भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रग्यान ओझाला ४ थ्या कसोटीतही खेळविले नाही. या संपूर्ण मालिकेत आणि इंग्लडच्या मालिकेतही त्याला बाकावरच बसवून ठेवले. त्याला एकदिवसीय संघातही घेतलेले नाही. याउलट अत्यंत टुकार गोलंदाजी करणार्‍या इशांत शर्माला मात्र दोन्ही मालिकेतले सर्व सामने खेळायला मिळाले. निदान या सामन्यात तरी इशांतऐवजी ओझाला घेण्याचा प्रयोग करायला पाहिजे होता. पण चक्रमादित्य धोनी/सेहवाग आपल्या इशांतप्रेमाचा हट्ट सोडायला तयार नाहीत.

आयला, कंटाळा आला. काल जरा छान वाटत होते हूक शॉट, कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह बघायला. पण आज आपले परत तेच! अगदी सरळ बॅट. कुठे सिक्स नाही, कुठे झेल नाही, कुठे एल बी डब्ल्यू नाही. धावबाद होण्याचा तर प्रश्नच नाही! शेवटी इशानला झेल दिला तर त्याचा विश्वासच बसेना! झेल घेणेच विसरून गेला होता तो. म्हणून त्याने तो सोडून दिला!
अहो दोनशे झाल्या क्लार्कच्या नि आता पाँटिंगच्या पण होतील लवकरच! किती वेळ तेच तेच!!

त्यापेक्षा आपले फलंदाज बरे. तास दीड तासात काय निरनिराळे शॉट्स येत असतील ते दाखवतात, चाळीस पन्नास धावा काढून परत!. थोड्यात गोडी. अति झाले की कंटाळा येतो!
आपल्याला तेव्हढे पुरते, त्याची आठवण काढून आपण अनेक वर्षे त्याच त्याच लोकांचे गोडवे गात बसतो.

आत्ताच रेडियोवर मुंबई स्टेशनच्या मराठी बातम्या कानावर आल्या " ...आणि यादवने आज ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला क्लार्कचा बळी घेऊन ... "
हम कुछ नही कहेते ! Sad

<< गंभीरने खरच धक्का दिला >> हिम्सकूलजी, आतां आपल्या फलंदाजानी थोडे तरी आनंदाश्चर्याचे धक्के आज आम्हाला द्यावे, एवढीच माफक अपेक्षा !!

धन्य तो अश्विन अन धन्य त्याची गोलंदाजी. ह्या टेस्ट मध्ये एका ओव्हरला सिली पाँईट अन लगेच दुसर्‍या (त्याच्याच) ओव्हरला फॉरवर्ड शॉट लेग . नेमका कोणता डाव होत हे कळत नव्हते.

<< जाहिरात क्षेत्रातील मॉडेल्सना क्रिकेट संघात घेतल्यावर हेच होणार की? >> पण बेफिकीरजी, क्रिकेट क्षेत्रातील खेळाडूना जाहिरात क्षेत्रात घेतल्याने त्या क्षेत्राची अशी अधोगती झालेली दिसत नाही !! कीं, ती आधीच झाली असल्याने कांही फरक पडला नाही ? Wink

" आज वेळ न दवडता डाव घोषित करणं आवश्यक आहे कारण या निर्जीव खेळपट्टीवर जिंकण्यासाठी
२० बळी मिळवणं खरंच कठीण आहे ", इति पाँटींग. हे आपल्या गोलंदाजांचं सांत्वन समजायचं कीं आपल्या फलंदाजीबद्दल अजूनही शिल्लक असलेला विश्वास ? Wink

भारत - ६२-२. पाँटींगला विरुद्ध संघाची नाडी ओळखतां येत नाही, म्हणूनच तर कप्तानपद त्याच्याकडून हिरावून घेतल नसेल ना? Wink

अपेक्षेप्रमाणे सेहवागने लवकर बाद होऊन भारतीयांना अपेक्षाभंगाचे दु:ख दिले नाही याबद्दल त्याचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. द्रविड पुन्हा एकदा त्रिफळाचित झाल्याने त्याच्याबद्दल अतिशय वाईट वाटत आहे. त्याच्या दैदिप्यमान कारकीर्दीच्या अखेरीला अशी वाईट अवस्था होईल असे कधी वाटले नव्हते. या कसोटीत सेहवाग, गंभीर, लक्ष्मण, धोनी, विनयकुमार व इशांत शर्माची हकालपट्टी आवश्यक होती. सुदैवाने धोनीवर एका सामन्याची बंदी आली आणि विनयकुमारला बाहेर ठेवले. पण आपल्याला घेऊन भारताने घोडचूक केली आहे, हे इशांत आणि सेहवागने पुन्हा एकदा निर्विवाद सिद्ध केले. वारंवार अपयशी ठरून सुद्धा इशांत संघात कसा हे कोडे कधी उलगडेल असे वाटत नाही. रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, ओझा आणि अभिमन्यू मिथुनला चारही कसोटीत बाकावर बसवून ठेवणे आणि सेहवाग, इशांत पूर्ण फ्लॉप खेळाडूंना चारही कसोटी खेळविणे याबद्दल धोनीचे त्रिवार अभिनंदन!

बहुतेक ही कसोटी ३ ऐवजी ४ दिवसात संपेल, कारण उद्या एका दिवसात भारताचे १८ खेळाडू बाद होणे अवघड वाटते. उद्या दिवसअखेर भारताचे फार तर १५-१६ खेळाडू बाद होतील. उरलेल्या २-३ खेळाडूंसाठी ४ थ्या दिवशी भारत ऑस्ट्रेलियाला किमान तासभर तरी झुंझवणारच!!!

द्रविड पुन्हा एकदा त्रिफळाचित झाल्याने त्याच्याबद्दल अतिशय वाईट वाटत आहे>>>>
नवभारत टाइम्स वर आपल्या इन्निन्गच लाइव्ह स्कोरकार्ड बघताना मला वाटल मी चुकुन मागच्या मॅचच बघतोय. (किती ते स्वप्न) Proud
राहुल द्रविड परत त्रिफळा. क्रॉसचेक करायला म्हणुन ऑसीजच स्कोरकार्ड पाहिलं तर दोघांच्या डबल सेन्च्युरी बघुन त्या दोघानी डबल चिमटा घेतल्यासारखा जागा झालो.

सध्या द्रवीड स्टंप उघडे टाकून खेळतो की काय? Proud

>> एका दिवसात भारताचे १८ खेळाडू बाद होणे अवघड वाटते.
मास्तरा, परत एकदा दात घशात घालून घ्यायचे आहेत वाटतं? Proud

लोक्स,
अजून फॉलो (ऑन) करताय.. ? कमाल आहे! चिवट्ट भारीच मायबोलीकरस.. Happy
असो. "या" भारतीय संघाविरुध्द कसोटी सामने खेळायला जगातील बर्‍याच लिंबूटींबू संघांनी आपल्या बोर्डाकडे हट्ट धरला आहे म्हणे! त्यांना कसोटी खेळणार्‍या देशांच्या यादीत स्थान हवे आहे Happy
शिवाय द्रविड दुसर्‍या डावात कसा बाद होईल यावर सट्टा लागला आहे म्हणे.

चौथा कसोटी सामना किती दिवसात ऊरकेल असा ईथल्या जाणकारांचा होरा आहे?
(मास्तुरे हे जाणकार नाहीत हे त्यांनी आधीच सिध्द केलय..) Happy

>>धन्य तो अश्विन अन धन्य त्याची गोलंदाजी
अलिकडे त्याचा हातच जास्ती वळतोय (विचीत्र अ‍ॅक्शन आहे!) चेंडू मात्र वळेना..

सध्या श्रीलंकेचे, महिला जयवर्धने आणि इतर काही मुख्य खेळाडू फ्लॉप जात आहेत. परत फॉर्मात येण्यासाठी आणि आपला वैयक्तिक करीअर बेस्ट परफॉर्मन्स करण्यासाठी भारताविरूद्धचे ४ एकदिवसीय सामने ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. पाँटिंग, कारकून, हसी इ. अपयशी ठरत असलेल्या खेळाडूंनी भारताविरूध्द जबरदस्त चंगळ केली. श्रीलंकेने त्यांच्यापासूनच स्फूर्ती घेतली असणार.

>>> धन्य तो अश्विन अन धन्य त्याची गोलंदाजी

अश्विनचे क्षेत्ररक्षण आणि धावा घेताना 'रनिंग बिटवीन द विकेट्स' सुद्धा जबरदस्त आहे. इतरांसारखी तो बॅट जमिनीवर घासत न नेता हवेतच लोंबकाळत नेतो. सचिन धाव घेताना त्याची स्लो मोशनमधली क्लिप आणि अश्विन धाव घेताना नेहमीच्या स्पीडने दाखवलेल्या क्लिपमध्ये दोघांचा वेग सारखाच दिसतो. कदाचित सचिन थोडा जास्तच वेगात धावत असेल.

<< ... सचिन धाव घेताना त्याची स्लो मोशनमधली क्लिप आणि अश्विन धाव घेताना ....>> मास्तुरेजी, नकळत तुम्ही आपल्या संघाच्या एका पारंपारिक सर्वसाधारण गुणविशेषावर बोट ठेवलंय ; क्लिअर डिव्हीजन ऑफ लेबर ! बॅटसमननी बॅटींग करावी , गोलंदाजानी गोलंदाजी ;एकमेकानी दुसर्‍याच्या क्षेत्रात नसती ढवळाढवळ नाही करायची !!! निवडसमितीही एखादा [ बहुतेक सगळेच ] गोलंदाज विकेट फेकून दांत विचकत परतला, तरीही त्याचे मार्क कांही कमी करत नाहीच !!! कुंबळेसारखा एखादा मूर्खासारखा जिद्दीने फलंदाजी करतो, तिकडे दुर्लक्ष करावं, झालं .

काय कृतघ्न लोक आहेत इथले.! जेव्हा भरभरून धावांचे आणि विकेटींचे रतीब घातले तेव्हाच तुम्हीच त्यांची तोंड फाटेपर्यन्त स्तुती केली होती ना? तुम्हीच ना? त्यावेळी धावांचे तोबरे तुम्हालाच भरवले होते ना त्यानी? तुम्हालाच ना? आणि विश्वकपाचा अमृतकुम्भ तुम्हीच ढोसला होतात ना? तुम्हीच ना....

मग आता जरासा 'मधु आटला ' तर केवढी बोम्बाबोम्ब? म्हणे नवीन खेळाडू घ्या... अरे बायको म्हातारी झाली म्हणजे काही 'कामाची' नाही म्हणून सोडून द्याल की काय रे ? कृतघ्नानो !!

शेतकरी देखील घरच्या गाइपासून झालेला बैल स्वतःच्या दावणीलाच मरू देतो , पण विकीत नाही.
आपल्या बैलांवर प्रेम करा रे !!! Proud

मास्तुरे तुम्ही इथे नित्य नेमाने इशांतला शिव्या घालत असता नि तिथे cricinfo वाले त्याच्या intensity, commitment चे कौतुक करत असतात. Do you guys watch same game ? Lol

http://www.espncricinfo.com/australia-v-india-2011/content/current/story...

भारत - १२२ - Sad Sad Sad Sad Sad !!!!!
प्रजासत्ताकदिनीच २० 'तोफां'ची सलामी ऑस्ट्रेलियात ?

मास्तुरे तुम्ही इथे नित्य नेमाने इशांतला शिव्या घालत असता नि तिथे cricinfo वाले त्याच्या intensity, commitment चे कौतुक करत असतात. Do you guys watch same game

>>

मास्तराने आता आट्यापाट्या किंवा लंगडीवर मतप्रदर्शन करावे हे बरे ..... Proud

भारताने चक्क दोनशेचा टप्पा ओलांडला , हा भारताचा नैतिक विजय आहे तांत्रिक विजय कोणाचा का होइना...

मूर्ख कोहलीला शतक काढण्याची दुर्बुद्धी झालीय....

<< मूर्ख कोहलीला शतक काढण्याची दुर्बुद्धी झालीय.... >> कोणाच्याही कोंबड्याने उजाडल्याशी कारण !!!! Wink
<< तिथे cricinfo वाले त्याच्या intensity, commitment चे कौतुक करत असतात. Do you guys watch same game >> म्हणजे cricinfo वाले म्हणतात तेंच ब्रह्मवाक्य समजायचं कीं काय ! असतीलही ते शहाणे पण म्हणून काय आम्ही सगळ्यानी डोक्याला व तोंडाला कुलूप लावून क्रिकेट बघायचं ? जमणार नाही ! Wink

Pages