भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
IPL ला शिव्या का...त्याच IPL
IPL ला शिव्या का...त्याच IPL मधे खेळुन कॅलिस, डीविलीअर्स नी शानदार खेळ दाखवला. हसी सुध्दा खेळला...IPL पाहीजेच..निवेदीतांनी कुठे जायचे..कार्कीर्द का असल्या सिनीअर्स साठी वाया घालवायची..?
यांना माज आलाय फक्त..घरी बसवा..रणजी खेळायला कंप्लसरी करा...सुतासारखे सरळ होतील भ&%$..
@ अतुलनीय ~ थॅन्क्स् फॉर
@ अतुलनीय ~ थॅन्क्स् फॉर करेक्शन. तरी बरे, योगायोगाने कुण्या कांगारूचाच 'विक्रम' मोडला गेला आहे.
त्याच्याऐवजी बुद्धिमान साहा
त्याच्याऐवजी बुद्धिमान साहा यष्टीरक्षण करण्याची शक्यता आहे.>>> मास्तुरे, बुद्धिमान हे त्याचे नाव की तुम्ही दिलेले विशेषण?
भारत-श्रीलंका-आस्ट्रेलिया
भारत-श्रीलंका-आस्ट्रेलिया यांच्यातल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. (नावे वर दिली आहेत).
इरफान पठाणचे आणि प्रवीणकुमारचे पुनरागमन झाले आहे ही आनंदाची गोष्ट आहे. पण विनयकुमारला याही संघात घुसडला आहे. हा माणूस कुठल्या गुणवत्तेवर संघात बसू शकतो? त्याच्याऐवजी रूद्र प्रताप सिंग चालला असता किंवा अभिमन्यू मिथुनला तरी ठेवायला पाहिजे होते. इशांत शर्माला हाकलले हे चांगले झाले. बाकी नावे अपेक्षेप्रमाणेच आहेत.
अभिमन्यू मिथुन, अजिंक्य रहाणे व प्रग्यान ओझा हे एकही कसोटी न खेळता परत जाणार (जर ४ थ्या कसोटीत नाही घेतलं तर). प्रग्यान ओझा एकदिवसीय संघात हवा होता.
असो. कसोटी सामन्यात पुरते वस्त्रहरण झालेले आहे. फक्त लंगोटी शिल्लक आहे. निदान एकदिवसीय सामन्यात तरी ती गळून देऊ नका.
>>>>>> त्याच्याऐवजी बुद्धिमान
>>>>>> त्याच्याऐवजी बुद्धिमान साहा यष्टीरक्षण करण्याची शक्यता आहे.>>> मास्तुरे, बुद्धिमान हे त्याचे नाव की तुम्ही दिलेले विशेषण?
जरा गंमत केली. वृद्धिमानऐवजी बुद्धिमान, नेहराऐवजी नेहरू अशी नावे मी गंमत म्हणून वापरतो.
सचिनही फार निराश करत आहे
सचिनही फार निराश करत आहे सध्या. इतरांना बोलिंगच झेपत नाहीये. पण सचिन जोपर्यंत क्रीज वर असतो तोपर्यंत कमांड मधे वाटतो (पर्थ ची दुसर्या डावतील त्याची विकेट पाहिली नाही) आणि लगेच आउट होतो.
असल्या डावांमुळे तो ना संघाला फार काही मदत करतो ना स्वतःचा शिक्का तेथे उमटवून जातोय. ब्रायन लारा नंतर नंतर फक्त स्वतः बोलिंग डॉमिनेट करायचा, बाकी संघाचे काहीही होवो. निदान तसे खेळून "मी तेंडुलकर आहे" हे तरी दाखव, ते ही नाही.
वन डे टीममधे तो आहे ते बरे झाले.
धोणीच्या चूका व संघनिवडीतील
धोणीच्या चूका व संघनिवडीतील दोष यामुळे हरण्याच्या 'मार्जिन'मधे थोडा फरक पडलाही असेल पण आपली अशी धुळधाण होण्यामागचीं कारणं मात्र खरंच तींच आहेत का ? देशात उपलब्ध असलेले व जागतिक दबदबा असलेले सर्वोत्तम फलंदाज तर संघात होतेच ना ! त्यांची कामगिरी त्यांच्या किर्तीला साजेशी सोडाच पण साधारण फलंदाजांना शोभेशीही झाली नाही, हे या खेदजनक परिस्थितीचं मुख्य कारण आहे असं मला वाटतं. असं होण्याचीं संभाव्य कारणं -
१] आपल्या देशातील खेळपट्ट्या - आज कित्येक दशकं अनेक अव्वल खेळाडूनी त्यात बदल कराव असं सुचवूनही आपण तशाच संथ, चेंडूला उसळी न देणार्या खेळपट्ट्याच बनवतो; आयपीएलमधे नजरेत भरणारी नवी प्रतिभाही त्या खेळपट्ट्यांवरच चमकत असते ; निदान दौरा आंखताना तरी खेळाडूना त्या देशातल्या खेळपट्ट्यांवर सराव करायला वेळ व सराव सामने ठेवावेत, तर तेंही केलं जात नाही;
२] अति क्रिकेट - या मालिकेत आपल्या खेळाडूंत प्रकर्षाने जाणवणारी मरगळ व जिद्दीचा अभाव हा पैशांच्या गुर्मीचा नसून [ मुख्यतः त्याचा नसून] अतिक्रिकेटचा परिणाम असावा ;
३] ज्येष्ठ खेळाडू - कितीही प्रतिभावान खेळाडू असला तरी त्याला जागतिक स्तरावर स्थिरावायला व
जबाबदारी पेलायला त्या स्तरावर खेळायचा अनुभव लागतोच [सचिनही कांही पहिल्याच सामन्यापासून शतकवीर नव्हता झाला !]. " तिघेही महारथी असून ही हालत, तर नवीन खेळाडू घेऊन काय होईल !", हा विचार गोंडस वाटला तरी फसवा आहे. त्यामुळे, इंग्लंड दौर्यापासूनच आपण त्रिमूर्तिपैकी दोघानाच एका वेळीं खेळवणं योग्य झालं असतं. [ आतां त्याना "हांकलण्याची" भाषा वापरायची पाळी आली नसती] ; व
४] सेहवाग हा आश्चर्यजनक, आक्रमक खेळाडू असला तरीही तो सलामीचा फलंदाज नाही, हे बर्याच जणानी सुचवलं होतं; थोड्याफार फरकाने गंभीरबद्दलही तेंच म्हणता येईल. या दोघांपैकी एकाच्यातरी जागीं तंत्रशुद्ध, स्पेश्यालिस्ट आघाडीचा फलंदाज तयार करण्याचा जिद्दीने व चिकाटीने प्रयत्न झाला नाही.
हे झालं माझं बाळबोध विश्लेषण !!
विनय कुमार सध्याचा जावई आहे.
विनय कुमार सध्याचा जावई आहे. आधी तो मुरली विजय होता. त्याला निदान थोडा ग्रेस तरी होता. पण हा विनयकुमार कॉलेज मध्ये बॉलिंग टाकल्यासारखी टाकतो. त्याला कोणीही मारेन.
<< आधी तो मुरली विजय होता >>
<< आधी तो मुरली विजय होता >> मुरली विजयमधे कसोटीसाठी सलामीचा उपयुक्त [ अत्युत्तम नसेलही ]फलंदाज होण्याचं 'पोटेंशियल' होतं; पण मर्यादित षटकांच्या सामन्यातही स्वतःला स्थान मिळावं म्हणून त्याने त्या 'पोटेंशियल'चं लोणचं घातलं, हेंही माझं एक बाळबोध निरीक्षण !
नेहराऐवजी नेहरू अशी नावे मी
नेहराऐवजी नेहरू अशी नावे मी गंमत म्हणून वापरतो.
>>> या नेहरू शब्दाला लय हस्लो हुतो म्या... रच्याकने, हा नेहरू सध्या कुठे आहे. ? तो ही चाल्ला असता असे वाटू लागले आहे....
निदान दौरा आंखताना तरी
निदान दौरा आंखताना तरी खेळाडूना त्या देशातल्या खेळपट्ट्यांवर सराव करायला वेळ व सराव सामने ठेवावेत, तर तेंही केलं जात नाही;
एक तर खर्च येतो, व दुसरे म्हणजे तसा सराव करायला वेळ कुणाला असतो? ज्या झंझावाती वेगाने एकामागून एक, वेस्ट इंडिजचा दौरा, मग इंग्लंड, लगेच भारतात इंग्लंड, लगेच ऑस्ट्रेलिया! यात सरावाला वेळ कुठे असतो?
शिवाय भारताची नामुष्की झाली, खेळाचा दर्जा घसरला ही सगळी माझी व तुमची मते आहेत. बीसीसी आय किंवा खुद्द खेळाडूंना तसे वाटत नाही, असे दिसते. ते कशाला काही करतील? तुम्ही काय करणार?
भारतात आपला संघ जिंकतो, इतर संघ हरतात, ते पहायला पैसे देऊन लोक येतात. परदेशात आपण हरतो नि ते जिंकतात, म्हणून त्यांचे लोक येऊन पैसे देतात, त्यातले पण मिळतात. तेंव्हा एकूण जोपर्यंत पैसे मिळताताहेत तोपर्यंत उगाच कशाला काही करायचे?
जोपर्यंत आहे त्या परिस्थितीत हवे तेव्हढे पैसे मिळताहेत तोपर्यंत उगच जास्तीचे श्रम कशाला करा, असाहि विचार बरेच खेळाडू करत असावेत.
विक्रेते लोकांना जसे वेतन फारसे नाही, पण जेव्हढा माल विकाल, त्यावर कमिशन मिळते तसे शतक काढले तर जास्त, जिंकले तर जास्त, असे केल्यास कदाचित खेळाडू विचार करतील.
अजिंक्य रहाणेने इंग्लंडमध्ये
अजिंक्य रहाणेने इंग्लंडमध्ये एकदिवसीय व ट२० सामन्यात चांगली कामगिरी केली होती. उसळत्या चेंडूंवर तो न घाबरता हूक आणि पुल मारत होता. त्याला तिरंगी स्पर्धेसाठी घ्यायला पाहिजे होते. त्याआधी ऑसीजच्या गोलंदाजीचा सराव होण्याच्या दृष्टीने त्याला ४ था कसोटी सामना खेळवायला पाहिजे होता. त्यात तो जास्तीत जास्त किती वाईट खेळेल? गंभीर किंवा सेहवागपेक्षा जास्त वाईट तो खेळला असता का? तसेच तिरंगी स्पर्धेसाठी अश्विनऐवजी ओझा हवा होता.
४ थ्या कसोटी साठी खालील संघ असावा. द्रविड किंवा सचिनला कर्णधार करावे.
रहाणे, द्रविड, सचिन, कोहली, रोहीत शर्मा, वृद्धिमान साहा, अश्विन, ओझा, उमेश यादव, झहीर खान, अभिमन्यू मिथुन
३ र्या कसोटी सामन्यात काही चांगल्या गोष्टी पण घडल्या.
- कोहलीने चांगली फलंदाजी करून दाखविली आहे
- उमेश यादव खूपच चांगली गोलंदाजी करून विकेट्स घेत आहे
याव्यतिरिक्त सांगण्यासारखे काहीही नाही.
४ थ्या कसोटी साठी खालील संघ
४ थ्या कसोटी साठी खालील संघ असावा. द्रविड किंवा सचिनला कर्णधार करावे.>> अहो पण त्यांना विचारणार का एकदा कि त्यांना व्हायचेय का ? बळेच घोड्यावर बसवताय त्यांना
knee jerk reactions apart, येत्या काहि वर्षांमधे नवीन फळी तयार होइतो लोकहो अशा प्रकारचे निकाल बघायची तयारी करायला हवी. नवीन खेळाडूंना पुरेशी संधी देणे जरुरी ठरणार अहे, तिथे एका दुसर्या मॅचवर ठरवता कामा नये. तसेच फक्त देशाबाहेरची कामगिरी न बघता complete picture बघणे जरुरी आहे. (जसे कि वर भाऊ म्हणातात कि देशातल्या उसळी नसलेल्या खेळपट्ट्या हे एक कारण. पण ह्याच खेळपट्ट्ञंवर जेंव्हा आपले खेळाडू धावांचा डोंगर रचतात तेंव्हा बाकिछ्या देशातले रचु शकत नसतील तर that's home field advantage. जर देशातल्या कानाकोपर्यापर्यतशाउसळत्या खेळपट्ट्या बनवता येत नसतील तर मह्त्वाच्या शहरांमधे फक्त तशा बनवणे शुद्ध आत्म घातकीपणा ठरेल.)
Let phase out begin ...........
२] अति क्रिकेट - या मालिकेत
२] अति क्रिकेट - या मालिकेत आपल्या खेळाडूंत प्रकर्षाने जाणवणारी मरगळ व जिद्दीचा अभाव हा पैशांच्या गुर्मीचा नसून [ मुख्यतः त्याचा नसून] अतिक्रिकेटचा परिणाम असावा ;>> अनुमोदन !
राजीव शुक्ला नि स्रिनिवास ह्याच्यवाप्रतिक्रिया वाचल्यावर अंदाज येतो कि how loggerheads BCCI can be with its "head-up- in- sand" attitude.
http://www.espncricinfo.com/australia-v-india-2011/content/current/story...
अशा परिस्थितीमधे आपण जे आधी जिंकलो ते तरी कसे काय असे आश्चर्य वाटते
<< अशा परिस्थितीमधे आपण जे
<< अशा परिस्थितीमधे आपण जे आधी जिंकलो ते तरी कसे काय असे आश्चर्य वाटते >> बहुतेक, अति क्रिकेट, दौर्याच्या आंखणीत सराव सामन्यांचा अभाव ही कारणं तेंव्हा नसावीत व आतांचे ज्येष्ठ त्यावेळी वयानुरूप ऐन फॉर्मात असावेत !!
<< that's home field advantage. >> One can't have best of both the worlds ! मग झक्कीसाहेब म्हणतात तसं आपण आपल्या देशात जिंकावं, इतरानी त्यांच्या त्यांच्या देशात !!
[ इंग्लंडमधल्या पावसाळी हवामानात खेळायचा नवोदिताना अनुभव चाखता यावा म्हणून मुंबईत 'कांगा लीग' सामने फार पूर्वीपासून सुरूं करण्यात आले; तिथला पाऊस व इथला पावसाळा यात प्रचंड फरक असूनही तो प्रयोग अजूनही यशस्वीपणे राबवला जातोय. 'कांगा लीग'मधे खेळणार्या शेकडो खेळाडूंपैकी कितीजण इंग्लंडसाठी ही तयारी करताहेत ? पण वेगवेगळ्या हवामानात, खेळपट्ट्यांवर खेळणं हा खेळात प्रगति करण्याचा, त्यातला आनंद वाढवण्याचाच भाग आहे, हे क्रिकेटर्सच्या मनावर बिंबवणं महत्वाचं. जिंकणं तेंव्हाच अर्थपूर्ण व सोपंही होतं. हा आपला माझा जुनाट विचार] .
<< जर देशातल्या कानाकोपर्यापर्यतशाउसळत्या खेळपट्ट्या बनवता येत नसतील तर मह्त्वाच्या शहरांमधे फक्त तशा बनवणे शुद्ध आत्म घातकीपणा ठरेल.) >> हॉकीसाठी अॅस्ट्रोटर्फ किंवा इतर कृत्रिम हिरवळ देशात किती ठीकाणी आहे ? पण तशी कुठेच नको म्हटलं असतं तर जागतिक स्पर्धेत आतां निदान आपण आहोत तेही अजिबात राहिलं नसतं; जिथं उसळी नसणार्या खेळपट्ट्या नाहीत तिथल्या प्रतिभावान खेळाडूना वेगवेगळ्या स्पर्धांमुळे किंवा मुद्दाम शिबीरं आयोजन करून देशातच उसळी घेणार्या खेळपट्ट्यांवर सराव मिळेल याची सोय करतां येईलच ना !
महेंद्रसिंग धोनीला हळुहळू
महेंद्रसिंग धोनीला हळुहळू गोलंदाजी बद्दल एका मॅच मधे न खेळण्याची शिक्षा केली आहे यावर विश्वास बसत नाही. वेडेच्चेत, तीन दिवसात मॅच संपवली त्याने
हरण्याचं एकच कारण आहे.. आपले
हरण्याचं एकच कारण आहे.. आपले वाघ म्हातारे झालेत.. त्यांचे दात पडले आहेत... एखादा अजूनही एखादी खेळी करू शकतो.. पण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द.आ. यांच्याविरुद्ध थोडी फाईट जरी द्यायची असेल तर निदान २-३ वाघांनी डरकाळी तरी फोडायला पाहीजे. तसं होत नाहीये. बाकी बॉलिंगचा पहिल्यापासूनच आनंद आहे.
पण वनडे मधे गोष्ट वेगळी आहे.. कारण ५०च ओव्हरी असतात आणि हा आपल्या बॉलर्सना मोठा फायदा आहे. वनडे मधे आपण चांगली फाईट देऊ.
काही वेळा असं वाटतं की आपण
काही वेळा असं वाटतं की आपण दुसर्या देशात हरतो पण स्वतःच्या गल्लीत जिंकतो यात फारसं काही शरमण्यासारखं नाही. बहुतेक सर्व देशांची हीच परिस्थिती आहे. अपवाद फक्त इंग्लंडच्या २०१०-११ च्या ऑस्ट्रेलिया दौर्याचा. त्यात त्यांनी यजमान ऑस्ट्रेलियाला कसोटीत ३-१ असे हरविले होते, पण एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने ६-१ अशी जिंकली. आपण ऑस्ट्रेलियाला २०१० मधल्या भारतात खेळलेल्या दोन्ही कसोटीत हरवलं पण त्यांच्या भूमीवर हरलो. इंग्लंडविरूद्ध २०११ मध्ये त्यांच्या भूमीवर कसोटी मालिका व एकदिवसीय मालिका हरलो. पण लगेचच भारताच्या दौर्यावर आलेल्या इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत ५-० असं हरवलं.
दुसर्या देशात जाऊन त्यांच्या भूमीवर त्यांना हरविणे महत्त्वाचे आहेच; पण भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका व द. आफ्रिका हे कसोटीतले टॉपचे देश काही दुर्मिळ अपवाद वगळता बहुतेक वेळा फक्त स्वतःच्याच देशात जिंकतात व दुसर्यांच्या देशात जाऊन हरतात.
या ५ देशांच्या घरी खेळलेल्या व बाहेर खेळलेल्या मालिकांची व विजयांची/पराभवांची आकडेवारी कोणाकडे असल्यास इथे टाकावी.
>>> हरण्याचं एकच कारण आहे..
>>> हरण्याचं एकच कारण आहे.. आपले वाघ म्हातारे झालेत.. त्यांचे दात पडले आहेत... एखादा अजूनही एखादी खेळी करू शकतो..
हे वाक्य फक्त सचिन, द्रविड व लक्ष्मण साठी आहे असे मी गृहीत धरतो.
पण मग सेहवाग, गंभीर व धोनी यांची तर पूर्ण बत्तिशी निखळून बाहेर पडलेली दिसत आहेत. मग त्यांनाही म्हातारे किंवा म्हातारे वाघ म्हणता येईल का?
वरच्या ७ खेळाडूंच्या धावा बघितल्या तर २ सर्वाधिक वयस्कर खेळाडूंनी सर्वाधिक धावा केल्या आहेत, तर ४ युवा खेळाडूंनी सर्वात कमी धावा केल्या आहेत. त्यामुळे धावा करण्याचा आणि वयाचा संबंध दिसत नाही.
फिल्डिंग बघितली तर २२ वर्षाच्या कोहलीने वॉर्नरचा अगदी सोपा झेल टाकला तर त्याच्यापेक्षा १५ वर्षाने वयस्कर असलेल्या लक्ष्मणने कोहलीकडे आलेल्या झेलच्या तुलनेत अवघड झेल घेतला. तसेच क्षेत्ररक्षणात तरूण झहीरच्या तुलनेत वयस्कर सचिन जास्त चपळ आहे.
रनिंग बिटवीन द विकेट्स बघितलं तर अश्विन, झहीर इ. तरूणांच्या तुलनेत सचिन व द्रविड जास्त चांगले पळताना दिसतात.
संघातले बहुतेक सर्व खेळाडू वाईट खेळल्यामुळे आपण हरलो हेच मुख्य कारण आहे. त्यात वयाचा, वाघ असण्याचा किंवा इतर कोणीतरी असण्याचा किंवा दात पडण्याचा काही संबंध दिसत नाही.
माझ्यामते अतिशय आश्चर्याची
माझ्यामते अतिशय आश्चर्याची बाब म्हणजे विश्वचषक आपण जिंकणे यात भ्रष्टाचार असणार असे कोणालाच वाटत नाही
मास्तुरे, आदरपूर्वक मत मांडत
मास्तुरे, आदरपूर्वक मत मांडत आहे, पण खरं सांगू का? कसलं विश्लेषण करताय राव? कंप्लीट भंकस आहे सगळी!
कैच्याकै कारणमीमांसा! मुळात वुई आर नॉट विनर्स!
>> पण मग सेहवाग, गंभीर व धोनी
>> पण मग सेहवाग, गंभीर व धोनी यांची तर पूर्ण बत्तिशी निखळून बाहेर पडलेली दिसत आहेत.
मी यापैकी कुणालाही बॅट्समन मानत नाही. गंभीरचा अपवाद वगळता बाकीचे दोघे पट्टेवाले आहेत. आणि गंभीर फार काही तंत्रशुद्ध नाहीये.
>>>>>>> >> पण मग सेहवाग,
>>>>>>> >> पण मग सेहवाग, गंभीर व धोनी यांची तर पूर्ण बत्तिशी निखळून बाहेर पडलेली दिसत आहेत.
>>> मी यापैकी कुणालाही बॅट्समन मानत नाही. गंभीरचा अपवाद वगळता बाकीचे दोघे पट्टेवाले आहेत. आणि गंभीर फार काही तंत्रशुद्ध नाहीये.
मग ठीक आहे. म्हणजे हे तिघे संघात असले किंवा नसले तरी निकालात काहीच फरक पडणार नाही. पण उरलेले तीन वाघ फेल गेले की आपण हरतो आणि ते खेळले की आपण हरत नाही.
>> आणि ते खेळले की आपण हरत
>> आणि ते खेळले की आपण हरत नाही
हरत नाही असं मी म्हणणार नाही पण निदान फाईट तरी देतो कारण धावा ३०० च्या वर होतात.
हे जरा जास्तच होतंय आता.
हे जरा जास्तच होतंय आता. एखादी सिरीज हरली तर एवढा गहजब? खेल खेल में ये सब होता है|
या लोकांना पूर्ण वेळ दिला पाहिजे.
विश्वचषक आपण जिंकणे यात
विश्वचषक आपण जिंकणे यात भ्रष्टाचार असणार असे कोणालाच वाटत नाही
असे कसे म्हणता? तुम्ही जरा शोधा, पाकीस्तानच्या एका ज्येष्ठ खेळाडूने ताबडतोब सांगितले होते की शेवटचा सामना 'फिक्स' होता. श्रीलंकेने क्षेत्ररक्षण लावण्यात ज्या चुका केल्या, त्या शाळेतली मुले पण करत नाहीत!! आणखीहि बरेच काही काही.
काही असो, फिक्सिंग वगैरे क्रिकेटमधे येत नाही, त्यासाठी इतर कुठल्याहि धाग्यावर जा. भारतातली अंधश्रद्धा, भ्रष्टाचार या शिवाय दुसरे काही दिसणारच नाही. कुणाला भारतात चांगले काही दिसतच नाही का?
(No subject)
आगामी वर्षात कसोटी हा
आगामी वर्षात कसोटी हा दर्जेदार खेळ समजून खेळणारे खेळाडू सापडणे कठिण आहे... भारताच्या सुदैवाने ९६च्या इं. दौर्यात सौरभ आणि राहुल सापडले होते...
मालिका हरल्याचे दु:ख कमी.... पण कसोटीला साजेसा दर्जेदार खेळ न केल्याचे जास्त आहे. नवोदित खेळाडूंचा खेळ पाहता त्यांच्या कडून कसोटी दर्जाची आशा बाळगणे व्यर्थच आहे.
देश, पैसा, लोकप्रियता, स्वाभिमान हे एकदिवसिय सामन्यां पुरता ठिक आहे... पण कसोटी क्रिकेट मधिल दर्जेदार खेळाचा निखळ आनंद तरी हिरावून घेऊ नका एव्हढी एकच मागणी त्या BCCI चरणी....
हॉकीसाठी अॅस्ट्रोटर्फ किंवा
हॉकीसाठी अॅस्ट्रोटर्फ किंवा इतर कृत्रिम हिरवळ देशात किती ठीकाणी आहे ? पण तशी कुठेच नको म्हटलं असतं तर जागतिक स्पर्धेत आतां निदान आपण आहोत तेही अजिबात राहिलं नसतं; जिथं उसळी नसणार्या खेळपट्ट्या नाहीत तिथल्या प्रतिभावान खेळाडूना वेगवेगळ्या स्पर्धांमुळे किंवा मुद्दाम शिबीरं आयोजन करून देशातच उसळी घेणार्या खेळपट्ट्यांवर सराव मिळेल याची सोय करतां येईलच ना !>> भाऊ आता तुम्ही planning मधे शिरलात. BCCI ने शेवटचे असे planning कधी केल्याचे आठवते ? तसे असते तर हि वेळ आलीच नसती ना मूळात. बहुतेक वेळा आपले उपाय हे band aid स्वरुपाचे असतात ज्यांनी फायद्यापेक्षा नुक्सान अधिक होते. हॉकीही ह्याल अपवाद नाहि. वीस वर्षे गटांगळ्याच खातोय. वीस वर्षांमधे grass roots वर कुठे ना कुठे तरी turfs आली असतीच ना ?
परदेशातले लागोपाठ ७ कसोटी
परदेशातले लागोपाठ ७ कसोटी सामने हरायची ही काही पहिली वेळ नाही आणि शेवटची पण नसेल (ही वेळ शेवटचीच असावी अशी इच्छा आणि अपेक्षा आहे).
भारत १९५८-५९ मध्ये वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलियाविरूद्ध परदेशात प्रत्येकी ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळला होता. त्या १० कसोटींपैकी भारत ८ कसोटी सामने हरला होता.
नंतर १९६७ मध्ये पतौडी कर्णधार असताना भारत इंग्लंडमध्ये ०-३ आणि नंतर ऑस्ट्रेलियामध्ये ०-४ असे लागोपाठ ७ कसोटी सामने परदेशात हरला होता.
परदेशात लागोपाठ हरण्याची मालिका पुढच्या ४ थ्या कसोटीत खंडित होईल असे उगीचच वाटत आहे.
Pages