

तेंव्हा येणार्‍या आनंददायक गोष्टींचा विचार करत सुखाने काळ कंठा!

ऑसीज भारताला घाबरले. भारताला फॉलोऑन देऊन २००१ ची कलकत्त्याची पुनरावृत्ती होईल की काय या भीतिने फॉलोऑन न देता आपली दुसरी बॅटिंग सुरू केली. >> नाहि हो, this goes back to trend of modern day captain being defensive. मागे तुम्ही धोनीबद्दल जे बोलत होतात तेच इथेहि लागू होते. ३-० नंतरही क्लार्कला असे वाटत नाहि कि आपल्याला चौथा डाव खेळावा लागणार नाहि ?

लक्ष्मण ला open करायला सांगा. शेवटच्या वेळी ओपन केले तेंव्हा १७७ काढले होते Lol

jokes apart, will he retire on his own or will it get dropped ? Sad end really ! Sad

<< ऑसीज भारताला घाबरले. >> जास्त शक्यता ऑसीजनी असा विचार केला असावा -
पाँटींगने म्हटल्याप्रमाणे विकेट निर्जीव असेल तर ती उत्तरोत्तर 'पाटा' बनेल व भारतीय फलंदाजही त्यावर वेळ व धांवा काढूं शकतील; त्याऐवजीं दुसर्‍या डावासाठीं खूप मोठं लक्ष्य करून ठेवलं तर निदान त्या दबावाखालीं असलेल्या भारतीय फलंदाजाना बाद करणं अधिक सोपं होईल. डावाने तर भारताला आधीं पराभूत केलंच आहे, मग चौथ्या- पांचव्या दिवशीं विकेट फिरकीला अगदींच अनुकूल झाली तर त्यावर खेळून 'कंप्लीट व्हाईट वॉश'ची संधी कां दवडावी !

कारण कांहीही असलं तरी ऑसीज "घाबरले" असं म्हणायला सध्या छाती फुगलेला विराट कोहली सुद्धा धजेल असं वाटत नाही ! Wink

>>> नाहि हो, this goes back to trend of modern day captain being defensive. मागे तुम्ही धोनीबद्दल जे बोलत होतात तेच इथेहि लागू होते. ३-० नंतरही क्लार्कला असे वाटत नाहि कि आपल्याला चौथा डाव खेळावा लागणार नाहि ?

फॉलोऑन न देण्यामागे २००१ च्या कटू स्मृती आहेत. २००१ ला कलकत्त्यामध्ये (हीच ती लक्ष्मण व द्रविडच्या भागीदारीमुळे व हरभजनच्या १३ बळींमुळे गाजलेली टेस्ट) भारताला फॉलोऑन दिल्यामुळे ऑसीजना ४ थ्या डावात फलंदाजी करावी लागली होती व हरभजनच्या फिरकीपुढे ५ व्या दिवशी ऑसीजचा खुर्दा उडाला होता. त्या कसोटीत हात पोळल्यामुळे तेव्हापासून आजतगायत ऑसीजने कधीही फॉलोऑन दिलेला नाही. त्यामागे गोलंदाजांना व क्षेत्ररक्षकांना विश्रांती देणे हा पण अजून एक हेतू असतो.

तेव्हा ४ था डाव खेळावा लागू नये व गोलंदाजांना व क्षेत्ररक्षकांना विश्रांती या २ हेतुंमुळे फॉलोऑन दिला नसावा.

अर्थात सर्वच कर्णधार असे खेळत नाहीत. मागच्या वर्षी विंडीजने श्रीलंकेविरूद्ध श्रीलंका ३०० हून अधिक धावांनी मागे पडल्यावर फॉलोऑन दिला होता, पण ती कसोटी अनिर्णित राहिली होती.

बादवे, ऑसीज भारताला घाबरले हे मी उपहासाने लिहिले होते.

मास्तुरेजी, तुम्ही म्हणता तसं हे << त्या कसोटीत हात पोळल्यामुळे >> असेलही, पण मग तें "बचावात्मक" पावित्र्यामुळे नसून पूर्वानुभवातून शिकलेल्या शहाणपणामुळे , असंही म्हणतां येईल !
<< बादवे, ऑसीज भारताला घाबरले हे मी उपहासाने लिहिले होते. >> मीही गंमत म्हणूनच त्यावर मल्लीनाथी केली होती.

मास्तुरे पण २००१ मधली नि आजची आपली परिस्थिती ह्यात प्रचंड अंतर आहे. २००१ मधे मुंबईच्या टेस्टमधे आपण हरलो तरी सचिन मस्त खेळला होता, लक्ष्मण फॉर्ममधे होता हे दिसत होते नि हरभजन सुरू झाला होता. इथे तीन टेस्ट्मधे कोणीच धड खेळत नाहिये. ह्याच टेस्टमधे गोलंदाजांना धार्जीण्या नसलेल्या पिचवर २०० हून अधिक लीड मिळाला आहे. अशा वेळी खराब होत चाललेल्या पिचवर भारतीयांचा दुसरा डाव अधिक लांबेल असे आपणसुद्धा म्हणणार नाहि Happy

हे साग्रसंगीत करावं का:

"सामना (२०१२)"

कुणाच्या भिंतीला नऊ नऊ भोके, नऊ नऊ भोके..

कशासाठी पाठवावे म्हातारे येथून
आडवे होती मैदानावर लाज सोडून
राहतात मागे सारे तरूण कुजून
तरी कसे निवडतात यांनाच पुन्हा ताजे

विक्रम गेले येथे सारे मोडून, तुटून
अब्रू गेली मैदानावर लोळून पळून
आयपिएल चा घेती पैसा मोजून मोजून
म्हणतो आम्ही वेडे लोक तरी यांना राजे!

(आणि थोडी वोरिजिनालिटी हवी म्हणून एक स्वत:चे कडवे) :
आता तरी जागे व्हारे झोपेतून सारे
गोड स्वप्न संपते अन लुप्त होती तारे
निरोपाचे बिगुल ही गल्लीतून वाजे
शोधायाला नवी भिंत आणि नवे राजे.

वा, वा योग. फारच छान!!
क्लिष्ट तांत्रिक, नि संख्याशास्त्रीय चर्चा चालू असताना, भाऊंचे विनोद नि तुमच्या चपखल कविता वाचायला बरे वाटते.

अरे काय हे? दुपारी मुद्दाम झोप काढली, रात्री क्रिकेट बघायला. वाटले होते, ऑस्ट्रेलियाचे लोक तासाभरात ५० एक धावा करून आटोपतील, सेहवाग पटकन बाद होईल नि कदाचित द्रवीडपण. म्हणजे मग सचिनची फलंदाजी, त्याचे शतक बघायला मिळेल.
कसले काय? ते क्लार्क नि पाँटिंग जणू मधे काही झालेच नाही अश्या रितीने परवासारखेच खेळत बसले होते. मधून मधून कुणीतरी 'वाईट वाईट' म्हणून ओरडत होते. जरा वेळाने लक्षात आले ऑस्ट्रेलियात वेSट चा उच्चार वाईट असा करतात. म्हणजे धाव घ्यायची नसेल तर तसे म्हणतात!!
शेवटी अंपायरने क्लार्कला खोटा बाद देऊन परत पाठवले. कंटाळा येतो माणसाला सारखे तेच तेच लोक खेळताना पाहून!
नि आता दोन तास होत आले, अजून खेळतातच आहेत! आता वाईट वाईट म्हणले तरी कळले आहे.

जाउ दे झाले झोपतो! झाले सचिनचे शतक तर आठवडाभराने कुठेतरी यू ट्यूब, नाहीतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट इथे कुठे तरी बघायला मिळेल.

छान योगजी ! साग्रसंगीत केलंच तर ढोल व शंख हीं दोनच वाद्य वापरावीत [ क्रिकेटसारखंच मला संगीतातलंही कांही कळत नसूनही माझा हा अनाहूत सल्ला; जुनीच खोड आहे ही माझी !]

>>> कशासाठी पाठवावे म्हातारे येथून
आडवे होती मैदानावर लाज सोडून

फक्त म्हातार्‍यांनाच कशाला शिव्या देता? तरण्याताठ्यांनी किती दिवे लावले आहेत? भारतीय संघातले फक्त म्हातारेच नव्हे तर तान्हे, टीनएजर्स आणि तरणेताठे सुद्धा लाज सोडून मैदानावर आडवे झाले आहेत.

चला आज चा पराभव उद्या वर.............हीच काय ते कमवले आजच्या दिवसात.........

विराट उगाच रन घ्यायला का पळाला तेच कळत नाही
शेवटचीच ओवर बाकी होती ......इशांत ची विकेट गेली असती तरी काही फरक पडला नसता.....उगाच स्ट्राईक घेण्याच्या नादात अक्कल हुशारी नडली.........

बर्‍याच दिवसांनी नेहमीचा सेहवाग बघायला मिळाला. ट-२० आणि एकदिवसीय मालिका सुरू होताना त्याला असा फॉर्म मिळणे हा शुभशकुन ठरू दे.

लक्ष्मण आणि बहुतेक द्रविडची कारकीर्द गुंडाप्पा विश्वनाथ प्रमाणेच संपण्याच्या मार्गावर आहे याचा खेद वाटतो. अर्थात विश्वनाथ संघाच्या बाहेर कायमस्वरूपी फेकला गेला तेव्हा तो ३३ वर्षांचा होता, म्हणजे त्याच्याकडे अजून ३-४ वर्षे होती. पण या दोघांचे निवृत्तीचे वय झाले आहे. पण खराब कामगिरीमुळे बाहेर काढण्यापेक्षा १-२ जबरदस्त डाव खेळून त्यांनी निवृत्त व्हावे अशी इच्छा आहे.

असो. आता निदान ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये तरी निराशा पदरी पडू नये, हीच इच्छा!

साग्रसंगीत केलंच तर ढोल व शंख हीं दोनच वाद्य वापरावीत शंख फुंकायचा की हाताने ताँडावर मारून आवाज करायचा? माझ्या मते कुठल्या तरी एका मराठी गाण्याची चाल म्हणे रडणार्‍या बायकांच्या रडण्यावरून घेतली होती, तसेच काहीसे करावे.
पाचव्या दिवसापर्यंत मॅच गेली, अचिव्हमेंट खरे आहे! आणि शनिवार असून खेळणार! काय ही निष्ठा खेळावर!

आता मला वाटते मार्चपर्यंत लाच देऊन का होईना, जरा दोन तीन सामने चांगल्यापैकी जिंका, नाहीतर भारतात विमानतळावर उतरल्याबरोबर सडकी अंडी, कुजका भाजीपाला यांचा पाउस पडेल, घरावर, गाडीवर हल्ले होऊन मोडतोड होईल. शिवाय अण्णा हजारे उपोषणाला बसतील, आणि कुणितरी पुनः शरद पवारांना थोबाडीत मारतील!! (मला वाटते, शरद पवारांनी त्या मानसाला कबूल केलेले पैसे दिले नाहीत म्हणून त्याने शरद पवारांना मारले. त्यात कसला आला आहे आणखी काही अर्थ? आता ते ऑस्ट्रेलिया नि श्री लंकेच्या खेळाडूंना ठरलेले पैसे देतील!)
आता खेळून जमत नाही, राजकारणी लोकांची मदत घ्या!
खरे तर पुढचे सहा महिने तरी भारतात कुणीहि कुठेहि क्रिकेट खेळू नये, फक्त लगान सिनेमा पहावा.

खेळात हार जीत असतेच असे ऐकले आहे >>>

हो फक्त आपली जित आणि त्यांची हार असे समिकरण ठेवा.
>>>>>

उनकी जीत हो अपनी हार हो - असे गाणे बद्लून लिहावे लागेल.

झक्की, फार मनाला लावून घेऊ नयेत,
कळतात, कळतात बरे ही असली बोलणी! मी हे सगळे मनाला लावून घेतो आहे हे कुणालाहि खरे वाटणार नाही. पण थोडक्यात, लिहीणे पुरे कर असे म्हणायचे होते तुम्हाला.
म्हणा. तुम्हाला कल्पना येणार नाही इतका निर्लज्ज आहे मी. कुणि काही म्हंटले म्हणून बदललो असतो, तर एव्हाना वीस वर्षे भारताचा पंतप्रधान झालो असतो, स्विस बँकेत मावणार नाहीत इतके पैसे केले असते नि मग मायबोलीवर लिहायला कशाला आलो असतो?

झक्की, मला फार वाईट वाटले हा प्रतिसाद वाचून आपला. इतका का मी कटू बोललो? अहो तुमचे स्वीस बॅन्केत खाते कशाला, स्विस बॅन्केने तुमच्याकडे खाते काढावे अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना. भारताचे काय, अमेरिकेचे अध्यक्ष व्हावात अशी इच्छा आहे. मला इतकेच म्हणायचे होते की आपले खेळाडू तसे खूप चांगले आहेत, पण बिचारे हारतात दोन अडीच दिवसात, आपला जास्त वेळही घालवत नाहीत. एकेकाचं चांगलं काय ते बघावं! पण मी एक बापडा आणि माझं वय लहान. त्यामुळे थांबतो.

Pages