भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
चला २५/२ येरे माझ्या
चला २५/२ येरे माझ्या मागल्या......................
येरे येरे पाउसा
तुला देतो IPL चा पैसा
भारतीय संघ झाला खोटा
धोनी ला धरुन फोडा........
एकट्या धोनीलाच का?
एकट्या धोनीलाच का?
एकट्या धोनीलाच का? >> इन
एकट्या धोनीलाच का?
>>
इन फॉर्म बॅट्समन अश्विन ला बाहेर बसवून बॅटिंग वीक केली शिवाय बॉलिंग अॅटॅक मधली होती नव्हती ती व्हरायटी घालवली... अन विनय कुमारला दिवे लावायला चानूस दिला...
विराट कोहली ला बॅकिंग देताना इन फॉर्म रोहित शर्मा वर अन्याव केला... आता उद्या विराट खेळेल (पहिल्या इनिंगला खेळला तसा...) की चौथ्या टेस्टला जागा फिक्स...
चौथ्या टेस्ट ला शर्मा ला सीट मिळेल याची लक्ष्मण नी आज अंडी घालून आधीच तजवीज करून ठेवलिये...
आणि जर समजा काही चमत्कार झालाच... आणि उद्या पूर्ण दिवस द्रविड अन कोहलीनी खेळून काढला अन चुकून माकून आपण टेस्ट ड्रॉ वगैरे केली किंवा लढून वगैरे हरलो... तर धोणीच्या सर्व चुका पुन्हा एकवार लोकांच्या विस्मरणात...
वर्ल्डकप मधे नाही त्यानी फायनल मधे विनिंग नॉक खेळून आधीचा बकवास परफॉर्मन्स सगळ्यांना विसरायला लावला...
माझ्यामते सलामीची फलंदाजी
माझ्यामते सलामीची फलंदाजी अतिमहत्त्वाची.. पण सेहवाग पाय रोवून बसेल तर शप्पथ.. दोघेही पटकन आउट होउन प्रतिस्पर्ध्यांचा उत्साह वाढवतात.. मग नेहमीची गाथा !
भाउ चित्र छान. म्हंटल्याबरोबर
भाउ चित्र छान. म्हंटल्याबरोबर लगेच टाकलत. धन्यवाद. मी पण तुमच्यासारखाच क्रिकेटप्रेमी, पण मध्यंतरी तीस वर्षे क्रिकेटचे नावहि ऐकीवात नव्हते इकडे, आंतर्जालामुळे जरा जरा माहिती मिळते, तेव्हढीच.
<< चुकून माकून आपण टेस्ट ड्रॉ
<< चुकून माकून आपण टेस्ट ड्रॉ वगैरे केली किंवा लढून वगैरे हरलो... तर धोणीच्या सर्व चुका पुन्हा एकवार लोकांच्या विस्मरणात... >> कुणाच्याही कोंबड्याने का होईना, एकदां तरी उजाडूंदे !!!
अँकी नं.१, तुम्ही उल्लेखलेले सर्व निर्णय हे मैदानाबाहेर, सामन्याच्या आधी घेतलेले आहेत; खरंच ते फक्त एकट्या धोनीने घेऊन संघावर लादले होते ? प्रशिक्षक व संघातल्या सहकार्याना विश्वासात घेऊन, चर्चा करूनच आपण असले निर्णय घेतो असं धोनी जाहिरपणे वारंवार सांगत असतो व इतरानी तें कधीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे खोडलेलं नाही. आपण म्हणता तसे हे निर्णय चूकीचे असतीलही पण ते निर्णय कसे व कां घेतले गेले हे खात्रीपूर्वक समजल्याशिवाय धोनीवर हेत्वारोप करणं अन्यायाचं नाही होणार ? अश्विन संघात असूनही त्याला फार कमी वापरला तर धोनीकडे नक्कीच दोष जाईल पण त्याला संघातून वगळण्याचा दोष सर्वस्वी त्यालाच आत्तांच देतां येत नाही, असं आपलं मला वाटतं.
झक्कीसाहेब, कसचं, कसचं !!!
भारतीय क्रिकेट संघातल्या
भारतीय क्रिकेट संघातल्या खेळाडूंना बैल म्हटल्याबद्दल मी माफी मागतो.............बैलांची.
उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना पेश
उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना पेश करत पुनश्च भारतीय टीमचा डावाने पराभव... धोनी राजिनामा देतोय बहुतेक सिरीज संपल्यावर.. कदाचित फ्लेचरची पण हाकालपट्टी होऊ शकते... गॅरी कर्स्टननी कमावलेलं सगळंच दोन सिरीज मध्ये गमावलं...
सध्याची आपल्या टीमची परिस्थिती बेडकीसारखी झालीये... कितीही प्रयत्न केला तरी बैलाएवढं मोठं होता येतच नाहीये.... आणि येणारही नाहीये...
पुढच्या मॅच मध्ये लक्ष्मण आणि द्रवीड किंवा सेहवाग, गंभीर पैकी एकजण नक्की बाहेर ठेवायला पाहिजे......
आज द्रवीड ज्या पद्धतीने आऊट झालाय ते बघता वॉल पूर्णपणे ढासळलेली आहे हे नक्की झालेले आहे..
आनंद झाला...
आनंद झाला...
निगरगट्ट सेहवाग बेशरम गंभीर
निगरगट्ट सेहवाग






बेशरम गंभीर
नालायक सचिन
हरामखोर लक्ष्मण
निर्लज्ज धोनी
कोडगा इशांत शर्मा
आणि
मूर्ख विनयकुमार
यांचा जाहीर निषेध

धोनी, सेहवाग, गंभीर आणि लक्ष्मण यांना आता या क्षणी मिळेल त्या पहिल्या एस टी ने घरी हाकलून द्यायला पाहिजे. भारताची इतकी वाईट अवस्था यापूर्वी कधीच झाली नव्हती. अत्यंत निर्लज्जपणे संघात जागा अडवून बसलेल्या या चौघांना एस टी, सहा आसनी, वडाप अशा मिळेल त्या वाहनाने तातडीने हाकललं पाहिजे आणि चौथ्या सामन्यात त्यांच्या ऐवजी बुद्धिमान साहा, रहाणे, रोहीत शर्मा आणि अश्विन यांना आत आणले पाहिजे. विनयकुमार व इशांत शर्मा ऐवजी ओझा व अभिमन्यूला आत आणावे.
त्यांच्या बरोबरीने पैशावर डल्ला मारण्यासाठी बीसीसीआय मध्ये घुसलेल्या सर्व अपशकुनी पुढार्यांना तातडीने हाकललं पाहिजे आणि आयपीएल नावाचा तमाशा बंद केला पाहिजे.
From his vantage position
From his vantage position beyond mid-on, outside the boundary rope, former Indian batsman and coach Anshuman Gaekwad heard some words that caused some dismay.
It was a Deodhar Trophy match, a ball was hit towards him, and the man at midwicket chased it and finally dived. His captain at mid-on could have done this too, but he didn’t. The reason became clear when he admonished his teammate thus: “Are you mad, why are you diving? The IPL is coming, do you want to hurt yourself and miss it?”
Gaekwad says, “I said, what the hell man, is this what cricket has come to? I was shocked, all the more so because the two players are in the Indian team now.”
The incident could provide a clue as to why the Indian team hasn’t been having a good time of late. Humiliation in Tests in England and now Australia have soured the ODI World Cup victory. M.S. Dhoni and his men have been criticised for lacking the mettle to handle genuine speedsters, for being insipid, for putting club and money before country. But shouldn’t greater blame accrue to the temptor, the BCCI? For its baby—the Indian Premier League—has transformed the cricketing milieu and mindset, and is slowly strangulating Test cricket.
वरील परिच्छेदामध्ये अंशुमन गायकवाडने भारताच्या गंभीर आजाराचं अचूक निदान केलंय. संपूर्ण लेख इथे आहे.
http://www.outlookindia.com/article.aspx?279557
मास्तुरे.. जस्ट चील..
मास्तुरे.. जस्ट चील..
पुढच्या मॅचमध्ये सगळे सॉल्लिड खेळणारेत
द्रविड बिचारा !! स्टंप्स लपवूच कसा शकत नाही.. 
च्यायला . . . दोन्ही डावात
च्यायला . . . दोन्ही डावात फलंदाजी करून ११ फलंदाजांना मिळून फक्त ३६९ धावा पण नाही करता आल्या. दुसरा डाव म्हणजे पहिल्याची झेरॉक्स कॉपी होती.
पहिल्या डावात ४ बाद ६३ वरून ६८ ची भागीदारी आणि नंतर ४ बाद १३१ वरून पुढच्या १०.३ षटकांत उर्वरीत ६ फलंदाज बाद होऊन सर्वबाद १६१.
दुसर्या डावात ४ बाद ५१ वरून ८४ ची भागीदारी आणि नंतर ४ बाद १३५ वरून पुढच्या १२.४ षटकांत उर्वरीत ६ फलंदाज बाद होऊन सर्वबाद १७१.
लाजा कशा वाटत नाहीत यांना!
हिम्स, खरं तर वैयक्तीक
हिम्स,
खरं तर वैयक्तीक कामगिरी सर्वांचीच सुमार आहेच. द्रविड आणि सचिन फक्त याच मालिकेत अपयशी ठरले आहेत (ईतरांचे आकडे अजूनच वाईट आहेत खरे तर!) हेही खरे. ईं. मध्ये त्याच दोघांनी ईतरांपेक्षा चांगला खेळ केला होता.
वॉर्नर आपल्या संघाची लाँड्री धुवत होता तेव्हा त्याच्या धुपाटण्याला रोखायचे डावपेच सोडा निव्वळ धाडस करायलाही आपण धजलो नाही. फलंदाजी करताना सर्वांचे चेहेरे व देहबोली नकारात्मक आणि विफल वाटत होती.

पण मला तरी या सर्वामागे "संघभावनेचा अभाव" ही गोष्ट या मालिकेत सातत्याने जाणवली, तेही सर्व विभागात. धोणी ची एकंदरच देहबोली "कसोटी सामने" खेळण्यात स्वारस्य नसल्याप्रमाणे होती. याची कारणे अनेक असली तरिही मुळात घरच्या पाट्यावर जिथे चेंडू कमरेपेक्षा अधिक ऊसळत नाही तिथे सेहवाग, धोणी, गंभीर, यांचे सदोष तंत्र झाकले जाते. बाहेर विशेषतः ईं. ऑ, न्युझि, ईथे पितळ ऊघडे पडते.
आणि संघभावना ही अनुभव, तंत्र, निव्वळ एकत्र दौरे करणे याने येत नाही. त्यासाठी कोच, कॅप्टन यांची प्रमू़ख भूमिका असते. खेरीज आज मी झहीर खान असेन तर संपूर्ण मालिकेत घाम गाळून २००% दिल्यावर माझेच संघातील सहकारी त्यांची कामगिरी (फलंदाजी) चोख करू शकत नाहीत ही एक प्रचंड निराशादायक गोष्ट माझ्यातील संघभावनेवर अतीशय वाईट परिणाम करू शकते. हे ईं. पासून चालू आहे. मला वाटते नेमकी हेच झाले आहे. खेळाडूंचा एकमेकांबद्दलचा विश्वास, आदर संपुष्टात येत असल्याची चिन्हे या मालिकेत दिसतात. आणि त्यातही अनकालनीय डावपेच, चूकीची संघनिवड, अशा ईतर अनेक गोष्टींनी मुळातच पाया खचलेल्या संघाला अक्षरशः भगदाडे (सहा डावात) पाडली आहेत. द्रविड लागोपाठ सहा वेळा त्रिफळाचित होत असेल तर त्यामागे ऊत्कृष्ट गोलंदाजी आहे हे वादातीत असले तरी "बचावात्मक, नकारात्मक" मानसिकता दिसून येते. या मालिकेत सचिन बाद झाल्यावर आपले "शेपूट" सुरू झाले असे म्हटले तर वावगे ठरू नये, अपवाद आजची विराट कोहली ची खेळी!
बैलासारखी गोलंदाजी टाकणार्या ईशांत ला चार अनुभवाचे बोल मैदानावर सांगताना कुणी दिसले नाही. रणजीच्या लेव्हल ची गोलंदाजी करणार्या विनय कुमार ला (मुळात घेतलेच कशाला?) नेमकी कुठे टाप्पा व दिशा ठेवावी हे सांगणारे मैदानात कुणी दिसले नाही. नेहेमीप्रमाणे कोंडाळी करून डावपेच आखताना दिसले नाहीत; कमर्शियल ब्रेक मध्ये ते तसे करतात असे मला वाटत नाही!
मैदाना बाहेर हे सर्व फ्लेचर नको म्हणून चालू आहे का धोणी-नवे वि. जुने या मतभेदांमूळे,याकडे गंभीर पणे लक्ष देवून आता निवड समितीने कडक पावले ऊचलायलाच हवी आहेत. द्रविड, लक्षमण, सचिन यांना लोकांनी देव म्हणून लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. पण "विसर्जन" गणपती बाप्पाला देखिल चुकले नाही, तिथे हे तर निव्वळ माणसे आहेत!
As they say "every good thing has expiry date". We need to get back to manufacturing shop and make products with new expiry date!
Anyone still interested in that 100th 100....???
रच्याकने: काल पायचित बाद दिल्यावर सचिन चा राग हा अंपायर च्या निर्णयापेक्षा स्वताच्या अपयशाने व दबावाने हतबल झालेल्या फलंदाजाचा जास्त वाटला. पहिल्यांदाच काल सचिन मला सर्वात जास्त व्हलनरेबल वाटला! (डावखुरे स्विंग गोलंदाज आणि सचिन यांचे असेही वाकडेच आहे.. )
धोनी कसोटी सामन्यातला अत्यंत
धोनी कसोटी सामन्यातला अत्यंत वाईट कर्णधार आहे. त्याची तातडीने हकालपट्टी आवश्यक आहे. त्याला जनाची नाही तर निदान मनाची तरी असली तर तो आजच कर्णधारपदाचा राजीनामा देईल.
पहिल्या डावात ऑसीजची फलंदाजी सुरू असताना एकवेळ स्कोअर नाबाद १९५ होता व वॉर्नर १२५ वर खेळत होता. द्रविड काही कारणाने पॅव्हेलियनमध्ये गेला होता. सेहवाग, लक्ष्मण आणि सचिन हे स्लिपमधले नेहमीचे क्षेत्ररक्षक तिथे न ठेवता कोहली हा आउटफिल्डचा चपळ क्षेत्ररक्षक स्लिपमध्ये ठेवणे हा धोनीचा मूर्खपणा. झहीरच्या गोलंदाजीवर उडालेला वॉर्नरचा अत्यंत सोपा झेल कोहलीने टाकला व नंतर वॉर्नर १२५ वरून १८० पर्यंत पोचला. तो झेल घेतला असता तर ऑसीजचा डाव ३०० च्या आत संपला असता आणि निदान डावाने पराभव न होता कमी नामुष्कीचा पराभव झाला असता.
मास्तुरेंना संपूर्ण अनुमोदन.
मास्तुरेंना संपूर्ण अनुमोदन. हे सगळे कुठल्या यष्टीस्टँडवर उतरणार आहेत ते समजेल काय? मी जातीने सडलेली अंडी आणि टोमॅटो घेऊन स्वागतास जाईन म्हणतो.
खर्या अर्थाने संक्रांत साजरी
खर्या अर्थाने संक्रांत साजरी झाली...
वेल डन... अप्रतिम योग जुळवुन आणल्याबद्दल मनापासुन अभिनंदन....
असेच खेळा...दि्घायुषी व्हा...
उदय
उदय
झाली ना संक्रांत. तिळगूळ घ्या
झाली ना संक्रांत. तिळगूळ घ्या गोड गोड बोला. पुढच्या टेस्टमधे पण हरा.. पण जरा लाज राखून हरा.
एक आनंदाची व एक दु:खद
एक आनंदाची व एक दु:खद बातमी
http://www.espncricinfo.com/australia-v-india-2011/content/current/story...
पर्थ कसोटीत षटकांचा प्रतितास वेग कमी राखल्याने व गेल्या १२ महिन्यात असे दुसर्यांदा झाल्याने धोनीवर एक कसोटी सामन्याची बंदी आली आहे. त्यामुळे २४ जानेवारीपासून सुरू होणार्या अॅडलेड कसोटीत धोनी खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी बुद्धिमान साहा यष्टीरक्षण करण्याची शक्यता आहे. धोनी कसोटीतून बाहेर (निदान एका तरी) ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. पण दु:खद बातमी अशी की धोनीऐवजी सध्याचा उपकर्णधार सेहवाग हा कर्णधार असेल. म्हणजे या नालायकाला अजून एका कसोटीत खेळवावे लागणार.
>>पण दु:खद बातमी अशी की
>>पण दु:खद बातमी अशी की धोनीऐवजी सध्याचा उपकर्णधार सेहवाग हा कर्णधार असेल. म्हणजे या नालायकाला अजून एका कसोटीत खेळवावे लागणार.
बहुतेक लक्ष्मण पहिला नंबर
बहुतेक लक्ष्मण पहिला नंबर लावतोय
http://www.indianexpress.com/news/ordinary-run-ends-a-special-career-lax...
मास्तुरे.. हे म्हणजे आगीतून
मास्तुरे..
हे म्हणजे आगीतून फुफाट्यात झाले..
असो.
बिसिसीआय ने लक्षमण ला ईंग्लंड च्या दौर्यानंतरच खरे तर डच्चू किंवा कल्पना द्यायला हवी होती की बाबारे ही तुझी शेवटची मालिका.. निदान सन्मानाने निवृत्त होवू शकशील असे तरी खेळ. कदाचित ते मोटीवेशन/धाक कामी आला असता. पण आता त्याला संघात घेतलाच तर किमान "डबल डिजीट" धावसंख्या करून शेवटच्या सामन्यात निवृत्त व्हायची संधी द्यायला हवी. ईतके वर्षे त्याने ऑ. वि. आपल्या साठी लक्षमण रेषा काढली, he deserves another opportunity to draw the line by himself, for one last time!! As it is series is lost and all that talks of team and country before an individual are bit redundant at this point, esp. in this series, so might as well have Laxamn choose the way he wants to bid farewell!
मला खात्री (शंका) आहे की त्यासाठी सचिन, द्रविड, धोणी देखिल आपला शब्द टाकतील आणि कुणाला तरी ईंज्युरड दाखवून लक्षमण ला आत ठेवले जाईल. असेही काहीच फरक पडत नाही.
बाकी सचिन या शेवटच्या सामन्यात शतक नक्की करणार नाही.. का ते मी वेगळे सांगायला नको
त्या सचिनला घरी बसवायला हवे
त्या सचिनला घरी बसवायला हवे तो आता देशापेक्षा मोठा व्हायला बघतोय.ढोणी हा बोलुन चालुन बिहारी. सेहवाग आणि युवराज यांनी पब कल्चर टिममध्ये आणले आहे त्यांनापण आता श्रीफळ द्यायला हवे.
>>>>एक आनंदाची व एक दु:खद
>>>>एक आनंदाची व एक दु:खद बातमी
http://www.espncricinfo.com/australia-v-india-2011/content/current/story...
पर्थ कसोटीत षटकांचा प्रतितास वेग कमी राखल्याने व गेल्या १२ महिन्यात असे दुसर्यांदा झाल्याने धोनीवर एक कसोटी सामन्याची बंदी आली आहे. त्यामुळे २४ जानेवारीपासून सुरू होणार्या अॅडलेड कसोटीत धोनी खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी बुद्धिमान साहा यष्टीरक्षण करण्याची शक्यता आहे. धोनी कसोटीतून बाहेर (निदान एका तरी) ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. पण दु:खद बातमी अशी की धोनीऐवजी सध्याचा उपकर्णधार सेहवाग हा कर्णधार असेल. म्हणजे या नालायकाला अजून एका कसोटीत खेळवावे लागणार. >>>>>>
मास्तुरे.. मला खरे तर आपले मनापासून अभिनंदन करावेसे वाटते. कारण इं. (४-०) व आता ऑ. मध्ये आजपर्यंत ३-० (कदाचीत अजुन ८-१० दिवसांनी ४-०) अशी लागोपाठ (मी साधारणपणे १९७७-७८ पासून क्रिकेटची कॉमेंट्री ऐकत आलो आहे, माझ्या आठवणीनुसार लागोपाठ्च्या परदेशी दौ-यांवर हा सर्वात वाईट परफॉर्मंन्स आहे) धुलाइ होउनसुध्या आपण ज्या उत्साहाने पुढील सामन्याकडे पाहता, त्यामधील १०% पॉझीटीव्हनेस जरी सध्याच्या भारतीय संघामध्ये असता व जर काही प्रमाणात तरी आत्मसम्मान व देशप्रेम शील्लक असते तर परकीय देशात अशी हालत झाली नसती. एकवेळ आत्मसम्मान, देशप्रेम वगैरे सोडून देउ, पण देशातील कोट्यावधी क्रिकेटरसिकांना निराशेच्या गर्तेत ढकलायचे तरी थांबवावे. किंवा आपण सर्व क्रिकेट्प्रेमींनी विनाकारण आशा लावुन बसणे तरी थांबवुया व हेच आजच्या संक्रातीचे सिमोल्लंघन समजुयात.
कारण सध्या पूर्वीच्या खेळाडुंना जसे कीरकोळ पैसे मिळायचे तसे आतच्या खेळाडूंचे निश्चीतच नाही. कारण विनयकुमारसारखा नुकताच १ कसोटी खेळलेलासुध्धा करोडपती असेल ( thanks to IPL / various Advertisements etc. etc.) त्यामुळे भारत जिंकला काय व हरला काय असे कोट्यावधी रसीकांच्या जिव्हाळ्याचे वाटणारे विषय एखाद्या नवशीक्या खेळाडूच्या द्रुष्टीनेदेखील नगण्य होतात. कारण नॅशनल टीममध्ये जागा मीळो कींवा नको आय.पी.एल. चा ३ वर्षांचा करार पदरात पडला की आयुष्याचे सोने झाले. - अतुल
>>>खर्या अर्थाने संक्रांत साजरी झाली...
वेल डन... अप्रतिम योग जुळवुन आणल्याबद्दल मनापासुन अभिनंदन....
असेच खेळा...दि्घायुषी व्हा...>>
>>>झाली ना संक्रांत. तिळगूळ घ्या गोड गोड बोला. पुढच्या टेस्टमधे पण हरा.. पण जरा लाज राखून हरा. >>> उदय व नंदिनी यांना २००% अनुमोदन.
"भिंत" द्रविडचा एक नवाच
"भिंत" द्रविडचा एक नवाच विक्रम आता पोतडीतून बाहेर आला. गेल्या दहा डावापैकी आठ डावात 'त्रिफळाचित' झाला आहे पठ्ठ्या. शिवाय स्टीव्ह वॉचा आतापर्यंतचा ५४ वेळा 'त्रिफळाचित' झालेला फलंदाज हा 'विक्रम' राहुलबाबाने त्रिफळ्याची ५५ नंबरी खेळी करून मागे टाकला.
[कुठेतरी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहोत.]
>>>"भिंत" द्रविडचा एक नवाच
>>>"भिंत" द्रविडचा एक नवाच विक्रम आता पोतडीतून बाहेर आला. गेल्या दहा डावापैकी आठ डावात 'त्रिफळाचित' झाला आहे पठ्ठ्या. शिवाय स्टीव्ह वॉचा आतापर्यंतचा ५४ वेळा 'त्रिफळाचित' झालेला फलंदाज हा 'विक्रम' राहुलबाबाने त्रिफळ्याची ५५ नंबरी खेळी करून मागे टाकला. >>>>>
अशोक, हा विक्रम स्टीव्ह वॉचा नसून अॅलन बोर्डरचा आहे. आणी बोर्डर ५३ वेळा क्लिन बोल्ड झाला असुन आपली भिंत - राहुल आता ५४ वेळा बोल्ड होऊन विक्रमाचा मानकरी ठरला / ली आहे.
>>>कुठेतरी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहोत->> हे मात्र सहीच बोर्डर काय किंवा वॉ काय - अतुल
बीसीसीआय मध्ये घुसलेल्या सर्व
बीसीसीआय मध्ये घुसलेल्या सर्व अपशकुनी पुढार्यांना
>>
अच्छा , खरं दुखणं इथं आहे तर तुमचं !
दुसरा डाव म्हणजे पहिल्याची
दुसरा डाव म्हणजे पहिल्याची झेरॉक्स कॉपी होती.
>>
अगदी अगदी !!
आणि तिसरी टेस्ट ही दुसरीची ...
Sorry for the minglish
Sorry for the minglish post:
I think it is simple: No matter How Great they are, and they will remain so in the "history" of the game, Sachin, Dravid, Laxman are NO longer capable of "forcing any results" or "chanigng the course of the game" esp. on away soil, in Test Matches. Something they were able to do collectively in previous outings, which helped the Team win to a greater extent. In contrast, Zahir has still proven to be the bowler who can "change the game" when needed and continues to do that.
Sehavag and Dhoni should be sacked from Tests, period. Both neither have technic nor temparament for this form of the game. I agree that to certain extent Dhoni is too over used, tired, and made junk as he almost played every match being wc/captain. The machine has finally broken down. Re sahavaag one can only say "aakhir dudh kaa dudh ho hi gayaa".
I had already said in the beginning that Laxman would likely announce his retirement at the end of this series, didn' think he would be forced too!
I wonder if BCCI had put conditions in IPL contract that "Test Performance" (over the year or semi annual) will be measured to revise the package, if all these so called Great plyares would have signed the same? The case is as optimistic as BCCI drafting such contract in first place. It is in business of making money and not building cricket, so the conglomerate will never try to shoot in their own foot.
IPL is necessary devil in quickly finding and recognizing the talent, but it is the same devil that can kill the same talent in short time for simply the money and everything else other than cricket that it provides!
It should be simple old school: Do Well, Show Performance, Get Paid! Fair to everyone.
Englnad was a wake up call, where we chose to press the "snooze" button. In Australia the Nightmare seems to be never ending. I am sure Vinay Kumar will quickly forget about WackWarner
and sleep well with upcoming IPL season
so should we. 
btw: Seeing Laxmans belly dropping below the center guard, reminded me of Arjuan Ranatunga. The only difference- he used it to better extent! NO harm if Dravid was clean bowled 54/55 times, every time it is "ball". In his case 48 times the best cricket ball one could have ever faced, recently (6 times) it is more to do with his "eye" balls. In any sport, the game will always catch up with your age.
Pages